मनी चांदण्यांची सय, डोळे चंद्राच्या वाटेला... उगा शिंपल्यांचा भार वाहण्याचं , काहीच कारण नाही...

*👴🏼👵🏽Whatsapp चा शाप न जेष्ठांचा ताप.

तर आजचा विषय आहे WhatsApp चे फमिली ग्रुप..!
समस्त चि.सौ.कां.पोरींनो🙋🏼‍♀ तुमच्या मोबाईलमध्ये बघा दोन डेडीकेटेड फमिली ग्रुप असतातच.सासरचा आणि माहेरचा.
पूर्वी जो सासू-सुनेचा प्रत्यक्ष टोमण्यांचा कार्यक्रम असायचा त्यानेही आता एक नवीन रूप घेतलं आहे.
आता होत काय सासरच्या ग्रुपवर जॉईन असलेल्या चुलत,आत्ये,मामे सासवा,नणंद ह्या त्यांच होम ग्राउंड असल्या प्रमाणे बिनधास्त Batting करतात.
तर ह्यांचे सर्वांचे मेसेज मुख्यत्वे असे असतात-
‘सुनबाई तुझ whatsapp चुलीमंदी जाळ’ (असं लिहतांना ह्या स्वतःच whatsapp वर )😆

‘वृद्धाश्रमात एकदा आईला येऊन भेटून जा’(हे त्या मऊ मऊ सोफ्यावर बसून तुझ्यात जीव रंगला,लागीर वैगरे बघतांना फोरवर्ड करत असतात हे गोष्ट विशेष हं!)😄

‘आज काळ मुलांना बोलायला वेळ नाही’

‘लेक असते आईची छाया...’

‘वहिनीबाई भावाला एकदा भेटू दे...(यात त्या डबल टोमणे हाणतात पोरीच्या वतीने सुनेला आणि ग्रुपमध्ये असणार्या स्वतःच्या भावजैला)

‘साब्कुच भुलना माबाप को नै...’ ,

‘साडी गेली जीन्स आली...’

‘घरात कुणीतरी मोठं पाहिजे ..’

ब्ला.. ब्ला... ब्ला...
ही तर झाली सासवांची तऱ्हा तमाम सासरेबुवांचा(आणि वडिलांचा सुद्धा) एक वेगळाच त्रास आहे.
ही मंडळी दर दोन दिवसांनी –

‘सावधान उद्या Equinox आहे,घराबाहेर पडू नका’😱

रात्री बारानंतर cosmic किरणे पृथ्वीवर आदळणार आहे.(ह्या मेसजच्या जनकाने इतक्या वेळा ते आदळवले आहे की विचारता सोय नाही.)⚡⚡🌞🌞

‘नासाचा रीपोर्ट-ढगफुटी होणार आहे’⛈

‘जन गण मन एक नंबर राष्ट्रगीत घोषित’

‘.... सरकार फ्री सायकल वाटत आहे’, .... सरकार फ्री घर वाटत आहे’

‘सावधान मुले पकडणारी टोळी आली आहे’,

’सावधान तुमचा भाजीपाला प्लास्टिकचा आहे.’

‘अमुक अमुक मंदिरातील आरतीच प्रत्यक्ष दर्शन...’

‘ओमसाई राम मेसेज १०० लोकांना पाठवा’

एक दिवस तर मेसेज झळकला -
सावधान तुम्ही कुठलीही Tablet घेतांना खात्री करा,तुमच्या जीवाचा खेळ होतोय’ असा मेसेज होता आणि खाली व्हिडीओ होता,त्यांत एका Tablet वर एक व्यक्ती थोडं पाणी टाकतो आणि त्या Tablet चा पूर्ण पातळ कागद होतो.’

डोक्यालाच हात लावला कारण तो व्हिडिओ ‘Tablet Tissue पेपरचा होता.’

घरातल्या लोकांना साधं वाढदिवसाला तोंडभरून Happy Birthday न म्हणणारी ही मंडळी संकष्टी,महाशिवरात्री,होळी ,रंगपंचमी,दशहरा,दिवाळी,ईद,क्रिसमस,पतेती,संक्रांति,रक्षाबंधन,प्रजासत्ताक दिन ,स्वातंत्र्य दिन....झाडून सगळ्या सण-उत्सवाच्या ते शुभेच्छा देतात.
इथे त्यांना कुठल्याही जाती धर्माचं वावडं नसतं.
आणि सगळ्यात मोठा ....सगळ्यात मोठा शाप न ताप तर ‘शुभ प्रभात ....’, ‘शुभ रात्री’..’शुभ हे ..’ शुभ ते ....
Ohh God…..

