पारीवारीक सुख महत्वपुर्ण?
*पारीवारीक सुख ही महत्वाची गोष्ट आहे. जर पारीवारीक सुख ज्याला मिळत नाही. त्या माणसाला जगूनही मेल्यासारखंच वाटतं. कारण सगळ्यांना सगळ्यांची गरज असते. कोणाला जास्त प्रमाणात गरज असते तर कोणाला कमी प्रमाणात गरज असते. तसाच परिवार अतिशय महत्त्वपूर्ण असतो आपल्या जीवनात. म्हणतात की परिवार जर असेल तर आपल्यावर येणारं संकट, तेवढं तीव्र वाटत नाही.*
वाद...... वाद घरादारात असतात. तसेच ते परीवारातही असतातच. यातूनच आता विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली. ज्यानुसार मी, माझी पत्नी व माझी मुलं. एवढंच विश्व निर्माण झालं. मग घरात असलेल्या साहू, सासऱ्यांसारख्या पवित्र नात्यांना दूर ढकलण्यात आलं. विवाहातही मोठ्या माणसांना पाहिजे त्या प्रमाणात महत्व दिलं जावू लागलं नाही. इथंच आपलं चुकलं. ज्याची झळ आपणालाच पोहोचली. उदाहरणादाखल एका मुलीचं उदाहरण देतो. एका मुलीला भावी जीवनाची स्वप्न दाखविणारा तिचा प्रियकर. त्या प्रियकरानं तिला मोठी मोठी आश्वासने देवून भुलथापा देत तिला पळवून नेलं. त्यानंतर एके दिवशी तिला, तिचा उपभोग घेवून बोर होताच तिला घरातून हाकलून दिलं. यादरम्यान ती त्याचेवर विश्वास ठेवणारी मुलगी, ती आपल्याच परीवारातून तुटल्यानं तिनं आत्महत्या केली. अशी बरीच प्रकरणं आहेत. एक परीवार तर असाही दिसला की ज्यानं पळून जावून विवाह केला आणि असं अक्षरशः घडतंच. तरुणपणा जेव्हा येतो. तेव्हा शारीरिक आकर्षणानं मुलाला मुलगी व मुलीला मुलगा आवडायला लागतो. मुला मुलींच्या या शारीरिक आकर्षणानं सख्खे जीवाला जीव लावणारे भाऊबहिण आणि सख्खे नात्यातले आईवडील की जे लहानाचं मोठं करतात. उन्हातून सावलीत नेतात. आपल्या इच्छा पुर्ण करतात. तेच परके वाटायला लागतात. तेच घडलं त्या दोघांच्याही बाबतीत. मग काय, पळून जावून लग्न करताच सारेच तुटतात. अर्थात मुलाचे आईवडील व नातेवाईक आणि मुलींचेही नातेवाईक व आईवडील. असंच घडलं त्या एका मुलीबाबतीत. मुलगा व मुलगी एकमेकांवर निरतिशय प्रेम करणारे. पारीवारीक वाद निर्माण झाल्यानं ते काही आपल्या आईवडिलांच्या घरी जावू शकत नव्हते. अशातच एक मोठा दुर्धर आजार मुलीला झाला. जिचा उपचार तो मुलगा रुग्णालयात करु लागला. अशातच काम निकालू मित्र दोन दिवस आले. तिसऱ्या दिवशी ते निघून गेले. आता मुलीला व मुलाला पश्चाताप होवू लागला की आपण प्रेमासाठी पळून जावून विवाह करायला नको होता. परंतु प्रेमासाठी वाट्टेल ते. काही दिवसानं ती बरी झाली. परंतु पश्चाताप तर होतच राहिला ना त्यांना आयुष्यभर. कारण परीवारानं अगदी शेवटपर्यंत त्यांना मिळवलं नव्हतं.
