Letter to Sumane..Your special sentences Part 4 in Marathi Letter by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग ४

Featured Books
Categories
Share

पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग ४

प्रिय सोना 

आपला एक मुलासारखा असणारा नातेवाईक मुलगा अजिबात मनमोकळे वागायचा नाहीआपण त्याच्यासाठी खूप करायचो त्याला जीव लावायचो.

.पण तो कधीच काही अंगाला लावून घ्यायचा नाही

किती वेळ त्याला समजावून पाहिले पण तो अजिबात संपर्कात सुद्धा राहायचा नाही का कधी आपली चौकशी करायची पण तसदी घ्यायचा

अशा वेळी तो प्रेमाने किंवा मनमोकळे बोलत नाही यासाठी माझी चिडचिड व्हायची

तुला सुद्धा मनातून नाराज वाटत असे पण तू काही प्रतिक्रिया नाही द्यायचा

तो बोलत नाही असे मी म्हणले का

तेव्हा तू म्हणायचा.."तो बोलून त्याच्या तोंडून काय  ज्ञानेश्वरी  बाहेर पडणार आहे"नाही बोलला तर नाही बोलला.."

तू अशा बाबतीत खूप व्यवहारीक होतासआणि मी अती भावनाप्रधान..

मला दान धर्म, कोणालाही मदत करण्याचा खूप नाद होताआर्थिक संकटात असणाऱ्या कोणालाही लगेच मदत करायला मी तयार व्हायचेतुला या गोष्टी खूप रुचायच्या नाहीत.

पण मला कोणत्याही प्रकारे तू विरोध करायचा नाहीस

कित्येक वेळा असे लक्षात यायचे की आपण केलेली मदत अनाठायी होती

किंबहुना ज्या ठिकाणी तू केली तिथल्या लोकांना त्याचे काहीच देणे घेणे नाही

दिलेला पैसाही योग्य ठिकाणी खर्च होत नाहीय..

अशा वेळी तू मला म्हणायचा बघ तुला सांगितले होते ना असे चटकन कोणते भावनात्मक निर्णय घेऊ नकोस..."Charity is Crime"

कधी कधी रेडिओ वर गाणी ऐकताना खट्टा मिठा मधील थोडा है थोडे की जरुरत है...

हे गाणे लागले की लगेच "सोडा है व्हिस्की की जरुरत हैं"अशी त्याची तोडमोड करून तू म्हणायचा 😃

तुझा एक भाऊ फार कुरकुर्या स्वभावाचा होता तू नेहेमी त्याच्या मनाप्रमाणे वागायचा

 तरी देखील बऱ्याच गोष्टी त्याच्या मनासारख्या त्याला वाटायच्याच नाहीत अशा वेळी वयाने मोठा असल्याने त्याचा मान राखायचा म्हणून तू तिथे काही बोलायचा नाहीस 

घरी आल्यावर मात्र "का रे बंड्या आता का ओरडतो .?असे म्हणून हसायचा 😃

आपण रोज सकाळी नियमित लांब पर्यंत फिरायला जायचो

 कधीतरी बदल म्हणून एखाद्या बागेत अथवा ग्राउंड वर फेऱ्या मारायला गेलो का तुला ते फारसे रुचायचे नाही

घरी आल्यावर लगेच.."काय ते वरातीतल्या घोड्या सारखे फिरणे अजिबात मजा नाही त्यात "अशी तुझी टिप्पणी असायची

 घरात जेव्हा पाहुणे यायचे असतील तेव्हा थोडे जास्त असायचे तुझी इच्छा असायची मला मदत करायची पण त्याच वेळेस तुला बाहेरची पण कामे असायची 

मग मीच माझ्या स्पीड ने बरीचशी कामे उरकून टाकायचे तू स्वयंपाक घरात आल्यावर सगळी कामे उरकत आलेली बघून थोडे कौतुकाने आणि थोडे रागाने "सगळ्या कामाचा एकदाचा उरका पाडला ना" असे म्हणायचा मी फक्त स्मित करीत असे..😊

आपले बरेच नातेवाईक गावात राहायचे आपल्या दोघांना सगळ्यांच्या घरी अधून मधून जायची खूप हौस होती

 त्यांनाही आपण आपल्या घरी बोलवायचो ते त्या वेळेस हो हो येतो म्हणायचे पण कित्येक वर्षात कधीच कोणी आपल्या घरी येत नव्हते हे आपल्या लक्षात आले होते 

तसेच पुण्यातही आपले नातेवाईक होते तिकडेही गेलो की आपण आवर्जून त्यांच्याकडे वेळ काढून जायचो भेटायचो गप्पा करायचो त्यांना कोल्हापूरला आलात की आमच्या कडे या म्हणायचो 

पण का कोण जाणे ते मात्र आपल्याकडे कधीच यायचे नाहीत 

ते कोल्हापुरात येऊन गेले हे आपल्याला ते गेल्यावर समजायचेपण आपल्या घरी आले नाहीत असे लक्षात यायचे 

मला खूप वाईट वाटायचे तसेच तुला पण...

पण तू तसे बोलायचा नाहीस 

मात्र गेली काही वर्षे आपण नातेवाईकांकडे कारण असल्या शिवाय जायचे बंद केले होते अशा वेळी तुझे एक खास वाक्य होते." हम किसी के घर नहीं जायेंगे"

नोकरीच्या कारणाने माझी सवय गडबडीने प्रत्येक काम करण्याची होती 

तुझा डॉक्टरी व्यवसाय असल्याने तू मात्र प्रत्येक काम शांतपणे आणि निगुतीने करायचा

 माझ्या पटापट काम करण्याच्या सवयीने काही वेळा कामे बिघडायची किंवा ती परत करायला लागायची 

अशा वेळी तू म्हणायचा "गडबड मत ब्याडा" सावकाश करीत जा काम 😊

काही वेळा आपण तीन चार तास टीव्ही बघत असू किंवा अर्धा पाऊण तास असेच चहा पित बोलत बसायचो

तू कामाचा माणूस असल्याने ...

अचानक तुला कामे आठवायची मग तू चटकन उठून म्हणायचा " चला कामाला लागा बसून कोणाच भले झालेय"😃😃