Mala Kahi Sangachany - 34 - 2 in Marathi Fiction Stories by Praful R Shejao books and stories PDF | मला काही सांगाचंय..... ३४ - २

मला काही सांगाचंय..... ३४ - २

३४. लपंडाव remaining

रिकामा झालेला चहाचा ग्लास टेबलवर गोल गोल फिरवत , मध्येच दोन्ही हात टेबलवर ठेवून तळहात एकावर एक ठेवले " मी तुला , तुझ्या हँडबॅग मध्ये चुकून आलेलं नोटबुक येतेवेळी आणायला सांगितलं होतं ..."


" अस्स ते होय , असेल की बॅगमध्ये " म्हणत तिने खांद्याला अडकवलेली बॅग टेबलवर ठेवली , आतमध्ये हात घालून तिने रिकामा हात बाहेर काढला ... एक नजर सुजितला पाहिलं , " अरे यात तर नाहीये ..."


" काय ? डायरी बॅगमध्ये नाही ... " सुजित जवळ जवळ ओरडला .


" अरे , जरा हळू बोल , आणि डायरी कसली ? " सुजितने कुमारची डायरी वाचली तर नाही ना ? म्हणून जरा चौकसपणे विचारलं ..


" डायरी म्हणजे ते नोटबुक .. " त्याने स्वतःला कसतरी सावरलं .


" तू मला फोनवर विचारलं होत ना , बॅगमध्ये ते नोटबुक आहे की नाही चेक कर म्हणून , बहुतेक तेव्हा बाहेर काढलं आणि मी परत बॅगमध्ये ठेवायला विसरले ..."


" अरे यार , ते नोटबुक घरीच राहिलं ..! पण नक्की घरी आहे ना ! "


" हो , मला खात्री आहे पण इतकं महत्वाचं असं त्यात काय आहे ? "


स्वतःशीच - तर हिने अजून ती डायरी उघडून वाचलेली नाही असं वाटतंय " त्यात ना , माझ्या मित्रांचे , नातेवाईकांचे , डॉक्टर , इतर काही महत्वाच्या लोकांचे मोबाईल नंबर आणि पत्ते लिहिले आहे ... "


" ठीक आहे , मी पुन्हा येतेवेळी आठवणीने नक्की सोबत घेऊन येईल ... "


" बरं , ठीक आहे .. "

इतकं बोलून ते तेथुन बाहेर पडले ... फोन लावायच्या निमित्याने ती जरा मागे थांबली , सुजित मात्र जड मनाने पावलं उचलत पुढे निघून गेला ... पण ती खरंच डायरी आणायला विसरली होती का ? कि तिने डायरी कुमारची आहे समजल्यावर जाणीवपूर्वक घरी ठेवली असेल ? तिने डायरी वाचायला तर घेतली नसेल ना ? कदाचित पूर्ण वाचून झाली की काय ? अजून कुणाला ते गुपित कळू नये म्हणून कुमार बरा झाला की त्यालाच परत करावी असं तिला वाटत असावं ? अश्या अनेक प्रश्नांनी त्याला भंडावून सोडलं ...


शेवटी बोलतांना त्याचा आवाज तिला किंचित निराश जाणवला , त्याच्या अश्या प्रतिसादाने तो खोटं बोलत असून त्याने डायरी वाचली असल्याचं तिला सहज कळलं ... पण सारं काही माहीत असून तसं काहीच तो दाखवत नाहीये याच तिला नवल वाटलं , पुढच्या क्षणी तिला स्वतः सुध्दा डायरी वाचलेली नाही असं दाखवून लपंडाव खेळत आहोत कळून चुकलं ... पण हा खेळ कितीवेळ असाच सुरु ठेवावा लागेल ? या अनपेक्षित प्रश्नाने तीच मन विचलित झालं , जमेल तितक्या लवकर घरी जायला हवं आणि राहिलेलं , आजच वाचून पूर्ण करावं लागेल जेणेकरून उद्या ती डायरी परत करता येईल ... असं ठरवून ती कुमारच्या आई वडीलांजवळ जाऊन त्यांना भेटली , रूमच्या काचेतून कुमारला भिजलेल्या डोळ्यांनी पाहिलं ... निघतांना सर्वांचा निरोप घेतला आणि सुजितला , एक महत्त्वाचं काम असल्याने आत्ताच बस स्थानक येथे सोडून द्यायला सांगितलं ... त्याने तिला थांबविण्याचा निष्फळ प्रयत्न केला नाही , उलट तो लगेच तिला घेऊन बस स्थानक ला पोहोचला ... तिला बस मध्ये बसवून तो तिथेच थांबला , त्याने अनिरुध्द ला फोन केल्यावर त्याला कळलं की ...


जेव्हा आर्यन , अनिरुध्द आणि ऋतुराज पंक्चर दुचाकीला नवीन ट्यूब बसवून दवाखान्याकडे यायला निघाले असता ऋतुराजला घरी जरा काम असल्याने घरचा रस्ता धरावा लागला ... ते तिघे दवाखान्याऐवजी घरी पोहोचले , बराचवेळ दुचाकी लोटत पायी चालत फिरल्यामुळे त्यांची चांगलीच घामाघूम झाली होती , अंगातील घामाने ओले झालेले कपडे ऋतुराजच्या घरी जाईपर्यंत कडक उन्ह आणि वारा यांच्या मेहरबानीने परत सुकले ... पण अंग कसं रसरस झालं होतं म्हणून आणि आर्यन , अनिरुध्द इथं आल्यानंतर बॅग त्याच्याच घरी ठेवून गेलेले म्हणून अंघोळ आटपून घेण्याचा बेत आखला ...


ऋतुराज येतांना तिघे सोबत असणार याची घरी कुणालाच कल्पना नव्हती म्हणून त्याच्या आईने त्यांना जरावेळ आराम करायला सांगून जेवण बनवायला सुरुवात केली ... एका आईच्या हट्टापुढे या तिघांचं काहीएक चाललं नाही , नाईलाजाने त्यांनी आणखी काहीवेळ घरीच मुक्काम ठोकला ... यामुळे ते अजून पर्यंत दवाखान्यात येऊ शकले नव्हते , मग सुजितने ती येऊन परत गेली आणि तिने डायरी सोबत आणली नव्हती तर कामं असल्याने घाईघाईत जायला निघाली म्हणून मी तिला थांबविण्याचा आग्रह करू शकलो नाही असं फोनवर त्यांना कळवलं ...


पण तरी आर्यन , अनिरुध्द आणि ऋतुराज , आम्हाला तिला भेटायचं होतं ... डायरी का नाही आणली ? ते विचारायचं होतं ... काहीतरी शक्कल लढवून तिला थांबवायला हवं होतं , काय सुजित , तुला इतकं काम करायला जमलं नाही ... असं ते सुजितला म्हणाले ... आज तरी डायरी वाचायला मिळणार अशी त्यांना आशा होती पण आजही निराशाच त्यांच्या पदरी आली ... त्यांना हि काही समजेना नियतीने हा कोणता लपाछपीचा खेळ चालवलाय ..? कोण कोण या लपंडाव खेळात सहभागी आहेत अन कोण कोण आतापर्यंत बाद झाले आहेत किंवा होणार आहेत ???

Rate & Review

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 9 months ago

Bharati Deshpande
Pri

Pri 4 years ago

Jyoti Shewale

Jyoti Shewale 4 years ago

Ashwini Nagare

Ashwini Nagare 4 years ago