प्रेम.... प्रेम अजरामर नेहमीच असतं आणि छरतं. तरुणपणात निर्माण होणारं प्रेम हे अगदी हवंहवंसं वाटतं. जे परीवाराला मंजूर नसतं. परीवारवाले आपल्या लेकरांकडून विवाहाच्या आशा अपेक्षीत ठेवतात. विचार करतात की अमूक अमूक आपल्या मुलानं आपल्याच नातेवाईकात नव्हे तर जातीत विवाह करावा. अशा मुलामुलींनी जातीत विवाह केल्यास त्यांना आईवडील मिळवून नेतात शेवटपर्यंत. समाजात इज्जत वैगेरे वाढून राहते. इज्जत शाश्वत राहते. तीच गोष्ट घडते जर आपण परीवाराचं न ऐकून आपल्याच मर्जीनं विवाह केला तर...... परीवारवाले आपल्याला तोडतात. खुद्द आईवडील, जे आपल्याला उन्हातून सावलीत नेतात. तेही तोडतात. नातेवाईकही तोडतात. अगदी शेवटपर्यंत आपल्याला मिळवीत नाहीत. खस्ता खात खात जिंदगी कापावीच लागते मजबुरीनं. अन् जोडीदारांपैकी जर एकानं तोडल्यावर मरणासारखी दुसरी गोष्ट नसते आयुष्यात. हेच वास्तव सत्य आहे. प्रेम करुन पळून जाणाऱ्या परीवाराची आयुष्यभर समाजात पाहिजे त्या प्रमाणात इजाजत दिसत नाही. राहिली मित्रांची संगत. तर मित्र हे संधी साधूच असतात. त्यांना खायला मिळालं की तो चांगला आणि नाही मिळालं की तो वाईट. अशी मित्रांची स्थिती असते. आयुष्यभर सुख जर हवं असेल तर मित्र नाही, परीवारच कामात येतो. म्हणूनच आपले पुर्वज प्रेमांना नाकारत होते आणि आजही नाकारतात व जातीत विवाह करायला मजबूर करतात. असं असलं तरी आज आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढले आहे. कारण समाजातील हुंडा प्रकरणे आणि समाजातील मुलामुलींच्या अपेक्षा. परंतु हे प्रमाण कमी आहे. लोकं पारीवारीक सुख जीवनात आयुष्यभर मिळावं म्हणून जातीतच विवाह करण्याची पद्धती अंगीकारत आहेत. जरी समाजात हुंडा असेल तरी आणि मुलांमुलींच्या अपेक्षा ह्या जास्त असल्या तरी.
मित्र..... मित्र हे काही कामात येत नाहीत असं प्रत्येकांचं वैयक्तिक मत. ते संधीसाधू असतात. म्हणूनच मित्रमंडळ हे क्षणीक असतं व ते सतत बदलत असतं. एक असाच व्यक्ती त्या मित्राचा मित्र की ज्याला परीवार नव्हताच. त्यानंही पळून जावून विवाह केला. परंतु दुर्दैवी ठरला तो. कालांतरानं त्याला शोधून मुलीच्या परीवारानं आपली मुलगी त्याच्याजवळून हिसकून नेली. त्यानं तो तुटला व आता तो एकाकी राहू लागला. परंतु त्याची समाजात ओळखपारख होतीच. त्याच भरवशावर आपल्याला आपलं काय करायचंय असा विचार करुन तो सतत दारु पिवू लागला. परंतु त्यानं एक काम कांगलं केलं. त्यानं आपल्या नोकरीचा विचार न करता आपल्या मित्राला नोकरी लावून दिली. काही काळानं ज्यानं नोकरी लावून दिली. तो आजारी पडला. तशी त्याची परिस्थिती बेताचीच होती. कसाबसा तो आपल्या मित्राच्या घरी गेला. मग मित्राला गयावया करु लागला की त्यानं त्याला रुग्णालयात भरती करावं. त्यानंतर मित्रानं त्याला भर्ती केलं व पहिल्या दिवशी तो पुर्ण दिवस राहिलाही उपस्थित. वाटल्यास नोकरी लावून दिल्याचं उपकार म्हणून त्यानं त्याला