tu jane na - 5 in Marathi Love Stories by दिपशिखा books and stories PDF | तू जाने ना - भाग ५

तू जाने ना - भाग ५

भाग - ५

" हॅलो अरे आहेस कुठे...? "

" बस क्या, तुमने पुकारा और हम चले आएsss..." कबिरने गाणं गुणगुणतच एन्ट्री घेतली आणि पंकजला बिलगला...

" hey ये हुई ना बात...? " त्याला पाहून पंकज पण खूष झाला...

" सो दुल्हेराजां सब कुछ सेट ना... हमारी होनेवाली भाभी कहाँ हैं...? " कबीर त्याला डोळा मारत म्हणाला...

" अरे ती आत्ताच संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी तयार व्हायला गेली... भेटवतो नंतर... तुझा प्रवास कसा झाला...? " पंकज

" हम्मम मस्त..." कबिरच्या डोळ्यासमोर सुहानीचा चेहरा येताच त्याचं वाक्य बदललं... " अरे विचारूच नकोस... हेक्टिक..."😣

" का रे...? " पंकज

" नाही काही नाही, नंतर सांगतो... जाम दमलोय रेस्ट करतो, उद्या शूट पण आहे... " कबीर अंग मोडतच म्हणाला...

" अरे मग लग्नाला आहेस ना...? " पंकजला काही कळेचना...

" अरे हो असणार आहे मी लग्नाला, एका दिवसाचं शूट आहे... पॅकप झालं की उद्याच्या रात्री पुन्हा इथे... " कबीर त्याला त्याचं सगळं शेड्यूल समजावून सांगत होता...

" बरं झालं एकच लोकेशन झालं ते... चल मी तुला तुझी रूम दाखवतो..." पंकज.

नेमकी त्याला सुहानीच्याच शेजारची खोली देण्यात आली होती... जेवढी ती दोघ एकमेकांपासून लांब जात होते तेवढीच नियती त्यांना एकमेकांच्या जवळ आणत होती आणि दोघेही ह्या गोष्टीपासून अनभिज्ञ होते... कबिरही जेवून लगेच झोपी गेला...

संध्याकाळी कार्यक्रमाला सुरुवात झाली... इथे सुहानी लेमन ग्रीन कलरचा लेहेंगा घालून तयार झाली होती... त्यावर साजेसा शृंगारही तिने केला होता... त्या पेहरावातही ती इतकी गोड दिसत होती की आज भल्या भल्या मुलांची विकेट जाणार होती...

रॉयल ब्ल्यू रंगाचा पठाणी कुर्ता आणि सफेद सलवार घालून कबिरही रुबाबदार दिसत होता... तो नेहमीच स्वतःला सजवण्यात तासंतास घालवत असे... आणि आजच्या कार्यक्रमात तर त्याला सगळ्यांना आकर्षून घ्यायचं होतं... तो मस्तपैकी तयार होत बाहेर पडला...

सगळे लॉन मध्ये जमले होते... मेहंदीचा कार्यक्रम थोड्यावेळापूर्वीचं उरकला होता... त्यामुळे आता सगळे संगीत एन्जॉय करण्यासाठी आतुर होते...

सुहानीची मेहंदी काढून झाल्यावर ती कोल्ड्रिंक्स घ्यायला म्हणून काउंटर कडे वळली... ओळखीची बरीच लोकं त्या कार्यक्रमात उपस्थित होते... त्यामुळे सगळ्यांना भेटून, खोटं नाटं हसून तिच्या घशाला कोरडं पडली होती आणि म्हणूनच ती कोल्ड्रिंक पीत तिथेच उभी होती...

पंकज कबिरला काव्याशी भेट करून देत होता... तो येतो ना येतो त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासमोर गराडा घातला... तो प्रत्येकासोबत फोटोज काढत होता... काहीवेळाने काव्या त्याला सुहानिशी ओळख करून द्यायला म्हणून तिच्याजवळ घेऊन गेली...

