Hey, I am on Matrubharti!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य


दी ग्रेट बाबासाहेबांनी 23 ग्रंथ लिहिले .


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य खूपच विपूल आणि प्रचंड आहे. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली ग्रंथ-पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे व वर्तमानपत्रे यांचा समावेश होतो. भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे प्रचंड लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परिक्षणे एवढा अफाट संग्रह डॉ. आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा आहे. डॉ. आंबेडकरांचे बहुतांश लेखन हे इंग्रजीत, काही मराठीत आणि बाकी इतर भाषेतील आहे. महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांच्या भाषण व लेखन असे काही साहित्यील आतापर्यंत एकूण २२ खंड प्रकाशित केले आहे, त्यांच्या संपूर्ण साहित्याला एकूण ४२ खंड देखील अपूरे पडतील असे प्रकाशन समिती सांगतेय. मल्याळम भाषेत बाबासाहेबांच्या साहित्याचे ४० खंडावर प्रकाशीत झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काव्य, कथा, नाटक इत्यादी प्रकारच्या साहित्याची कोणतीही रचना केली नाही, परंतु त्यांच्या लेखणीतून उच्चकोटीचे विपुल साहित्याचे सृजन झाले आहे. त्यांचे साहित्य मूळात इंग्रजी भाषेतील सखोल अध्ययन व चिंतनानंतर सृजित झाले आहे. बाबासाहेबांचे साहित्य जेवढे त्यांच्या वेळी प्रासंगिक होते, त्यापेक्षाही कैक अधिक वर्तमानात प्रासंगिक आहे. आज बाबासाहेबांचे साहित्य व विचार भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा विषय बनले आहे. त्यांच्या बद्दल सतत नवीन माहिती मिळत आहे. लोक त्यांच्या जीवनाशी पूर्णपणे परीचित आहेत, पण सध्या त्यांच्या साहित्याशी आणि विचारांशी कमी परिचीत झाले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथ काही तर त्यांच्या हयातीच प्रकाशित झाले तर काही त्यांच्या परिनिर्वाणानंतर प्रकाशित होऊ शकले, ज्यांचे वर्षानुसार विवरण पुढिलप्रमाणे आहे -


1. कास्ट्स इन इंडिया (१९१७)

2. स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज (१९१८)

3. द प्रॉब्लम ऑफ द रूपी (१९२३)

4. दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया (१९२४)

5. वेटिंग फॉर अ व्हिझा (१९३५-३६)

6. अनाइअलेइशन ऑफ कास्ट (१९३६)

7. मिस्टर गांधी अँड दी एमॅन्सीपेशन ऑफ दी अनटचेबल्स(१९४५)

8. रानडे, गांधी अँड जिन्ना (१९४३)

9. थॉट्स ऑन पाकिस्तान (१९४५)

10. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स(१९४५)

11. महाराष्ट्र एज ए लिंग्विस्टिक स्टेट (१९४५)

12. हू वर दि शुद्राज? (१९४६)

13. स्टेट्स अँड माइनॉरिटीज (१९४७)

14. हिस्ट्री ऑफ इंडियन करंसी अँड बँकिंग (१९४७)

15. द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दी बिकम अनटचेबल्स (१९४८)

16. थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट (१९५५)

17. बुद्ध अँड कार्ल मार्क्स (१९४६)

17. कम्यूनल डेडलाक अँड वे टू सॉल्व इट (१९४५)

18. बुद्ध अँड दी फ्युचर ऑफ हिज रिलीजन (१९५०)

19. फ्युचर ऑफ पार्लियामेन्ट्री डेमोक्रेसी (१९५१)

20. लिंग्विस्टिक स्टेट्स नीड्स फार चेक्स अँड बॅलेन्सेज(१९५३)

21. बुद्धिज्म अँड कम्यूनिज्म (१९५६)

22. द बुद्धा अँड हिज धम्मा (१९५७)

23. हिंदू वुमन: राइजिंग अँड फॉल

Read More

भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६),
हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली,
तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री,
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.
देशाच्या विविबाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या;
तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले.
त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते.
त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले,
वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला,
तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.

इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला.
धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले.
इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.[२]
इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे.
आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत.
ध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.[१].

Read More

ताण तणाव घातक असतो:अति हाव हा जीवनाचा शत्रू

ताण तणाव हा एक प्रकारच्या गॅस चेंबर सारखे काम करतो. कुक्करच्या शिट्टीने मर्यादित काळ वाफ रोखता येते परंतू त्याची सहनशक्ती संपली की स्फोट होतो. नदीला पूर आला की ती सर्वच नष्ट करीत जाते.जीवनदायिनी जीव घेणारी ठरते. जसा गॅस चेंबरला, सिलेंडरला रेग्युलेटर असतो, कुक्करला जशी शिट्टी असते ,तशी तणावमुक्त करणारे रेग्युलेटर किंवा शिट्टी आपल्या कडे निसर्गाने दिली आहे, परंतू आपण तिचा वापर करत नाही. ताण-तणाव कमी करण्यासाठी अनेक उपाय आहेत. कशाचीही वाजवी पेक्षा जास्त चिंता न करणे, ताण कमी करण्यासाठी आपले छंद जोपासणे, नियमित व्यायाम, योगा करणे, आपल्या मित्र मंडळी, नातेवाईक व नातवंडांत रममाण होणे, आपल्या आवडत्या व्यक्तीशी सुसंवाद साधणे, आवडत्या ठिकाणी सहलीस जाणे, यासारखे अनेक उपाय आहेत. आपली सुख, दुःख शेअर करता येतील अशी जीवाभावाची माणसं, मित्र, मैत्रीणी जोडून ठेवावीत. आनंद झाला तर तो खुलेपणाने व्यक्त करता आला पाहिजे, दुःख झाले तर आपल्या हक्काच्या खांद्यावर डोकं ठेऊन मनसोक्त रडता आले पाहिजे. जीवनात खंबीरपणा आवश्यक आहे परंतू खंबीरपणा म्हणजे दुःख; भावना दडपून ठेवणे नव्हे. खळखळून हसावे व मनसोक्त रडून घ्यावे.ताण आपोआप पळून जाईल.