शेवटपर्यंत साथ द्यायला हवी होती. कारण त्यानं आपल्या ओळखीनं त्याला सरकारी नोकरी, तिही आजच्या काळात विनापैशानं लावून दिली होती. परंतु घडलं उलटच. दुसऱ्या दिवशीपासून त्याला त्याचा तो मित्र अजिबात रुग्णालयात दिसलाच नाही. त्यानंतर त्याला कळलं की आपलं वागणंच वाईट. आपण दारु प्यायला नको होती. कसाबसा त्यानं रुग्णालयात आपल्या स्वतःचा उपचार केला व तो काही दिवसानंतर रुग्णालयातून बाहेर पडला. त्यानं दारु सोडली. काही दिवस जाताच त्यानं आपला विवाहही केला. त्यानंतर बरेच दिवस निघून गेले व एक दिवस त्यालाही सरकारी नोकरी लागली. ही गोष्ट त्याच्याच त्या संधीसाधू मित्राला माहीत झाली. त्यानंतर तो भेटायला आला. तेव्हा त्या मित्रानं त्याला प्रश्न केला की तो पहिल्या दिवशी त्याला रुग्णालयात भरती केल्यानंतर कुठे गेला होता? त्यावर त्याचं उत्तर होतं की त्याला रुग्णालयातील वास सहन होत नव्हता. म्हणून तो दुसऱ्या दिवशीपासून रुग्णालयात आलाच नाही. असे असतात मित्र. काही मित्र हे जीवाला जीव देणारेही असतात, हंस आणि कावळ्याच्या दंतकथेतील हंसासारखे. तर काहीजण त्याच कथेतील कावळ्यासारखेही असतात. यात विचार करण्यालायक बाब अशी की गर त्याच मित्राचे आप्त वा मुलगी वा पत्नी जर त्या रुग्णालयात भरती झाली असती. तर त्याला रुग्णालयातील वास आला नसताच. ही वास्तविकता आहे. म्हणूनच परीवार महत्वपुर्ण ठरतो या ठिकाणी. आपले आईवडील, आपली मुलं वा आपली पत्नी. कधीच आपल्याला सोडून जात नाही अशा संकटसमयी.
पुर्वी असं नव्हतं. पुर्वी संयुक्त कुटुंबपद्धती असायची. ज्यात घरातील प्रौढ व्यक्तीच निर्णय घ्यायचा व त्याच व्यक्तीच्या सल्ल्यानं सर्वजण चालायचेही. मग विवाह असो की आजारपण. ज्याला सर्व पैसे तोच प्रौढ व्यक्ती लावायचा आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची सेवा ही परिवारातील सदस्य करायचे.
सेवा....... संकट काळात आपली सेवा घडावी म्हणूनच विवाह निर्माण झाला व विवाह हा जातीतच करण्याची पद्धती निर्माण झाली. कारण जातीत विवाह केल्यानंतर असा व्यक्ती आजारी पडल्यावर त्याचा आत्मीक सुख परीवार व नातेवाईक यांच्याकडून प्राप्त व्हावं. ज्या आत्मीक सुखाच्या भरवशावर आजारी असणारा तो व्यक्ती लवकरच दुरुस्त व्हावा ही अपेक्षा. तसं प्रेमविवाह केल्यानंतर घडत नाही. म्हणूनच जातीत विवाह करण्याची पद्धत. कारण मित्रमंडळी संकटात कामात येत नाही. ही संकल्पना आधीपासूनच रुढ आहे..म्हणूनच मित्र हे वारंवार बदलत असतात. बालपणाचे मित्र हे उतारवयापर्यंत साथीला नसतात. कधी ते आठवतही नाहीत. तसेच दहावी बारावीचे मित्रही सोबतीला शेवटपर्यंत नसतातच. तेही कालांतरानं आठवत नाही. नोकरीपेशातील मित्र हे नोकरीवर आहोत. तेव्हापर्यंतच. ते म्हातारपणात आठवत नाहीत. परंतु परीवार हा शेवटपर्यंत असतो. त्यांचे नातेसंबंध शेवटपर्यंत आठवतातक व ते जोडून ठेवण्याचा प्रयत्न माणूस शेवटपर्यंत करतोच. म्हणूनच परीवार महत्वाचा.
