Mala Kahi Sangachany - 22 in Marathi Fiction Stories by Praful R Shejao books and stories PDF | मला काही सांगाचंय... - २२

मला काही सांगाचंय... - २२

२२. एकांत

स्वतःशी तिचा असा संवाद सुरु असता ती त्या भावविश्वात मग्न झाली ... कितीतरी विचारांचे बाण प्रत्येक क्षणाला तिचं मन विचलित करू लागले ... मनात अचानक आलेले विचार घर करू पाहत होते पण दुसऱ्याच क्षणी आणखी पुढे काय लिहिलं असणार ? असं तिच्या मनात आलं आणि तिने समोर वाचायला सुरुवात केली ...


रविवार दिवस होता ... बराच वेळ पुस्तक वाचून नोट्स काढून घरच्या घरी जाम कंटाळा आला होता , मग काय सायकल घेऊन निघालो सुजितला भेटण्यासाठी पण मनात ती नव्हतीच कारण सकाळपासून फक्त आणि फक्त अभ्यास करत जवळ जवळ अर्धा जास्त दिवस निघून गेला होता ... तर म्हटलं चला सुजितने आज काय केलं ? जरा भेटून विचारावं ... म्हणून सहज निघालो होतो ...


मी आपला माझ्या धुंदीत सायकल चालवत जात होतो ... तर समोर ती होतीच ... तिच्या हातात एक कागद होता ... मी तिला टाळत पटकन निघुन जायचा प्रयत्न केला पण जवळून जाताच .... हाक ऐकू आली ...


" कुमार ... "


जास्त दूर न गेल्याने मी आवाज ऐकू आला नाही असा बहाणा करू शकलो नाही ... मागे परतून आलो ... तिच्या जवळ सायकल उभी करून सवयीप्रमाणे एक पाय खाली टेकवून --


" किर्तीप्रिया , तू आवाज दिला ? "


" नाही , मी आवाज नाही दिला .."


" खरंच तू आवाज नाही दिला ... "


" नाही , बहुदा तुला भास झाला .. "


" .... " जरावेळ विचार करत - हिने मला आवाज दिला होता की मला भास झाला


" बरं येतो मी ... " जरा गोंधळून बोललो


" हं , ये .. " हसतच


" नक्की तू आवाज दिला नाही ... " खात्री करून घ्यावी म्हणून पुन्हा एकदा विचारलं ...


" अरे हो रे , इतकं गोंधळायला काय झालं ? " हसत हसत


" तू नाही का म्हटलं ? "


" जरा गंमत केली रे .. "


" ठीक आहे ... एक वेळ माझी पण येईल .."


" हो वाट बघ ... "


" ते जाऊ दे , आवाज का दिला ? "


तो कागदअजय हातात देऊन " हे बघ MS - CIT क्लास सुरु होणार आहे .. "


" अस्स यासाठी .... "


" मी क्लास लावणार असं ठरवलं आहे , मी अकरावीला आहे आणि कॉलेज करून वेळ असतोच ना मग सोबत सोबत MS CIT करून टाकावं म्हणते .."


" वा छान ... "


" छान काय छान , तू सुद्धा क्लास लाव अस सांगण्यासाठी तुला थांबवलं .. "


" अस्स होय ... कळलं ... "


" मग चलशील सोबतच उद्या कॉलेज झाल्यावर परत येतेवेळी आपण ऍडमिशन करू .."


" सॉरी पण मला क्लास नाही लावता येणार ... "


" का बरं ? "


" बारावीचं वर्ष पूर्ण झाल्यावर MSCIT करायचं ठरवलं ..."


" कुमार ... प्लिज ,तुला माहिती आहे ना मी का सोबत क्लास करू म्हणते .."


" का ? "


" नवीन ठिकाणी कुणी ओळखीचं सोबत असलं तर धीर राहतो आणि ... "


मी विचारायला नको होतं पण न राहवून विचारलं ... " आणि ... आणि ... काय ? "


" काही नाही ... तू सोबत क्लास लावणार कि नाही ? " जरा रागात


" पुन्हा एकदा सॉरी पण मला नाही जमणार .. "


" बरं , ठीक आहे ... "


मला तिथं थांबणं जमत नव्हतं " चल , निघतो मी , ठीक काम आहे ... " म्हणत मी तिथून निघालो ...


सुजितला भेटून परत आलो आणि सरळ कबीरला जाऊन सारं सांगितलं ... मी खरंच क्लास लावू शकत नव्हतो बारावीची सराव परीक्षा काही दिवसांत होणार होती आणि दोन अडीच महिन्यात शेवटची परीक्षा ....


दुसऱ्या दिवशी ...


मी सायकल फिरवून रस्ताने जात होतो ...


" कुमार ... "


मागे फिरून पाहिलं तर तिच होती ... तसं आवाजावरून मला कळलं होतं .


" किर्तीप्रिया .. तू इथे कशी काय ? "


" हा प्रश्न मी तुला विचारायला हवा ... "


" नोटबुक घ्यायचं होतं ... "


" मला वाटलं तू माझ्यासोबत ऍडमिशन घेण्यासाठी आला ..."


