Pyar mein.. kadhi kadhi - 12 in Marathi Love Stories by Aniket Samudra books and stories PDF | प्यार मे.. कधी कधी (भाग-१२)

प्यार मे.. कधी कधी (भाग-१२)

घड्याळात १०.३०च वाजले होते. दुसर्‍या दिवशी न्यु-जॉईनीजना काही प्रेझेंटेशन्स द्यायची होती. पण त्याच्यावर फायनल टच द्यायचा राह्यला होता. आधी विचार केला होता की बॅंगलोरला येताना फ्लाईटमध्ये करुन टाकीन, पण त्यावेळेस ‘इतर’ महत्वाची कामं असल्याने ते राहुनच गेलं होतं. चरफडत लॅपटॉप चालु केला आणि ‘लव्ह’, ‘विरह’, ‘फिलींग्स’ वगैरे गोष्टी बाजुला सारुन ‘क्लाऊड कंप्युटींग’, ‘डेटा-अ‍ॅनॅलिटीक्स’, ‘सॉफ्टवेअर-अ‍ॅज-अ-सर्व्हिस’ वगैरे किचकट गोष्टींमध्ये बुडुन गेलो.

कसा बसा अर्धा तासच झाला असेल इतक्यात मोबाईलवर मेसेजचा दिवा लुकलुकला..

प्रितीचा मेसेज होता..

“अजुन जागाच आहेस?”
“हम्म..”
“का रे? झोप येत नाहीये का? मला तर येतच नाहीये झोप”
” ”

“बरं मग काय ठरलं आपलं?”
“कश्याचं?”
“अरे असं काय? मगाशी काय झोपेत बोललास का माझ्याशी? काय करायचं आहे आपण?”

” प्रिती.. तुला काय मल्टीपल पर्सनॅलीटी डिसऑर्डर वगैरे झालाय का?”
“बाप रे? कसलं भयंकर नाव आहे हे? काय असतं ते? प्रेमात पडल्यानंतरचा काही डेंजर आजार वगैरे आहे का?”
“अरे यार.. एनिवेज.. सोड.. तु नाही झोपलीस?”
“झोप उडाली आहे माझी. त्यात हे व्हॉट्स-अ‍ॅप.. वेड लागणारे मला.. मोबाईलच बंद करवत नाहीए..”
“हम्म..”

“बरं ऐक ना, एक मस्त सॉंग ऐकते आहे.. पाठवु?”
“कुठलं आहे..?”
“चांगलं गाणं आहे म्हणुन विचारते आहे ओके? उगाच त्यातुन अर्थ काढु नकोस..”
” ”
“तु कॉन-एअर मुव्ही पाहीला आहेस?
“निकोलस-केजचा ना? हो पाहीला आहे”
“त्यातलंच आहे.. ‘हाऊ डू आय लिव्ह विदाऊट यु..’ कसला मस्त आवाज आहे अरे तिचा.. असा अंगावर काटा येतो ऐकताना..”
“हम्म..”

“काय हम्म? बोअर करतेय का मी तुला?”
“नाही.. बोल..”

“तु मगाशी म्हणालास ना, हार्ट अ‍ॅन्ड ब्रेन वेगवेगळी मतं आहेत..”
“हो..”
“मग आपण कुणाचं ऐकायचं? हार्ट्चं का ब्रेनचं?”
“ठरवणं कठीण आहे. कारण आपण एक ठरवलं म्हणुन दुसरं गप्प बसणार नाही. हार्ट आणि ब्रेन दोघंही मध्ये मध्ये नाकं खूपसणारंच”

“मग आपण दोघांपैकी कुणीतरी एकाने स्ट्रॉंग होऊयात.. तु होशील? इट्स इंम्पॉसिबल फॉर मी..”

मला अजुनही हे सगळं स्वप्नवतच वाटत होतं. प्रिती आणि माझ्यात हे इतकं सगळं घडेल आणि ते ही इतक्या लवकर असं वाटलंच नव्हतं.

