Patrasumne Gharatlya tujhya vastu - 1 in Marathi Letter by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पत्रसुमने घरातल्या तुझ्या वस्तू - भाग 1

Featured Books
Categories
Share

पत्रसुमने घरातल्या तुझ्या वस्तू - भाग 1

प्रिय सोना  
घरातल्या तुझ्या वस्तू आपल्या घरात तुझ्या असंख्य वस्तू आहेत आधी गेट उघडले की असते तुझी लाडकी लाल गाडी ती जशीच्या तशी चकाचक ठेवली आहे अधून मधून फिरायला बाहेर काढते मीत्यातलं तुझं सामान जस आहे तसे ठेवले आहे दारात असलेल्या तुझ्या चपला, स्पोर्ट बूट, छोट्या व्हरांड्यात असलेली तुझी पेपर वाचायची खुर्ची.. सगळ तसेच आहे लोक म्हणतात की गेलेल्या व्यक्तीच्या वस्तू घरात ठेवू नयेत माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही मुळात तू गेला आहेस हेच माझं मन मानत नाही आणि मानणार नाही तू इथेच आहेस माझ्या शेजारी बसून गप्पा ऐकतो आहेस पूर्वी पण मी बोलायची तू ऐकायचास कारण माझा स्वभाव अती बडबड करणारा होता आणि तुझा मितभाषी..तसेच आताही मी बोललेले तू ऐकत असतोस मी बाहेर पडले की माझ्या उजव्या बाजूने चालतोस सकाळी माझ्या हातात फोन धरलेला असतो आणि इयर प्लग दोघांच्या कानात आधी तू गाणी कोणती लावायची ठरवतोस आणि मग मोबाईल माझ्या हातात कारण मोबाईल हातात धरणे तुला आवडायचे नाही तुझा फोन अजून आहे तसाच आहे त्यातलं काहीच डिलिट अथवा ॲड नाही केले त्यातलं तुझं स्टेटस "आनंद द्या आनंद घ्या" मनाला सुखावून जाते तूही असाच निर्व्याज मनाचा होतास फोन वर असलेला आपल्या बागेतला अबोली कमळाचा फोटो.लॉक स्क्रीन वर असलेला आपल्या लाडक्या कुत्र्याचा जिमी चा फोटो पंचायत सीरियल ची मी तुला घालून दिलेली कॉलर ट्यून काहीच बदललं नाहीय अधून मधून मीच तुझा फोन रिचार्ज करून तुझा कॉल आल्याचा आनंद घेते तशीच TV पाहताना सिनेमाअसो अथवा Ott मी तुझ्याशी गप्पा मारतच बघत असते घरात तुझे माझे बरेच फोटो आहेत ते बघत आणि तुझ्या डोळ्यात बघत मी  दिवसभर या ना त्या कारणाने तुझ्याशी गप्पा करतेच तीच गोष्ट तुझ्या साहित्याची सकाळी उठल्यावर दात घासताना तू वापरत असलेला ब्रश,तुला रोज जीभ स्वच्छ लागायची ती जीभ घासणि सकाळच्या फिरण्या साठी तू वापरत असलेले बूट व मोजे आता मी वापरते तू बाहेर घालत असलेल्या चपला मला थोड्या मोठ्या झाल्या तरी त्या वापरून मी चालताना तुझा सहवास अनुभवते तुझ्या घरात घालायच्या सपाता आता माझ्या पायात आहेत त्या घालून तुझ्या सोबत मी घरभर फिरते सकाळी ब्रश करताना पेस्ट ब्रश ठेवलेल्या वस्तूचे कपाट उघडले की त्यात तुझा कंगवा , दाढीचा ब्रश, ब्लेड पाकीट रेझर तू वापरत असलेले तेल जसेच्या तसे आहे आणि राहील तुझा दाढी नंतर वापरायचा ट्रिमर ही तिथे तसाच आहे तुझी मिशा कोरायची बारीक धारेची कात्री तिथेच आहे बेडरुमच्या दरवाजा मागे तू वापरत असलेले पँट चे बेल्ट अडकवलेले आहेत तसे खाली आणि वरच्या मजल्यावर पण तुझे ब्रश, केसाचे कंगवे आहेतच तुझे डॉक्टर आय कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, तुझे विविध साईझ चे फोटो, तुझे , दवाखान्याचे डिग्रीचा तसेच पत्ता असलेला शिक्का, तुझ्या छोट्या छोट्या डायऱ्या ज्यात तू वेळोवेळी काही टिपणे केली होतीस ते सगळे तसेच जपून ठेवले आहे आपल्या लग्नाची पत्रिका घराच्या वास्तूशांतीची पत्रिका त्यासाठी झालेला आणि तू लिहून ठेवलेला बारीक सारीक खर्च सगळे तसेच आहे लग्नाआधी आपण एका गावात असून सुद्धा थ्रिल म्हणून आपण एकमेकांना लिहिलेली पत्रे सुद्धा अजून ताजी आहेतअसे वाटते तू एकदा येऊन ते सगळे तसेच आहे का हे बघून जावेस तुझे पैशाचे पाकीट ज्यात माझा लग्ना आधीचा सुंदर फोटो आहे शिवाय emrgency साठी साठवलेले दहा हजार रुपये आहेत ते पाकीट अगदी जसेच्या तसे ठेवले आहे मी तुझी दवाखान्याची aristocrat बॅग त्यात असलेले दोन स्टेथास्कोप ,थर्मामीटर हे नुकतेच मी तुझ्या डॉक्टर मित्राला देऊन टाकले आहे आयुर्वेदिक औषधे तयार करायचा दगडी मोठा खलबत्ता जो तुझ्या आजोबांच्या काळा पासून आहे ज्यात तू सुद्धा पूर्वी औषधे खलत होतास तो मोठा खलबत्ता सुद्धा योग्य ठिकाणी द्यायचा विचार आहे खालच्या कपाटात तुझा आणि माझा मागील वर्षी घेतलेला रेनकोट आहे जो पावसाळ्यात आपण फिरायला जाताना घालायचो आणि ते एकसारखे रेनकोट पाहून लोकांना खूप कुतूहुल आणि गंमत वाटायची बाकी तुझ्या लाल गाडीत जे तू ठेवलेले सामान होते जसे की छत्री, वेगवेगळ्या पिशव्या, सुट्ट्या पैशाची डबी, तुला मांडीवर हात पुसायला लागणारा रुमाल, तुझी कानपट्टी,सगळे जसेच्या तसे गाडीत आहे मात्र तुझ्या कपड्याच्या कपाटाचा नीटनेटकेपण मला तुझ्यासारखा सांभाळता नाही आलातुझे कपडे घडी घालायचे नीट नेटके पण पूर्वीही मला जमायचे नाही आता ही जमत नाही ते पण परत एकदा तू व्यवस्थित लावून जावेस असे वाटते बाकी दुसऱ्या कप्प्यात थंडीत घालायचे तुझे स्वेटर मफलर त्यातले काही काही मी प्रसंगांने वापरू शकते वेगवेगळ्या प्रदेशातल्या टोप्या मी बघेन कधी वापरायला मिळतात का  त्या आहे तिथेच ठेवलेल्या आहेत