झुकेरबर्गा कुठे नेऊन ठेवला जेष्ठ नागरिक माझा?

मला पुन्हा ते पेपरात डोक घालून बसणारे,कट्ट्यावर बसणारे, चुकल्यावर समोरासमोर शाळा घेणारे जेष्ठ, प्रेमाने चिवडा,लाडू करणाऱ्या,वाती वळत चुगल्या करून झाल्यावर
‘जाऊदे मरो आपल्याला काय करायचं य...देव बघून घेईल’ म्हणणाऱ्या म्हाताऱ्या हव्या आहेत.
देवा त्यांच्या हातात स्मार्टफोन येऊ दे पण त्यात त्यांचा पूर्वीचा चौकसपणा हरवू देऊ नको.
फालतू टीव्ही सीरिअलने आधीच त्यांच्या वेळ फुकट घातला आहे त्यात ही अजून एक भर नको.......
© Givinghappinesss.

Read More

❣️घराचं कुलूप.

तिची माहेरी आल्यापासून आई जवळ सतत भुणभुण चालू होती सासूविषयी.नोकरी करत असल्याने नातीसाठी सासुसासर्यांना गाव सोडून इथं पुण्यात राहावं लागतं.घरात वडीलधारे असल्यास खूप मर्यादा येतात कपडे घालण्यावर, हॉटेलिंगवर,हिंडण्या फिरण्यावर म्हणून इतर कुठल्याही आताच्या मॉडर्न मुलीसारखीच ती जरा नाखूष होते.
'आई अश्याच करतात,तश्याच नाही करत.सासऱ्यांचं ह्याव त्याव.... '
शेजारी बसलेली मावशीआजी सगळं ऐकत होती आणि तिचं बोलून झाल्यावर म्हणाली-

"बाली जेव्हा तुझी सासू गावी जाते आणि जेव्हा जेव्हा तुला बाहेर काही कामानिमित्ताने जायचं असल्यास काय करते.?"


"काय ग आजी,अर्थात घराला कुलूप लावून जाते."आजीकडे हसून बघत ती बोलली.

" हेच सांगायचंय बेटा तुला घरातले म्हातारे घराचं कुलूप असतात.हे कुलूप घरी असल्यास कशी पटकन कुठल्याही कामाला सहज बाहेर पडू शकते,लाईट,फॅन ,गॅस,इस्त्री,गिझर काही चालू तर राहिलं नाही ना..दार व्यवस्थित लागलंय ना याचं काही टेन्शन येत नाही हो ना?कारण माहिती असतं आपलं घर सांभाळणार आपलं कुणीतरी घरात आहे.हे कुलूप कितीही दणकट,कुरकुणारं वाटलं तरीही त्याचा आड तुझं घर आणि मुलगी तुझ्यामागे अगदी सुखरूप आहे"

तिच्या डोक्यावरून हात फिरवत आजी बोलली.

तिचे डोळे खाडकन उघडले
"अरेच्चा हो की ते घरात असले की मला माझ्या घराचं मुलीचं ,भाजीपाला,बाजारहाट ह्याचं काहीच टेन्शन नसतं."

खरंय थोडं खाजगीपण गमावतो.थोडी चिडचिड होते पण थोडं ऍडजस्ट केलं तर घर,नोकरी सगळं साध्य होतं.
शेवटी काहीही झालं तरी घराचं कुलूप आपलं असतं आणि त्याची चावी पण आपलीच असते.हो ना?

Read More

#नणंद #


👸👸👸👸

नणंद भावजयी नात्याचा 'आहो वन्स' पासून
'अहो ताई' मार्गे सुरू झालेला प्रवास,
'अगं ऐक ना' पर्यंत कधी झाला हे कळलंच नाही
कित्येक पिढ्यांना ह्या नात्याचं गमक वळलच नाही।

नणंद नाही फक्त एक शब्द किंवा फक्त नातं
नणंद असते एक अलवार जोडणारा धागा
माहेर सोडून आलेल्या नव्या नवरीची
परक्या घरात विसाव्याची जागा।

नंणदेत शोधू नये बहिणीची माया किंवा मैत्रिणीची छाया
शोधायचच असेल तर शोधा
बहिणीच्या मायेचा न मैत्रिच्या छायेचा
एक भरभक्कम पाया।

