Your support is like a moon in the sun - 11 in Marathi Love Stories by Bhagyashree Parab books and stories PDF | साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा - 11

साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा - 11

अमृता बिल्डिंग....

अशोक दार उघडून समोर बघतो तर त्याच्या अंगावर थरकाप उठतो " त.. तुम्ही.."


तो समोरचा व्यक्ती डायरेक्ट आत येत डोळ्यावरचा गॉगल काढत ऐटित आत येत थंड आवाजात " हो मी का येऊ नाही शकत.. "


अशोक स्वतःला नॉर्मल करत " नाही... अस काही नाही तुम्ही कधीही येऊ शकता..."



ती व्यक्ती " म्हणजे तू इथेच राहणार आहेस का... "


अशोक " अ.. आम्ही आताच निघणार होतो , तेवढ्यात तुम्ही आलात इथे.. "


तो व्यक्ती अशोकला थंड नजरेने बघत एक भुवयी उंचावत " ओह... आताच निघणार होता का... "


त्या व्यक्तीची थंड नजर बघून अशोक जागीच गार होतो आता आपल काही खर नाही अस समजून त्याला खर बोलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून अशोक खर काय ते बोलून टाकतो " आम्ही ज्या बसने जाणार होतो ती बस चार तास लेट येणार त्यामुळे त्या स्टँड वर तीन तासाने थोड लेट जाऊ म्हणून आम्ही घरीच थांबलो... "



अशोक च कारण ऐकुन तो व्यक्ती भडकला " का थांबलात मला अडकवण्यासाठी , हिम्मत पण नाही करायची समजल नाही तर माहीत आहे मी मारून टाकायला मागे पुढे पण नाही बघत समजल... आता लगेच इथून चालत व्हायच समजल , बस ला कितीही वेळ लागू दे... "



अशोक " ह... ह... हो.. हो... " एवढ बोलून अशोकने लगेच आपल्या बेडरूम मध्ये धूम ठोकली आणि शीतल ला लगेच तयारी करून निघू अस बोलून तो पण तयारी करण्यासाठी निघून गेला...


इथे अशोक बेडरूम मध्ये गेल्यावर तो व्यक्ती डोळ्यावर गॉगल लावत निर्विकार चेहऱ्याने तडक बाहेर आला आणि एक नंबर डायल करून कोणाला तरी कॉल लावला...

पलीकडून कॉल उचलल्या वर तो लगेच " हॅलो मी बोललेल काम झाल... "

पलीकडून " माझ नाव नागेश आहे आणि नागेश कोणतही काम अपूर्ण नाही ठेवत... बॉस तुमच काम झाल समजा... "


तो व्यक्ती त्या नागेश च बोलून झाल्यावर तो चेहऱ्यावर मिस्ट्रिअस स्माईल ने " ग्रेट तुझ्याकडून हीच अपेक्षा होती... आणि हो माझ्या प्लॅनिंग मध्ये काही वाकड झालेल आढळल ना तर माहीत आहे ना... "


नागेश " बॉस काही वाकड नाही होणार तुमच्या प्लॅन मध्ये... "


तो व्यक्ती " हम.. " इतक बोलून कॉल कट करतो आणि पुढच्या प्लॅनिंग ची तयारीत निघून जातो....


तो व्यक्ती निघून गेल्यावर इथे लपून बसलेला मानव बाहेर येत मनात " अच्छा तर ही गडबड आहे.. ( गुढपणे हसत ) पण लवकरच तुमचा द एंड होणार आहे.. जस्ट वेट अँड वॉच..." मनात बोलून झाल्यावर मानव आपला फोन काढून त्यावर काहीतरी टाईप करतो आणि कोणाला तरी सेंड करून तिथून निघून जातो...




जीवनश्री बंगलो...

नाष्टा निवृत्ती ने बनवलेल कळताच रामेश्वरी ला खूपच राग आला आणि त्यांनी रागातच नाष्ट्याची प्लेट जमिनीवर भिरकावून दिली...

रामेश्वरी च वागण बघून सिद्धार्थ ला राग आला तो रागातच " रामेश्वरी... हे काय चालू आहे , ही कोणती पद्धत अशी वागण्याची... "


इथे निव्या आणि विष्णू मनातच " झाला ओव्हर ड्रामा चालू... " चालू असलेला लाईव्ह धडाकेबाज सीन चविष्ट नाष्टा चा स्वाद घेत बघत होते... आणि वंश तो तर गप्प निर्विकार चेहऱ्याने समोर काय चालू आहे हे बघत होता... निवृत्ती तर रामेश्वरी चा हा अवतार बघून चेहऱ्यावर कोणतीच भीती न दाखवता गप्प निर्विकार चेहऱ्याने खाली मान घालून उभी होती...


सिध्दार्थ च्या बोलण्याला इग्नोर करून रामेश्वरी सरळ निवृत्ती ला " तुझी हिम्मत कशी झाली किचन मध्ये आणि तेही माझ्या परमिशन शिवाय... माझ्या मर्जी शिवाय कोणीही कशाला हात नाही लावत इथे आणि तू तर लिमिट क्रॉस केलीस... याची शिक्षा तर भेटणारच तुला... आता तूच यापुढे सगळ नाष्टा , जेवण बनवायच तेही नोकरांची मदत न घेता.. आणि जर कोणाची मदत घेताना आढळलीस तर तुझी शिक्षा त्या नोकराला दिली जाईल.."

