Naa kavle kadhi - 1-26 in Marathi Fiction Stories by Neha Dhole books and stories PDF | ना कळले कधी Season 1 - Part 26

ना कळले कधी Season 1 - Part 26

       सिद्धांत तिला ऑफिस झाल्यावर भेटायला आला. काय आर्या आज फार खुश दिसत आहेस काही विशेष, काही हो आहेच विशेष मी उद्या पासून ऑफिस ला येणार! डॉक्टरांनी परवानगी दिली आहे. अरे वा! मस्तच पण हे बघ आर्या डॉक्टरांनी जरी परवानगी दिली असली तरीही तुला अजून अशक्तपणा आहे त्यामुळे मी तुला गाडीने तर नाही च जाऊ देणार ! तू कितीही हट्ट केला तरीही. मी ऐकणार नाही. आई किती बंधन लादतेस ग ! हे नको करू इतक्या दिवस जाऊ दिल नाही आता काय तर म्हणे गाडी घेऊन नाही जायचं. मी ना खरच कंटाळली आहे, तुझ्या ह्या वागण्याला. त्या पेक्षा मी जातच नाही, हो तेच बर राहील मी ना जॉब सोडते आणि घरीच बसते म्हणजे शांती वाटेल तुला. आर्या चिडूनच बोलली. आर्या, अग इतकं चिडण्या सारख काय आहे त्यात काकू चुकीचं बोलत थोडीच आहे. i can understand  घरी राहून तुला कंटाळा आला त्या मुळे चिडचिड होणं स्वाभाविक आहे. पण त्यांची काळजी पण समजून घेणं! तुझी काळजी वाटते म्हणूनच बोलत आहेत त्या. आणि तुला काही कायमच गाडी नेऊ नको असं  म्हणाल्या का त्या थोडे दिवस आणि माझही हेच मत आहे की  तू काही दिवस गाडी नेऊ नये. सिद्धांत ने समजून सांगितल्यावर तिला समजलं.सॉरी आई! विनाकारणच चिडले मी तुझ्यावर ! हे बर आहे पहिले चिडायचं आणि मग सॉरी म्हणायचं. तिची आई म्हणाली. आई सॉरी ना चुकलं माझं . बर बर ठीक आहे तुम्ही बसा बोलत मी मस्त पैकी चहा आणते करून चहा च नाव काढलं की सिद्धांत चे expression पाहण्या सारखे होते ते पाहून आर्या ला हसू आलं. आई एक कॉफी आण सर चहा नाही घेत. आर्या म्हणाली. ठीक आहे. म्हणून तिची आई बाहेर गेली. i am so excited  उद्या पासून ऑफिस. आर्या म्हणाली. मी पहिली मुलगी पाहतोय ऑफिस साठी एवढी excited असणारी. मस्त आराम करून घ्यायचा तर! सिद्धांत तिला म्हणाला. सर तुम्हाला जर अस घरी एकट्याला बसवून ठेवलं तेव्हा समजेल अस नाही कळणार. आर्या म्हणाली. मी  enjoy केलं असत.सिद्धांत तिला म्हणाला. इतक्यात आर्याची आई आली  दोघांनीही चहा कॉफी घेतली. चला मी निघतो आता, उद्या सकाळी येईन मी घ्यायला आर्या तुला तयार रहा. नाही नाही काही आवश्यकता नाही अरे मी सोडेल तिला ऑफिस ला जाताना तुला कशाला उगाच त्रास. आर्या ची आई म्हणाली. त्रास काही नाही काकू त्यात मी जाणारच आहे तर तिला घेऊन जाईल सोबत बस्स ! अरे नको मी सोडेन तिला वाटलं तर तू येताना सोड ठीक आहे. आर्या ची आई म्हणाली. बर ठीक आहे पण जर तुमचं नसेल जमत तर मला फोन करा मी येऊन जाईन. चला बाय good night मी येतो आता. बाय good night. आर्या म्हणाली आणि तो निघाला. चल आर्या आराम कर थोडा मी जेवायला उठवते तुला. उद्या पासून पुन्हा ऑफिस आहे. तिची आई तिला म्हणाली.