सुहानीला ड्रिंकच्या काउंटरजवळ उभी असलेली पाहून काव्या, पंकज आणि कबीर तिच्या दिशेने गेले... ती पाठमोरी उभी असल्याने कबिर तिच्या चेहऱ्यापासून अनभिज्ञ होता... ते तिघेही तिच्या मागे येऊन उभे राहिले... अधून मधून कबिरचे चाहते त्याच्यासोबत एकतरी सेल्फी काढून घेतच होते... पण त्याची नजर काही तिच्या कमनीय बांध्यावरून हटत नव्हती... तिचा चेहरा बघायची त्याची मनोमन तीव्र इच्छा होत होती... एकीकडे त्याच काउंटरचा पंखा थोडा खराब झाल्याने एक माणूस तो रिपेअर करत बसला होता...
काव्याने सुहानीला आवाज देताच ती मागे वळली आणि नेमका पंखा पण तेव्हाच सुरू झाला... त्या वाऱ्याने तिचे केस तिच्या गालांना छळू लागले... त्या वाऱ्याला बेसावध असणारी ती सुकलेल्या मेहेंदीच्या हातांनीच तिच्या केसांची अडचण दूर करत होती... पण कबीर मात्र तिच्या चाललेल्या निष्फळ प्रयत्नांकडे गंमतीने एकटक बघतच होता... अखेर त्या केसांआडून तिची नजर त्याच्यावर पडली... एक क्षण दोघांनाही काही सुचलच नाही... तो तिच्याकडे पाहतच राहिला... कुणी खरंच इतकं सुंदर कसं काय असू शकतं...? ह्या पेहरावात काय कमाल दिसतेय ही...! त्याच्या मनात बरंच काही घोळत होतं... तिचे गुलाबी ओठ त्या रोमांटीक वातावरणामुळे अजूनच गुलाबी झाले होते... तिच्या ओठांकडे क्षणभर तो पाहतच राहिला... नकळत त्याच्या स्वतःच्या ओठांवरून त्याची जीभ फिरली...एकदम हावरटासारखी... हे सगळं आपसूकच घडत होतं पण त्याचे ते भाव तिला किळसवाणे वाटत होते... काहीवेळापूर्वी त्याच्या डोळ्यात हरवलेली सुहानी आता एका मारक्या म्हशीप्रमाणे त्याच्याकडे बघू लागली होती...

पंख्याची दिशा फिरताच सगळं वातावरण पहिल्यासारखं झालं... काव्याने दोघांची एकमेकांना ओळख करून दिली तसा तो भानावर आला... क्षणभर आपण ह्या चेटकीनीच्या विचारात कसं काय हरवून गेलो हेच त्याला समजत नव्हतं... दोघांनीही एकमेकांना खोटी स्माईल देत ती वेळ मारून नेली... उगीचच दुसऱ्यांच्या कार्यक्रमात तिला तमाशे करावेसे वाटत नव्हते आणि हाच मौका कबिरच्या हाती लागला... काव्या आणि पंकज तिथून गेल्यावर तो तिला त्रास देऊ लागला, तिला त्रास देण्याचा एकही क्षण सोडत नव्हता...

" माझ्या मागे मागे इथपर्यंत आलीस... आतातर माझी खात्रीच पटलीय... सकाळी फ्लाईट मध्ये आणि आत्ता इथे तू माझा पाठलाग करत होतीस..? खरखर सांग..." त्याचं खोचकपणे बोलणं, तिच्या खोड्या काढणं चालूच होतं...

" हे बघ, तू इथे तमाशे नको करुस... आणि इतर मूर्ख मुली तुझा पाठलाग करत असतील, मी तसल्या मुलींसारखी मुळीच मूर्ख नाहीए... तू काय आहेस ना, ते मी चांगलंच ओळखून आहे..." तीही गप्प बसणारी नव्हतीच...

" काय माहितीय गं तुला माझ्याबद्दल...? " कबीर

" हेच की तू फालतू मुलगा आहेस... श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा जो आळशी, कामचोर आणि .. आणि घमेंडी आहे... माझ्याशी वाद नाही घालायचा, हिशोबात राहायचं, समजलं..." ती दात ओठ खातच बोलत होती...

" अच्छा, तू खूपच माहिती काढलीस माझी...? आणि घमेंडी कोणाला म्हणतेयस मला...?? स्वतःला काय समजतेस...?? घमेंड तर तुझ्यात कुटून कुटून भरलीय, आधी स्वतःकडे बघ..." कबीर सूनवतच होता...

" शट अप... त्यादिवशीची विसरलास वाटतं...? तिथे तेव्हा कोणी नव्हतं पण इथे दिली तर काय इज्जत राहील तुझी...? जरा विचार कर आणि निघ इथून..." तीही ऐकून घेत नव्हती...

" त्यादिवशी जे काही केलंस ना, ते योग्य नव्हतं... तू माझ्याशी असं वागायला मी तुला काहीच केलं नव्हतं..." कबीर आजूबाजूचं भान ठेवून रागातच बोलत होता...

" हात लावलेलास मला आणि मला हात लावायची शिक्षा होती ती... आजवर कोणाची हिंमत नाही झाली, ह्या सुहानी दीक्षितच्या केसालाही धक्का लावायची आणि ज्यांनी प्रयत्न केला ना, त्यांना मी चांगलीच अद्दल घडवलीय... so stay away from me... " ती त्याच्यावर नजर रोखून बोलत होती...

