निवृत्ती डोळे उघडून आजूबाजूला बघते तर तिच्या मनात भीतीची लहर येते..
निवृत्ती मनात घाबरून " मी.. मी.. इथे कशी आली , त्या सरड्याने मला इथे बघितल तर.. नको मला कोणी मोठ्या आवाजात बोलल की भीती वाटते.. तो सरडा इथे यायच्या आत मला इथून उठाव लागेल..."
( तिला अजुन त्याने नक्की कुठे राहायच हे सांगितल नाही ना त्याने...)
निवृत्ती बेडवरून उठणार तर तिला आवाज येतो..
" वहिनी... " निवृत्ती आवाजाच्या दिशेने बघते तर बेडरूम च्या दाराजवळ निव्या आणि विष्णू उभे होते...
निवृत्ती " अरे तुम्ही दोघ..."
( निवृत्ती आणि वंश या दोघांच्या लग्ना मध्ये या तिघांची चांगली गट्टी जमली होती..)
निव्या " हो.. आम्ही बघायला आलो होतो की तू आता कस फिल करतेय.. मग कस वाटत आहे आता तुला..."
निवृत्ती " मला कुठे काय झाल आहे मी तर बरी आहे.. "
विष्णू " तुझ्या चेहरा बघून वाटत आहे बरी नाही तू , तुझा चेहरा अजुन थकल्यासारख वाटतोय..."
निवृत्ती " अरे पण मला काय झाल आहे..."
निव्या " वहिनी तू काल रात्री कुठे झोपली होतीस सांगशील जरा..."
निवृत्ती अडखळत " ह... ते.. ते.. मी..."
निव्या " थांब मीच सांगते... वहिनी तू काल रात्रभर गार्डन मध्ये होतीस , तेही भर थंडीमध्ये... आज सकाळी मी आणि विष्णू वॉक ला आलो तेव्हा तुला बेशुध्द अवस्थेत पाहिल आणि वरून कुडकुडत होतीस.. आम्ही किती घाबरलो माहिती का , मग एका बॉडगार्ड काकांची मदत घेऊन आणल माझ्या बेडरूममध्ये..."
निवृत्ती मनात " म्हणजे मी निव्या च्या रूम मध्ये होती यांच्या नाही... हुश वाचले मला वाटल मी झोपेतून यांच्या रूम मध्ये आली की काय... पण शोकिंग हे आहे की मी खरच एकाच जागेवर झोपून होती पण कस , कदाचित मी रात्रीपासून बेशुध्द असेल... "
निवृत्ती आपल्याच विश्वात रमली असताना तिला निव्या हलवून भानावर आणते " वहिनी कुठे हरवलात , कधीची आवाज देत होते... "
निवृत्ती भानावर येत " ह.. ते सॉरी मला वाटल ही रूम त्यांची आहे , आणि चुकून मी त्यांच्या रूम मध्ये..."
विष्णू " समजल वहिनी , रात्री काय झाल असेल याचा अंदाज आहे आम्हाला.. म्हणून निव्या आणि मी तुला दुसरी रूम दाखवायला आलेलो.. दादाच्या रूम चा दरवाजा वाजवला होता त्याने उघडलाच नाही , वाटल झोपला असेल तुला बाहेर काढून.. मग आम्ही सगळीकडे शोधल तर तू सापडली च नाही , नंतर रमा काकांकडून ( नोकर ) समजल की तू गेस्ट रूम च्या इथे जाताना दिसली वाटल तिथेच गेस्ट रूम मध्ये गेली असणार सो तुला त्रास नको म्हणून नाही गेलो... पण तू तर गार्डनमध्ये.."
निवृत्ती " हम.. एक्च्युअली मला कोणी मोठ्या आवाजात बोलल की भीती वाटते , त्या मिस्टर ॲटीट्यूड ने अस मोठ्या आवाजात बोलण्याने मी घाबरली आणि रडायला लागले , वरून नको नको ते बोलत होते म्हणून मी तडक त्यांच्या रूम मधून पळून आले आणि इथे तिथे न बघता सरळ बाहेर आले.. कदाचित मला रमा काकांनी त्या दिशेने जाताना बघितल असेल म्हणून तुम्हाला वाटल की मी गेस्ट रूम मध्ये आहे..."
निव्या " ओह अस झाल तर... वहिनी आता तुला गेस्ट रूम मध्ये राहायची गरज नाही , तू माझ्या बेडरूम मध्ये राहू शकते... "
निवृत्ती " अग पण... "
निव्या " वहिनी पण बिन काही नाही तू माझ्या बेरूममध्ये राहणार म्हणजे राहणार दॅट इज फायनल... नाही तर मी बोलणारच नाही... " एवढ बोलून निव्या ने तोंड फुगवल..
निव्या च पडलेल तोंड बघून निवृत्ती ने तिच्या सोबत बेडरूम मध्ये राहायला होकार...
तशी निव्या खुश होत " येस.. ये हुई ना बात...चला आता नाष्टा करून घ्या मग गोळ्या सुध्दा खायच्या आहेत... तस वहिनी मिस्टर ॲटीट्यूड छान नाव आहे हा.. "
निवृत्ती " मग काय नुसत ॲटीट्यूड भरलेल असत अशा माणसाला कोण भाव देतय , तसही एका वर्षात मी मोकळी होणार आणि मग मी हे शहर सोडून खूप दूर निघून जाणार , त्या काळया नरकातून सुध्दा..."
