Naa kavle kadhi - 1-33 in Marathi Fiction Stories by Neha Dhole books and stories PDF | ना कळले कधी Season 1 - Part 33

ना कळले कधी Season 1 - Part 33

दोघेही जण बसले होते कोणीही काहीही बोलले नाही. आर्याने आपला मोबाईल काढून त्यामध्ये निसर्गाचे सुंदर सुंदर फोटो काढायला सुरवात केली. सिद्धांत तिच्या जवळ आला आणि म्हणाला 'आर्या, तुझा फोन बघू.' 'का काय झालं?', तिने विचारलं. अग काही नाही मला फक्त तुझी 'फोटोग्राफी बघायची आहे.', तिने फोन त्याच्या हातात दिला. 'काय बघणार आहे कुणास ठाऊक? फोटोग्राफी मधलं काय कळत असणार ह्याला, हा तर पुस्तकी किडा आहे.', त्याने एक दोन photos तिला दाखवले, 'हे बघ आर्या, हे सुंदरच आहेत पण आणखीन सुंदर कशे आले असते हे मी तुला सांगतो.', आणि त्याने तिला काढून दाखवले. 'wow sir, its really amazing!!!!! काय सुंदर फोटोग्राफी आहे तुमची. तुम्ही काढत का नाही?', त्याने त्याचा मोबाइल काढून तिला दाखवला 'हे बघ.' आर्या एकएक photo बघत होती आणि ती बघतच राहिली. 'किती सुंदर! नेमक्या आणि अगदी अचूक clicks. seriously sir, सोडून द्या हा जॉब आणि फोटोग्राफी चालू करा!!', आर्याने त्याला सल्ला दिला. 'नाही माझं प्रोफेशन मी काही सोडणार नाही. आणि ही फक्त आवड गं.. आणि तुझं ऐकलं तर झालंच. थोड्या दिवसांपूर्वी मला chef होण्याचा सल्ला तू देत होती. तुझं ऐकत बसलो तर दर महिन्याला मला प्रोफेशन change करावं लागेल. हे सगळे छंद म्हणून फक्त जगायचे असतात.', सिद्धांत म्हणाला. 'अजून काय काय hidden talent आहे सर तुमच्यात?', आर्याने विचारलं. 'बस बस इतकंच आणि हे काही अस special talent नाही. आवड म्हणून करतो ह्या गोष्टी. तुला काय आवडत?', त्याने प्रतिप्रश्न केला. 'मला, मी आधीच सांगितलं ना पुस्तके वाचायला, फोटोग्राफी आणि मनात जे काही आहे ते कागदांवर उतरवायला.', आर्या म्हणाली. 'छान!! चांगल आहे. एक विचारू का आर्या? बघ राग तर नाही येणार?',  सिद्धांत म्हणाला. 'विचाराना सर त्यात काय.' 'Do you have a boyfriend?', त्याने विचारलं. 'आज का विचारलं हे?', आर्या ने विचारलं. 'अग अगदी सहजच विचारलं.' 'तुम्हाला काय वाटतं? असेल की नाही?' 'आता तर मला अस वाटतं नसेल, पण आधी कोणी तुझ्या आयुष्यात असेल की नाही माहिती नाही.', सिद्धांत म्हणाला. 'नाही माझ्या आयुष्यात आधीही कुणीच नव्हतं आणि आताही नाही आहे', आर्या म्हणाली. 'का इतक्या वर्षांमध्ये कुणीच आवडलं नाही?', सिद्धांत ने विचारलं. 'आवडलं नाही असं नाही. आवडायचे पण प्रेम व्हावं अस कुणी नाही मिळालं. मी मुळात आधार शोधायचा प्रयत्न करत होते, म्हणजे मला माझी काळजी करणारा, हक्काने रागावणारा, मला समजून घेईल असा कुणी तरी हवा होता, पण ते जे आवडायचे ते फक्त हक्क गाजवणारे होते त्यामुळे पुढे काही झालंच नाही आणि मी ही कधी त्या भानगडीत पडले नाही.', आर्या म्हणाली. 'तुमचं काय ? तुमच्या आयुष्यात नव्हती कुणी?', आर्याने प्रतिप्रश्न केला. 'हो होत्या ना. एक नाही दोन होत्या', सिद्धांत म्हणाला. 