पैसे जरूर कमवा पण त्यासाठी स्वतःची कुतरओढ करून घेऊ नका. आपल्या गरजा; बडेजाव कमी केला तर आपण कमवित असलेले पैसे पुरून उतरतील. पैसा अफाट कमावला आणि मनाला शांती नसेल, कौटुंबिक सुख नसेल तर त्या संपत्ती व ऐश्वर्याचा काय उपयोग ? पैश्याच्या नादी लागून विविध रोगांना आमंत्रण देऊन आपला जीव धोक्यात घालण्यापेक्षा, आहे त्यात समाध मानता आले पाहिजे. तरच ताण-तणाव आपल्या जवळपास देखील फिरणार नाहीत व आपले जीवन आनंदी होईल.

Read More

दुसऱ्यांशी चांगले वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात ?

जाणून घ्या कारणं ?

आपण चांगले तर जग चांगले, ही थोरामोठ्यांची शिकवण आपण अंमलात आणतो. परंतु बरेचदा अनुभव असा येतो, की कितीही चांगले वागा, पण लोक आपल्याशी वाईटच वागतात. असे का? हा प्रश्न आपल्याला पडतो आणि चांगुलपणावरून आपला विश्वास उडायला लागतो. त्यावर उत्तर दिले एका साधूमहाराजांनी!

एका गावातला एक तरुण अतिशय साधा, भोळा आणि प्रेमळ होता. कोणी कसेही वागो, पण त्याने आपला चांगुलपणा कधीच सोडला नव्हता. परंतु एक वेळ अशी येते, जेव्हा संयमाचा बांध फुटतो आणि आपल्याला स्वत:च्या चांगुलपणाचाही राग येऊ लागतो. मन व्यवहारी होते, स्वार्थी होते, परंतु हा बदलही आपल्याला सहन होत नाही. कारण चांगले वागणे हा आपला स्थायी भाव असतो.
त्या तरुणाच्या बाबतीतही तेच झाले. तो अतिशय अस्वस्थ होता. त्याने गावातल्या एका साधूबाबांकडे जाऊन शंकेचे समाधान विचारले. साधू महाराजांनी त्याला आपल्या सदऱ्याच्या खिशातून एक अंगठी दिली आणि म्हणाले, `पुढचा आठवडाभर ही अंगठी तू तुझ्याजवळ घे आणि त्याची किंमत किती मिळू शकेल याचा शोध घे. फक्त काही केल्या ही अंगठी विकू नकोस!'
प्रश्न आणि उत्तर यांचा परस्पर काहीही संबंध नसताना साधूमहाराजांनी दिलेले काम पाहून तरुण निराश झाला. परंतु त्याने दिलेले काम पूर्ण करायचे ठरवले. तो एका व्यापाऱ्याजवळ गेला. त्याला अंगठी दाखवली. तो त्या अंगठीचे हजार रुपये देईन म्हणाला. तरुण मुलगा दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेला, त्या व्यापाऱ्याने दहा हजाराची बोली लावली. तिथून तो एका सोनाराकडे गेला. सोनाराने अंगठी नीट पाहिली आणि म्हणाला एक लाख रुपए देतो, पण ही अंगठी मलाच विक! तरुण मुलगा गोंधळला. तिथून तो एका जवाहिराकडे गेला. त्याने मोल ठरवायला वेळ लावला पण त्याने जे उत्तर दिले ते ऐकून तरुण मुलगा चक्रावला. जवाहीर म्हणाला, माझी सगळी संपत्ती देऊ केली तरी या अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही, हे ऐकून गोंधळलेला तरुण साधूमहाराजांकडे परत आला. त्याने सगळी हकीकत सांगितली. त्यावर साधूमहाराज म्हणाले, बाळा, अंगठीची किंमत ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार सांगितली. जो खरा रत्नपारखी होता त्याने ही अंगठी अमुल्य आहे असे सांगितले. याचाच अर्थ आपले गुण ओळखणारा आणि त्या गुणांची कदर करणारासुद्धा तेवढाच गुणवान असावा लागतो. जे लोक तुझी किंमत करत नाहीत, ते त्यांच्या कुवतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात. मात्र जे तुला ओळखतात ते तुझी किंमत, योग्यता समजतात. तू ही अंगठी आहेस हे आधी ओळख आणि तुझी किंमत सामान्य व्यापाऱ्याने ओळखावी अशी अपेक्षा करू नकोस. तू तुझा चांगुलपणा कायम ठेव. कोणीतरी रत्नपारखी आयुष्यात नक्कीच भेटेल

सदैवखालील गोष्टी लक्षात ठेवा की

रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते ?

तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट ?

Read More

ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,त्या पायरीला कधीच विसरू नये.कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो...!*

Read More

संपादक हरी आल्हाट 9960504729