Jyotish shashtra in Marathi Magazine by Sudhakar Katekar books and stories PDF | ज्योतिष शास्र - ग्रहांचे कारकत्व

ज्योतिष शास्र - ग्रहांचे कारकत्व

गुरू:-- धनु व मीन या राशीत स्वगृही असतो तर कर्क राशीत उचीचा व मकर राशीत नीचीचा असतो.तो आपल्या स्थाना पासून ५.७.व९ या दृष्टीने पाहतो.मांड्या, काळीज,तळपाय.यावर गुरूचा प्रभाव असतो.संतती,वैभव,ज्ञान,परमार्थ,पुण्य कर्म,तसेच,धर्म स्थळे,शाळा, कॉलेज,विश्वविद्यालय,कीर्तनकार,यावर याचा
प्रभाव आहे.कर्क,वृश्चिक,मकर मिन या बहू प्रसव राशी या राशीत संततीस अनुकूल असतो.लग्न,द्वितीय,पंचम,नवम,दशम एकादश या स्थानात त्याचे महत्व आहे.गुरू
संपत्ती दायक आहे.त्याच्या द्वितीय किंवा व्यय
स्थानी मंगळ नसावा.गुरू तूळ राशीत असेल तर मनुष्य सात्विक असतो.मिथुन,तूळ,कुंभ या राशीत मनुष्य विद्वान व सात्विक होतो.
मेष,कर्क,धनु मीन सिंह या राशीत संपत्ती देतो.गुरू चंद्र योगाला अतिशय महत्व आहे .
त्रिकोण योग असेल तर परमार्थ,शिक्षण अध्यात्म धार्मिकता असते.लग्न,रवी ,चंद्र
यांच्याशी त्रिकोण योग्य संपत्ती दायक असतो
लग्न,रवी चंद्र यांच्याशी लाभ करील तर पुष्कळ संपत्ती मिळते.गुरू कोणत्या नक्षत्रात आहे व दशवर्गात त्याला किती वर्ग मिळाले ते पाहावे.
शुक्र:--विवाह आणि वैवाहिक सुख शुक्रावर
अवलंबून आहे.शुक्राचा विर्याशी संबंध आहे
याला सौंदर्याची देवता म्हणतात.हा स्रीग्रह आहे.वृषभ आणि तूळ या त्याच्या राशी आहेत.मीन राशीत उचीचा व कन्या राशीत
नीचीचा असतो.विषय वासना शुक्रच निर्माण
करतो.संगीत कला,एहीक जीवन.सौंदर्य दृष्टी,
दयाळू पणा, सामंजस्य याचा तो कारक आहे.
वाहन मोटार,जहाज,विमान,विमान कंपन्या,
मोहक चित्रे पेंटिंग.तसेच नट नट्या, मेकअप,
सुशोभीकरन,फोटो ग्राफर हे त्याचे व्यवसाय आहेत.
गुरू हा जसा देवांचा गुरू तास शुक्र हा दैत्यांचा गुरू हिरे,रत्ने याचाही कारक आहे.
कर्क व वृश्चिक राशीत तीव्र काम वासना करतो,व्याभिचाराकडे प्रवृत्ती असते.सिंह धनु
राशीचा शुक्र असणारी व्यक्ती गोरी असते.
शुक्र लग्नी असता मनुष्य,सुंदर तसेच विलासी
व छान शोक असणारा असतो.द्वितीय स्थानी
शुक्र असता पत्नी सुंदर मिळते. शुक्र पंचम स्थानी असता,कला, नाटक,गायन यात प्राविण्य असते.लाभ स्थानात शुक्र असेल तर
हिऱ्यांचा व्यापारास अनुकूल असतो.चंद्र शुक्र योग व्याभिचार दर्शक मानतात.गुरू शुक्र,बुध शुक्र बुद्धिमत्तेचे प्रतीक .रवी शुक्र योग राजकीय योग घडउन आणतो.तो रवीच्या पुढे
गेलेला नसावा
गुरू,बुध शुक्र वक्री असल्यास उन्नती करतात.
शनी:--हा ग्रह प्रत्येक राशीर अडीच वर्षे राहतो.सूर्या भोवती प्रदक्षिणा करण्यास २९.५वर्षे लागतात.शनीचा आकार व तेलाचा घाणा यात साम्य आहे म्हणून यास तेली म्हणतात.हा मंद गतीने चालणारा ग्रह आहे.हा
ज्या राशीवर असतो त्याच्या मागच्या व पुढच्या राशीस पीडा करतो यालाच साडे सती म्हणतात.मेष,वृश्चिक,कर्क,सिंह व धनु या राशीत जन्म काळी रवी व चंद्र एकत्र असतील
तर साडे सतीचा परिणाम विशेष जोराने घडतो.दात मोठे,तोंडे वेडे वाकडे करण्याची सवय.हाव भाव फार.अडखळत बोलण्याची सवय,डोळे बारीक व खोल.या लक्षणांवरून शनी ओळखता येतो.चोरी,खोटे बोलणे,अविचार,खोटा दिखाऊ पणा अस्वच्छ
पणा,दंभ,मच्छर हे शनीचे गुण धर्म आहेत.
शरीरातील हाडे,गुडघे,पुरुशांचा उजवा कान, स्त्रियांचा डावा कान यावर शनीचा अमल आहे.शनी सेवक म्हणून हलक्या दर्जाची कामे,चामडे,स्मशान,उत्तरक्रिया,शवचिकिच्छा, बर्फ,फ्रिज,आईस्क्रीमचे कारखाने,अंधारी जागा,निर्जन प्रदेश,इत्यादीवर त्याची आधी सत्ता असते.स्थावर मिळकीतीचा कारक मंगळ असला तरी तरी त्या खालोखाल शनीलाही करकत्व आहे.शनी कोणतीही गोष्ट
मंदगतीने करतो.
कुंडलीत शनी बलवान असेल तर त्याचा सारखा उदार कोणीही नाही
मिथुन,तूळ व कुंभ या राशीत तो बलवान असतो.बुध, गुरू शुक्र यांच्या बरोबर तो चांगल्या गोष्टी घडवून आणतो
त्यांच्या सान्निध्यात शनीचे अशुभत्व कमी होते.
राहू:--वास्तविक राहू व केतू हें काल्पनिक ग्रह आहेत.चंद्राचा भ्रमण मार्ग पृथ्वीच्या भ्रमण मार्गास ज्या दोन ठिकाणी छेदितो त्या पैकी एका चंदन बिंदूला राहू व दुसर्याला केतू असे म्हणतात.उत्तरे कडील छेदन बिंदूला राहू व दक्षिणेकडील छेदन बिंदूला केतू म्हणतात.राहू
हा गारुडी विद्येचा कारक आहे.राहू केतू राशी चक्रात उलट गतीने फिरतात म्हणून ते कायम वक्रीच असतात.१९।। वर्षांनी बारा राशीत त्यांची प्रदक्षिणा पूर्ण होते.म्हणून एका राशीत
ते साधारपणे दीड वर्ष राहतात.राहू कन्येचा तर केतू मिनेचा स्वामी मानतात.
सुधाकर गोपीनाथ काटेकर
Vishaarad
Astological Research Institute, Chennai.
Rate & Review

chandali bhalerao

chandali bhalerao 4 months ago

gajanan joshi joshi
Shreya Furniture   Jeevan Patki

सुलभ पद्धति ने मार्गदर्शन

Maheish  Laturkar

Maheish Laturkar 3 years ago

gitesh dandekar

gitesh dandekar 3 years ago

खुप छान