“कसला विचार करतो आहेस तरुण?”
“प्रिती, खरं सांगु, मला अजुनही विश्वास बसत नाहीये आपण हे बोलतो आहे. म्हणजे, मला तु आवडत होतीस.. आवडतेस.. पण..”
“का? लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट फक्त मुलांनाच होतं का? मुली काय उलट्या काळजाच्या असतात?”
“डोन्ट टेल मी, आपण कॉलेजमध्ये भेटलो तेंव्हाच मी तुला आवडलो ते..”
“रॉंग.. त्या आधीच आवडला होतास मला..”
” :-O म्हणजे?”
“एनिवेज.. सोड..”

“नाही, मला कळलंच पाहीजे.. सांग..”
“अरे नेहा तिच्या मोबाईलवर तुमचे पिक्स दाखवायची, तुमच्याबद्दल, तुझ्याबद्दल सांगायची.. का कुणास ठाऊक.. पण असं मनात काही तरी व्हायचं.. मला निट नाही सांगता येणार..तु तिला पाठवलेले एस.एम.एस वाचुन छान वाटायचं.. वाटायचं.. नेहा खूप्पच बालीश आहे तुझ्यासाठी, यु निड समवन मॅच्युअर्ड.. लाईक मी..”

“प्रिती.. प्लिज स्टॉप.. आय एम फॉलींग फॉर यु…”
“व्हाय? आर यु फॉलींग इन लव्ह विथ मी?”
“आय थिंक आय ऑलरेडी हॅव…<3"

"आय एम ब्रिदिंग हेवीली तरुण..", बराच वेळ शांततेत गेल्यावर प्रिती म्हणाली…
"मी पण…"

बराच वेळ कुणीच कुणाशी बोललं नाही.

"बघीतलंस तरुण, काही तासांपुर्वी आपण प्रेमात पडलो नाही आणि हे कदाचीत आकर्षण वगैरे आहे असंच म्हणत होतो.. आणि आता?"
"हो ना.. कसलं ब्रेन आणि कसलं हार्ट.. मला तर कुणीतरी भलत्यानेच माझा ताबा घेतला आहे असं वाटतंय.. काहीच कंट्रोल नाहीये माझा माझ्यावर.."

"मी गॉन केस आहे तरुण.. सगळं माहीती आहे, सगळं कळतं आहे तरीपण मी तुझ्याकडे ओढले जाते आहे. कसं थांबवु स्वतःला? श्शी.. मुलीच्या जातीनं असं इतकं बेभान व्हावं! बरोबर नाही ना तरुण हे?"
"मला असं स्वतःला थांबवुन वागलेलं नाही आवडत प्रिती, आणि जमत पण नाही.. माणसाने असं मुक्त होऊन वागावं.. मनाला वाटेल तसं.."
"देअर यु गो.. म्हणजे हार्ट चं ऐकावं असंच ना???? "

"आय विल होल्ड दॅट गॉन केस फॉर अ व्हाईल.. इफ़ इट्स ओके विथ यु.. "
"नो.. इट्स नॉट ओके विथ मी..”
” ”

“तरुण, तुझं इमेल अकाऊंट ५० के.जी. ची अ‍ॅटॅचमेंट घेऊ शकतं का रे?”
“के.जी? तुला एम.बी. म्हणायचं आहे का?”
“नाही..मी बरोबर विचारलं.. मी ५० किलोची आहे, आले असते इमेलला अ‍ॅटॅच करुन ”

कमॉन.. इज धिस रिअली हॅपनींग ऑर आय एम ड्रिमींग.. मी फोन जोरात गादीवर आपटला… सर्व सेन्सेस पुर्ण बधीर झाले होते. इतक्या वर्षात नेहा कध्धीच इतकं माझ्याशी रोमॅन्टीक बोलली नव्हती. जे फिलींग आज मला प्रितीशी बोलताना येत होतं तसं कध्धीच मला नेहाबरोबर वाटलं नव्हतं.

मी समोरचा मिनी फ्रिज उघडला.. आतमध्ये दोन व्हाईट-चॉकलेटच्या कॅडबर्‍या होत्या.. अधीरासारखी एक कॅडबरी कव्हर फाडुन खाल्ली आणि थंडगार कोकचा एक कॅन घश्यात उतरवला..

थोडा वेळ इकडे तिकडे चकरा मारल्या आणि परत मोबाईल हातात घेतला.