" मी कालच तुला सांगितलं ... "


" हो , ठीक आहे ... "


" तुझा क्लास इथे आहे का ? "


" हं ... "


" चल इथपर्यंत आलो आहे तर आत सुध्दा येतो ... " एक नजर घड्याळ पाहून


दोघेही MSCIT सेन्टर च्या आत गेलो ... तिचा ऍडमिशन फॉर्म भरून त्यावर फोटो लावला ... रसेप्शनिस्ट कडून आवश्यक सर्व माहिती मिळवली आणि बॅच टाईम करीत फॉर्म घेऊन केबिनमध्ये जात -


" हॅलो सर , आम्ही आत येऊ शकतो ... "


" हो प्लिज , या ना "


आत गेल्यावर सर समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितल्यावर , आम्ही दोघेही बसलो ...


" बोला ... काय नावं आहेत तुमची ? "


" मी कुमार ... हि किर्तीप्रिया ..."


" ok ..."


" सर हिला ऍडमिशन पाहिजे .. "


" बरं , तूम्ही फॉर्म भरला ? "


" येस सर ... " फॉर्म सरांना देत


त्यांनी फॉर्म चेक केला , फी बद्दल सांगितलं आणि उद्यापासून 9:30 ते 10:30 पर्यंत बॅच होईल ...


" ठीक आहे , सर ... धन्यवाद ! "


.... .. .. ..

आम्ही दोघे घरी जायला निघालो .... काही वेळातच घरी पोहोचलो आणि मी लगेच आल्याबरोबर कबीर ला भेटायला ....


सरळ त्याच्याजवळ जाऊन बसलो ... जरावेळ शांतच होतो , काल तिच्याशी बोललो ते सारं आठवत होतं .... तिने बराचवेळ मी सोबतच ऍडमिशन करावी म्हणून मला बदलविण्याचा प्रयत्न केला होता ... पण माझा नाईलाज हित नाहीतर तिच्या सहवासात क्लास न जाणं कुणाला नको होत ...


थोड्या वेळाने भानावर आलो ...


" कबीर ... खरंच खूप वाईट वाटत आहे , तिला नाही म्हणावं लागलं ... तेही इच्छा असून पण मी समाधानी आहे कि तिने क्लास लावला ... तिने काल जेव्हा मला क्लास बद्दल सांगितलं आणि तो कागद हाती दिला तेव्हाच मी विचार केला होता ... म्हणून मी आज सकाळीच कॉलेजला जाण्याआधी MSCIT सेन्टर ला गेलो होतो , क्लास चा पत्ता कागदावर होताच आणि तिथं जाऊन कळलं की जे सर तिथे क्लास घेतात ते ओळखीचेच होते .. मग मी तेव्हाच सर्व माहिती मिळवली , कोर्स किती महिन्याचा , फीस , टायमिंग आणि सरांना एक फ्रेंड ऍडमिशन करणार आहे ... तेव्हा सरांनी सांगतील होत की फक्त संध्याकाळच्या बॅच मध्ये ऍडमिशन होऊ शकते असे समजलं पण सर ला विनंती करून एक जागा सकाळच्या बॅच मध्येच करून द्या असं सांगून , कॉलेजहुन परत येतांनी फॉर्म भरून घेऊ आणि जमल्यास सकाळी बॅच टाईम मिळाला तर उत्तम । असं सगळं आधीच बोलून घेतलं होतं ... "


कुमारने असं लिहिलेलं वाचून ती विचार केल्या शिवाय राहू शकली नाही ,

डायरी तशीच हाती धरून , तिने एक नजर वर गरगर फिरणाऱ्या पंख्याच्या पात्याकडे पाहिलं ... संपूर्ण घरात ती एकटीच बसून वाचत असताना तिला एकांत असल्याचं जाणवलं नाही आणि म्हणूनच आतापर्यंत एकसारखं वाचून एकदम थांबल्याने मनात येणारे विचार प्रश्नाचं रूप धारण करून वर डोकावू पाहत होते ... ती एकाकी आणि त्यात भर म्हणजे घरातील शांत वातावरण यामुळे विचारांची चादर तिच्या मनावर पांघरूण ओढत होती ... एक वेळ आली जेव्हा विचार प्रश्न बनून तिचे मन पूर्णपणे झाकल्या गेलं ... प्रश्नांनी लवकरच तिच्या मनावर ताबा घेतला ...


ती स्वतःलाच प्रश्नांमागे प्रश्न विचारायला लागली ...


कोण ह्या लहान लहान गोष्टी लक्षात घेऊन दुसऱ्यासाठी जगतो ?? आजच्या या स्वार्थी दुनियेत जीवनात असे काही विशेष क्षण जपून ठेवणारा कुणाला मिळतो ?? कुमार ... तुला समजणं कठीण आहे ... कठीण म्हणण्यापेक्षा अशक्य ! फक्त तुलाच ठाऊक असेल तु पूर्णपणे कोणाला समजलास .... ! कदाचित तू स्वतःच तुला समजू शकतोस ... अन समजला असेल ...

Rate & Review

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 8 months ago

Milu

Milu 1 year ago

Sejal Trivedi

Sejal Trivedi 3 years ago

Ashwini

Ashwini 3 years ago

Nisha

Nisha 4 years ago