'बापरे!! चक्क सर तुमच्या दोन girlfriend!! विश्वास नाही बसत!', आर्या म्हणाली. 'का नसू शकतात का? बाकीच्यांना पण असतातच ना मग इतकं का ओव्हर रिऍक्ट करतीये.', सिद्धांत म्हणाला. 'नाही असूच शकतात पण इतरांची गोष्ट वेगळी आहे', आर्या म्हणाली. 'इतरांची वेगळी म्हणजे? अच्छा अच्छा तुला अस वाटत असेल ना की हा इतका चिडका ह्याच्या सोबत कस काय कुणी राहू शकत? बरोबर ना आर्या.', त्याने तिला विचारलं. 'हो' आर्या म्हणाली. 'अरे यार मी हो काय म्हणतेय!' 'नाही नाही तस अजिबात नाही वाटलं मला.', आर्या म्हणाली. 'हे बघ आर्या, तुला खोटं अजिबात बोलता येत नाही गं! त्यामुळे तू असे निष्फळ प्रयत्न करत जाऊ नको.', सिद्धांत तिला म्हणाला. आता आर्याकडे बोलण्यासारखं काहीही नव्हतं. 'मग काय झालं त्या दोघींचं?', आर्याने हळूच विचारलं. 'गेल्या त्या सोडून. त्यांना फक्त पैसा हवा होता. केला खर्च, दुसरा मिळाला चांगला, दिलं सोडून.', सिद्धांत म्हणाला 'आणि तुम्हाला काहीच नाही वाटलं?', आर्या ने विचारलं. 'माझं ही मुळात त्यांच्यावर प्रेम होतच कुठे? मला मानसिक आधाराची फार गरज वाटायची मी ते त्यांच्यात शोधायचा प्रयत्न करायचो पण तो कधी मला मिळालाच नाही, मग मला कळून चुकलं की अस काहीही नसत लोक फक्त आणि फक्त आपला उपयोग करून घेतात त्यांच्या गरजेनुसार, आपण वेडे असतो त्यांना आपलं मानतो, मग हे जेव्हा कळालं तेव्हा पासून नाही कुणीही आणि आता विश्वास नाही ठेवावा वाटत कुणावरही.' 'हो सर, पण मी मागेही म्हणाले होते की सगळे सारखेच नसतात. त्या वाईट निघाल्या म्हणून बाकीच्या मुलीही वाईटच असतील अस नाही न?', आर्या ने विचारलं. 'बाकीच्यांच माहिती नाही पण तू तर नाहीच आहे त्यांच्यासारखी!', सिद्धांत हळू आवाजात म्हणाला. 'काय?', आर्याला स्पष्ट ऐकु नव्हतं आलं. 'काही नाही सोड तो विषय!', सिद्धांत म्हणाला. 'बर ठीक आहे', आर्या म्हणाली.
       'आर्या sorry!!', सिद्धांत म्हणाला. 'आता का sorry? मला नाही आला कशाचा राग वगैरे.', आर्या म्हणाली. 'अग त्यासाठी नाही. तुला सांगू का? म्हणजे मला मारू नको फक्त.', सिद्धांत तिला म्हणाला. 'काय? मी का मारू? सर please मला कळेल अस काही तरी बोला! मला काहीही कळत नाही आहे तुम्ही काय बोलत आहात ते.', आर्या म्हणाली. 'हे बघ म्हणजे मी मुद्दामून नाही केलं हे पण चुकीनी झालं हे!' सिद्धांत बोलला. 'अरे यार!! तुम्ही अस कोड्यात नका न बोलू मला काहीही कळत नाही आहे', आर्या वैतागून म्हणाली. 'अग आर्या, तू जेव्हा आजारी होती ना तेव्हा मी तुझी diary वाचली.', सिद्धांत म्हणाला. 'इतकंच ना! त्यात काय ठीक आहे.' आर्याने सुरवातीला खूप lightly घेतलं. सिद्धांत थोडा shock च झाला 'हिला काहीच नाही वाटलं!', आर्या एकदम ओरडली, 'सर काय म्हणालात तुम्ही माझी diary वाचली!!!' 'आता पेटली वाटत आर्याची tube.', सिद्धांत मनातच म्हणाला. 'हो मी तेच सांगतोय तुला आणि त्यासाठी sorry देखील म्हणालो.' 'सगळी वाचली?' आर्याने थोडस चाचपरतच विचारलं. 