Naa kavle kadhi - 1-34 in Marathi Fiction Stories by Neha Dhole books and stories PDF | ना कळले कधी Season 1 - Part 34

ना कळले कधी Season 1 - Part 34

'हो वाचलंय न! म्हणूनच तर विचारतोय की काय होत ते.', सिद्धांत म्हणाला. 'अरे यार!! काय हे सर, का वाचलं ते सगळं!' 'कॉल मी सिद्धांत, लिहिताना तर तू सिद्धांतच लिहिते ना, बरोबर ना!', आर्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून तर सिद्धांतला फार मजा येत होती, पण आज तो थांबणार नव्हता. आज आर्या कडून वदवूनच घ्यायचं हे त्याने ठरवलं होतं. 'आर्या बोल न!' 'सर ते काय आहे न.......!' 'सर नाही, सिद्धांत म्हण.' 'अस कस म्हणणार!', आर्या म्हणाली. 'सोप्प आहे, जितक्या सहज पणे लिहिलं तितक्याच सहजतेने.', सिद्धांत तिला म्हणाला. 'नाही मला नाही जमणार!' आर्या म्हणाली. 'बर.. सिद्धांत तर तू मला म्हणणारच, आज नाही तर उद्या.. त्यात मला काही शंकाच नाही. आता पुढे सांग. बरंच लिहिलंय तू माझ्या बद्दल त्या बद्दल सांग.' 'नाही सर  ते असच लिहिलं, तेव्हा जे वाटलं ते', आर्या म्हणाली. 'अच्छा म्हणजे तेव्हा वाटायचं तुला माझ्या बद्दल काहीतरी', सिद्धांत म्हणाला. 'मग आता काय?' सिद्धांत ने विचारलं. 'आता काय वाटतं ते नाही सांगू शकत कारण मला माझ्या प्रश्नांची उत्तरे नाही मिळाली अजून. ज्या दिवशी ती मिळतील त्या दिवशी सांगेल मी आता काय वाटत! माझे बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. त्यांचं काय??', आर्याने विचारलं. 'आर्या हे चूक आहे हा.. तू विषय बदलत आहेस. तुला उत्तर नसेल द्यायचं तर तस सांग पण आता मध्येच हे कुठून काढलं.', सिद्धांत म्हणाला. 'काय चूक काय बरोबर हे तर आता मुळात तुला बोलायचा काही अधिकारच नाही. माझी डायरी वाचली ते चूकच होत आणि तरीही मला चूक बरोबर शिकवतो!', आर्या म्हणाली.
'wow तू मला तू म्हणाली, मी म्हंटल होत ना की तू मला 'तू' म्हणणार पण इतक्या लवकर माझी वाणी सत्य होईल हे मलाही माहिती नव्हतं!', सिद्धांत म्हणाला. 'हे बघा ते बोलण्याच्या ओघात निघून गेल. sorry!!!' 'अस काहीही नसत आर्या मनातलं ओठांवर येतच. ते तू नाकारू नाही शकत कळाल न!', सिद्धांत तिला म्हणाला. 'बर सिद्धांत!! खुश!! नाही म्हणणार आता सर!!! झालं समाधान. नाही करणार आता formality.. मला नाही म्हणावं वाटत तुला सर, इतका काही मोठा नाही तू, पण मी position ची respect करत होते. पण ठीक आहे तुला आता कळलंच आहे की मी माघारी सिद्धांत म्हणते तर ठीक  आहे. आता समोर ही म्हणते.', आता आर्याने हे बोलून सिध्दांत ची बोलतीच बंद केली. 'मघाच पासून तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत आहे. आता खूप झालं हं. आता नाही देणार. आधी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे. मागील काही दिवसांत बरेच प्रश्न विचारले होते मी. त्यांचं काय??', आर्याने विचारलं. 'बापरे आर्या, danger च आहेस तू. किती बोलते', सिद्धांत तिला म्हणाला.
'अरे काय विचित्र आहेस तू! तूच बोलायला भाग पाडतो मला आणि म्हणे मीच  danger आहे, आणि हो विषय बदलू नको', आर्या म्हणाली. 'देतो. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो फक्त थोडा वेळ......' आर्या त्याला मधेच थांबवत म्हणाली, 'अजून किती वेळ???? माझ्या सहनशक्तीचा अंत पाहणं चाललंय हं आता! माझ्या कडून सगळं काढून घेतो स्वताः मात्र चूप!! काहीही विचारलं की एक तर उत्तर माहिती नसतात किंवा बोलायचं नसत. कधी बोलणार सिद्धांत तू??? कधी?', आर्या थोडस वैतागुणच म्हणाली. 'इतकी घाई झाली आहे माझं बोलणं ऐकण्याची?', सिद्धांत तिला म्हणाला. आर्याला आता काय बोलाव काहीही कळत नव्हतं. 
