**पूनम जेव्हा सासरी जाते तेव्हा,**
निघते फक्त. काहीही घेऊन जात नसते. जसंच त्यांना कळतं की मी येत आहे, तसं जणू त्या संपूर्ण एरियाचा श्वास आला आहे. प्रत्येक जण घरातून भरभर खाली येतो, कळत-नकळत. एका बिल्डिंगमध्ये ८० च्या पुढे घरे असतील, आणि अशाच जवळपास भरपूर. पण गाडी पार्किंगला लागायच्या आधीच तिथे गर्दी असते.घरात सासूबाई म्हणतात, "अजून एक-दोन तास लागतील आपल्यापर्यंत यायला तिला..." अजून पूनम फक्त पूनम आहे. माझी अशी दुसरी कोणती ओळख नाही. फक्त प्रेम, आपुलकी आणि विचारपूस करत आली, बाकी काही एक नाही.पण सगळेच असतात वाट बघत, आतुरतेने. वेगवेगळ्या भाषा बोलणारे, "आप आते ही नहीं!" आपण हसून तेवढंच म्हणायचं, "आता आली आहे, बघा..." जातानाही तेवढंच, आणि येतानासुद्धा.सुरुवातीला हीच भीती सासूबाईंना जाणवली असेल. पण त्यांनी मला जवळून अनुभवले. त्यांना हे accept कधीच नव्हतं, पण नंतर त्यांनी स्वतःच पाहिलं, काहीही झालं तरी ही माणसं सोडत नाहीत.आणि तीला माणसे सोडतं नाहीत.ह्याच परिस्थितीमुळे घरातील मंडळी सुरुवातीला रुसून बसत, बोलत नसत. आहेत कोणाच्या तुम्ही, पण गेल्या भरपूर वर्षांमध्ये त्यांच्यात माझ्याबद्दल झालेला बदल मी पाहिला. त्यांच्या मुलांपेक्षाही त्या मला जीव लावायला बघतात.जेव्हा घरात मी येते आणि एखादं कोणी बोलत नाही, तेव्हा त्या स्वतः म्हणतात, "तिची माणसं खूप आहेत जगात. आपण नाही कोणी बोललो तरी तिला आपल्यापर्यंत येऊसुद्धा देत नाहीत, तरी ती येते. पण आपलं हे वागणं असतं..."त्यांचं मन दुखलेल मी अनुभवलं माझ्यासाठी....असं नाही की मला काहीच वाटत नाही. असं नाही की मला त्यांची काळजी नाही, किंवा मला ते नकोत. पण माझ्यामुळे त्यांच्यात वाद नको....त्यांचं रुसणं साहजिक आहे. ते लहान आहेत, त्यांचा हक्क आहे माझ्यावर रुसण्याचा. पण मी जास्त थांबू शकत नाही. मला पुन्हा तिथे गुंतायचं नाही.पण प्रत्येकजण योग्य वेळ आली की समजतो, का वागत आले मी अशी.सोडल्यानंतर किंमत कळायची वाट मी कधीच बघत नाही. मला वाटतं, आहे तेव्हाच त्या नात्यांसाठी आपण होईल तेवढे प्रयत्न करायचे. कारण मनातून नातं संपलं की मग मी त्या व्यक्तीला फक्त एक माणूस म्हणून बघते मी. मग फक्त तिथे उरते ती माणुसकी माझ्यासाठी...प्रयत्न खूप केलेले असतात, चान्ससुद्धा खूप दिलेले असतात, वेळसुद्धा दिलेला असतो. पण जो येईल तो ठीक, नाहीतर मग मी आणि माझं कर्तव्य.जेव्हा कुठेही राहायला गेले, तेव्हा तेथील परिस्थिती पाहून सासूबाई नेहमी म्हणतात, "ही मनाने श्रीमंत आहे."प्रत्येक मार्केटमध्ये, भाजीवाल्यांपासून ते बांगड्या भरणाऱ्यांपर्यंत, आम्ही महिला मंडळ उभं असू तेव्हा सुद्धा त्या म्हणतात, "ही श्रीमंत आहे."खरी श्रीमंती मनाची असते, हेच ते ओळखतात.भाजीवाली काकू अजूनही माझ्यासाठीच, जी भाजी मला आवडते ती नेहमी घेऊन येतात. जसं की "हातग्याची फुलं" माझ्या आवडीची. मोसम आला की त्या आठवणीने आणतात. हे इकडे मिळणं कठीण असतं.