वाद...... पारिवारीक वाद नेहमीच असतात. तसे वाद होतातच. हे वाद होतात अपेक्षेने. बरेच वाद पैशावरुनंच होत असतात. परिवारात जेव्हा पिसे मागीतले जातात व उपकारांची जाणीव न ठेवता पैसे परत केले जात नाही. तेव्हा नातेसंबंध बिघडत जातात. तसेच एखाद्यावेळेस एखाद्या अपेक्षेनं वाद होवून परीवार तुटतो. प्रेमविवाहातून तर परीवार हमखास तुटतोच. तेव्हा अशा अपेक्षाच ठेवू ऑये की परीवार तुटेल. असा पैशाचा व्यवहार करु नये की पारीवारीक नातं संपुष्टात येईल आणि असा प्रेमविवाह करु नये की आयुष्यभऱ्यासाठी नातंच संपून जाईल. पारीवारीक नातं टिकून राहावं. ते टिकवून ठेवावं. जेणेकरुन त्याच नात्यातून आपल्याला भविष्यात आत्मीक सुख प्राप्त होईल. जे आत्मीक सुख आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत टिकेल. तेच आत्मीक नातं आपल्या भविष्याची ताकद ठरेल. आपल्याला आपल्या जीवनात मोलाची मदत करेल. तसंच तेच आत्मीक सुख आपल्याला सतत जीवन जगायला प्रेरणा देखील देईल. यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०पारीवारीक सुख महत्वपुर्ण? *पारीवारीक सुख ही महत्वाची गोष्ट आहे. जर पारीवारीक सुख ज्याला मिळत नाही. त्या माणसाला जगूनही मेल्यासारखंच वाटतं. कारण सगळ्यांना सगळ्यांची गरज असते. कोणाला जास्त प्रमाणात गरज असते तर कोणाला कमी प्रमाणात गरज असते. तसाच परिवार अतिशय महत्त्वपूर्ण असतो आपल्या जीवनात. म्हणतात की परिवार जर असेल तर आपल्यावर येणारं संकट, तेवढं तीव्र वाटत नाही.* वाद...... वाद घरादारात असतात. तसेच ते परीवारातही असतातच. यातूनच आता विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली. ज्यानुसार मी, माझी पत्नी व माझी मुलं. एवढंच विश्व निर्माण झालं. मग घरात असलेल्या साहू, सासऱ्यांसारख्या पवित्र नात्यांना दूर ढकलण्यात आलं. विवाहातही मोठ्या माणसांना पाहिजे त्या प्रमाणात महत्व दिलं जावू लागलं नाही. इथंच आपलं चुकलं. ज्याची झळ आपणालाच पोहोचली. उदाहरणादाखल एका मुलीचं उदाहरण देतो. एका मुलीला भावी जीवनाची स्वप्न दाखविणारा तिचा प्रियकर. त्या प्रियकरानं तिला मोठी मोठी आश्वासने देवून भुलथापा देत तिला पळवून नेलं. त्यानंतर एके दिवशी तिला, तिचा उपभोग घेवून बोर होताच तिला घरातून हाकलून दिलं. यादरम्यान ती त्याचेवर विश्वास ठेवणारी मुलगी, ती आपल्याच परीवारातून तुटल्यानं तिनं आत्महत्या केली. अशी बरीच प्रकरणं आहेत. एक परीवार तर असाही दिसला की ज्यानं पळून जावून विवाह केला आणि असं अक्षरशः घडतंच. तरुणपणा जेव्हा येतो. तेव्हा शारीरिक आकर्षणानं मुलाला मुलगी व मुलीला मुलगा आवडायला लागतो. मुला मुलींच्या या शारीरिक आकर्षणानं