Patrasumaane...Sweet Journey - Part 17 in Marathi Letter by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १७

Featured Books
  • વડનગર પુરાતત્વ મ્યુઝિયમ

    વડનગર હાટકેશ્વર મંદિર વિશે અત્રે લખી ગયો છું. ટૂંકમાં ફરી કહ...

  • રોકાણ - 5

    ભાગ ૫ — એક અધૂરું સપનુંડોક્ટરનો ફોન મૂક્યા પછી રમેશભાઈ થોડા...

  • Imege Time Mashin

    સોમનાથના દરિયા કિનારે અદ્રશ્ય થયેલી 'ટાઈમ-મશીન' વાન...

  • શૂન્યની બહાર - 11

    ભાગ 11 — પ્રથમ વિષય“હું નક્ષત્રનો પ્રથમ વિષય હતી.”નિષાના શબ્...

  • આનંદનગર : પ્રકરણ ૩૦

    પ્રકરણ ૩૦: દ્વારકાની યાદો અને આનંદનગરમાં પાવન 'લાલાના હિ...

Categories
Share

पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १७


प्रिय सोना

..पुण्यातून परत आल्यावर लगेच तू कुर्ग ट्रिप प्लान केलीस एक कार भाड्याने घेऊन आपण तिकडचे हॉटेल बुक केले चार दिवस मुक्काम ठेवला होता आपल्याला कुर्ग खूप आवडले तिकडे छान फिरलो तिकडचे खास पदार्थ खाल्ले आपल्याकडे बाटाची दुकाने होती तरी तिथल्या बाटाच्या दुकानात चप्पल घेतल्या भरपूर वेगवेगळे शॉपिंग केलेतिकडे एक स्पाइस गार्डन बघायला गेले असता मला त्या गार्डनच्या मालकाकडे एक अबोली कमळ दिसले मागे अशाच एका कमळा सोबत फोटो काढायची संधी नागपूरला मिळाली होती आता प्रत्यक्ष कमळ समोर होते पण मागणार कसे अनोळखी माणसे होती ना सहज म्हणून मी त्यांना आपल्या बागेतील गुलाबी कमळाचे फोटो दाखवले त्यांना खूप नवल वाटले आणि आपले कौतुक पण..स्पाइस गार्डन बघून परत आल्यावर जाताना त्यांनी एका प्लास्टिक पिशवीत पाण्यात ठेवलेले अबोली कमळाचे कंद मला दिले मी चकित आणि आनंदित पण झाले न मागता हे कमळाचे कंद मिळाले नेहेमीप्रमाणेच माझी इच्छापूर्ती झाली होती चार दिवस जवळ ठेवून नंतर मग रेल्वेच्या प्रवासातूनु आपण ते कंद घरी अलगद आणून आपल्या कमळ तळ्यात सोडले नंतर दोन वर्ष त्याला कमळ नाही आले नंतर मात्र दोन दिवसा आड कमळ लागू लागली खूप देखणं होतं ते कमळ तुला तर इतके आवडले की त्याचा फोटो तू मोबाईल च्या लॉक स्क्रीन वर ठेवला होतास तुझ्या मोबाईल च्या मेन स्क्रीन वर आपल्या जिमी चा फोटो होताच आपण कोरोना आधी जपान टूर प्लान केली होती पण त्या वेळेस ती रद्द झाली होती त्या बदल्यात त्यांनी आपल्याला संपूर्ण गुजरात टूर दिली होती त्यामुळे गुजराथ पूर्ण पाहून झाले होते आता आपण मस्त पंधरा दिवस राजस्थान टूर प्लान केली सोबत आपले दोन मित्र त्यांची फॅमिली होती या टूर मधे आपण भरपूर विविध पदार्थ खाल्ले तू संपूर्ण टूर मध्ये प्रत्येक गावी एक दोन अशा  माझ्यासाठी एकंदर दहा साड्या घेतल्या होत्यास मी कोणतीच साडी मागितली नव्हती पण तू हौसेने स्वतः पसंत करून त्या घेतल्यास या साठी आपल्या सहप्रवाशांनी सुद्धा तुझे खूप कौतुक केले त्या टूर मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची भरपूर मिठाई खाल्ली रेल्वेत तर आपले एक सहप्रवासी नुकतेच एक राजस्थानी लग्न करून आले होते तेतिकडे मिठाई खाऊन कंटाळले होते थोड्या ओळखीत त्यांनी अनेकविध प्रकारांनी भरलेला अख्खा मिठाई बॉक्स आपल्याला देऊन टाकला ते प्रकार खाऊन मी फार खुश झाले तेव्हा तू म्हणाला “गोडोबा काका” झाले का आता समाधान त्या टूर मध्ये तू मला भरपूर मोत्यांचे दागिने पण घेतले होतेतू होताच हौशी ..अगदी गोल्डन ट्रँगल ऑफ महाराष्ट्र टूरमध्ये येवला इथे तू मला 18000 ची पैठणी घेतली तेव्हा मी म्हणाले मी किती वेळ नेसणार ही कशाला इतकी महाग..तेव्हा तू म्हणाला तू तर अंबाबाई आहेस  .