Letter Sumne. Food Life - Part 4 in Marathi Letter by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 4

Featured Books
Categories
Share

पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 4

प्रिय सोना

आपले खादय जीवन भाग ४ 

दाल  फ्राय मात्र खास तुझा हातखंडा होता बारीक कांदा बारीक लसूण घालून तू इतकी खमंग करीत असे आणि त्याला थोडा smok देत असे सोबत मी मस्त खुसखुशीत बंगाली पराठा करीत असे तोंडी लावायला कांदा  नॉनव्हेज प्रकार तू पूर्वी खायचा पण हल्ली सोडून दिला होता मी केलेली अंडा करी आणि आले लसूण लावलेला पिवळा भात तुझा अतिशय आवडता तो खाताना तुझा चेहरा खुलून जात असे डबल ऑमलेट ब्रेड किंवा पोळी पण प्रिय होती तुला बाकी नाश्ता प्रकारात..डोसा पारंपरिक असो वा मूग डाळीचा असो त्याचे पीठ भिजवण्या पासून त्यासाठी चटणी करण्यापर्यंत सगळे तुझे काम गरम गरम डोसा करून मला पहिला तयार करून घालणं हे ही तुझे आवडते काम गोड पदार्थात तुझे जास्त आवडते म्हणजे श्रीखंड आणि जिलबी 15ऑगस्ट 26जानेवारी रोजी विकतची तुपातली जिलबी आणि समोसा हाच आपला ब्रेकफास्ट असे तरुणपणी जेव्हा घरी श्रीखंड करीत असू तेव्हा चक्का आणून तो टांगून योग्य तितकी साखर घालून मिक्सर मध्ये फिरवणे मग त्यात वेलदोडे केशर चारोळी घालणं व फ्रीज मध्ये ठेवणे हे तुझे आवडते काम चक्का फिरवलेल्या मिसरच्या भांड्यात थोडे दूध घालून तू त्याचे पियूष करायचा कालांतराने शुगर च्या कारणाने जास्त श्रीखंड खाणे कमी झाले मग थोडेसे पन्नास शंभर ग्रॅम बाहेरचे विकत आणत असू मला इकडे तिकडे पाहिलेले ,वाचलेले पदार्थ करून पाहण्यात खूप इंटरेस्ट असे तू म्हणायचा कशाला इतकी स्वयंपाकघरात दमत असतेस साधे साधे पदार्थ करीत जा पण मी हट्टाने बरेच प्रकार अधुन मधून करीत असे त्यात तुला भाज्यांच्या फोडी घालून नारळाच्या दुधात केलेले अवियल खूप आवडत असे उकडलेले छोले घालून केलेले सुंदल तुला प्रिय असे एकदा वेन पोंगल म्हणून केरळी पदार्थ केला तो मात्र तुला खूप आवडला मुग डाळ आणि तांदळाचा मऊसूत थोडा खिचडी कडे झुकणारा प्रकार चार पाच वेळा केला गेला त्याचाच गोड प्रकार स्वीट पोंगल मात्र करायचे राहूनच गेले बघ तुला खायला घालायचे होते पण त्याआधीच तू निघून गेलास आंब्याचा मोसम तुझा अतिशय आवडीचा आधी घरच्या झाडाच्या कैऱ्या काढून पन्हे कैरीची डाळ , चटणी, कैरीची कढी, कैरीचे खास तू केलेले ताजे लोणचे,चित्रान्न, हे सारे प्रकार सुरू व्हायचे उकडलेले हरबरे घालून केलेले थंडगार चित्रान्न तुला खूप आवडायचे कुठेतरी एकदा आपण किसलेली कैरी कांदा चटणी खाल्ली होती तुला खूप आवडली होती दोन तीन दिवसात ती केली जायचीच तुझ्या आईच्या पद्धतीचे कैरीचे पुटे मात्र तूच करायचदा आणि त्यांची आठवण ही काढायचा बाकी कैरीची कढी प्रकार तुझा खास आवडता नव्हता मी मात्र त्या मोसमात चार पाच वेळ तरी ती कढी करीत असे आपल्या बागेतल्या दोन्ही झाडाला भरपूर आंबे लागत ते तू नेहेमीच छान अढी घालून पिकवायला ठेवायचा व तयार होईल तसे काढायचा आंबे शास्त्र शुद्ध रित्या पिकवणे ही तुझ्याकडे उत्तम कला होती तुला कापलेल्या आंब्याच्या फोडी आवडत आंब्याचा रस दोन वाट्या जरी रोज खाल्ला तरी चालतो मात्र त्यासोबत इतर जेवण काहीच न घेता फक्त सॅलड खाल्ले म्हणजे शुगर कंट्रोल राहते हा तुझा अभ्यास आपल्या दोघांच्या बाबतीत परफेक्ट ठरायचा घरचे आंबे