Kshan Sonyacha jhala, Krushn Yashodecha Jhala - 2 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग २

Featured Books
  • तमस ज्योति - 54

    प्रकरण - ५४मुझे एवॉर्ड मिलने की खुशी में मेरे परिवारने मुझे...

  • साथिया - 121

    शालू और  सांझ आराम से बिस्तर पर लेटी अपनी-अपनी मेहंदी देख रह...

  • My Devil Hubby Rebirth Love - 47

    अब आगे                                रूही अपने रूम में आई त...

  • जंगल - भाग 4

    जिंदगी एक तरफा नहीं दो तरफा और  कभी ब्रेक डाउन तो कभी अप लग...

  • 5 करोड़ भी ठुकरा दिए

    इस संसार में जब से हम आते तभी पैदा होने के साथ ही एक तरह की...

Categories
Share

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग २

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला भाग दुसरा

मी पण आता हसत खेळत, एक सुंदर आयुष्य सुरू करायला निघाली आहे.सुखी संसाराची स्वप्नं डोळ्यात साठवून मी लग्नाची तयारी करण्यात गुंतले आहे.

माझ्या दोघी तायड्या मला चिडवून बेजार करत होत्या.त्यांच्या चिडवण्यामुळे मला राग न येता माझ्या अंगावर गोड शिरशिरी उठायची. निखील ने साखरपुड्याच्या दिवशी एकदोनदा माझ्याकडे रोखून बघीतलं होतं तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावर हलकसं हसून होतं.ते रोखून बघणं आत्ताही आठवलं आणि मन मोहरून उठलं.***बघता बघता उद्यावर माझं लग्नं आलं तशी सगळ्यांची गडबड उडाली त्याबरोबर मला चिडवण्याची त्यांच्यात स्पर्धाच लागली होती.

आज गृहमख झालं. ऊद्या मेंदी आहे. त्यासाठी दुपारीच मेंदी काढणारीला बोलावलं आहे. माझ्या पक्क्या मैत्रीणी सकाळपासूनच येणार आहे.आमच्या गृप मध्ये माझंच पहिलं लग्न असल्यामुळे त्या जाम एक्सायटेड होत्या.परवा सकाळी हळद आहे त्याचा पण सगळा बेत ठरलाय.निशाताई आणि ईशाताई दोघी सतत कामात दिसायच्या.लग्नात कुठे काही कमी राह्यला नको म्हणूनच आईबाबा निशाताई आणि ईशाताई यांची धावपळ चालू होती.आता हे दोन दिवसच मी माझ्या लाडक्या घरी राहणार आहे.नंतर…नंतर निखीलचं घर आपलं घर म्हणायला लागेल. एका मुलीसाठी खरच सगळं अवघड आहे.पण मला निखील समजून घेईल याची खात्री आहे.आपल्याच विचारात अपर्णा गुंगून गेली. मध्येच स्वतःशीच हसायची.ते बघून अभिषेक जीजू म्हणाले,

"ए अपर्णा काय?...अं. जागेपणी निखीलला बघतेय का?"आणि जोरात हसायला लागले.तशी आजूबाजूच्या सगळ्यांनी मला चिडवून बेजार केलं***आजच तर मी लग्नं होऊन या घरी आले. घरच्यांशी काय निखीलशी सुद्धा माझी छान ओळख झाली नव्हती. निखीलला अंतर्बाह्य समजून घेण्यासाठी मी किती उत्सूक होते.निखीलनी माझ्याकडे नुसतं बघीतले तरी मी मोहरून जायचे.

माझं मोहरून जाणं त्याला कळायचं.निखील बरोबर सप्तपदी चालताना त्याने जेव्हा त्याच्या हातात माझा हात घेतला तेव्हा मी गडबडले.एका वेगळ्याच आनंदानी बहरले. हा स्पर्श मला खूप रोमांचीत करून गेला. त्याने हळूच हाताची पकड घट्ट केली तशी मी लाजेने चूर झाले.

माझा निखीलच्या घरी गृहप्रवेश झाला. निखीलचं घर खूप छान सजवलं होतं. आम्हा दोघांना आईंनी औक्षवण केलं. मी तांदूळाचं माप ओलांडून घरात प्रवेश केला.नंतर ऊखाण्याचा कार्यक्रम झाला. सगळ्या घराला आनंदाचं तोरण लागलं होतं. हास्याची कारंजी चौफेर उडत होती. आम्हा दोघांना चिडवण्याची सगळ्यांमध्ये जणू अहमहमिका चालू होती. मी तर आनंदसागरात पोहत होते.***

लग्नानंतरचा दुसरा दिवस उजाडला.घरी पूजा असल्याने लवकरच सगळे आवरत होते.

