Dear Sona..Patrasumne..After you are gone - Part 4 in Marathi Letter by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 4

Featured Books
Categories
Share

प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 4

तू नेहमी ऋण मुक्तेश्वर बाजारात भाजी आणायला जायचा कधी कधी मात्र आपण दोघे कपिलतीर्थ मार्केट मध्ये जायचो तिथे सगळे विक्रेते तुझ्या ओळखीचे होते मितभाषी असला तरी तू माणसे राखून होतास सगळीकडे तुझ्या व्यक्तिमत्वाची छाप असायची आता कपिलतीर्थ मार्केट मध्ये जायची माझी ताकद नाही सगळी जण तुझी चौकशी करतील आणि मग उत्तर देण्याऐवजी माझे डोळे गळायला लागतील आणि मला स्वतःला आवरणे अशक्य याची भीती वाटते आता भाजी फळे बहुधा ऑनलाईन मागवते..मीकिती लागते एकटीला असे...एवढेच काय आपले नेहेमीचे फिरायचे रस्ते सुद्धा मी बदलून टाकलेत तिकडे खूप वर्ष फिरत असल्याने असंख्य ओळखीची लोक आहेत आपण कायमच सगळीकडे जोडीने फिरायचो त्यांनी आता तुझ्या विषयी काही विचारलं तर उत्तर देण्या इतक माझ्यात बळच राहिलेले नाही पूर्वी प्रत्येकाशी हसून खेळून मुद्दाम हाक मारून बोलणारी मी आता बोलायचं दूरच.. नजर चुकवते मी लोकांची शक्यतो अनोळखी भागात फिरते गप्पिष्ट असणारी मी आता बदलून गेले आहे लोकांशी बोलणे त्यांना भेटणे टाळते आता मी..आपल्या हॉल मधले टेबल टिपॉय आणि मोठे गणपती बाप्पा यांची जागा बदलली आहे बाकी सर्व वस्तू जागीच आहेत  घरातली पुस्तके सुध्दा एखाद्या छोट्या लायब्ररीला देऊन टाकायचा विचार आहे तू औषधे तयार करीत होतास तो मोठा दगडी खलबत्ता कुठंतरी आयुर्वेदिक औषधे तयार करण्याच्या कारखान्यात द्यायचा विचार आहे तसा शोध चालू आहे आता आपल्याकडे स्फूर्ती दुध येत नाही आपण पूर्वी फिरून येताना ते दूध, दही आणत असू त्या विक्रेत्याशी रोजच्या गप्पा करीत असू आता तिकडे जायला मन होत नाही तुझ्या जाण्याचा विषय कोणी काढावा आणि माझी कींव करावी असे नाही वाटतते दुखः मला झेपणार नाही आपल्या इस्त्री वाल्याकडे सुद्धा आता मी जात नाही कामवाली ला पाठवते तुझ्या आवडत्या आणि अतिशय सोयीच्या अशा स्वयंपाक घरात असलेल्या भाजीच्या रिकाम्या जाळीच्या पिशव्या आता सगळ्या नाही वापरायला लागत..एखादं दुसरी बास होते स्वयंपाक घरात कुठ काय कुठल्या डब्यात ठेवायचे हे तुझे सेटिंग असायचे आता मी एकटीच असल्याचे त्यात सुद्धा थोडा फार बदल घडतो आहे बरीच भांडी,क्रोकरी मध्यंतरी देऊन टाकली होती मला वाटल होत मी आता इथे परत येणार नाही म्हणून ती दिली पण आता वाटते उगीच दिली कारण जिला ती देऊन टाकली तिला तिची काहीच किंमत नव्हती त्यापेक्षा आता इथे ती मला उपयोगी पडली असती स्वयंपाक घरात तुझ्या पद्धतीने भांडी पालथी घालायला मेड ला शिकवले आहे तू लक्ष घालून आमच्या आईच्या पद्धतीने करीत असलेला मसाला अजून शिल्लक आहे ती बाटली पहिली की तुझी मसाला करायची लगबग, निगुती सगळे आठवते दोन तीन वेळा या मोसमात आंब्याचे लोणचे तुझ्या पद्धतीने घातले लोकांना नमुना म्हणून वाटले सुद्धा सगळी म्हणाली आम्हाला आवडले असे ...