संपले की आपण बाहेरून विकत आणून आंबे खात असू पण आंब्याच्या मोसमात रोज आंबा खायचा असे आपले ठरलेले असे याबाबत आपण काकांचा म्हणजे माझ्या वडिलांचा आदर्श घेतला आहे असे तू गमतीने म्हणत असे कारण त्यांना सुद्धा आंब्याची अतिशय आवड होती बाकी आमरस पुरी, पातोळे, धिरडी, फुलके , आंब्याच्या पुऱ्या केक शंकरपाळी वगैरे प्रकार मी करीत असे ते तुला फारसे पसंत नसत ते पदार्थ करून त्याचे फोटो घेऊन माझ्या चॅनेल वर टाकत असे मला तो एक नाद होता सारखे काय ते स्वयंपाकाचे चॅनल अशी कधी कधी तू तक्रार करायचा..पण मला कधीच विरोध किंवा हे तू करू नको असे कधी म्हणाला नाहीस मला कॉकटेल आइस्क्रीम खूप आवडायचे उन्हाळ्यात कधी कधी फक्त माझ्या आवडी साठी आपण खायला जात असू पण त्या दिवशी जेवण स्किप करायचे असा तुझा कटाक्ष .मागील उन्हाळ्या पासून आपण कॉकटेल खायचे ठरवत होतो ते राहूनच गेले आणि मग तुच निघुन गेलास...तुला  तृषा शांती दुकानातील लस्सी आवडायची उन्हाळ्यात आठवड्यात दोन तीन वेळ तरी आपण प्यायला जायचो आपला मुलगा लहान होता तेव्हा मी घरीच कायम चांगले आइस्क्रीम करीत असे तसेच तू सुद्धा मंडईतुन दही आणून व्हॅनिला इसेन्स किंवा आमरस घालून उत्तम लस्सी करायचा हल्ली हल्ली तर iced टी आणि कोल्ड कॉफी सुद्धा उत्तम करायचा ती कॉफी फेसायसाठी हौसेने आणलेला नवा व्हिपर तू फार वापरला पण नाहीस कधी कधी संध्याकाळी रंकाळा येथील पाणीपुरी किंवा राजाभाऊ ची भेळ प्लान आपण करत असू जे तुला खूप आवडायचे आणि मग रंकाळा एक चक्कर मारून यायचे घरी भेळ करायची सुद्धा पुष्कळ वेळा तुला लहर यायची ती पण तू अगदी सिस्टिम नुसार आणि चविष्ट करायचा तुझी आवडती कांदा भजी , बटाटा भजी पण केली जायची आमची आई करायची तशी बारीक कांदा चिरून केलेली गोल भजी तुला आवडायची.. पण माझ्याकडून ती फारशी कधी केली गेली नाहीत खेकडा भजी मात्र मला छान जमायची पण कोपऱ्यावर तुझ्या मित्राचे हॉटेल होते तिथे ही भजी छान मिळायची दोन प्लेट भज्यासाठी कशाला एवढी उस्तवार करतेस..सोपे करून घ्यायचे मग सात वाजता जाऊन आपण तिथून गरम गरम खेकडा भजी आणत असू मी हौसेने ओव्याचे झाड लावले होते कधी नाश्त्याला ही भजी व्हायची ओवा बटाटा मिक्स भजी पण तुला खूप आवडायचीबटाटे वडा आणि कट वडा हे पण प्रिय असत पूर्वी मी बटाटे वडा घरी करायचे कट पण आपण घरी करायचो नंतर मात्र व्याप कमी करून बाहेरचा आणण्याकडे आपला कल वाढला पहिली पसंती शाळे जवळचा शीतल वडा नंतर खासबाग वडा  नंतर अनेगा किंवा आपली आवड वडा विठाई हॉटेल चा भला मोठा कट वडा तुला आवडायचातो माफक तिखट असायचा आपली नात कोल्हापूरला आली की तिला हा वडा आवडेल तो तिला खायला घालायचा असे तू नेहमी म्हणायचाकारण तिलाही बटाटे वडा आवडायचापण या ना त्या कारणाने तिचे ही दोन वर्षे कोल्हापूरला येणे झालेच नाही आणि आता तर तू पण नाहीस बघ..आणि बटाटे वडा कॉकटेल तिला खायला घालायची हौस अपूर्ण राहिली मला गोड पदार्थ आवडायचे कधी मिठाईच्या दुकानात गेले तर तू मला हवी ती बर्फी किंवा मिठाई घेऊन द्यायचा पण फक्त एक पीस जास्ती घरी न्यायची नाही एक तुकडा एवढीच तुझ्या जीभेची चव आहे ती भागली की मन तृप्त होईल जास्ती घरी घेऊन जाऊन जादा कॅलरी कशाला वाढवायच्याहा तुझा सरळसोट हिशोब असे मला ही ते पटत असेभारतात कधीही वेगवेगळ्या भागात जेव्हा जेव्हा आपण फिरायचो तेव्हा तेथील लोकल फूड मुद्दाम शोधून खाण्याकडे