प्रिय सोना..
आपण मुंबईत फिरत होतो खात पित होतो मनात आठवणी मात्र दुबई मधल्या होत्या यावेळेस अबू धाबी पाहताना लक्षात आले होते की आता शेख झायेद मास्क बघायचे कायदे खूप कडक केले होते आपल्या ग्रुप मधील एकीला केवळ हाताच्या बाह्या जॉर्जेटच्या आणि पातळ आहेत या कारणाने आत सोडायला नकार दिला होता बाकी तिथे डेझर्ट सफारी एन्जॉय करताना पूर्वी आपण हे केले आहे असे जाणवत होते फेरारी 🌍 वर्ल्ड मध्ये मात्र बरेच आकर्षक बदल झाले होते लाल रंगाची पार्श्वभूमी मात्र तीच होती भरपूर फोटो तिथे पण काढले आता मात्र दर पाच वर्षांनी दुबई करायची असे आपण ठरवले होते मुंबईतून चार दिवसानंतर ठरल्या दिवशी रात्री अकरा वाजताच्या ट्रेन ने आपण राजस्थान ला गेलो रतलाम रेल्वे स्टेशन पासून लग्न स्थळ दोन अडीच तासाच्या अंतरावर होते "साजन सजनी"वाटीका असे नाव होते दिवसातून दोनच प्रायव्हेट बसेस होत्या बाय लक आपल्याला पहिली बस मिळाली आणि आपण निघालोआपले वऱ्हाड तिकडे पहाटेच पोचले होतेच आपण फोन करुन येतो आहोत असे कळवले ती प्रायव्हेट बस अनेक ठिकाणी थांबत थांबत आपण जवळ जवळ तीन तासाने तिकडे पोचलो तेथून लग्नाचे कार्यालय दोन तीन किलोमीटर होते आपल्याला घ्यायला मुलीचे मामा गाडी घेऊन आले होते फार सुंदर एखाद्या रिसॉर्ट सारखे कार्यालय होते ते आपल्या नातेवाईकांच्या गाठी भेटी झाल्यावर. आपल्याला एक स्वतंत्र मोठी रूम दिली गेली सोबत त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या भेटी टॉयलेटरी खाण्याचे पदार्थ असे बरेच काही वेगवेगळ्या सुंदर पाउच मधून दिले गेले कार्यालयाचा परिसर प्रशस्त होता नाश्ता भरगच्च भरपेट झाल्यावर सगळी पाहुणे मंडळी आवरून वधूच्या घरी गेलो लग्न पूर्णपणे राजस्थानी पद्धतीने असल्याने सकाळीच तिकडे काही कार्यक्रम नाच गाणी व्हायची होती त्यांच्या घरचा कार्यक्रम खान पान पार पडल्यावर बाहेर राजस्थानी पद्धतीने गरबा डान्स झाला आपण दोघांनी त्यात उत्साहाने भाग घेतलाआम्ही दोघींनी जावानी महाराष्ट्रीयन फुगडी खेळली परत कार्यालयात आल्यावर साग्रसंगीत भोजन पार पडले संध्याकाळी साखरपुडा होता त्याची तयारी सुरू झाली आपण जेवून इकडे तिकडे थोडे भटकून आलो आणि मग थोडी विश्रांती घेतली संध्याकाळी संपूर्ण लॉन आणि परिसर उत्तम शृंगारला होता लायटिंग केले होते साखरपुडा झाल्यावर पदार्थांचे असंख्य स्टॉल लावले होते मस्त जेवण होते रात्री बारा एक पर्यंत गप्पा टप्पा नवीन लोकांच्या ओळखी चालू होत्या आपल्या दोघांच्या बोलक्या स्वभावा मुळे आपण थोड्याच वेळात बऱ्याच लोकांशी सख्य जमवले लोकांनी आपल्या सोबत बरेच फोटो घेतले फार मस्त माहोल होता तो तिथे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर ला तर आपली जोडी इतकी आवडली की त्याने वेगवेगळ्या पोझ मधले आपले भरपूर फोटो काढले घरचे अनेक नातेवाईक या लग्नात होते जे कोल्हापूरचे असले तरी एका गावात राहून आपल्या भेटी फारशा होतच नव्हत्या अगदी तुझी सख्खी भाऊ बहिण सुद्धा आपल्याला तिथेच भेटली नुसते आपले" या की घरी "असे तोंड देखले बोलणारी लोक होती ती यापूर्वी अनेक वेळ आपण तुझ्या माझ्या सगळ्या कोल्हापूर पुणे परिवाराला अनेक वेळ घरी जाऊन भेटलो होतो पण का कोण जाणे ते लोक काही कधी आपल्या घरी येत नव्हते शेवटी कंटाळून तू एके वर्षी ठरवून टाकले होतेस…"हम किसीके घर नहीं जायेंगे…."