'नाही सगळी नाही वाचली, थोडस आपलं, आणि अस दुसऱ्यांच् personal वाचू नये न मग आपलं थोडंच वाचलं', सिद्धांत थोडा घाबतरतच म्हणाला. 'व्वा! सर एकीकडे म्हणता personal वाचु नये आणि तरीही थोडं वाचलच, म्हणजे काय म्हणू मी आता! personal गोष्टी ह्या personal असतात त्या थोड्या कमी जास्त अश्या काहीही नसतात.' आर्या थोडं चिडूनच बोलत होती. 'अग हो आर्या, चुकलंच न मग माझं. म्हणून तर मी आधीच sorry म्हणालो ना! मी नव्हतं वाचायला पाहिजे पण वाचलं आणि थोडंच हं!' 'परत तेच थोडंच वाचलं, थोडंच वाचलं! पण वाचलच का? का हात लावला माझ्या डायरी ला मला न विचारता? काय गरज काय होती? तरीही मी विचार केला त्या दिवशी डायरी बद्दल इतकं खोदून खोदून का विचारन चाललं होतं आता मला कळाल! already वाचलेली होती. शी! खरंच किती मूर्ख आहे मी. मला कस नाही कळाल? मी चुकीच केली ती डायरी तिथे ठेवून!',  आर्याचा राग अजूनही शांत झाला नव्हता. 'आर्या तूच म्हणते ना my life is open book ! मग वाचले त्या बुक् मधले काही pages तर काय बिघडलं ग?' 'अरे हो, पण म्हणून without my permission?', आर्याने विचारलं. 'तुला मागितली असती तर तू दिली असतीस? आणि जर मी वाचलं नसत तर मला कळलं ही नसत की तू माघारी मला devil म्हणते.', आता सिद्धांतने नेमका अचूक वार केला आणि आर्या मात्र अगदी निरुत्तर झाली. 'आर्या बोल न आता का शांत आहे? असच काहीतरी लिहिलं आहे न तू??', सिद्धांत ने तिला विचारलं. 'अरे यार ह्याने नको ते वाचलं. काय उत्तर देऊ आता ह्याला', ती मनातच विचार करत होती. इतक्या वेळ ज्वालामुखी सारख्या भडकणाऱ्या आर्याची वाचाच गेली होती. 'हे बघा सर, ते चुकून लिहिलं होतं म्हणजे अस काही नव्हतं लिहायचं मला. मला तेव्हा राग आला आणि मी लिहिलं ते. काही इतकं मनावर घेऊ नका.', आर्या थोडस अडखळतच म्हणाली. 'ohh अस आहे का? नाही मला कुणी तरी सांगितलं होतं की डायरी मध्ये अगदी खरं खर लिहिलेलं असत. अगदी मनात जे आहे ते, कोण म्हणाल होत बर अस???', तो आर्या कडे पाहून म्हणाला. ती बिचारी शांतच होती. तिला काहीच कळत नव्हतं काय बोलावं. सिद्धांतने तिला चांगलच अडकवल. 'मीच म्हणाले होते अस!!', आर्या हळूच म्हणाली. 'मग ते म्हणली होती ते खोट होत की लिहिलं आहे ते???',  सिद्धांत तिच्या जवळ गेला आणि विचारलं. 'मला नाही माहिती' ती त्याच्या कडे न बघताच म्हणाली. 'आर्या माझ्या कडे बघून उत्तर दे. माझ्या डोळ्यांमध्ये बघून सांग की मला माहिती नाही.', 'मी सांगितलं न रागात लिहिलं मी तस!', ती त्याच्या कडे बघून म्हणाली. 'आणि त्याच्या नंतर लिहिलेलं? त्याच काय ? त्याच उत्तर नाही मिळालं मला अजून', सिद्धांत ने विचारलं. 'अच्छा म्हणजे ते ही वाचलं का? नाही म्हणजे अजून काय काय वाचलं अस विचारायचं होत मला?', आर्याने थोडस भीतभीतच विचारलं.
क्रमशः


Rate & Review

Mr. D.K

Mr. D.K 1 year ago

Prakash Gonji

Prakash Gonji 2 years ago

Arati

Arati 2 years ago

Swara

Swara 3 years ago

Aparna

Aparna 3 years ago