अंबाबाई एकदा नेसलेली साडी परत नेसत नाही तू एकदा नेसली.. साडीची किंमत फिटली …त्या टूर मधे सुला वायनरी ची सहल होती तू तिथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन विकत घेतल्या होत्या आपण सहाच सहप्रवासी गाडीत असल्याने गाडीत भरपूर जागा होती घरी गेल्यावर तू मला पण रेड वाईन टेस्ट करायला दिली होतीस तुला ड्रिंक घ्यायची आवड होती पण तुला चार लोकांसोबत घ्यायला आवडत नसे तुझी डॉक्टर ची इमेज खराब होते असा तुझा विचार असे त्यामुळे तू घरीच हा प्रोग्राम करत असे महिन्या दीड महिन्यात एकदा ते सुद्धा तुझे ब्रँड एकदम महागाचे असत ती घेताना सुद्धा तुझी सिस्टीम असे सात वाजता घ्यायला सुरू करून आठला समाप्त करून जेवण करायचे फार उशीर केलेला तुला खपत नसे दारू सुद्धा ठराविक पेग घेणे कधी कधी मी खुश असले की तू मला गमतीने बाटली घेऊन दे म्हणायचा मी पण हौसेने तुला तुझ्या आवडीची दारू घेऊन देत असे नवऱ्याला दारूची बाटली विकत घेऊन देणारी अशी जगातली तू पहिलीच बायको असशील..असे तू म्हणे पण मला तुझी सिस्टीम व संयम माहीत होता त्यामुळे मला काहीच वाटत नसे नुकतीच कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेन सुरू झाली होती हौशी तर आपण दोघेही होतोच आपण ठरवलं या ट्रेन चे पाहिल्या दिवशीचे तिकीट काढायचे लगेच बुकिंग केले एका गुरुवारी इथुन पुण्यात गेलो रविवारी परतीची ट्रेन होती दोन दिवस राहिलो फार मजा वाटली .मीनवीन तंत्र नवीन ट्रेन खाणे पिणे पण छान होते आपल्या नातीला समजल तेव्हा ती पण म्हणाली आजी मला का नाही नेले तिला सगळीकडे आपल्यासोबत यायचे असायचे पण तिच्या आईवडिलांचा आपल्यावर विश्वास नव्हता ते तिला आपल्यासोबत सोडायचे नाहीत मधे एकदा सहजच बँकेच्या हॉलिडे होम चे बुकिंग करून आपण चार दिवस जीवाची मुंबई करून आलोशिवाजी पार्क दादर ला रोज फिरायला जात होतो सगळी जुनी जुनी हॉटेल पालथी घातलीशॉपिंग स्ट्रीट वर भरपूर खरेदी केली प्लाझा सिनेमा गृहात “छावा” सिनेमा लागला होता.तो बघून आलो तू मला बरेच फ्रॉक, शॉर्ट टॉप्स घेतलेसतुला फॅशन ची हौस होतीच तुला पण एक छान जीन्स जाकीट मिळाले होते ते तुला फारच आवडले होते आपल्या नातीला पण आपण एक जीन्स जॅकेट आणि गॉगल घेतला या वस्तू पाहून तिला आनंद झाला होता पण या दोन्ही गोष्टींचा फारसा वापर केला गेला नाही अशा सारख्या आपल्या टूर सुरूच होत्या एकदा डेहराडून मसुरी फिरलो तिकडे पण गरम कपड्यांचे शॉपिंग केले तिथले वेगवेगळे पदार्थ आणि सर्च करून खाल्ले एकदा मुद्दाम दिल्लीला जाऊन चार दिवस राहिलो जुन्या दिल्लीच्या गल्ल्या गल्लीतून फिरलो तिथले पदार्थ खाल्ले लाल किल्ला बघून पराठा गल्लीत फिरलो कॅब करून ऋषिकेश, बद्रिकेदार, वृंदावन, मथुरा फिरलो शेवटी लोक विचारायला लागले तुम्ही कोल्हापुरात असता कधी पायाला भिंगरी लागली होती जणू 😊आणि नुकतीच कोल्हापूर हैदराबाद,अहमदाबाद, तिरुपती अशी विमान सेवा सुरू झाली गुजरात तीन वेळ बघितले होते तरीही केवळ विमान सेवा चालू झाली म्हणून आपण चार दिवस एक थ्री स्टार हॉटेल बुक केले तिकडे जाऊन राहिलो हॉटेल जवळच लॉ गार्डन होते रोज सकाळी फिरायला तिकडेच जात होतो रोज वेगवेगळ्या ठिकाणी स्पेशल थाळी खायला जात होतो तिथेच एक आपण मार्केट मधे टी शर्ट, मोठी बॅग, दोघांसाठी एकसारखे पांढरे कॅनव्हास बुट अशी खूप खरेदी केली रोज उठून मार्केट मध्ये जात होतो तिथे एक भद्रकाली चे मंदिर होते तिचे दर्शन घेऊन शॉपिंग सुरू त्याचवेळेस कोवळ्या तूर शेंगाचा मौसम होता त्या दिवसात तिकडे तुरीची कचोरी करीत.ज्याला “लिलवा कचोरी” म्हणत मला स्वयंपाकाची आवड होती मी त्या कचोरी साठी त्या शेंगा घेतल्याहा मौसम भाज्यांचा असल्याने उंधियु सुद्धा केला जायचा मी पण या भाज्या आणि उंधियु मसाला घेतला होता कोल्हापूरला गेल्यावर हे दोन्ही पदार्थ मी  केले होते जे तुला खूप आवडले लॉ गार्डन पाशी संध्याकाळी लेडीज कपड्यांचे शॉपिंग चालत असे तू हौसेन मला संध्याकाळी तिकडे घेऊन गेलास आणि पंजाबी ड्रेस घेऊन दिलेस तुझ्या हौसेला काही मोलच नसायचं