तरी पण या सगळ्या गोष्टी मागे टाकून आपण सर्वांच्या सोबत मजा करीत होतो सकाळी उठून नेहेमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला जात होतो दोन तीन दिवस वेगवेगळ्या परिसरात फिरून तो भाग आपण बघत होतो इकडे "रजवाडी "चाय ची बरीच दुकाने होती सकाळी फिरून येताना आपण तेथून मसालेदार चाय पिऊनच येत होतो मी चायच्या दुकाना बाहेर असलेल्या मिशीवाल्या पुतळ्या सोबत फोटो पण काढला .सहज त्या भागाची आठवण म्हणून…दुसऱ्या दिवशी सकाळी हळदी होत्या आणि संध्याकाळी लग्न होते तिथे लग्नाचा मुहूर्त असा नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी हळदी कार्यक्रम चालू झाला दोन मोठी कमळाचे आकाराची पात्रे होती त्यात वधू वराना बसवून सर्वांनी त्यांना हळदी लावल्या यानंतर त्यांच्या कडच्या काही लोकांनी तिकडची गाणी म्हणली शेवटी वधू पक्ष विरुद्ध वर पक्ष अंताक्षरी अंताक्षरी कार्यक्रम होता मला गाण्यात रुची होती असंख्य गाणी येत होती मी हिरीरीने गाणी म्हणत होते.तू ही माझी छान साथ देत होतास शेवटी आपला पक्ष जिंकला.सगळ्यांनी एकच कल्लोळ केला सगळ्यांनी वाद्यांचा गजर करून नाच सुरू केलास..तू पण खूप नाचला…तुझ्याकडे चांगले नाचायचे कसब होतेच मला आनंद वाटला की वधू पक्षाच्या गावी आपण त्यांना हरवले..सगळ्यांनी माझे "कौतुक" केले तू इतकी गाणी छान म्हणते आम्हाला माहितच नव्हते असे सगळी म्हणली मी मनात म्हणले कधी माझी कसली वास्तपुस्त केली नाही तर कसे समजणार माझ्याकडे कोणत्या कला आहेत ते…दुपारचे जेवण झाल्यावर वरातीची तयारी सुरू झाली दुल्हेकी बारात आल्यानंतरच लग्न होणार होते आपण सगळे जण नटून थटून तयार झालो जवळच्या मारुतीच्या देवळात जाऊन दर्शन घेऊन मग ही वरात निघणार होती आपण दोघांनी सुद्धा तिथे जाऊन गळ्यात हार घालून फोटो काढायची हौस पुरी करून घेतली तू नेहेमी आपण हिमाचल मधून आणलेली टोपी कार्यक्रमात घालत असे ती तुला खूप आवडायची आणि अर्थात सगळ्यात उठून दिसायची आता पण तुझी ही टोपी बघून सर्वांनी कौतुक केले आपल्याकडच्या बाकीच्या बायका गुजराती पद्धतीची साडी नेसल्या होत्या मला ती आवड नव्हती मी मात्र पैठणी नेसले होते,सासूबाईची नथ घातली होती त्यांच्याकडील बायकाना माझ्या नथ घालण्याचे खूप अप्रूप वाटले तुझा लेंगा ,झब्बा, टोपीपुरेपूर "महाराष्ट्रीयन" लुक होता आपला आपली जोडी खरेच सगळीकडे उठून दिसत होती मारुतीची पूजा आरती झाल्यावर वधू कडील लोकांनी आपल्या सगळ्यांना तिकडचे फेटे बांधले आणि मग देऊळ ते कार्यालय या अर्ध्या एक किलोमीटर अंतरात वरात सुरू झाली भरपूर फटाके मोठा डी जे रस्त्यावर आजुबाजूला भरपूर लायटिंग शृंगारलेला घोडा .आपण सगळीजण तुफान नाचलो आणि वरात कार्यालयात पोचली मांडवात राजस्थानी पद्धतीने लग्न विधी सुरू झाले भरपूर फोटो व्हिडिओ झाले अखेर लग्न लागले..त्या दिवशी तर जेवणाचे असंख्य स्टॉल लावले होते कोणत्याच पदार्थाची कमतरतां नव्हतीखूप रात्री उशीर पर्यंत चालला होता सोहळा..दुसऱ्या दिवशी दुपारी आपण कोल्हापूरला जाणाऱ्या ट्रेनसाठी रतलाम ला जायला निघणार होतो अजून त्रिपुरसुंदरी आईचे दर्शन बाकी होते देवीसाठी घेतलेली लाल साडी मी तिकडे सगळ्यांना दाखवली.सर्वांना खूप कौतुक वाटले इतक्या लांबून महाराष्ट्रातून देवीसाठी मी साडी आणणे त्यांच्या दृष्टीने खरंच नवलाची गोष्ट होती आपल्या बरोबर आलेल्या वऱ्हाडाची ट्रेन संध्याकाळी होती.ते सर्व बाहेर पडताना त्रिपुरसुंदरी चे दर्शन घेऊनच बाहेर पडणार होते देऊळ लांब होते आपल्यासाठी मात्र मुलीचे मामा आपल्याला देवीच्या देवळात घेऊन जायला तयार झाले नाश्ता करून आपण मामांच्या गाडीतून त्रिपुरसुंदरी देवी दर्शना साठी निघालो