“प्रिती.. आय वॉन्ट टु डेडीकेट वन सॉंग टु यु.. कॅन आय..?”
“कुठलं?”
“मै चाहु तुझको.. मेरी जॉं बेपनहा.. फिदा हु तुझ पे.. मेरी जॉं बेपनहा…”
“स्टॉप इट तरुण”

“का? काय झालं?”
“आय एम ब्लशींग!”
“आय डोन्ट बिलिव्ह धिस.. कित्तेक वर्ष झाली लाजणारी मुलगी बघुन… तु लाजतेस? तुला लाजता येतं??”
“म्हणजे काय? काही विचारतोस का तु..?”

“प्रिती.. प्लिज फोटो पाठव ना तुझा आत्ताचा…एक सेल्फ़ि.. प्लिज…”
“गप रे.. काही काय? मी नाही आत्ता फोटो वगैरे काढणार.. एक तर अवतार आहे माझा…”
“असु देत.. प्लिज…”
“बरं एक मिनीटं…”

एक मिनिट म्हणुन प्रिती गेली ते ५ मिनीटं झाली तरी काहीच पत्ता नाही..

“हॅल्लो..!! कुठे गेलीस..??”

अजुन २-३ मिनीटं गेल्यावर प्रितीचा मेसेज आला तिच्या फोटोबरोबर.., पण फोटोत चेहरा फोटोच्या विरुध्द बाजुला होता. फोटोत फक्त हसताना तिच्या गालावर उमटलेले डिंम्पल दिसत होते.. पण माझं लक्ष वेधुन घेतलं ते तिने कानात घातलेल्या इअररिंग्ज् ने.. एका हाताने केस बाजुला धरल्याने तिचे इअररिंग्ज् स्पष्ट दिसत होते..

“हेच इअररिंग्ज् होते का रे नेहाच्या ‘मैत्रिणीच्या’ कानात?”, प्रितीने विचारले..
” ”

“प्रिती तुझ्या लक्षात आलंय का? आपण कालपासुन बोलतोच आहोत..”
“काल पासुन?”
“मग? घड्याळ बघ, १२ वाजुन गेलेत.. गुड मॉर्नींग..”
“ओह माय गॉड.. बरं चल मग झोपुयात का आता.. उद्या.. आय मीन.. आजच.. थोड्या वेळाने बोलु.. ओके?”
“ऑलराईट.. स्विट ड्रिम्स.. गुड नाइट..”
“गुड नाईट तरुण.. ब-ब्बाय…”

मी बराच वेळ प्रितीच्या फोटोकडे पहात बसलो. मग शेवटी थोडा फ्रेश झालो, अजुन एक कोका-कोला पोटात ढकलला आणि उरलेले काम पुर्ण करण्यासाठी लॅपटॉप पुढे ओढला.


“थरुन, विल यु कम टू माय प्लेस फॉर स्नेक्स इन इव्हनिंग?”, सकाळी ऑफिसमध्ये स्वामी विचारत होता.
“प्लिज कम, आय स्टे निअर-बाय, माय वाईफ लक्ष्मी टोल्ड मी टू ब्रिंग यु होम”, माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तो म्हणाला

दुपारी प्रितीचा मेसेज होता तिच्या आईला रुटीन चेक-अप साठी दवाखान्यात ,घेऊन जाणार होती, सो संध्याकाळी ऑनलाईन नसेल म्हणून मग स्वामीला होकार कळवला.

दिवस सो-सोच होता. इंडस्ट्रीतले नवीन नवीन टेक्निकल वर्डस ऐकून फ्रेशर्स खुश होऊन गेले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह, आत्मविश्वास वगैरे झळकत होता. मला मात्र त्याचं फार वाईट वाटल. काही दिवसातच हे सुद्धा इतरांसारखे झोंबी होऊन कामाला जुंपले जाणार.

मी आपला पाट्या टाकल्यासारखं प्रेझेन्टेशन पूर्ण करून टाकले.

संध्याकाळी स्वामीच्या घरी पोहोचलो तेंव्हा लक्ष्मीने, त्याच्या पत्नीने, दारातच स्वागत केले.
“हाय तरुण, बर झालं तू आलास.” मी घरात येताना लक्ष्मी म्हणाली.