         सिद्धांत आज भलताच खुश दिसत होता कारण आज पासून आर्या ऑफिस ला येणार होती. काय सिद्धांत आज खूप खुश दिसतोय काही विशेष. कुठे काय मी रोजच्या सारखाच तर आहे तो त्याच्या आई ला म्हणाला. आर्या कशी आहे रे ?तुला काल विचरायचंच राहील.त्याच्या आई ने त्याला विचारलं. अग बरी आहे आणि तुला माहिती आहे जे आज पासून ती ऑफिस ला येणार आहे!तो एकदम उत्साहाने म्हणाला. अच्छा म्हणून तू एवढा खुश आहेस तर! त्याची आई म्हणाली. का माणसाने एरवी आनंदी राहू नये का? तो म्हणाला. रहा न चांगलच आहे मला तर चांगलंच वाटेल तुला अस नेहमी आनंदी बघून.त्याची आई म्हणाली. आणि हो ती बिचारी दुखण्यातून उठून ऑफिस ला येत आहे विनाकारण तिला रागावू नको, तिला जास्त कामाचा ताणही देऊ नको कळलं ना!त्याच्या आई ने त्याला सांगितले. हो ग आई कळत मला ते चल मी निघतो नाहीतर उशीर होईल बाय.आणि तो निघालाही.किती प्रेम आहे ह्याच आर्या  वर पण हे अजून त्याला कळत कस नाही. देवा लवकर ह्याला ह्याची अनुभूती होऊ दे म्हणजे मिळवलं! सिद्धांत ची आई म्हणाली. सिद्धांत ऑफिस ला आला अरे आर्या नाही आली अजून! तो खूप आतुरतेने तिची वाट पाहत होता. आणि आर्या आली नेहमीसारखाच तिचा प्रसन्न चेहरा घेऊन पण ती हसतमुख जरी असली तरीही तिचा चेहरा आजारणामुळे उतरलेला होता   आणि ती बरीच अशक्त ही वाटत होती. सिद्धांत ला ती आली ह्याचा खूप आनंद झाला पण तीची ही पारिस्थिती पाहून त्याला वाईट वाटत होतं कुठेतरी अजूनही स्वतःलाच दोषी समजत होता. आणि आर्या ह्या विषयावर काहीही बोलायला तयार नव्हती त्यामुळे तर त्याला अधिकच वाईट वाटत होतं.आज बोलावं का आर्याला नको पण ती आजच ऑफिस ला आली तिचा मूड खूप चांगला असणार आहे नको खराब करायला. इतक्यात आर्याच त्याच्या केबिन मध्ये अली गुड मॉर्निंग सर! ती उत्साहाने म्हणाली. गूड मॉर्निंग आर्या!  आली finally ऑफिस ला तो तिला म्हणाला. चल मग आधीच पेंडिंग काम पूर्ण कर इतक्या दिवस सुट्ट्या झाल्या आता काम करायला नको.! सिद्धांत तिला म्हणाला. काय माणूस आहे काल पर्यंत आराम कर आराम कर म्हणत होता आणि आज लगेच पेंडिंग काम पूर्ण कर आर्या मनातच म्हणाली. जस्ट किडींग ! आर्या लगेचच इतक टेन्शन नको घेऊ. तुला जितकं शक्य असेन तितकं कर okkk! तो तिला म्हणाला.