साई बिल्डिंग...
एका बेडरूम मध्ये दोन व्यक्ती झोपलेले असतात , अचानक एक बाई झोपेतून उठून ओरडते " निवृत्ती.."
त्या बाईचा आवाज ऐकुन त्यांच्या बाजूला झोपलेला व्यक्ती उठत " काय झाल स्वाती ओरडली का.."
स्वाती अडखळत "साहिल ते.. ते.. "
साहिल " श.. शांत हो आधी पाणी पी घे.." बाजूच्या टेबलवर ठेवलेल पाणी स्वाती देत...
स्वाती पाणी पिऊन स्वतःला शांत करते , स्वाती शांत झाल्यावर साहिल " वाईट स्वप्न बघितल का कुठल..."
स्वाती " हो... ते निवृत्ती ला कोणीतरी मारल , सोबत तिच्या शरीराला कुठे तरी..."
साहिल डोळे मोठे करून " काय.. अस कस शक्य आहे निवृत्ती ला जाऊन तर वीस वर्ष झाली , मेलेल्या व्यक्तीच कस स्वप्न पडू शकत..."
स्वाती " नाही आपली निवू नाही मेली , ती.. ती... जिवंत आहे... ती जिवंत आहे..." एवढ बोलून स्वाती अचानक बेशुध्द होते...
स्वाती ला अस बेशुध्द झालेल बघून साहिल घाबरला तो घाबरतच तिच्या गालावर थोपटत " हे स्वाती उठ काय झाल... ह.. पाणी.. पाणी.."
पटकन पाणी स्वाती च्या गालावर शिंपडल तरीही स्वाती शुध्दीवर येत नव्हती...
साहिल ला स्वातीला अस बघून जीव घाबराघुबरा झालेला त्याला काय करू काय नको काहीच सूचत नव्हत...
साहिल थोड स्वतःला शांत करत पटकन डॉक्टर ला कॉल केला...
डॉक्टर ने कॉल उचलल्या उचलल्या साहिल " हॅलो.. हॅलो डॉक्टर माझी वाइफ बेशुध्द झालीय प्लीज लवकर या.. "
डॉक्टर " तुम्ही काळजी करू नका आलो मी लगेच..."
डॉक्टरांशी बोलून झाल्यावर साहिल डॉक्टर येईपर्यंत स्वातीच्या उशाशी बसून राहिला...
जीवनश्री बंगलो...
निवृत्ती पटपट आवरून लगेच किचन चा ताबा घेते.. सॉरी जे बोलायच होत तिच्या स्टाईल ने ✨....
थोड्या वेळाने सगळेच डायनिंग टेबलवर जमा होतात , तशी मेड सर्वांना नाष्टा सर्व्ह करते..
निव्या निवृत्ती ला अस कोपऱ्यात उभे असलेले बघून " निवु ताई तिथे का उभी आहे , तू पण ये ना आमच्या सोबत ब्रेकफास्ट करायला.. " निव्या च ऐकुन विष्णू पण तिच्या बोलण्याला दुजोरा देतो...
निवृत्ती " नको तुम्ही करा मी नंतर करेन तुमच झाल्यावर..."
निव्या " नाही.. तू पण ये नाही तर आम्ही नाही करणार ब्रेकफास्ट.. "
निव्या , विष्णू निवृत्ती ने सोबत ब्रेकफास्ट करावा म्हणून मागे लागले असतात आणि निवृत्ती नकार देत असते , हे बघून रामेश्वरी वैतागून " हे दोघ किती मागे लागले आहेत मग बस ना कशाला एवढा भाव खात आहेस.. "
रामेश्वरी चा वैतागलेला चेहरा बघून सिद्धार्थ शांत पणे प्रेमळ शब्दात" निवृत्ती बेटा अस ऑकवर्ड नको होऊ... विष्णू आणि निव्या एवढ आग्रह करत आहे तर ये बस.."
निवृत्ती रामेश्वरी अस वैतागलेल आणि सिद्धार्थ चा आग्रह म्हणून नाईलाजाने वंश च्या बाजूला ब्रेकफास्ट करायला बसते...
इथे वंश गप्प पणे मान खाली घालून एकही शब्द न बोलता चुपचाप ब्रेकफास्ट करत होता..
पहिला घास खाल्ल्यावर त्याला चव थोडी वेगळी वाटते तो मनात च " चव वेगळी का वाटत आहे कोणी बनवल असेल.. एक घास खाल्ल की एकदम तृप्त झाल्यासारख वाटत आहे... "
रामेश्वरी एक घास घेतल्यावर आपोआप त्यांचे डोळे बंद होतात..
रामेश्वरी " हम.. सुधा आजचा ब्रेकफास्ट खूपच छान झाला आहे , रोजच्या सारखी आज वेगळी चव आहे.. असच रोज बनवत जा... "
सुधा अडखळत " मॅडम ते.. ब्रेकफास्ट मी नाही निवृत्ती ताईने बनवल आहे.. "
सुधा च बोलण ऐकून रामेश्वरी चेहरा रागाने लालबुंद झाला होता.. रागातच त्यांनी प्लेट जमिनीवर भिरकावून दिली..
साई बिल्डिंग...
डॉक्टर स्वाती ला तपासून झाल्यावर साहिल ला " यांचा बिपी लो झाला आहे.. त्यांनी कोणत तरी मोठ टेंशन घेतल आहे... मी काही गोळ्या लिहून दिल्या आहेत ते त्यांना वेळेवर द्या , आणि त्यांना जास्त टेंशन घ्यायला नका सांगू... "
साहिल " ओके डॉक्टर.. "
डॉक्टर निरोप घेऊन निघून जातात..