( ॲटीट्यूड बघा बाबा या रामेश्वरी चा..)


रामेश्वरी च बोलण ऐकून निवृत्ती विचित्र पणे त्यांच्याकडे बघत मनात " यांच मेंदू काय रिकामा आहे की काय... जस यांच्या मेंदूत जगभराचा कचरा फेकल्यासारखा काहीही बोलत आहेत , मगाशी बोलल्या की हात नाही लावायचा आणि आता लगेच बोलत आहे की सगळ मी करायच... कमाल आहे मला वाटल की या मस्त तीन चार दिवस हात नाही लावू देणार , पण हे तर उलटच झाल...तसही मी तर हे चुटकीसरशी करेन ही.. ही.. ही.."



वंश च्या आवाजाने निवृत्ती भानावर आली..

वंश " तिला शिक्षा देण्याआधी माझी शिक्षा ऐका.. तर शिक्षा ही आहे की मिस रामेश्वरी राणे तुम्ही एक महिना नाष्टा आणि जेवण सगळ स्वतः बनवायच... मी एक महिना सगळ्या नोकरांना सुट्टी दिलेली आहे... "

( इथे वंश च रामेश्वरी ला नावाने हाक मारलेले बघून निवृत्ती चे डोळे मोठे होतात ती मनात " आपल्या आईला नावाने कोण बोलत अस... कुछ तो गडबड जरूर है , याचा शोध तर घ्यावाच लागेल..." )





रामेश्वरी चिडत " वंश तू अस नाही करू शकत समजल.. मी.. मी.. जेवण , नाष्टा.. नो.. नेवर.. आणि का म्हणून शिक्षा दिलीस मी काय चुकीच केल आहे... "


वंश " शिक्षा ह... माझ्या बायकोला जो कोणी त्रास देईल त्याला तर शिक्षा होणारच.. "


रामेश्वरी " मी काय त्रास दिला जे केल ते बरोबर तर होत.."


वंश थंड आवाजात " ओह मग आता जे काही बरळत होता ते काय तुमच्या शरीरात दुसरा आत्मा घुसून बोलत होत का... "

वंश च्या आवाजाने रामेश्वरी चिडीचूप झाल्या...


आणि इथे त्याच बोलण ऐकून निव्या आणि विष्णू वंशकडे आ वासून बघत होते.. त्यांना विश्वास च बसत नव्हता की दादा अस काही तरी करेल आणि सोबत रामेश्वरी च्या हातच खायच हे ऐकुन विचित्र च तोंड केल त्यांनी...


वंश " मी सांगितल म्हणजे ते झालच पाहिजे , नाही झाल तर हा वंश डबल शिक्षा देतो माहीत आहे ना की डिटेल मध्ये सांगू... "


रामेश्वरी ला माहीत होत की वंश एकदा त्याने सांगितल की तो ती गोष्ट करवूनच घेतो , मग आपल याच्यापुढे काही चालणार नाही म्हणून पुढे काही बोलत नाही.. सिध्दार्थ कडे मदत मागितली तर तो आधीच चिडल्याने त्याच्याकडून काही मदत नाही होणार तर आता वंश ने जी शिक्षा सांगितली ती स्वीकारल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता म्हणून त्या चिडत च वर आपल्या बेडरूम मध्ये निघून गेली...

त्यापाठोपाठ वंश आणि सिध्दार्थ नाष्टा संपवून ऑफिस ला निघून गेले.. विष्णू आणि निव्या पण नाष्टा करून कॉलेजला गेले...


निवृत्ती बेडरूम मध्ये जाणार तेवढ्यात तिला कोणाचा तरी कॉल येतो...


फोन उचलल्यावर पलीकडून "____________"


निवृत्ती " हो.. आले मी तिथेच थांब... "

एवढ बोलून निवृत्ती कॉल कट करते आणि लगेच बेडरूम मध्ये जाऊन स्वतःच आवरून कुठेतरी निघून जाते...




साई बिल्डिंग...

साहिल कॉल कट करून मागे वळतो तर स्वाती ला बघून घाबरतोच...

साहिल अडखळत " स.. स्वाती तू... "


स्वाती " हो मीच का येऊ नाही शकत इथे... "


साहिल " नाही अस काही नाही... "


स्वाती " अहो मला जाग आली गरम होत होते वरून लाईट नसल्याने फॅन तर नाही लावता येणार मग म्हंटल थोड बाल्कनीत बसू जरा बर वाटेल मग आले मी इथे... पण तुम्ही मला बघून का घाबरला आहात... "



साहिल मनात " हुश्श.. बर झाल नाही ऐकल हिने..."


भानावर येत साहिल " कोणी अस अचानक समोर आला तर माणूस घाबरणार ना.. "


स्वाती " हा ते आहेच.. "


साहिल " हम.. तू उभी का ( त्याच्या बाजूला बसण्याचा इशारा करून..) बस इथे..."

तस स्वाती साहिल च्या बाजूला जाऊन बसत मनात
" तुम्ही जे काही लपवत आहात ते तर मी शोधून च काढेन..."






जीवनश्री बंगलो...



रामेश्वरी चिडत आपल्या बेडरूम मध्ये आल्या आल्या कोणालातरी कॉल करून रागात " मला आताच्या आता भेटायच आहे.. मी ॲड्रेस देतेय तिथे या लवकरात लवकर.. " एवढ बोलून समोरच्याच न ऐकता कॉल कट करतात...



क्रमशः

- भाग्यश्री परब