आणि हो बर नसेल वाटत तेव्हा लगेच घरी जाऊ शकते बर! थोडही काही वाटलं की लगेच मला सांग. सिद्धांत म्हणाला. हो सांगेल मी बघते कामच अस म्हणून आर्या बाहेर आली. ती तिच्या जागेवर येऊन बसली. तिच्या जागेवरून तिला सिद्धांत सहज दिसत होता. तिने त्याच्या कडे पाहिलं तो त्याच्या कामामध्ये व्यस्त होता. त्याच लक्ष नव्हतं. किती चांगला आहे सिद्धांत माझ्या आजारपणात किती मदत केली त्याने कधी कधी खूप जास्तच चिडतो पण चिडण्यातही प्रेम असत त्याच्या. चिडून लगेच शांत ही होत चुकलं की माफीही मागून मोकळा होतो. आता मला लागलं तर स्वतःलाच दोषी मानून घेतोय. मी तर अजूनही त्याला ह्या विषयावर बोलली नाही बिचारा उगाचच स्वतःच्या मनावर ओझं ठेवून जगत असेल. त्याला बोलायला हव त्याला सांगायला हवं की ह्यात तुझी काहीही चूक नाही, मीच दिवसभर जेवले नाही स्वतःला त्रास करून घेतला आणि त्याचा तो परिणाम होता. तो ही नाही नाही ते बोलला मला सगळ्यांसमोर पण त्यातही काळजीच होती. सिद्धांत सोबत  हे बोलायला हवं.दिवसभर त्यांचे ऑफिस मधले कामं चालू होते संध्याकाळी ऑफिस सुटलं. सिद्धांत बाहेर आला चल आर्या निघायचं ना! हो झालंच एक 5 मिनटं. आणि तीही आवरून निघाली.
           कमाल आहे बाबा आर्या तुझी मानलं तुझ्या stamina ला. मला खरच वाटलं नव्हतं की तू आज इतक्या वेळ काम करू शकशील. but you have done it!  सिद्धांत तिला म्हणाला. तीच मात्र लक्षच नव्हतं. आर्या, काय झालं मी तुझ्याशी बोलतोय. ओहह सॉरी काय म्हणालात सर. आर्या म्हणाली. अग लक्ष कुठे असत तुझं. हल्ली हे फार वाढत चालल आहे तुझं सिद्धांत तिला म्हणाला. सॉरी सर माझं चुकलं, सिद्धांत ने ब्रेक मारला आणि गाडी थांबवली.  its okk आर्या लगेच चुकलं काय. सिद्धांत तिला म्हणाला. नाही मी आता साठी नाही त्या दिवशी जे झालं त्या बद्द्ल बोलत आहे. हॉस्पिटलमध्ये मी बोलणं टाळलं पण त्यात तुमची काहीही चुकी नव्हती तुम्ही उगाचच स्वतःला दोष देऊ नका. बर झालं तूच विषय काढला, हे बघ आर्या मी सगळ्यांसमोर उगाचच बोललो ते माझं चुकलंच पण मी intentionally  नाही वागलो अस! हो मला कळालं ते म्हणूनच मी म्हणत आहे तुम्ही नका स्वतःला दोष देऊ. चला म्हणजे आता तुझ्या मनात काही नाही न सिद्धांत ने तिला विचारलं. नाही अजिबात नाही आणि तुम्हीही ठेवू नका आर्या म्हणाली. बाप रे आर्या कीती मोठं दडपण हलकं केलं आहेस माझ्या मनावरचं तुला कल्पना देखील नाही.आर्या तू खरच खुप ग्रेट आहे आणि म्हणूनच तू मला........... आणि तो शांत झाला. म्हणूनच काय?? आर्या ने विचारलं. काही नाही चल निघुया नाहीतर उशीर होईल. आणि त्याने गाडी स्टार्ट केली.
क्रमशः
       


Rate & Review

Geetanjali Kavitake

Geetanjali Kavitake 12 months ago

shobha valiv

shobha valiv 2 years ago

Swara

Swara 3 years ago

Jyoti Chaudhari

Jyoti Chaudhari 3 years ago

Aparna

Aparna 3 years ago