आपला कल असे नृसिंह वाडी मध्ये सोमण भोजनालय चे जेवण तुला फार आवडायचे त्यासाठी मुद्दाम आपण वाडीला जात असू येताना आठवणीने थोडे पेढे आणि शुगर फ्री बासुंदी हमखास आणायचो जर ट्रिप मधून गेलो असू तर त्या हॉटेल मधील नाश्ता अथवा जेवण स्किप करून आपण बाहेर तिथले वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ हुडकून खात असू तेव्हा ट्रिप मध्ये हा चर्चेचा विषय होत असे मध्य प्रदेश टूर मध्ये सगळ्या ग्रुप सोबत आपण अलाहाबाद येथे रात्री अकरा वाजता पान खायला गेलो होतो एक दिवस जाऊन सराफा बाजार भेट देऊन तिथले विविध व्हरायटी चे पदार्थ खाल्ले होते दिल्ली, डेहराडून, कोलकाता, हैदराबाद,अहमदाबाद , कुर्ग इथे ज्या ज्या सहली आपण स्वतः नियोजन करून केल्या होत्या तिथे आपण पूर्णपणे तेथील खाद्य पदार्थ व फळे यांचा मनसोक्त आस्वाद घेतला होता वाराणसी ला आपण ट्रिप मधील जेवण नाश्ता सोडून तिथल्या गल्ल्यातले स्ट्रीट फूड, वेगवेगळ्या सुपाऱ्या, बनारस पान खाल्ले होते अजून तिथे बरेच स्ट्रीट फूड खायचे होते पण वेळेअभावी ते शक्य झाले नाही आपल्याला वाराणसी खूप आवडले होते तिथले ही बरेच साईट बघणे झाले नव्हते तेव्हा आपण पुन्हा एकदा वाराणसी करायची असे ठरवले होते पण तुझ्या अकस्मात जाण्याने तीही इच्छा अपुरी राहिली जगन्नाथ पुरी ला गोल्डन बीच वर खाल्लेली झाल मूडी, तिथले प्रसिद्ध कुरकुरीत खाजे केरळ मध्ये केळीच्या पानावर जेवलेले पारंपरिक जेवण डेहराडून मध्ये तर ज्या टॅक्सी वाल्या सोबत आपण फिरत होतो त्याने आपली आवड बघून आपल्याला वेगवेळ्या ठिकाणी तिथले विशेष पदार्थ खायला नेले होते आपली ही खाण्याची आवड पाहून त्याला सुद्धा आपले कौतुक वाटले होते मसुरी रोड ला फिरताना तिथली बेडमी पुरी भाजी आणि सोबत दिलेली भाजलेली मिरची आपल्याला खुप आवडली होती तिथली फेमस गरम जिलबी खाऊन आपण खुश होऊन इतर काही पर्यटकांना सुद्धा ती खायचा आग्रह केला होता त्यांनी सुद्धा आवडीने ती खाऊन आपल्याला आवडली हे संगितले होते हैदराबाद ला हैदराबादी बिर्याणी मिळते त्या गल्लीत मुद्दाम टॅक्सी करून आपण जाऊन बिर्याणी खाल्ली शिवाय रोज चार दिवस तिथल्या मिठाईच्या दुकानात आपण वेगळी वेगळी स्वीट पण खाऊन बघितली होती त्यातील कुरकुरीत पेपर स्वीट प्रकार आपल्याला खुप आवडला होता कोल्हापूर अहमदाबाद विमान सुरू झाल्यावर खास तिथल्या वेगवेगळ्या हॉटेल मधील गुजराती थाळी खाण्यासाठी मुद्दाम आपण चार दिवस जाऊन राहिलो होतो कोलकाता मध्ये सुद्धा आपली खायची आवड बघून आपण रहात असलेल्या हॉटेल चा शेफ रोज आपल्या साठी वेगवेगळे पदार्थ व मिठाई बनवायचा  असलेल्या हॉटेल मधील शेफ ने सांगितलेल्या इको पार्क या ठिकाणी जाऊन आपण बंगाली मिठाईचा मनसोक्त आस्वाद घेतला होता शारदा मठ इथे जाऊन तिथले प्रसादाचे जेवण जेवलो होतो कोलकाता फेमस पूचका आणि झाल मूडी मात्र आपल्याला खास नाही मिळाली कुर्ग ला तिथली बेस्ट कॉफी आणि तिथले फेमस पदार्थ अक्की रोटी.अप्पमं, नीरडोसा , कदंबटू, ही आपण कोडगू किचन मधे जाऊन मनसोक्त रोज जाऊन खाल्ले होते अशी तुझी खाण्याची हौस आवडी निवडी आणि सवयी  अनेक वर्षाच आपले वैवाहिक आयुष्य त्यातले सर्व आठवून लिहिले आहे कदाचित तू असता तर यात काय लिहायचे राहिले आहे हे बरोबर पॉईंट आऊट करून सांगितले असतेस कारण माझ्या पेक्षा तुझी मेमरी शार्प होती एकंदर आपले खाद्य जीवन चविष्ट होते एवढे खरे...