पण मला स्वतःला जाणवले की तुझ्या आईकडून  लोणचे करताना आलेला पारंगत पणा त्यात नव्हता ते तुझं कौशल्य मला शिकता नाही आले याची खंत वाटते मला तुझ्या आई म्हणजे आपल्या सासूबाई विषयी सुद्धा लिहायचे होते त्यासाठी तुला विचारून काही गोष्टी माहिती संकलित करणार होते...पण ते राहिले बाजूला आणि तुझ्यावर लिहायची वेळ आली बघ.मी थोडे घर सुटसुटीत करते आहेपसारा कमी करते आहे जो आपण तुझ्या आजारपण आधी  आपण दोघे करणार होतो तेव्हा मी करू रे असे म्हणत आळस केला..ते आता सगळेच माझ्या अंगावर कोसळले आहे तरीही मी ते निभावत आहे घरच्या सुरक्षितपणाच्या दृष्टिकोनातून काही ठिकाणी जाळ्या, पत्रा मारला आहे सगळ्या घराच्या खिडक्यांची दारे जाळ्या मध्ये स्वच्छ करून घेतलीत तुझ्याईतके प्लॅनिंग नसेल पण सुचेल तसे पुढे येईल तसे काम पार पाडते आहे बाग आहे तशीच पाणी घालून कायम स्वच्छ ठेवते आहे बागेतल्या झोपाळया वर जर तुझ्या जागेवर बसले तर झोका हळू घेते तुला मोठा झोका घेतलेला आवडायचा नाही ना तुझी लाडकी गाडी सुद्धा पुसून कव्हर घालून ठेवते आहे अधूनमधून फिरायला पण जाते मी तिला घेऊन आता मी टीव्ही बघते रोज थोडा वेळ पण आपली पूर्वीची मजा येत नाही अजूनही टीव्हीवर कोणतेही कंटेंट बघताना मधे मध्ये तुझ्याकडे बघत कमेंट करतच मी बघत असते बाकी आलेला दिवस देवाच्या कृपेने आणि तुझ्या वरून केलेल्या देखरेखी मुळे खरोखर आनंदात आणि गडबडीत चालला आहे तुला जशी अपेक्षित होते तशीच मी टिप टॉप फॅशनेबल आणि आनंदी राहते आहे बाकी तुझ्या असंख्य आठवणी सुंदर सुंदर प्रसंग मनात आहेतच...त्याची रिल सुद्धा करीत असते मी तुझ्या सोबत घालवलेल्या अनमोल क्षणा सोबत त्यांच्या फोटो व्हिडिओ सोबत आयुष्य आणखी छान वाटते मात्र अजूनही कुठेही कोणतीही चांगली गोष्ट बघितली काही छान खाल्ले ,आनंदाचे प्रसंग आले की तू हवा होतास अशी जाणीव होते असे वाटते तुला सोडून मी अशी मजा करते ते योग्य नाही पण काय करणार नाइलाज आहे Show must go on...कितीही सावरले तरी डोळे पाझरत रहातातच कोणी म्हणतात गेलेल्या माणसाच्या आठवणीत रडू नये आत्म्याला त्रास होतो ..तरी पण मी वेडी.. मला कळते तरी वळत नाही रे त्याबद्दल माफ कर मला माझे पाझरणारे डोळे आता जेव्हा तुझ्याकडे येऊन भेटेन ना तेव्हा तूच तुझ्या हाताने पुसशील आणि मला जवळ घेऊन शांत करशील देव कृपेने तो दिवस लवकर येवो तुला भेटायला मी आतुर आहे❤️तुझी आणि फक्त तुझी लाडकी वृषाली..