जनहित न्युज महाराष्ट्र .संचालक

एसटीबद्दल एक हळवा कोपरा आजही मनात आहे. आताशा एसटीचा फारसा प्रवास होत नाही पण लहानपणीच्या कितीतरी आठवणी एसटीभोवती गुंफल्या आहेत. एसटीचं रुपडं तरी किती सुंदर. अगदी लांबून उठून दिसणारा तिचा खास लाल रंग आणि त्यावरचा पिवळा पट्टा. खिडक्यांचा रंग. सीटांचा हिरवा रंग. अगदी नऊवारी नेसणार्‍या प्रेमळ आजीची आठवण यावी. ज्या कोणी ही रंगसंगती शोधली त्याला सलाम.

लहानपणी एसटीचं सगळं जगच अदभूत वाटायचं. प्रचंड गर्दीत उभा राहून लोखंडी खांबावर टक टक आवाज करत तिकीटं विकणारा तो कंडक्टर. त्याची ती अल्युमिनियमची तिकीटपेटी. त्यावरचे वेगवेगळे तिकीटाचे पांढरे गठ्ठे. त्याचं ते तिकीट पंच करायचं ते यंत्र ! गळ्यात अडकवलेली पैसे ठेवायची कातडी बॅग. आपण गाव सांगितल्यावर पटापट दोन चार गठ्ठ्यातून तिकीटं फाडून ती योग्य ठिकाणी पंच करून ती आपल्या हातात जेव्हा तो द्यायचा तेव्हा जाम आदर वाटायचा त्याचा. सगळा हिशेब कसा करत असेल हा. बरं तिकीटावर नुसते पाढे लिहिल्यासारखे दोन रांगेत आकडे छापलेले असायचे. नेमकं कुठे पंच करायचं हे कसं कळत असेल याचं अजूनही कुतूहल आहे.

कंडक्टरचा सगळ्यात जास्त हेवा वाटायचा जेव्हा तो घंटी वाजवायचा ! एसटी सुरु करायची आणि थांबवायची पावर त्याच्याकडे आहे हे पाहून त्याचा आदर अधिकच दुणावायचा. दोन घंट्या दिल्या की एसटी सुरु आणि एक घंटी दिली की एसटी थांबणार म्हणजे थांबणारच ! कधीतरी आपल्यापण ती दोरी ओढून घंटी वाजवायला मिळावी ही एसटीने प्रवास केलेल्या प्रत्येक मुलाचं स्वप्न असायचं. कंडक्टर तिकीटं काढून झाली की आपल्या जागेवर जाऊन हिशेब जुळवत बसणार. कधी कधी हिशेब जुळला नाही तर पुन्हा शिरगणती करायला लागायची. एवढं काम झालं तरी कधी कधी एसटी च्या टपावर सामान चढवायला पण त्याला मदत करावी लागायची.

पुर्वी एसटीला एकच दरवाजा असायचा तो मागच्या बाजूला. त्या एसट्यांना ड्रायव्हरच्या मागे एक लांब पाच माणसं बसेल अशी मोठी सीट असायची. ड्रायव्हरकडे पाठ करुन बसावं लागे. लहानपणी बराच प्रवास त्या आडव्या बाकावर गुढग्यावर बसून वरच्या जाळीत बोटं अडकवून आणि तासनतास ड्रायव्हरकडे आणि समोरच्या रस्त्यावरची वाहतूक पहात केला आहे. आता विमानाच्या कॉकपीटचं जेवढं कुतूहल वाटतं तेवढच कुतूहल मला एसटी च्या कॉकपीटचं वाटायचं. ड्रायव्हरचं सीट, त्याच्यासमोरचं ते भलं मोठं व्हिल ! त्याच्या समोरचा तो अगम्य डॅशबोर्ड. उजव्या हाताला वरच्या बाजूला अजुन काही बटणं असायची. आणि साईड इंडीकेटर म्हणून चक्क एक बाण लटकवलेला असायचा. आतून एक दोरी ओढली की तो बाण काटकोनात वर जायचा ड्रायव्हरच्या डाव्या हाताला असणारा दोन फुटाचा आणि विचित्र कोनातला तो गिअर एसटी स्टँड ही एक वेगळीच परिसंस्था ! तिथली ती गर्दी. वेगवेगळे फलाट, तिथल्या त्या स्पिकर वर होणार्‍या घोषणा, स्टँडवर असलेली रसवंती गृहे आणि त्याचा तो घुंगरु लावलेला आवाज. एसटीच्या बाहेरुन विविध पदार्थ आणि वर्तमान पत्रे विकणारी मंडळी, बुकस्टॉल्स, तिथली उपहार गृहे सगळंच खास ! त्या बुक स्टॉल वर चांदोबा हे मासिक खूपच आकर्षक वाटायचं. आयुष्यातलं पहिलं पॉपीन्स मी या एसटी स्टँडवर खाल्लं. किंबहुना एसटी आणि पॉपीन्सच्या गोळ्या हे समीकरण माझ्या घट्ट डोक्यात बसले आहे. कुठल्या एसटी स्टँड वर एसटी थांबली की सोललेल्या आणि कापून मीठ लावलेल्या काकड्या घेऊन विक्रेते गाडीत यायचे त्या काकड्या खाताना खूप थंडगार वाटायचं. पुर्वी गाड्या फलाटाला रिव्हर्स करुन लागत. स्टँडवर बसलेल्या माणसाला कुठली गाडी लागली हे पहायला पुढे जावे लागायचे. गावातल्या महत्वाच्या दुकानांच्या जाहिराती एसटी स्टँडवर पहायला मिळायच्या. एशियाड यायच्या आधी रातराणी नावाचा एक प्रकार होता. रात्रीचा प्रवास करणारी रातराणी ! त्याचे नावच फार भारी वाटायचे.