सख्खे जीवाला जीव लावणारे भाऊबहिण आणि सख्खे नात्यातले आईवडील की जे लहानाचं मोठं करतात. उन्हातून सावलीत नेतात. आपल्या इच्छा पुर्ण करतात. तेच परके वाटायला लागतात. तेच घडलं त्या दोघांच्याही बाबतीत. मग काय, पळून जावून लग्न करताच सारेच तुटतात. अर्थात मुलाचे आईवडील व नातेवाईक आणि मुलींचेही नातेवाईक व आईवडील. असंच घडलं त्या एका मुलीबाबतीत. मुलगा व मुलगी एकमेकांवर निरतिशय प्रेम करणारे. पारीवारीक वाद निर्माण झाल्यानं ते काही आपल्या आईवडिलांच्या घरी जावू शकत नव्हते. अशातच एक मोठा दुर्धर आजार मुलीला झाला. जिचा उपचार तो मुलगा रुग्णालयात करु लागला. अशातच काम निकालू मित्र दोन दिवस आले. तिसऱ्या दिवशी ते निघून गेले. आता मुलीला व मुलाला पश्चाताप होवू लागला की आपण प्रेमासाठी पळून जावून विवाह करायला नको होता. परंतु प्रेमासाठी वाट्टेल ते. काही दिवसानं ती बरी झाली. परंतु पश्चाताप तर होतच राहिला ना त्यांना आयुष्यभर. कारण परीवारानं अगदी शेवटपर्यंत त्यांना मिळवलं नव्हतं. प्रेम.... प्रेम अजरामर नेहमीच असतं आणि छरतं. तरुणपणात निर्माण होणारं प्रेम हे अगदी हवंहवंसं वाटतं. जे परीवाराला मंजूर नसतं. परीवारवाले आपल्या लेकरांकडून विवाहाच्या आशा अपेक्षीत ठेवतात. विचार करतात की अमूक अमूक आपल्या मुलानं आपल्याच नातेवाईकात नव्हे तर जातीत विवाह करावा. अशा मुलामुलींनी जातीत विवाह केल्यास त्यांना आईवडील मिळवून नेतात शेवटपर्यंत. समाजात इज्जत वैगेरे वाढून राहते. इज्जत शाश्वत राहते. तीच गोष्ट घडते जर आपण परीवाराचं न ऐकून आपल्याच मर्जीनं विवाह केला तर...... परीवारवाले आपल्याला तोडतात. खुद्द आईवडील, जे आपल्याला उन्हातून सावलीत नेतात. तेही तोडतात. नातेवाईकही तोडतात. अगदी शेवटपर्यंत आपल्याला मिळवीत नाहीत. खस्ता खात खात जिंदगी कापावीच लागते मजबुरीनं. अन् जोडीदारांपैकी जर एकानं तोडल्यावर मरणासारखी दुसरी गोष्ट नसते आयुष्यात. हेच वास्तव सत्य आहे. प्रेम करुन पळून जाणाऱ्या परीवाराची आयुष्यभर समाजात पाहिजे त्या प्रमाणात इजाजत दिसत नाही. राहिली मित्रांची संगत. तर मित्र हे संधी साधूच असतात. त्यांना खायला मिळालं की तो चांगला आणि नाही मिळालं की तो वाईट. अशी मित्रांची स्थिती असते. आयुष्यभर सुख जर हवं असेल तर मित्र नाही, परीवारच कामात येतो. म्हणूनच आपले पुर्वज प्रेमांना नाकारत होते आणि आजही नाकारतात व जातीत विवाह करायला मजबूर करतात. असं असलं तरी आज आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढले आहे. कारण समाजातील हुंडा प्रकरणे आणि समाजातील मुलामुलींच्या अपेक्षा. परंतु हे प्रमाण कमी आहे. लोकं पारीवारीक सुख जीवनात