A Drop of Milk - 2 in Marathi Adventure Stories by Gajagamini books and stories PDF | दूधाचा थेंब - 2 - खिडकी

Featured Books
Categories
Share

दूधाचा थेंब - 2 - खिडकी

निवेदक: श्रीयुत 

मुंबईची ही भर दुपार. सूर्य माथ्यावर तळपतोय. प्रकाशाच्या धारा अंगावर कोसळतायत जसा की पाऊसच. हा अंगावरचा शर्ट? भिजलाय घामानं. भिजून अंगाला चिटकलाय. 

आणि मी? मी या उकाड्यात जिद्दीने उठबशा काढतोय. रोजसारख्या.

व्यायाम करता करता माझे हात अचानक थांबले. नजर खिळली ती समोर. घराच्या एका काचेच्या चौकटीवर. सहा महिने झाले होते मला इथे येऊन. पण त्या खिडकीपलीकडे, त्या चौकटीतल्या 'फ्रेम'मध्ये कोण राहतय हे डोकावून पाहण्याची तसदी मी घेतली नव्हती.

पण आज ती खिडकी नेहमीसारखी रिकामी नव्हती. 

का? कोण होतं तिथे?

मीरा. होय, खिडकीच्या त्या चौकटीत आज मीरा उभी होती. अंगात पिवळा सुती मऊ ड्रेस घालून. त्या ड्रेसच्या कडा तिच्या गोलाकार शरीरावर ताणल्या होत्या. दुपारचं ते कोवळं ऊन खिडकीच्या तावदानातून आत शिरलं. तिला त्यानं पिवळ्याशार प्रकाशाने न्हाऊ घालत. तिचा गव्हाळ रंग गोरापान झाला. 

तिच्या हाताच्या विळख्यात तिचं इवलंसं मूल होतं. भुकेने व्याकुळ झालेलं ते लहान मूल. 

मीरा पुरचुंडीकर—रत्नाकरची ती बायको. असं नाही की मी तिला ओळखत नाही पण ती आणि तिचा नवरा रत्नाकर, हे इथे राहत असावेत हा विचार माझ्या मनात यायला मी कोणी ब्रह्मज्ञानी नव्हतोच. 

रत्नाकर आणि माझी पहिली भेट ऑफिसच्या कँटीनमधे झाली. "रत्नाकर म्हणजे एक 'अजातशत्रू' माणूस. ऑफिसच्या कँटीनमध्ये जो माणूस डुलक्या काढत सिगरेटी फुंकू शकतो, तो रत्नाकर!  त्याचं आणि माझं ऑफिसमध्ये छान जमलं. 

आणि मग एके दिवशी भर बाजारात, माझी त्याच्याशी अचानक गाठ पडली. आजूबाजूला केवढी ती गर्दी! कुठे बायकांची पळापळ. कुठे भाजीपाल्यांचा वास. आणि ते पुरुष ज्यांना भाजीतला भ सुद्धा कळत नाही ते ताठ मानेनं चालले भाव विचारायला! 

त्यात फूटपाथ शेजारी हा पठ्ठा आरामात सिगारेट ओढत उभा! 

बरं, त्याने मला सिगारेट दिली ती कशी? जणू काही एखाद्या कोण्या संताने भक्ताला तीर्थ द्यावं! मी ही कशाला मागे राहतो? रत्नाकरचा मान राखणं हे माझं कर्तव्यच होतं, नाही का? त्या धुराच्या लोटात आम्हाला काही क्षणांपुरता का होईना, मोक्ष मिळाल्याचा भास झाला.

त्याने भाजीवाल्याशी हुज्जत घालणाऱ्या एका बाईकडे बोटानं खुणावलं.

'ती बघ रे तिथं...माझी बायको ती…मीरा.'

रत्नाकर तिथेच माझ्यापाशी रेंगाळत, दाढी खाजवत उभा राहिला. आणि त्याची बायको? ती मात्र बिचारी दोन्ही हातांत त्या जड पिशव्या सावरत, आमच्या दिशेनं येऊ लागली. त्या सांजवेळच्या धूसर अंधारात तिचं रूप मला नीटसं टिपता आलं नव्हतं. पण आज? आज मात्र त्या खिडकीतून येणाऱ्या लख्ख प्रकाशात, मीराचं ते रूप पहिल्यांदाच माझ्या डोळ्यांसमोर उघडं पडलं.

तिच्या कडेवरचं ते बाळ रडायला लागल्यावर तिने त्याला वर उचललं. तिचे ओठ वरखाली हलत होते. बहुधा ती अंगाई गात असावी. 

आणि मग,

तिने आपल्या ड्रेसचा गळा हळूच खाली ओढला. तिच्या गुळगुळीत छातीवरुन तो खाली सरकला. 

मी तसाच पुतळ्यासारखा उभा. श्वास छातीतच अडकला. बाहेरच येईना. ताकदच गेली शरीरातली. पाणी पिता-पिता माझा हात असा काही थरथरला की पेल्यातलं अर्ध पाणी थेट माझ्या पोटावरून पायापर्यंत ओघळलं. 

 मोठा पांढरा दुधाचा थेंब. तो हळुवार निथळला. रेंगाळत खाली आला, संथपणे पोटावर जाऊन तिच्या ड्रेसच्या कापडात विरून गेला. माझे डोळे इतके मोठे झाले की पापण्या फाटायची वेळ आली. हवेतली गरमी अचानक वाढली. मला चटके देऊ लागली. 

ती खिडकीतून आत वळली. ती गेली, पण माझ्या डोळ्यांच्या पडद्यावर तो पांढरा थेंब घर करून राहिला.

माझं मन चित्र रंगवू लागलं. माझ्या मनाच्या खिडकीत अजूनही ती उभी होती. ते पांढरे थेंब येत राहिले. ते तिच्या ड्रेसमध्ये विरत राहिले. प्रत्येक थेंबासरशी मी माझे ओठ उघडले जणू मी ते पित होतो. त्यांची चव? किती गोड. समधुर. मला ते प्यायचय. ती इतकी लांब का? त्या कवितांमधल्या नायकांसारखी तहान मलाही आता लागलीय. तिला कवेत घेण्याची तहान. तिला माझ्या मिठीत ठेवण्याची तहान. ते थंडगार अमृत चाखण्याची तहान. 

माझ्या घशाला कोरड पडली. ती गुलाबी टोकं, त्यांच्या मऊशार कडा. पुरुषाला दुसरं काय हवय, सांगा?

माझ्या शरीराचा ताबा सुटला. माझ्या तोंडातून दीर्घ उसासे बाहेर पडले. 

खिडकीत मीरा होती, इथे मी आणि आमच्यातल्या या भिंती. पण त्या भिंतींमुळे काय फरक पडतो? भिंतीना सुद्धा भेगा पडतातच की. दरवाजेसुद्धा एक दिवशी उघडतात. सापाला बिळातून निघायला संधी ती मिळतेच. 

-

© २०२६ गजगामिनी 

सर्व हक्क सुरक्षित.

प्रताधिकार (Copyright): सर्व हक्क सुरक्षित. या पुस्तकातील कोणत्याही भागाचे प्रकाशकाच्या लेखी परवानगीशिवाय पुनरुत्पादन करणे, किंवा तो कोणत्याही स्वरूपात, डिजिटल किंवा प्रिंट, पुनर्प्रकाशित करणे हा कायद्याने गुन्हा असून तसे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.