Read More

जनहित न्यूज महाराष्ट्र

स्वातंत्र्योत्तर काळात गिरण्यांची संख्या वाढू लागली. सन १९८२पर्यंत मुंबई शहरात ६० गिरण्या कार्यरत होत्या. सन १९७०पासून या व्यवसायास चांगलीच सुबत्ता आली होती. गिरण्यांचा विस्तार होत होता. त्यामुळे गिरण्यांचं शहर अशी मुंबईची ओळख झाली.

दादरपासून भायखळा आणि शिवडीपासून वरळी या भागाला गिरणगाव म्हणून संबोधलं जात असे. गिरण्यांची ६०० एकर जागा, अडीच ते तीन लाख गिरणी कामगार यामुळे मुंबईतील प्रत्येक घराचा गिरण्यांशी संबंध येत होता. गिरणीतील जॉबर, कारकून हा जसा गिरणीत प्रतिष्ठित होता, तसा तो जिथे राहत होता, त्या चाळीतदेखील त्याला प्रतिष्ठा मिळत होती.

त्यावेळी रस्त्याने चालताना आकाशाकडे पाहिलं, तर गिरण्यांची उंच धुरांडी दिसायची. यातच गिरणगावातील लोकांची रोजगार आणि जगण्याची साधनं निर्माण झाली होती. गिरण्यांच्या तिन्ही पाळ्या चालू असत, तेव्हा गिरण्यांचे भोंगे हेच घड्याळ होतं.

त्या सुमारास दत्ता सामंत हे कामगार नेते म्हणून उदयास आले होते. सन १९८१च्या दिवाळीत बोनसवरून कामगारांची निराशा झाली होती. वेतनवाढ, बदली कामगारांचा प्रश्न हे मुद्दे होतेच. कामगार अक्षरश: धुमसत होते. सामंत यांनी आपल्यासाठीही लढा द्यावा, असं गिरणी कामगारांना वाटलं आणि सामंत यांनी कामगारांच्या आग्रहास्तव सन १९८२चा संप केला. सामंत यांच्या महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली हा संप झाला, त्यास काही डाव्या संघटनांचा पाठिंबा होता. १८ जानेवारीपासून या संपाची हाक देण्यात आली होती. परंतु, कामगार एवढे उत्तेजित झाले होते की, १७ तारखेची दुसरी पाळी संपल्यानंतरच सर्वजण संपावर गेले, रात्रपाळी झालीच नाही. एकूण अडीच लाख कामगार यात सहभागी झाले. सामंत यांनी गिरणी मालकांकडे तब्बल ५०० रुपये वेतनवाढीची मागणी केली होती.

सुरुवातीचे ६ महिने कामगारांची एकजूट होती. मात्र, यातील बहुतांश कामगार हे या नोकरीवरच अवलंबून होते. अन्य नोकरी-व्यवसायसंबंधी कुशलता त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे यातील अनेकांचा धीर खचला. हा संप चिघळतोय हे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नेते एस. एम. जोशी व गुलजारीलाल नंदा यांनी पुढाकार घेऊन ४५ ते ७५ रुपये मासिक वेतनवाढीचा प्रस्ताव कामगार संघटनांपुढे ठेवला. (त्यापूर्वी कम्युनिस्ट नेते श्रीपाद डांगे यांच्या नेतृत्वाखाली सन १९७४मध्ये गिरणी कामगारांचा ४० दिवस संप झाला होता व मासिक चार रुपये वेतनवाढ मंजूर झाल्यानंतर डांगे यांनी संप मागे घेतला होता.