हे सर्व मिळतं तेव्हा, जेव्हा आपण मनाने जगतो. त्यांच्या जागी स्वतःला नेहमी उभं करून बघतो.नाही वेळ मिळत प्रत्येकाच्या कार्यक्रमात, पण दुःखात नेहमी भेटून येत असते. मग वेळ लागला तरी चालेल.वाटतं, सुखात नाही गेलो तरी चालतं. पण दुःखात नेहमी समोर असावं, जमेल तेव्हा. आपलंच दुःख आहे ते म्हणून. मग कळतं, समोरचा कोणत्या परिस्थितीतून जात असेल.बाकी नेहमीप्रमाणे प्रत्येकाच्या मनात माझं घर...माझे मिस्टर नेहमीच म्हणतात, "ही समुद्र आहे. ती कोणालाच विसरत नाही, आणि विसरूही देत नाही."वाटतं, अशा घराची मला गरज वाटत नाही जिथे फक्त भिंतींनी ते उभं आहे.लास्ट टाईम नणंदसुद्धा म्हणाली, "जिथे त्या असतील, तिथे आपलं घर वाटतं."आयुष्यात सर्व मिळालं, सर्व दिलंही प्रत्येकाने.प्रत्येकामध्ये हे गुण असतात. पण आपण त्यापेक्षा कुठेतरी भीती, "का बोलू?", "मीच का समोरून जाऊ?", "माझं मला आयुष्य आहे", "माझी मुलं आहेत" — हे सगळं करत आपलं जीवन जगणं विसरत चाललो आहोत का?हे आपण बघतच नाही.माझा प्रवास छोट्या सिटीतून. सुरुवातीला attitude दाखवत विचारायचे, "कुठून आली?" तर उत्तर होतं, "विदर्भ."पण माझे विचार, भाषा आणि वागणं मला माहीत होतं.मी त्यांना एवढंच म्हणायचे, "मी जे बोलते ती भाषा तुमच्या पुस्तकात नसेल, एवढी शुद्ध आहे."आज प्रत्येक ठिकाणी माझं मित्रमंडळ आहे.काय तर, मी आली कुठून...मी जिथून आले, तेच ठिकाण बेस्ट आहे, हे सर्वांना दाखवून दिलं.**व्यवहारातून, वागण्यातून.** हे सर्व मला अहंकार आहे किंवा मीच बेस्ट असंही नाही.....फक्त मी केलेल्या,मला मिळालेल्या जगलेल्या प्रवासाचा एक भाग आहे. असेलही माझ्यात कुठे कमी कोणीच पूर्ण नसते. पण नेहमी मी आजपर्यंत पडताळा घेत आली मी कुठे चुकली का? जर हो तर ते नीट केलंही, कधी चूक नसताना आपले म्हणून नेहमी माफी मागितली,कारण तेव्हा नातं महत्त्वाचं समजत आलेली,..आज माणूस म्हणूनही चुकते का बघत असते..जर होत तर माफी...कारण माफी मागायला मला काहीही वाटत नाही.....माझे values नेहमीच माझ्यापेक्षा मोठ्या ठेवत आली मी....
मी नशिबवान आहे,की हे सर्व मी अनुभवते,अनुभवत आली आणि अनुभवता आले मला.....माझ्या आईबाबांच्या नेहमी ऋणी आहे...ज्यांनी मला फक्त तू त्या उडत राहा....त्या पक्ष्यांसारखी...
मी ऋणी आहे माझ्या मिस्टरांची...बाबा गेल्यानंतर ते तर बाबापेक्षाही जास्तच झालेत, माहीत आहे बाबांपेक्षा कोणी नसेल, पण ते आहेत. भलेही सुरुवातीला मी त्यांची आई,गुरू सर्व बनली असेल,पण आता सर्व तेच करतात...मला नेहमी माझे बाबा त्यांच्यात दिसतात, मग सकाळचा त्यांच्याच हातून माझ्यासाठी ची गरम कॉफी,असो की सुट्टीच्या दिवशी त्यांनी बनवलेला नाष्टा...बस अजून काय हवं असतं.... मी सदैव त्यांच्या ऋणी...
माणसांमध्ये माणूसपण आहे, आपुलकी आहे म्हणूनच माझ जग , आणि मी ह्याच माणसांमुळे श्रीमंत आहे....... त्यामुळे माणसाच्या माणुसकीला मी ऋणी आहे... राहीन नेहमीच....