आयुष्यभर मिळावं म्हणून जातीतच विवाह करण्याची पद्धती अंगीकारत आहेत. जरी समाजात हुंडा असेल तरी आणि मुलांमुलींच्या अपेक्षा ह्या जास्त असल्या तरी. मित्र..... मित्र हे काही कामात येत नाहीत असं प्रत्येकांचं वैयक्तिक मत. ते संधीसाधू असतात. म्हणूनच मित्रमंडळ हे क्षणीक असतं व ते सतत बदलत असतं. एक असाच व्यक्ती त्या मित्राचा मित्र की ज्याला परीवार नव्हताच. त्यानंही पळून जावून विवाह केला. परंतु दुर्दैवी ठरला तो. कालांतरानं त्याला शोधून मुलीच्या परीवारानं आपली मुलगी त्याच्याजवळून हिसकून नेली. त्यानं तो तुटला व आता तो एकाकी राहू लागला. परंतु त्याची समाजात ओळखपारख होतीच. त्याच भरवशावर आपल्याला आपलं काय करायचंय असा विचार करुन तो सतत दारु पिवू लागला. परंतु त्यानं एक काम कांगलं केलं. त्यानं आपल्या नोकरीचा विचार न करता आपल्या मित्राला नोकरी लावून दिली. काही काळानं ज्यानं नोकरी लावून दिली. तो आजारी पडला. तशी त्याची परिस्थिती बेताचीच होती. कसाबसा तो आपल्या मित्राच्या घरी गेला. मग मित्राला गयावया करु लागला की त्यानं त्याला रुग्णालयात भरती करावं. त्यानंतर मित्रानं त्याला भर्ती केलं व पहिल्या दिवशी तो पुर्ण दिवस राहिलाही उपस्थित. वाटल्यास नोकरी लावून दिल्याचं उपकार म्हणून त्यानं त्याला शेवटपर्यंत साथ द्यायला हवी होती. कारण त्यानं आपल्या ओळखीनं त्याला सरकारी नोकरी, तिही आजच्या काळात विनापैशानं लावून दिली होती. परंतु घडलं उलटच. दुसऱ्या दिवशीपासून त्याला त्याचा तो मित्र अजिबात रुग्णालयात दिसलाच नाही. त्यानंतर त्याला कळलं की आपलं वागणंच वाईट. आपण दारु प्यायला नको होती. कसाबसा त्यानं रुग्णालयात आपल्या स्वतःचा उपचार केला व तो काही दिवसानंतर रुग्णालयातून बाहेर पडला. त्यानं दारु सोडली. काही दिवस जाताच त्यानं आपला विवाहही केला. त्यानंतर बरेच दिवस निघून गेले व एक दिवस त्यालाही सरकारी नोकरी लागली. ही गोष्ट त्याच्याच त्या संधीसाधू मित्राला माहीत झाली. त्यानंतर तो भेटायला आला. तेव्हा त्या मित्रानं त्याला प्रश्न केला की तो पहिल्या दिवशी त्याला रुग्णालयात भरती केल्यानंतर कुठे गेला होता? त्यावर त्याचं उत्तर होतं की त्याला रुग्णालयातील वास सहन होत नव्हता. म्हणून तो दुसऱ्या दिवशीपासून रुग्णालयात आलाच नाही. असे असतात मित्र. काही मित्र हे जीवाला जीव देणारेही असतात, हंस आणि कावळ्याच्या दंतकथेतील हंसासारखे. तर काहीजण त्याच कथेतील कावळ्यासारखेही असतात. यात विचार करण्यालायक बाब अशी की गर त्याच मित्राचे आप्त वा मुलगी वा पत्नी जर त्या रुग्णालयात भरती झाली असती. तर त्याला रुग्णालयातील वास आला नसताच. ही वास्तविकता