या गडबडीत निखीलचे डोळे सतत माझा पाठलाग करत होते. त्यामुळे मी लाजून अजुन गोंधळत होते. माझं सगळं शरीर त्याच्या नजरेतील प्रेमाच्या शिडकाव्याने मोहरून उठतं होतं.पूजा सुरू असतानाही हा नजरेचा खेळ चालूच होता.मांजरांने डोळे मिटून दूध प्यायलं तरी जगाला कळतच.तसं कळलं आणि मग खूप चिडवणं सुरू झालं, हास्यकल्लोळ उठू लागले.***

निखील लांब उभं राहून मला मोहरताना बघून गालातल्या गालात हसायचा. तो हसला की लाजेंनी चूर चूर व्हायचे. आजूबाजूला सगळे असायचे त्यामुळे मला माझं मोहरून जाणं लपवतान खूप त्रास व्हायचा.

निखील मला अश्या मोहरेल्या अवस्थेत ठेऊन स्वतः निघून जायचा पण मला त्यांच्या पाठीमागे जाता यायचं नाही. कोण काय म्हणेल ही भीती.पण एक दिवस माझी ही अवस्था चुलत नणदेनी ओळखली आणि तत्परतेनौ माझ्या जवळ येऊन तिनी माझ्या दंडाला चिमटा काढला.

"आं… हे काय करताय? दुखलं नं…"

"आमचे बंधूराज आणि तुमचं काय चाललं होतं? बघीतलं मी."

"ताई काहीतरीच तुमचं.ते तर कामाला गेलेत." मी लाजून म्हटलं. पण ताई एवढ्यावरच थांबणार नव्हत्या हे मला कुठे माहिती होतं.

" निखील नी त्याच्या नजरेनी तुमची काय अवस्था केली आहे दिसलं मला." आणि जोरात हसायला लागल्या.

मी घाबरून त्यांना म्हटलं,

"अहो ताई केवढ्यांदी हसताय! कोणी काही विचारलं तर मी काय सांगू? "

" काही सांगू नका.तुम्ही चला माझ्याबरोबर."

"कुठे? काही न उमजून मी ताईला विचारलं.

"चला तर… तुम्हालाच कळेल.ताई माझा हात धरून घेऊन जाऊ लागल्या.आम्हा दोघींना जातांना आईंनी हाक मारलीच

"अगं कुठे चालल्या दोघी? किती कामं पडली आहेत?"

आईचं हे ऐकून मी माझा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. मला कामं सोडून ताईंबरोबर जाणं यात अपराध्यासारखे वाटू लागले.ताई काय या घरची मुलगी होती. मी अजून नवविवाहित सून होते.मला त्यांच्यासारखं वागून कसं चालेल? तेवढ्यात ताई म्हणाल्या,

" काकू आम्ही पाच मिनिटांत येतोय."

आईंना पुढे बोलण्याची संधी न देता ताई भरभर मला खोलीबाहेर घेऊन गेल्या.आम्ही जवळ जवळ धावतच खोली बाहेर पडलो.

मी माझा हात सोडवण्याचा खूप प्रयत्न करूनही सोडवू शकले नाही कारण ताईंनी माझा हात घट्ट पकडून ठेवला होता.आई आणि काकू दोघी आमच्याकडे संभ्रमीत नजरेनी बघत होत्या. बाकीचे लोक गप्पांमध्ये मशगूल होते. माझी छाती भीतीने दडपली.तेवढ्यात चालता चालता मी थबकले. माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हता.

माझ्या सगळ्या शरीराला कंप सुटला. ताईंनी माझा हात हळूच कधी सोडला हे मला कळलं सुद्धा नाही. माझ्या छातीची धडधड खूप वाढली होती.मला वाटत होतं ही धडधड बाहेर लोकांना ऐकायला गेली तर…!

काहीच कळत नव्हतं. हात पाय,कानशीलं गरम झाली होती. कोणी हात लावून बघीतले असतं तर बहुदा चटका बसला असता.

किती वेळ मी अशी उभी होते कुणास ठाऊक!एखाद्या पुतळ्यासारखी  ऊभी होते. मनात प्रचंड घालमेल चालू होती पण शरीर काही हालचाल करायला तयार नव्हतं. कसल्या अनामिक ओढीने माझ्या हालचालींना बांधून ठेवलं होतं माहिती नाही.माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हता.हवीहवीशी वाटणारी भीती मनात होती आणि समोर…!-----------------------------------------------------------काय होतं अपर्णाच्या समोर?वाचू पुढल्या भागात.'प्यासी नदी' भाग पहिला.माझ्या कथा आवडत असतील तर जरुर लाईक कमेंट करून इतरांना शेयर करा ही विनंती.## लेखिका मीनाक्षी वैद्य