Mala Kahi Sangachany - 32 in Marathi Fiction Stories by Praful R Shejao books and stories PDF | मला काही सांगाचंय..... - ३२

मला काही सांगाचंय..... - ३२

३२. भेटीची ओढ

इकडे कुमारच्या घरी ... ... ...

नवीन ठिकाणी तशी उशिराच झोप येते तर याबरोबरच कुमार आणि त्याच्या कुटुंबियांवर हि वेळ आली होती त्यामुळे सर्वांनाच दुःख झालं होतं ... मग याप्रसंगी मन कश्यातच समाधानी नव्हतं तर झोप रोजच्यासारखी कुणालाच लागली नव्हती ... गावात कोंबडा आरवला कि सर्व लोक जागी होतात , तशी सर्वांना जाग आली ... सर्व उठून जागेवरच बसले ... बऱ्याच दिवसांनी नजरेसमोर त्यांनी जरा वेगळा आणि मनमोहक देखावा ते पाहिला ... तांबूस सूर्यकिरण नभनक्षी कामात बुडालेले , पाखरांची किलबिल सुरु झालेली , गुराढोरांना चारापाणी करून लोक कामात रमलेले , कुणी दुधाच्या धारा काढत असल्याचा झरझर असा आवाज , तर रस्त्यावरून ऐटीत चालणारे बैल आणि सोबतच जुंपलेली बैलगाडी , आजूबाजूच्या सर्व अंगणात सडा शिंपून रांगोळी काढलेली ... हे असं रमणीय दृश्य पाहून त्यांना आपण कुठे आहोत आणि परिस्थिती काय आहे ? याच भान हरपलं ...

इतक्यात सकाळची सर्व कामं आटोपून , देवपूजा करून , हातात अगरबत्ती धरून त्या माउलीने तुळशीसमोर वाकून नमस्कार केला ... मनोमन कुमार साठी प्रार्थना करून ती मागे वळली ... तिला पाहून ते सर्व भानावर आले ...

" बाळांनो उठले ... झोप गेली ? " ती हळूच म्हणाली ...

त्यांनी होकारार्थी मान हलवली , उठून उभे राहिले ... पटापट हातपाय , तोंड धुऊन घरात बसले , सोबत चहा घेतला ... सुजितने वडिलांना फोन लावला ...

" हॅलो बाबा "

" हॅलो बोल सुजित "

" कुमार आता कसा आहे ? "

" तो झोपेतून उठला , नर्सने तपासलं , सगळं ठीक आहे म्हणे ..."

" कुमार काही बोलला का ? "

" आम्ही आत नाही गेलो ... डॉक्टर आल्यावर त्याला भेटू ..."

" बरं , काकांना फोन द्या ... " म्हणत त्याने प्रशांतला फोन दिला ..

" हॅलो बाबा , दादा कसा आहे आणि तुम्ही सगळे ? "

" कुमार आत्ताच उठला आणि आम्ही ठीक आहोत ..."

" बरं आईशी बोला ... "

" हॅलो , अहो आता कुमार बरा आहे ना ? "

" बरा आहे ... "

" तुम्ही सर्वांनी चहा घेतला ? "

" हो ... "

तिने पदर डोळ्याला लावला आणि मोबाईल आर्यनला दिला ... " हॅलो काका , काळजी करू नका "

" .... " आर्यनने मोबाईल कानापासून दूर करत ' आवाज येत नाहीये ..' मोबाईल अनिरुध्द ने घेतला ...

" हॅलो ... "

" हॅलो बोल सुजित .."

" काका मी अनिरुध्द "

" अच्छा , बोल ना ... "

" डॉक्टर कधी येणार आहेत ..? "

" १०:३० वाजता येतील .."

तो पुढे काही बोलणार इतक्यात ऋतुराजने मोबाईल इकडे दे असा इशारा केला ...

" हॅलो काका , काही काळजीचं कारण नाही ना ? "

" नाही ... आता तो बरा आहे .."

" ठीक आहे काका , दवाखान्यात येण्यासाठी आम्ही लवकरच घरून निघतो .."

" ठीक आहे .. "

" हो काका , फोन ठेवतो .."

त्याने फोन ठेवला ... मोबाईल स्क्रीनवर ९:०० वाजलेले पाहून त्याने सगळ्यांकडे एक नजर फिरवली , आपण लवकर जे काय बाकीची कामं असतील ते पार पाडून निघायला पाहिजे ...