आहे. म्हणूनच परीवार महत्वपुर्ण ठरतो या ठिकाणी. आपले आईवडील, आपली मुलं वा आपली पत्नी. कधीच आपल्याला सोडून जात नाही अशा संकटसमयी. पुर्वी असं नव्हतं. पुर्वी संयुक्त कुटुंबपद्धती असायची. ज्यात घरातील प्रौढ व्यक्तीच निर्णय घ्यायचा व त्याच व्यक्तीच्या सल्ल्यानं सर्वजण चालायचेही. मग विवाह असो की आजारपण. ज्याला सर्व पैसे तोच प्रौढ व्यक्ती लावायचा आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची सेवा ही परिवारातील सदस्य करायचे. सेवा....... संकट काळात आपली सेवा घडावी म्हणूनच विवाह निर्माण झाला व विवाह हा जातीतच करण्याची पद्धती निर्माण झाली. कारण जातीत विवाह केल्यानंतर असा व्यक्ती आजारी पडल्यावर त्याचा आत्मीक सुख परीवार व नातेवाईक यांच्याकडून प्राप्त व्हावं. ज्या आत्मीक सुखाच्या भरवशावर आजारी असणारा तो व्यक्ती लवकरच दुरुस्त व्हावा ही अपेक्षा. तसं प्रेमविवाह केल्यानंतर घडत नाही. म्हणूनच जातीत विवाह करण्याची पद्धत. कारण मित्रमंडळी संकटात कामात येत नाही. ही संकल्पना आधीपासूनच रुढ आहे..म्हणूनच मित्र हे वारंवार बदलत असतात. बालपणाचे मित्र हे उतारवयापर्यंत साथीला नसतात. कधी ते आठवतही नाहीत. तसेच दहावी बारावीचे मित्रही सोबतीला शेवटपर्यंत नसतातच. तेही कालांतरानं आठवत नाही. नोकरीपेशातील मित्र हे नोकरीवर आहोत. तेव्हापर्यंतच. ते म्हातारपणात आठवत नाहीत. परंतु परीवार हा शेवटपर्यंत असतो. त्यांचे नातेसंबंध शेवटपर्यंत आठवतातक व ते जोडून ठेवण्याचा प्रयत्न माणूस शेवटपर्यंत करतोच. म्हणूनच परीवार महत्वाचा. वाद...... पारिवारीक वाद नेहमीच असतात. तसे वाद होतातच. हे वाद होतात अपेक्षेने. बरेच वाद पैशावरुनंच होत असतात. परिवारात जेव्हा पिसे मागीतले जातात व उपकारांची जाणीव न ठेवता पैसे परत केले जात नाही. तेव्हा नातेसंबंध बिघडत जातात. तसेच एखाद्यावेळेस एखाद्या अपेक्षेनं वाद होवून परीवार तुटतो. प्रेमविवाहातून तर परीवार हमखास तुटतोच. तेव्हा अशा अपेक्षाच ठेवू ऑये की परीवार तुटेल. असा पैशाचा व्यवहार करु नये की पारीवारीक नातं संपुष्टात येईल आणि असा प्रेमविवाह करु नये की आयुष्यभऱ्यासाठी नातंच संपून जाईल. पारीवारीक नातं टिकून राहावं. ते टिकवून ठेवावं. जेणेकरुन त्याच नात्यातून आपल्याला भविष्यात आत्मीक सुख प्राप्त होईल. जे आत्मीक सुख आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत टिकेल. तेच आत्मीक नातं आपल्या भविष्याची ताकद ठरेल. आपल्याला आपल्या जीवनात मोलाची मदत करेल. तसंच तेच आत्मीक सुख आपल्याला सतत जीवन जगायला प्रेरणा देखील देईल. यात शंका नाही. अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०