एकीकडे स्टेज वर एकसो एक डान्स परफॉर्मन्स होत होते आणि दुसरीकडे ह्या चुहा बिल्लीची नोक झोक... एकवेळ सुहानीला त्या कार्यक्रमातून निघून जावंसं वाटून गेलं पण तिला काव्याची नाराजगी परवडण्यासारखी नव्हती... त्याच्या अजून नादी न लागता ती दूर उभ्या असलेल्या काव्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली... अखेर त्या कार्यक्रमाची सांगता कबिरच्या परफॉर्मन्सने होणार होती... सगळ्यांनी एकाच जल्लोषात त्याचं स्वागत केलं...

कबीर तिला खुन्नस देतच तिच्यासमोरून स्टेजवर गेला... कराओके ट्रॅक वर त्याने गिटारची तार छेडली... चेहऱ्यावर थोडं हास्य आणत तो बोलू लागला...

"हे लव यू ऑल... अँड धिस सोंग इज डेडीकॅटेड टू माय फ्रेंड पंकज अँड हिज ब्युटीफुल ब्राईड काव्या..."

तो गाणं गाऊ लागला...

🎵🎵तुझसे ही तो मिली है राहत
तू ही तो मेरी है चाहत
तुझसे ही तो जुडी ज़िन्दगी
तेरी यादें हैं कुछ अधूरी
सांस आधी है कुछ है पूरी
आँखों में है कैसी ये नमी
मेरा मन कहने लगा
पास आके ना तू दूर जा
छूने दे होंठ तेरे
ज़रा साँसों में अपनी बसा
आ...🎵🎵 तो डोळे बंद करून सुरांशी मेळ करत गात भले होता पण हळूहळू त्याच्या त्या डोळ्यांसमोर मगाशी पहिल्या नजरेत पाहिलेली सुहानीच येत होती... ती दिसायची तसा तो मटकन डोळे उघडून पुढे गायचा...

आता समोरच तो होता म्हटल्यावर त्याचं गाणं तिला ऐकणं भाग होतं... तसाही तिला त्याच्या गाण्यात काहीएक इंटरेस्ट नव्हता पण त्याच्या आवाजाची जादू होतीच काही निराळी जी हळूहळू सुहानीवर चढत होती, बघता बघता तीही त्याच्या आवाजात गुंतून गेली... त्याचा गोड गळा तिच्या कानावर, तिच्या मनावर एक प्रकारचं संवेदनशील जाळं विणत जात होतं आणि ती ह्यापासून अजाण होती... वो मौसम का जादुही कुछ ऐसा था...

🎵🎵ओ, करम खुदाया है, तुझे मुझसे मिलाया है
तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है
ओ, तेरे संग यारा, खुश रंग बहारा
तू रात दीवानी, मैं ज़र्द सितारा
ओ, तेरे संग यारा, खुश रंग बहारा
मैं तेरा हो जाऊँ जो तू कर दे इशारा🎵🎵

कबिरचा मंत्रमुग्ध करणारा तो सुरीला आवाज नकळत तिला त्याच्या हृदयाकडे खेचत होता... त्याचं गाणं थांबुच नये हेच क्षणभर तिच्या मनात घोळून गेलं... तिच्या रागाचा पारा केव्हाच निवळला होता... आज बऱ्याच दिवसांनी तिला खूप हलकं वाटत होतं... मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं भासत होतं... त्याच्यावर तिची नजर खिळली होती आणि त्यालाही एवढ्या लोकांच्या घोळक्यात तीच उठून दिसत होती... त्याच्या गाण्यांनी तिच्या दुखऱ्या मनावर हळुवारपणे फुंकर घातली होती... गाण ऐकण्यात तल्लीन झालेल्या तिला, तिच्या डोळ्याच्या कडा कधी पाणावल्या हेदेखील कळलं नव्हतं...

कबीर एकसो एक हिट गाणी गात होता... आणि ती वेड्यासारखी त्याच्यात हरवून जात होती...

शेवटच्या गाण्याने त्याने काही लोकांना परफॉर्मन्ससाठी स्टेजवर बोलावलं आणि त्यातच त्याने एक नावं सुहानीचंही घेतलं... तिच्या शेजारी उभ्या असलेल्या काव्याने तिला आपल्या हाताच्या कोपर्याने धक्का देताच ती भानावर आली... पंकज आणि काव्याने जबरदस्तीने तिला स्टेजवर धाडलं... आता मात्र तिची धांदल उडाली... एवढ्या सगळ्यांच्या घोळक्यात ती नकारही देऊ शकली नव्हती...
कबिरने अलगद तिच्या समोर आपला हात केला, तिनेही आजूबाजूला नजर भिरकावत आपला हात त्याच्या हातात दिला... त्याने त्याचा दुसरा हात तिच्या कमरेत घालून तिला थोडं जवळ ओढलं... अनपेक्षित झालेल्या त्या स्पर्शाने खरंतर ती मोहरली... हृदयाची गती वाढू लागली... ती कावरीबावरी का होतेय हे तिचंच तिला समजत नव्हतं... तितक्यात मध्येच वाऱ्याने तिचे केस जणूकाही तिला त्याच्या नजरेपासून लपवायला तिच्या चेहऱ्यावर आले... त्या केसांआडून तिने न राहवून त्याच्याकडे पाहिलं... तो तिची नजर वाचू पाहत होता कारण जेव्हा त्या दिवशी त्याने तिचं मनगट पकडलं तेव्हा तिने त्याच्या मुस्कटीत लगावली होती आणि आज ...? आज त्याविरुद्धच तिच्या नजरेत भाव होते... तिच्या कमरेवर हात ठेवूनही ती काही बोलत नाहीए, हे आठव्या आश्चर्यापेक्षा काही कमी नव्हतं...