तिला मराठी बोलताना पाहून मी चमकलोच, तसं स्वामी म्हणाला, “शी इज अ महाराष्ट्रीयन, सो शी कुड स्पीक युअर लैंग्वेज”
“इथे सारखं हिंदी/इंग्लिश बोलून कंटाळा आला होता, बरं झाल तू आलास, इतक्या दिवसाने मराठी बोलून बरं वाटल बघ.”, लक्ष्मी म्हणाली

पुढची १०-१५ मिनिट आम्ही जनरल गप्पा मारल्या.

मी सहजच स्वामीला विचारलं, “सो तुमचं लव्ह मॅरेज?”
“ऑफकोर्स..” दोघंही एकदमच म्हणाले.

“आय.आय.टी. मध्ये भेटलो आम्ही..”, लक्ष्मी म्हणाली.
“वॉव्व.. मस्ट बी पिस ऑफ केक देन.. बोथ आर क्वालिफाईड, गुड जॉब..”
“अ‍ॅक्च्युअली नॉट.. लक्ष्मीज पॅरेंट्स वेअर समहाऊ कन्व्हीन्ड.. बट माय पॅरेंन्ट्स… दे जस्ट वेअर नॉट रेडी टु अ‍ॅक्सेप्ट हर..”

“मग? कसं केलं कन्व्हींन्स?”, मी लक्ष्मीला विचारलं..
“नाहीच करु शकलो आजपर्यंत..”, नाराजीच्या सुरात लक्ष्मी म्हणाली.. “शेवटी त्यांच्या मर्जीविरुध्द केलं लग्न.. त्यांनी स्वामीशी संबंधच तोडुन टाकलेत.. ही वॉज सो सॅड अफ़्टर आवर मॅरेज.. वुई हॅड आवर हनीमुन अफ़्टर वन मंन्थ.. व्हेन ही वॉज ओके ”

“या.. थरुन, इट वॉज डिफिकल्ट फ़ॉर मी.. स्टेईंग अवे फ़्रॉम पॅरेंट्स वॉज रिअली पेनफ़ुल. इट्स नॉट दॅट दे वेअर बॅड.. बट लक्ष्मी अलसो मिंन्ट अ लॉट टु मी..”

“हो ना.. आणि आधी आम्हाला वाटलंच नव्हतं की आम्हाला घरुन विरोध होईल.. नाहीतर एकमेकांच्या प्रेमात पडायच्या आधीच स्वतःला थांबवलं असतं..”, लक्ष्मी म्हणत होती.


हॉटेलवर परत आलो तेंव्हा डोक्यात चक्र फिरत होतं. मी स्वामीच्या जागी स्वतःला ठेवुन पाहीलं. आई-बाबांचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. मी एकुलता एकच.. समजा मला पण स्वामीसारखं घरच्यांच्या विरोधात लग्न करुन वेगळं रहावं लागलं तर?

विचार खरंच असह्य करत होता.

वडीलांची रिटायर्मेंट जवळ आली होती, आईची पण तब्येत अधुन मधुन डाऊन असायची. जशी मला एकटं रहायची सवय नव्हती.. तश्शीच त्यांनाही माझ्याशिवाय रहायची सवय नव्हती. प्रितीसाठी घर सोडुन जाताना मी बाबांचा पडलेला चेहरा पाहु शकेन? आईच्या डोळ्यातील अश्रु सहन करु शकेन?

सगळाच विचीत्र प्रकार होता.

व्हॉट्स-अ‍ॅपच्या मेसेजचा दिवा लुकलुकत होता. प्रितीचा अनरिड मेसेज होता.

मेसेज न वाचताच मोबाईल बंद करुन लांब सरकावुन दिला आणि उशीत डोकं खुपसुन शांत पडुन राहीलो.

[क्रमशः]

Rate & Review

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 8 months ago

Manali Sawant

Manali Sawant 3 years ago

Maneesha Zade

Maneesha Zade 3 years ago

Rutuja

Rutuja 3 years ago

Sujata

Sujata 3 years ago