#Kavyotsav

'तू'


तू नितळ पाण्यासम
मनं असलेला
तू ध्रुवतारा अढळ
माझ्या मनी वसलेला


तू वस्तीतले ते वळण
जेथून समुद्र दिसावा
तू रातीची ती खिडकी
जेथे चंद्र रोज येऊन बसावा

तू सांजेचा घंटाराव
सुखद आवाज गाजणारा
तू मंत्रमुग्ध करत असलेला
तो पावा वाजणारा


मी वेडी रातराणी
निळ्या रातीला फुलणारी
तुझ्या ओंझळीत येता
सुगंधी स्वप्नांवर झुलणारी

©धनश्री साळुंके

Read More