           इतक्यात सिद्धांत चा फोन वाजला. 'अरे आज नसतो बाबा माझा वाढदिवस. उद्या आहे तुझं दरवर्षीचच झाल आता हे' सिध्दांतने अस बोलून फोन ठेवून दिला . 'उद्या birthday आहे तुमचा? sorry तुझा?', आर्या ने त्याला विचारलं. 'हो उद्या आहे. हा विक्रांत उगाचच फोन करून आज पासूनच त्रास द्यायला सुरुवात करतो.' सिद्धांत थोडा चिडूनच बोलत होता. 'मित्र आहे तो तुझा.. इतकं तर चालतच, त्यात चिडण्यासारखं काय आहे!',  'अग तुला नाही माहिती तो किती डोकं खातो. सतत एका तर एकाच गोष्टीच्या मागे लागतो.', सिद्धांत तिला म्हणाला. 'सिद्धांत तू ना खरच कश्यावरूनही चिडू शकतो. कठीण आहे बाबा तुझं..',  आर्या म्हणाली. 'आर्या तुला अस वाटत नाही आहे का की आज तू विसरतीये की मी तुझा boss पण आहे.', सिद्धांत तिला म्हणाला.  'हो बऱ्याच वेळेस हे तू ही विसरला होता आणि आज तर निश्चितच तू मला इथे एम्प्लॉयी म्हणून नाही घेऊन आला, बरोबर ना?', आर्याने त्याला विचारलं. 'बापरे!! आर्या तू तर आज ठरवूनच आली आहे वाटत की मला काही बोलूच नाही द्यायचं.', सिद्धांत तिला म्हणाला. 'मी तर बोल म्हणतिये पण तूच नाही बोलत आहे.', आर्या म्हणाली. 'उद्या नक्की!  उद्या तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.', सिद्धांत तिला म्हणाला. 'उद्या कधीही येत नसतो म्हणजे मला काही उत्तरे मिळणार नाही. ती मनातच म्हणाली. चल मग निघायचं कारण थांबूनही मला नाही वाटत आता काही उपयोग आहे.', आर्या त्याला म्हणाली. सिध्दांतकडे आता काहीही बोलण्यासारखं नव्हतंच. तो पण निघू म्हणाला आणि दोघेही निघाले. तो गाडीत बसल्यावर तिला म्हणाला, 'उद्या एक छोटीशी पार्टी आहे. म्हणजे माझे सगळे friends मागे लागले होते तर त्यांच्या साठी ठेवली आहे you are also invited, येशील ना?', त्याने विचारलं. 'yes I will be there.', आर्या म्हणाली. त्याने तिला घरी सोडलं. आज तिला खूप मोकळं मोकळं वाटत होतं शेवटी आज बऱ्याच गोष्टींचा उलगडा जो झाला होता.
          'किती लापवतो हा मनातलं. कधी बोलणार काय माहिती. माझ्या कडून मात्र सगळं वदवून घेतलं. पण त्याला जे ऐकायचं होत ते तर नाही बोलले मी आणि का बोलू? सगळं मीच का बोलायचं? त्याने काही तरी बोलावं. म्हणतो तर आहे उद्या देईल सगळ्या प्रश्नांची उत्तरे पण काय माहिती देईन की नाही. माझा तर त्याच्यावर विश्वासच नाही आहे!', आर्या मनातच विचार करत होती.
'किती घाई झाली आहे आर्याला माझ्यातोंडून ऐकण्याची, तीचं ही साहजिकच आहे म्हणा, मीच फार उशीर करतोय! पण ठीक आहे ना, आता मनात कुठलीही शंका नाही राहिली. आर्याने ही बऱ्याच गोष्टी कबूल केल्या पण मीही तिला तितकाच आवडतो हे सांगणे तिने शिफायतीने टाळले मानलं हं आर्या तुला! काय गेलं असत बोलली असती तर, पण नाही मुलींचं असच असत. उद्या बोलणार finally तिला. काय reaction असेल आर्याची! ती तर खरी बघण्यातच गंमत आहे.' त्याचा विचार चालूच होता. इतक्यात त्याची आई आली , 'काय रे बोलला का आज आर्याला?' त्याच्या आई ने विचारलं. 'नाही अजून', तो म्हणाला. त्याच्या आई ने डोक्यालाच हात लावला 'काहीही नाही होऊ शकत सिद्धांत तुझं. तुला नाही जमणार. सोड तू! काहीही कामाचा नाही.' त्याची आई त्याला म्हणाली. 'उद्या विचारणार ग नक्की..', सिद्धांत म्हणाला. 'बघू उद्या तरी विचारतो का.. नाही तर मला वाटतं आर्याच वाट पाहून पाहून तुला विचारेल अस नको व्हायला.' 'नाही ग तिच्या वर नाही येणार ती वेळ! चल आता मी जातोय झोपायला उद्याचा दिवस फार special आहे माझ्यासाठी!'


Rate & Review

sajan ghag

sajan ghag 12 months ago

nice

Iqbal Shaikh

Iqbal Shaikh 12 months ago

Geetanjali Kavitake

Geetanjali Kavitake 12 months ago

ams

ams 3 years ago

Vaibhavi Dhuri

Vaibhavi Dhuri 3 years ago