Naa Kavle kadhi - 1 - 10 in Marathi Fiction Stories by Neha Dhole books and stories PDF | ना कळले कधी - Season 1 - Part 10

ना कळले कधी - Season 1 - Part 10

आर्या ला बोलून सिद्धांत ची काळजी एकदम कमी झाली. त्याही पेक्षा उद्या पासून ती ऑफिस ला येणार हे ऐकून. आणि तो निश्चित होऊन कामाला लागला. आर्याला सिद्धांतने फोन केल्याचं थोडं नवलच वाटलं पण आज काल सिद्धांतच वागणंच बदललं होत आणि तिला ते निश्चितच सुखवणारं होत.
     आर्याला आज फ्रेश वाटत होतं, थोडासा अशक्तपणा होता पण गेल्या दोन दिवसांपेक्षा आज खूप बरं वाटत होतं. आणि सिद्धांतचा फोन आल्यापासून तर आणखीनच बरं वाटत होत. ती ऑफिसला निघणार इतक्यात आयुष आला, 'मी सोडणार आज ऑफिस ला तुला!', 'अरे मी जाऊ शकते', 'हो! आजच बरं वाटतय ना, खर तर.. तू आज जायलाच नको आहे ऑफिसला पण तू काही कोणाचच ऐकणार नाही.  ते काही नाहीआणि मी तुला एकटीला जाऊ देणार नाही.' 'पण येताना परत प्रॉब्लेम येतो रे, तुझा क्लास असतो आणि तिकडून लवकर काही मिळत नाही.' 'मग सिद्धांत सोडेल ना.' 'what you mean? सिद्धांत सोडेल, तो का सोडेल?' आर्या म्हणली.  'आता ते तुलाच माहिती!!' 'बरं जास्त डोकं नको लावु. चल सोड मला पटकन.' आयुष ने आर्याला  ऑफिसला  सोडलं. त्यांना ऑफिसच्या खालीच सिद्धांत भेटला. 'काय आर्या कशी आहेस?' 'ठीक आहे सर.' 'काय म्हणतो आयुष इकडे कसा काय?' 'दीदी ला सोडायला आलो होतो.' 'हा, हे मात्र बरं केलं तु. चला मला उशीर होतोय मी निघतो', अस म्हणुन आयुष निघाला. 'चल आर्या जायचं ना ऑफीसमध्ये?' 'हो! चला.' दोघेही जण ऑफिस मध्ये गेले. त्या दोघांना ऑफिसमध्ये सोबत येताना विक्रांतने पाहिलं. तो लगेचच सिद्धांतच्या मागे त्याच्या केबिनमध्ये गेला. 'काय रे.. तू काही pickup drop facility चालु केली आहे का? मला माहिती आहे तु परवा तिला सोडायला गेला होता, आज सोबत घेऊन आला. म्हणजे नक्की चाललय काय तुझं?' 'हे बघ परवा तिच्या कडे गाडी नव्हती आणि इतक्या उशिरा ती कशी जाणार म्हणून मी तिला ड्रॉप केलं thats it! आणि आता मी काही तिला काही घ्यायला वगैरे नव्हतो गेलो. ती खाली भेटली मला. झालं.. आता करु का मी माझे कामं? की अजून काही प्रश्न बाकी आहेत तुझे?' 'मी बघतो तुला नंतर पण कुछ तो गडबड हे बॉस!! जाऊद्या हा काही सांगणार नाही.आपण आपलं काम करू.'
     आर्याची सिद्धांत आज सकाळ पासून बरीच काळजी घेत होता. तिला दोन तीनदा त्याने कॉल ही केला आणि तिला आज कामही तस कमीच दिलं. आर्याला अशी special treatment मिळत असल्यामुळे थोडं भारी वाटत होतं. लंच ब्रेक झाला आर्याला काही खाण्याची अजिबात इच्छा नव्हती पण रेवा तिला खूप आग्रह करत होती जेवण्यासाठी. पण आर्या काही तीचं ऐकत नव्हती. तितक्यात सिद्धांत तिथे आला, काय रेवा काय timepass लावला आहे? पटकन लंच करून कामाला लागा.' 'सर, मी किती वेळचं हेच सांगतेय आर्याला पटकन जेवुन घेऊया पण ही माझं अजिबात ऐकत नाही आहे.' 'आर्या जेवायचं नाही?', 'माझी खरंच अजिबात जेवण्याची इच्छा च नाही आहे. रेवा please तू जा!' 'का इच्छा नाही आहे? पटकन जेवुन घे आणि हा पूर्ण टिफिन संपल्याशिवाय कॅन्टीन मधुन बाहेर यायचं नाही कळलं. ऐकणार ना बॉस ची ऑर्डर की नाही?' 'सर पण', तिला मधेच थांबवत सिद्धांत म्हणाला, 'आर्या मला कारणं दिलेली आवडत नाहीत.' आर्याचा चेहराच पडला. रेवाला तिची ही परिस्थिती पाहून खूप हसायला आलं. पण ती control करून म्हणाली 'जेवायचं ना आर्या मग?' आर्याला खरं तर रेवाचा ह्या क्षणी राग येत होता ती म्हणाली, 'चल एकदाच घेऊ जेवुन.' त्या लंच करायला बसल्या तेव्हा रेवाने सगळ्यांना तो किस्सा सांगितला की आर्याला सिद्धांत ने कशी जेवायची पण ऑर्डरच दिली. त्यावर आशिष म्हणाला, 'एकंदरीत म्हणजे तुमच्या boss ला काळजी आहे तुमची.' रेवा त्याला म्हणाली, 'उगाचच ऑफिस मधल्या सगळ्या मुलींचं crush नाही आहे तो, तो आहेच मुळात भारी.' 