निवृत्ती च बोलण ऐकून तीन जणाच्या काळजात धस्स झाल... ( तिसर कोण समजेल पुढे...🤭 )
मुंबई , विलेपार्ले
एके ठिकाणी बाहेरून ती छोटी खोली आणि आत एकदम प्रशस्त दिसत होती... त्यात एक वर्ष मावणार अश्या सगळ्या सोयी सुविधा होत्या..
त्याच खोलीत एका कोपऱ्यात एका वयस्कर बाईला साखळ्या ने बांधून ठेवल होत आणि ती बाई वेड्यासारखी ओरडत होती जणू तिच मानसिक संतुलन बिघडल होत...
ती बाई वेड्यासारखी हसत " हा.. हा... हा... मी सोडणार नाही कोणाला नाही सोडणार एकेकाला मारून टाकेन.. हा.. हा.. हा... " असच काही बडबडत होती...
इथे त्याच खोलीच्या बाहेर लागून एक दुसरी खोली होती जिथे चार हट्टकट्टे माणस समोर असलेल्या कॉम्प्युटर स्क्रीन मध्ये त्या बाईला अस वेड्यासारख करताना शांतपणे बघत होते.. त्यांच्या चेहऱ्यावर त्या बाईच्या प्रती कोणतीच काळजी दिसत नव्हती त्यांना फरक च पडत नव्हता.. ते फक्त शांतपणे त्या स्क्रीनकडे बघत होते... ती खोली साऊंड प्रूफ असल्याने बाहेर कोणाला समजणार पण नव्हत की आत काय चालू आहे...
ती बाई बडबडत असताना कोणीतरी त्या खोलीत येत , त्या बुटाच्या आवाजाने ती बाई शांत होत त्या व्यक्ती कडे बघते आणि त्या व्यक्तीला बघून घाबरून च जोरात किंचाळते...
त्या बाईच्या किंचाळण्याने ती व्यक्ती दोन्ही कानावर हात ठेवून त्याच्या सोबत आलेल्या व्यक्तीला जोरात ओरडत " हे मला बघत काय बसला आहेस , इंजेक्शन दे तिला लवकर... "
तसा तो व्यक्ती पटकन त्या बाईला इंजेक्शन देतो , इंजेक्शन दिल्यावर ती बाई हळू हळू बेशुध्द होऊ लागते..
ती बेशुद्ध झाल्यावर तो व्यक्ती बाजूच्या खोलीत जातो जिथे चार माणस असतात..
त्या खोलीत आल्यावर तो व्यक्ती त्या चार जणांना थंड आवाजात " शुध्दीवर आली की माहीत आहे ना काय करायच.. " त्या व्यक्तीच बोलण ऐकून हे चार जण मान हलवून होकार देतात...
तो व्यक्ती त्यांना सूचना देऊन पुढे जातो.. त्या व्यक्तीला पुढे गेलेले बघून त्या चार जणांमधून एक जण हळू आवाजात दुसऱ्याला " एवढ च करायच आहे तर एकदाच मारून टाकायच ना , कशाला उगाच टाईमपास.. "
तो माणूस हळू आवाजात बोलत असला तरी त्या व्यक्तीच्या तीक्ष्ण कानाने ते ऐकल आणि एका सेकंदात तो माणूस जागीच मृत्यू पावला , तसे बाकीच्या तीन जणाचे डोळे मोठे झाले.. त्या व्यक्तीने त्या माणसाच्या छातीवर गोळी झाडली होती...
तो व्यक्ती त्या तीन माणसाला कडक आवाजात " माझ्या प्लॅन मध्ये कोणी इंटरफीअर केल तर त्याची हालत अशी होईल लक्षात ठेवा... दुसऱ्या माणसाची सोय करा लगेच...आणि ( त्या मारलेल्या माणसाकडे बघत ) याच नामोनिशाण मिटवा याच एक हाड पण सापडल नाही पाहिजे..."
ते तिघ एकत्र " हो बॉस... "
तो व्यक्ती त्या खोलीतून निघून गेल्यावर ते तिघ त्या डेड बॉडी ची व्यवस्था करण्यात बिझी झाले.. बोलत बसलो तर माहीत नाही आपल काही खर नाही ही भीती ठेवून...
तो व्यक्ती त्या बाहेर आला तस त्याने लगेच कोणाला तरी कॉल केला..
पलीकडून कॉल उचल्यावर " हॅलो... "
तो व्यक्ती " सापडले का ते दोघ.. "
पलीकडून " नाही बॉस त्यांना शोधण खूप अवघड आहे.."
तो व्यक्ती " मला कारण नकोत तुझी लवकरात लवकर शोध त्यांना , नाही तर तुझी अशी हालत करेन की तू कोणाला सापडणार नाही समजल... "
पलीकडून घाबरत " हो.. हो.. बॉस मी प्रयत्न करतोय..."
तो व्यक्ती " प्रयत्न नकोत मला कोणत्याही किमतीत मला ते हवेत समजल ..."
पलीकडून काही बोलणार त्या अगोदर च त्या व्यक्तीने कॉल कट केला आणि आपली कार घेऊन कुठे तरी निघून गेला...
मुंबई मध्ये दूरवर एके ठिकणी....
अमृता बिल्डिंग...
दोन वयस्कर व्यक्ती आपल्या बेडरूम मध्ये झोपले अचानक एक व्यक्ती झोपेतून ओरडत " निवृत्ती..."
क्रमशः
- भाग्यश्री परब