नणंदा असाव्यात घरोघरी,
कारण त्या असतात
नवऱ्याच्या बालपणीच्या आठवणींची
एक चालती बोलती तिजोरी।

नवऱ्याच्या मनगटावरच्या राखीसाठी...
पोरांच्या ' आत्तु, आत्तु' लडिवाळ हाकेसाठी...
बहिणीसोबतच अजून एका विसाव्यासाठी...
रुसण्यासाठी,भांडण्यासाठी,मनभरून गप्पांसाठी..
गरजेला सासूसॊबत ताडजोडीसाठी..
एक तरी नणंद हवी सासरच्या अनोळखी प्रवास
हातात हात घेऊन सोपा करण्यासाठी......!!!

©हर्षदा

Read More

तुझा जरतारी स्पर्श
श्वास झाले पारिजात
व्यर्थ मनाचे निष्कर्ष
 हुरहूरे सांजवात।

©हर्षदा

-Harshada

तू  निघून गेल्यावर...!!

गदड अधिकच झाली  रात्र तू  निघून गेल्यावर
रंग  उडाला कोवळ्या उन्हाचा  तू  निघून गेल्यावर..

मूठभर चांदणे चोरले प्रेमाच्या अवकाशातले
तर मला शाप लागला चंद्राचा तू  निघून गेल्यावर...

दिवस ही तसेच आहेत येतात  अन जातात
मला त्रास झाला स्वतःचा तू निघून गेल्यावर...

सोबतीचे क्षण अलगद किनाऱ्यावर सोडले तेव्हा
आता आघात सोसवेना लाटांचा तू  निघून गेल्यावर...

उणे भासते आयुष्य हे परतून तू येशील का?
सारा हिशोब चुकला आयुष्याचा तू  निघून गेल्यावर...

आयुष्याच दान स्वीकारशील का पुन्हा ?
भार  होतोय देहाला श्वासांचा तू  निघून गेल्यावर...

©हर्षदा

Read More

आयुष्यातून कुणी अचानक निघून गेलं तरी आयुष्य कुणावाचून थांबत नाही असं म्हणतात खरंय पण आयुष्य थांबत जरी नसलं तरी ते कुणावाचून पूर्ण ही होतं नाही

-Harshada

Read More

तुझ्याशिवाय आयुष्य मी आयुष्य धरत नाही..तुला वजा करून ह्या आयुष्यात काहीचं तर उरत नाही.”

-Harshada

"काय बघतेय एवढं आकाशाकडे?”  जरा आश्चर्यानेच त्याने विचारलं.
“The moon.You know वेद, मी कितीतरी तास असंच चंद्र,चांदण्या बघत बसू शकते”
चंद्रात अगदी खोलवर हरवल्यासारखी ती म्हणाली.
“आणि मी तुला बघत असंच रात्रभर बसू शकतो”
तो पुटपुटला.
“काही बोललास का?” 
“  Selenophile !!”
“काय्य?”
“ Selenophile म्हणजे चंद्राच्या प्रेमात असलेली एक वेडी व्यक्ती.

(तू ही रे माझा मितवा भाग-६)

©हर्षदा
#कोजागरी
#कथा

Read More

रित्या पहाटेच्या ओठी
कुण्या पाखरांच्या ओळी
वारा घालू दे स्वप्नांना
पापण्यांची कर झोळी
दुपार कुशीवर वळता
आठवांचं पाणी होतं
वेड्या उन्हांचं बघ
काळीज करपून जातं
सांजवातीच्या पर्वाला
मिणमिणला एक दिवा
थंड शांत उजेड
काजळीला उगा हेवा
रात्र ओंजळीत घेता
खाली अंधार सांडतो
मी खुडली चांदणी
चांद माझ्याशी भांडतो

-Harshada

Read More

तिचे तिलाच कळले नाही,
का बावरून गेली
मी फक्त हसलो जरासा ,
ती उगाच मोहरून गेली
भेटलो काल सहजच,
ती चांदनवेळ होती
चल निघते निघते म्हणता
रात्र ओसरून गेली
ती आली तेव्हा अशी
दवांत न्हाऊन आली
अन जातांना हलकेच
चांदणे पांघरूण गेली
राहिलो न मी माझा
कसा कुणास ठाऊक
ती कुठूनशी आली अन आयुष्य मंतरुन गेली...!
-Harshada

Read More