Read More

एक व्यक्ती ऑटोरिक्षामध्ये बसून एका ठिकाणी चालला होता. ऑटो ड्रायव्हर आरामात ऑटो चालवत होतो. तेवढ्यात एक कार अचानक पार्किंगमधून निघून रोडवर आली. ऑटो ड्रायव्हरने जोराचे ब्रेक लावले आणि कार-ऑटोचा अपघात होता-होता राहिला. कारचालकाची चूक असूनही तो रागामध्ये ऑटो ड्रायव्हरला घालून-पाडून बोलू लागला

ऑटो ड्रायव्हर कारचालकावर क्रोधीत झाला नाही आणि त्यालाच सॉरी म्हणून पुढे निघून गेला. ऑटोमध्ये बसलेल्या व्यक्तीला कार चालकाचे वर्तन पाहून खूप राग आला होता आणि त्याने ऑटो ड्रायव्हरला विचारले- तू त्या कार चालकाला काहीही न बोलता तसेच कसे काय जाऊ दिले? त्याची चूक असूनही तो तुला किती वाईट बोलून गेला. आपले नशीब चांगले म्हणून आपण वाचलो अन्यथा आता दवाखान्यात असतो


ऑटोवाला म्हणाला, साहेब अनेक लोक गार्बेज ट्रक( कचऱ्याचा ट्रक) प्रमाणे असतात. हे लोक खूप कचरा आपल्या डोक्यात घेऊन फिरत असतात. ज्या गोष्टींची आयुष्यात काहीच गरज नाही त्या गोष्टी मेहनत करून जोडत राहतात उदा. क्रोध, घृणा, चिंता, निराशा इ

अशा लोकांच्या डोक्यात कचरा जास्त असतो आणि हे आपले ओझे कमी करण्यासाठी इतरांवर हा कचरा फेकण्याचा शोधात राहतात. यामुळे मी अशा लोकांपासून दूर राहतो आणि दुरूनच स्मितहास्य करून त्यांना वाटी लावतो. कारण अशा लोकांनी फेकलेल्या कचऱ्याचा मी स्वीकार केला तर मीसुद्धा कचऱ्याचा एक ट्रक बनेल आणि स्वतःसोबतच जवळपास असलेल्या लोकांवरही कचरा फेकत राहील

मला असे वाटते की, आयुष्य खूप सुंदर आहे. यामुळे जे आपल्याशी चांगले वागतात त्यांना धन्यवाद म्हणा आणि जे लोक वाईट वागतात त्यांना मोठ्या मनाने माफ करा. आपण हे नेहमी लक्षात ठेवावे की, सर्व मानसिक रुग्ण फक्त हॉस्पिटलमध्ये नसतात तर काही आपल्या जवळपासही फिरत राहतात


👉🏼शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवत (घासफूस)ने भरून टाकतो. याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात. दुसरा नियम असा आहे की, ज्याच्याकडे जे आहे तो तेच वाटत राहतो. सुखी सुख, दुःखी दुःख, ज्ञानी ज्ञान, भ्रमित भ्रम आणि भयभीत भय वाटत राहतो

Read More

कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या
मनात एखाद्या व्यक्तीबाबत
चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा,
आपण स्वतः चार पावले चालुन
समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद
साधुन मगच खात्री करा.
99 टक्के सांगणारा उघडा पडल्याशिवाय राहणार नाही.आपल्याला कोण काय माहिती सांगतो,त्याचा हेतू काय आहे,यावरून त्याचा कावा ओळखता येऊ शकतो
आपल्यात फाटाफूट करून तो आपली पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न करत असतो,आपल्यात फूट पाडून त्याचा फायदा असल्याशिवाय तो कशाला आपल्या विषयी एखाद्याच्या मनात विष पेरेल?
जगातील अनेक संबंध असेच स्वार्थी लोकांनी आपल्या स्वार्थापायी तोडले आहेत.
जरा आजूबाजूला पाहिले की असे लोक खूप दिसतील.
आणि माणसाला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टीवर लवकर विश्वास बसतो.याचाच फायदा फाटाफूट करणारे लोक घेत असतात.
म्हणून फाटाफूट करणाऱ्या लोकांपासून वेळीच सावध व्हा.आणि आपले संबंध टिकवा.
संबंध तुटल्यानंतर सत्य कळले तर त्याचा काही फायदा होत नाही.तुटलेली मने जुळायला खूप वेळ लागतो .मने जुळली तरी ती दुरावा ठेवूनच असतात.हे सत्य आहे.
तेंव्हा वेळीच सावध होऊन आपले संबंध टिकवा.

Read More