Naa Kavle kadhi - 1 - 9 in Marathi Fiction Stories by Neha Dhole books and stories PDF | ना कळले कधी - Season 1 - Part 9

ना कळले कधी - Season 1 - Part 9

दोघांनीही कॉफी घेतली आणि आणि सिद्धांत निघाला खरं तर त्याला मनातून आर्या ला ह्या परिस्थितीत सोडून जावं वाटत नव्हतं पण जास्त वेळ तो थांबू ही शकत नव्हता. चलो आर्या, आयुष Bye...मी निघतो आता आर्या, काळजी घे आणि काहीही गरज पडली तर मला कॉल कर..! I will be there...असं म्हणून तो निघाला.
 काय दीदी किती cool आहे ना सिद्धांत! मला तर तो बॉस वाटलाच नाही, मला वाटलं की हा friend आहे तुझा..ह्याला काय सांगू की कसा आहे तो आर्या मनातच म्हणाली. ती आयुषला फक्त हो म्हणाली. दीदी तू कर आराम मी बाहेर आहे. आयुष निघून गेल्यावर आर्या सिद्धांत च्याच विचारात हरवून गेली. किती छान आहे ना सिद्धांत, किती caring आहे. मी उगाच त्याला वाईट समजत होते इतका पण वाईट नाहीये तो.. फक्त काही सेकंद त्याने पकडलेला हात,असं का वाटलं की हा हात कधीच सोडू नये? इतका आश्वासक आज पर्यंत कोणीच कस वाटलं नाही. कुठल्याही औषधी पेक्षा मला सिद्धांतच्या येण्याने जास्त बर वाटतंय! का असं वाटत होतं की नको जायला ह्याने निदान ह्या क्षणी तरी हा इथेच असावा?  आजपर्यंत असं कधीच झालेलं नाही ह्याचा इतका राग आणि इतकी ओढ का वाटावी? असे असंख्य प्रश्न आर्याच्या मनात येत होते पण गोळ्यांचा परिणाम आणि अशक्तपणा ह्यामुळे तिला झोप लागली.
सिद्धांत घरी आला त्याला खुप फ्रेश वाटत होतं.. मनावरचा खूप मोठा ताण हलका झाल्यासारखा वाटत होता.आर्याला भेटून त्याला खूप छान वाटत होतं..,आर्या किती निरागस आहे ना, तिने कालचा काहीच राग मनात ठेवला नाही, तिला हवं असत तर तिने तिच्या घरी माझा अपमानही केला असता, पण नाही आर्या खरचं इतर मुलींसारखी नाही आहे ती वेगळीच आहे सगळ्यांपेक्षा वेगळी. कुछ तो अलग बात हे बंदीमे! सिद्धांत काय रे आज बराच फ्रेश दिसतोय काही विशेष? अगं काही नाही आज पहिल्यांदा,  केलेल्या चुकीची माफी मागुन आलोय . बापरे ! चक्क तू चुकलास?आणि त्याची तू  माफीही मागितलीस  ग्रेट !!! म्हणजे  नक्कीच कोणीतरी स्पेशल असणार...स्पेशल वगैरे काही नाही गं, माझी चुक झाली, मी माफी मागितली thats it ! आता आईने आणखी काही विचारायच्या आत त्याने लगेच विषय बदलला, मला एक important कॉल करायचा आहे आलोच. सिद्धांत ची आई सिद्धांत ला असं खूप दिवसांनी फ्रेश पहात होती तिला खूप आनंद झाला. चला म्हणजे आता सिद्धांत माणसात येतोय.
सकाळी सिद्धांत उठला आणि आवरून ऑफिस ला जायला निघाला,तितक्यात त्याला आर्याची आठवण आली .आज कशी असेल आर्याची तब्येत ? कॉलच करतो तिला, असं म्हणून त्याने आर्याला कॉल केला. पण तिने receive नाही केला. आर्या बरी तर असेल ना? की तिचा ताप कमीच नाही झाला?फोन का नसेल उचलत? काय करावं मी काल आयुष चा नंबर घ्यायला हवा होता. आता जावं का तिच्या कडे, पण ऑफिस मध्ये important meeting आहे ती पण नाही postpone करता येणार. एक काम करतो आधी ऑफिस ला जातो, मीटिंग attend करून मग तिला भेटायला जातो .तोपर्यंत बघू कॉल बॅक आला तर! सिद्धांत तसा खूप प्रोफेशनल होता तो आपल्या कामाच्या आड काहीही येऊ देत नव्हता.पण आर्याचा अजून फोन आला नाही म्हणून त्याला काळजी वाटत होती. त्याने मीटिंग successfully handle  केली आणि बाहेर आला. विक्रांत लगेच त्याच्या मागे आला congrats सिद्धांत well done! नेहमीसारखच मस्त प्रेझेन्टेशन दिल तू , पण तुला काय झालंय इतका का अस्वस्थ दिसतोय तू is everything all right? कसलं tension आहे का? अरे काही नाही i m all right थोडं मीटिंगचच टेन्शन होत सिद्धांत म्हणाला. हो का तुला कधी पासून मीटिंग च टेन्शन यायला लागलं? खरं खरं सांग काय झालं . अरे विक्रांत खरचं काही नाही झालं. आणि तू इथे काय timepass करतोय तुला काम नाही का तुझे? बरं..नसेल सांगायचं तर नको सांगू जातो मी! इतक्यात सिद्धांत चा फोन वाजला आणि त्याच्या चेहरा एकदम आनंदी झाला.काय रे कोणाचा फोन आहे?विक्रांत म्हणाला.तु अजून इथेच, आता माझा प्रत्येक कॉल सांगू का तुला?बरं जातोय नको सांगू.
हॅलो,हं आर्या कशी आहेस ? तू फोन का  नाही उचलला ?तब्येत ठीक आहे ना? बरं  वाटतंय ना तुला?सर, I am feeling absolutely fine ,today..फक्त थोडा weakness आहे. मी येईल उद्या ऑफीस ला .चालेल ना? अगं ठीक आहे तुला बरं वाटलं तेव्हा तू ये आणि काळजी घे चल भेटू उद्या bye... !


Rate & Review

Rajashree  Bhosale
Aparna

Aparna 3 years ago

Priya Tushar Velis
Sneha

Sneha 3 years ago

Anagha Babras

Anagha Babras 3 years ago