डॉक्टर निघून गेल्यावर साहिल तिच्या शेजारी बेडवर बसून स्वाती चा हात हातात घेत " सॉरी स्वाती मी तुझ्यापासून खूप मोठ सत्य लपवल आहे.. हव तर मला माफ कर.. माफ कर.. " बोलत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू चा एक थेंब बाहेर पडतो...
साहिल एकटक स्वाती कडे बघत असताना फोन च्या रिंग ने त्याची तंद्री तुटते...
साहिल नंबर न बघताच कॉल उचलत बाल्कनीत जातो...
फोन उचल्यावर साहिल " हॅलो.. "
पलीकडून " ओह मिस्टर साहिल आज पण न बघता फोन उचलला , चला यात समाधान मानायच की आज तुमच्या आवाजाच दर्शन झाल... "
त्या व्यक्तीचा आवाज ऐकुन साहिल चिडून फोन कट करणार तर पलीकडून " अ... कॉल कट करण्याची पण हिम्मत नाही करायची नाही तर तुमची एक चूक आणि इथे बाकी सगळे स्वर्गवासी..."
साहिल आणखी चिडून " बोल काय बोलायच आहे... "
पलीकडून करड्या आवाजात " तोंड सांभाळून समजल... हा तर कॉल यासाठी केला की तुम्हाला इथून अबक इथे घर सोडून जायच आहे..."
साहिल " व्हॉट ?... हे बघ आज पर्यंत तू जिथे बोलल तिथे जात आहोत आम्ही आणि तू हे शेवटच असेल असही बोलल होत... "
पलीकडून " हे जास्त शक्कल नाही लढवायची समजल नाही तर माहीत आहे ना... " एवढ बोलून पलीकडून कॉल कट होतो..
इथे साहिल " हॅलो.. हॅलो.. " करत होता , मग कॉल कट झाल्याच समजताच चिडून रूम मध्ये जाण्यासाठी मागे वळतो आणि त्याचे डोळे मोठे होतात...
कारण समोर स्वाती उभी होती...
मुंबई , विलेपार्ले...
त्या खोलीत बॉस च्या ऑर्डर नुसार त्या मारलेल्या व्यक्तीला त्याला जाळून त्याच नामोनिशाण मिटवून टाकल , कोणताच पुरावा शिल्लक ठेवला नव्हता.. त्यांनी नव्या व्यक्तीची अरेंजमेंट केली होती , तो उद्या सकाळी इथे हजर होणार होता...
नव्या व्यक्तीची अरेंजमेंट झाल्यावर ते पुढच्या कामाला निघून गेले...
ते तिघ जण त्या बाईला ज्या रूम मध्ये ठेवल होत तिथे आले.. त्यातल्या दोन जणांनी त्या बाईला बेडवर झोपवून दोन्ही हाताला घट्ट बांधून झोपवल आणि डोक्यावर मशीन लावली.. तस त्यातल्या एकाने समोर बसलेल्या व्यक्तीला बघून थंब्म्स केल आणि बाजूला झाला .. त्याने सुद्धा थंब्म्स करून बाजूला असलेल एक बटन दाबले...
बटन दाबल्यावर त्या भयानक शांततेमध्ये बेडरूम मध्ये चारही बाजूंनी काळजात धस्स करणारी किंकाळी ऐकु आली...
त्या बाईला शॉक दिल होत , ती बाई शॉक मुळे तडफडत होती , ओरडत होती आणि तिथे असलेल्या त्या तीन जणांना तिची जरा सुद्धा दया नाही आली... ते तिघ त्या बाईला अस तडफडताना बघून जोरजोरात राक्षसी हसत होते...
एका कॉफी शॉप मध्ये , मुंबई...
एक मुलगा " आपल्याला कसही करून त्या दोघांकडे पोहोचायच आहे... यावेळी काहीही होऊ दे मी त्या दोघांना भेटूनच राहणार... "
एक मुलगी चिडत " प्रज्वल वेडा आहेस का , तू विसरलास का त्या नालयकाची माणस आपल्यावर चोवीस तास लक्ष ठेवून आहे... "
प्रज्वल " मग काय करू मोनिका असच हातावर हात ठेवून बसू का... ते काही नाही मी त्यांना भेटणार म्हणजे भेटणार अँड दॅट्स फायनल... " एवढ बोलून तो तिथून बाहेर निघून जातो , त्याचा पाठोपाठ मोनिका पण निघून जाते...
मोनिका आणि प्रज्वल निघून गेल्यावर इथे कोपऱ्यात बसलेला व्यक्ती कोणाला तरी कॉल करतो...
कॉल उचलल्या वर तो व्यक्ती " बॉस ते दोघ त्यांना भेटायला जाणार आहेत.. "
पलीकडून " मग माहीत आहे ना काय करायच ते... "
तसा तो व्यक्ती गुढपणे हसत " हो.. " बोलून कॉल कट करतो आणि पुढच्या कामाला निघून जातो...
अमृता बिल्डिंग...
सकाळीच दारावरची बेल वाजते तस अशोक दार उघडायला जातात...
दार उघडल्यावर ते समोर बघतात तर त्यांच शरीर कापायला लागत...
अशोक थरथरत " त.. तुम्ही... "
क्रमशः
- भाग्यश्री परब