काही वेळातच तीन दुचाकी घेऊन , एका दुचाकीवर ती माउली आणि सुजित , दुसऱ्या दुचाकीवर प्रशांत आणि आकाश तर तिसऱ्या दुचाकीवर आर्यन , ऋतुराज , अनिरुध्द दवाखान्याच्या रस्त्याने जायला निघाले ... कुमार कसा असेल ? हा प्रश्न सर्वांच्याच मनात होता ...

या सगळ्यांपेक्षा जरा वेगळा विचार करत होता , तो म्हणजे अनिरुध्द ...

" सोनेरी क्षण " हे नवीन रहस्य , गुपित काय आहे ? कुमारने डायरी सोबतच असं काही लिहून ठेवल्याची कल्पना कुणालाच कशी नाही ? त्यात त्याने काय काय लिहिलं असेल ? या प्रश्नांनी त्याला भंडावून सोडले ... कधी एकदा दवाखान्यात पोहोचतो आणि कुमारशी बोलतो , त्याला विनवून कधी डायरी अन सोनेरी क्षणांचा खुलासा करून घेतो अस त्याला वाटलं ... कुमारच्या भेटीची ओढ प्रत्येक क्षणाला वाढतच गेली ... तर आर्यन विचार करू लागला की आज कुमारसोबत मनसोक्त बोलायचं , त्याला बोलतं करायचं ... त्याला एक सांगाचंय कि " दोस्ता तू बरोबर होता , तुझं म्हणणं मला पूर्णपणे पटलं .."

ऋतुराजने दुचाकी चालवत जसे वाटेत येणारे दगड चुकवीत रस्त्यावर लक्ष ठेवले , मनात येणाऱ्या विचारांना तितक्याच कुशलतेने बाजूला करत तो समोर निघाला ... त्याच्या मनात वारंवार आज ती डायरी काहीही झालं तरी मिळवायची म्हणून ती व्यक्ती कोण आहे ? जिच्याकडून डायरी घ्यायची , म्हणून तिला भेटण्याची ओढ लागली .. अचानक दुचाकी पंक्चर झाली मग काय आर्यन , अनिरुध्द आणि ऋतुराज दुचाकी दुरुस्त करून नंतर येतो ... तुम्ही समोर जा म्हणाले ...

दोन दुचाकी घेऊन काही वेळातच ते दवाखान्यात पोहोचले ... सगळे कुमारच्या रुमजवळ गेले तर तिन्ही वडीलमंडळी खुर्चीवर बसलेले ... त्यांच्याशी बोलून फोनवर जे बोलणं झालं होतं त्याशिवाय वेगळं त्यांना काहीही ऐकायला मिळालं नाही ... ते सर्व डॉक्टर येण्याची वाट पाहत बसले आणि घड्याळात १०:०० केव्हाच वाजले ... थोडा वेळ तिन्ही वडील मंडळी तेथून बाहेर पडले , जवळ जवळ अर्धा तास तिथं शांतता पसरली ... ठीक १०:३० वाजता डॉक्टर आले , त्यांनी लगेच कुमारला तपासलं ... डॉक्टर रूममधून बाहेर येताच -

" कुमार बरा आहे ना ? " तिने विचारले

" आधीपेक्षा त्याची प्रकृती आता चांगली आहे पण तो अजून काहीच बोलला नाही "

" का ? " जवळपास सर्वांनी एकसाथ हा प्रश्न विचारला ...

" बहुतेक त्याला बोलतांना त्रास होत असावा .... असं मला वाटतं .."

" बाकी काळजीचं काही कारण नाही ना ? " प्रशांत म्हणाला ...

" नाही ... ठीक आहे आपण नंतर भेटू , त्याला आरामाची गरज आहे ... " म्हणत डॉक्टर इतर रुग्णांना तपासायला निघून गेले ...

सुजितचा मोबाईल वाजला ...

" हॅलो , बोल आर्यन "

" डॉक्टर आले का ? कुमार कसा आहे ? "

" डॉक्टर आले आणि त्यांनी कुमारला तपासलं सुध्दा , तो आता ठीक आहे ..."

मध्येच मोबाईल हाती घेऊन अनिरुध्द " अरे सुजित , पंक्चरचं एकही दुकान मिळालं नाही , कितीवेळपासून पायी चालत आहोत ..."

सुजितने त्यांना एका दुकानाचा पत्ता सांगितला , अजून काही अडचण आली तर सांगा ... नाहीतर थोड्या वेळाने मी फोन करतो , बरं ...फोन ठेवतो म्हणत त्याने फोन कट केला ...

Rate & Review

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 9 months ago

Supriya

Supriya 3 years ago

Rohit Gharge

Rohit Gharge 4 years ago

Surekha

Surekha 4 years ago