'हे बघ रेवा, इतक कौतुक नको करू. त्याचा जमदग्नी केव्हाही भडकू शकतो हे तुलाही माहीत आहे.' 'हो तेही खरंच आहे म्हणा', रेवा म्हणाली . त्यांनी अश्याच गप्पा करत करत जेवण संपवलं आणि सगळे आपल्या कामाला लागले.
      ऑफिस सुटलं आर्या निघणार इतक्यात तिला सिद्धांतने आवाज दिला, 'आर्या, कशी जाणार आहे? आयुष आलाय का घ्यायला?' 'नाही त्याचा class असतो. तो नाही येणार मी जाईल. 'अगं थांब मी पण निघतोच आहे I will drop you.' आर्याला माहिती होत इथे नाही म्हणून काहीच उपयोग नाही. ती सिद्धांत सोबत निघाली. आज मात्र सिद्धांत ने AC अजिबात नाही लावला.आर्याला सिद्धांतच्या ह्याच छोट्या छोट्या गोष्टी फार आवडत होत्या. नकळत घेतली जाणारी काळजी कुठेतरी तिच्या मनाला स्पर्शून जात होती. 'सिद्धांत खरचं फणस आहे! फक्त बाहेरून काटेरी दिसतो.' ती मनातच म्हणाली. इतक्यात सिद्धांत चा फोन वाजला. तो फक्त आलोच म्हणाला आणि त्याने फोन ठेवून दिला. मग आर्याला म्हणाला, 'आर्या सॉरी! पण तुला आधी न सोडता आपल्याला माझ्या घरी जावं लागणार आहे, चालेल ना? थोडंस urgent आहे so,' 'its ok सर, हवं तर तुम्ही मला इथेच सोडा, मी इथून easily जाऊ शकते, आणि आता फारसा उशिरही नाही झाला उलट आपण आज फार लवकर निघालो. मी जाईल,' 'नाही अग, फक्त 10 मि च काम आहे. तुला फक्त उशीर होणार नाही ना ते सांग.'  'नाही उशीर तर नाही होणार पण....', 'चल मग, आता पण बिन काही नाही.'अस म्हणून त्याने गाडी त्याच्या घराकडे वळवली. आणि ते सिद्धांत च्या घरासमोर पोहचले. तो पटकन गाडीतून उतरला 'सॉरी आई, मी सकाळी तुला चावी द्यायचंच विसरलो, जास्त वेळ थांबावं नाही लागलं ना तुला ?' 'नाही रे!! मी आले आणि लगेचच तुला कॉल केला.', त्याची आई म्हणाली, आणि लगेच त्याने लॉक उघडले.आर्या हे गाडीतून पाहताच होती. इतक्यात सिद्धांत ने तिला आवाज दिला, 'आर्या, come here', आर्या आतमध्ये गेली.'आर्या, meet my mom, माझी आई एक ngo चालवते आणि आई ही आर्या आताच जॉईन झाली आहे ऑफीस मध्ये, माझी team member आहे.' दोघींनीही एकमेकींकडे पाहून स्मितहास्य केले. 'अग उभी का? बस ना..' त्यांनी तिला बसावयास सांगितले आणि त्या दोघींचं बोलणं चालू झालं. 'सिद्धांत बॉस ना तुझा? फार ओरडत असेल न? तू लक्ष नको देत जाऊ हं. तो तसाच आहे.' सिद्धांत ची आई आर्याला म्हणाली. आर्या ला त्यांना काय बोलावं कळतच नव्हतं ती फक्त हो म्हणाली, 'अगं ए आर्या!! हो काय म्हणतेय, रागावतो का मी तुला?' आता आर्याची चांगलीच पंचाईत झाली. आणि ते दोघंही तीच्या कडे बघून हसू लागले. 'relax आर्या, अरे चेहरा बघ तिचा,' 'काय सर, तुम्ही पण ना!' मग आर्याच्या आणि सिद्धांतच्या आईच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. तिला त्यांच काम खूप आवडलं. आर्या मध्येच त्यांना म्हणाली 'बापरे! बराच उशीर झाला. मला निघायला हवं. आई वाट बघत असेल.' 'हो चालेल. खूप छान वाटलं तुला भेटून ये परत नक्की'. 'हो येईल', म्हणून आर्या निघाली. सिद्धांत पण तिला सोडायला निघाला.


Rate & Review

Swati Jagtap

Swati Jagtap 3 years ago

Anjali bagal

Anjali bagal 3 years ago

Rahashri

Rahashri 3 years ago

Aparna

Aparna 3 years ago

Vaishali Chorge

Vaishali Chorge 3 years ago