🎵🎵 इन्ना सोणा क्यूँ रब ने बनाया
इन्ना सोणा क्यूँ रब ने बनाया
आवाँ जावाँ ते मैं यारा नूँ मनावाँ
आवाँ जावाँ ते मैं यारा नूँ मनावाँ🎵🎵

दोघेही नजरेच्या खेळात ते गाणं अनुभवत होते... तो वाट्टेल तसा तिला त्याच्या बाहुपाशात थिरकवत होता... ती इतकी त्याला संमोहित होईल हे तिचं तिला देखील वाटलं नव्हतं... आपल्या जवळचा कोणीतरी, ज्याचा हवाहवासा वाटणारा स्पर्श, मनाला भारावून टाकणारे त्याचे सूर, त्याच्या नजरेतून नकळत होणारा तो प्रेमाचा वर्षाव तिला आतल्याआत सुखावत होता... दोघांच्याही मनातला राग कुठल्याकुठे पळून गेला होता... गाणं संपताच दोघेही भानावर येत एकमेकांपासून पटकन दूर झाले... टाळ्यांच्या कडकडाट सगळ्यांनीच त्यांचा तो रोमॅंटिक परफॉर्मन्स एन्जॉय केला होता...

घडलेल्या प्रकाराने सुहानीच्या घशाला कोरड पडली होती... तिला स्वतःचीच लाज वाटत होती... त्याच्यासोबत मी डान्स का केला...? ह्या विचारातच ती ड्रिंक्स काउंटरकडे वळली... तिला असं मान खाली घालून जाताना पाहून कबीर अजूनच गोंधळला... " ही नक्की तीच आहे ना...! " असं त्याला उगीच वाटून गेलं...

तो तिच्या बाजूच्याच एका टेबलावर बसून काही जणांशी बोलत होता... पण अधूनमधून तिला न चुकता पाहतही होता... ती मात्र त्याच्याशी नजरानजर होताच स्वतःची नजर चोरून घेत दुसरीकडे बघत होती... त्या रात्री मात्र त्याने तिला कोणतेच प्रश्न केले नव्हते... पण तिच्याशी मात्र बोलायचा प्रयत्न करूनही तिने त्याच्यापासून अंतर ठेवण्यातच शहाणपणाचं समजलं होतं...

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच तिला जाग आली... बाल्कनीत उभी राहून ती समोरचा हिरवागार निसर्ग पाहत होती... आणि तेवढ्यातच शेजारच्या बाल्कनीतून मोठमोठ्याने गाणं गुणगुणत कबीर येऊन, त्याच्या बाल्कनीत उभा राहिला... फक्त बरमोडा घालून तो आळस देतच तिथे येऊन उभा राहिला आणि मान भिरकावून पाहतो तर सुहानी त्याच्या नजरेस पडली... उघड्या पिळदार शरीरयष्टीकडे ती क्षणभर तशीच पाहत राहिली... तिच्या नजरेतले भाव बघून त्याने पटकन आपल्या दोन्ही हातांनी स्वतःचं शरीर झाकून घेतलं... तशी तिने नजर दुसरीकडे वळवली...

" हॅलो... तू इथे काय करतेस...? तू पुन्हा माझा पाठलाग...? " कबीर म्हणाला...

" काहीही... मला काय कुत्रा चावलाय तुझा पाठलाग करायला...?" सुहानीने पण त्याचं आवेगात त्याला उत्तर दिलं...

" चक्क खोटारडी आहेस तू... बघितलंय मी कशी बघत होतीस माझ्याकडे ते...! तुझ्या ह्या ह्या घाणेरड्या डोळ्यांनी माझी इज्जत लुटत होतीस..." कबीर तिच्याकडे हातवारे करून बोलत होता आणि पुन्हा स्वतःचं अंग झाकत होता...

" शीsss...इतके वाईट दिवस नाही आलेत माझे...! तोंड पाहिलंस का आधी स्वतःचं...? आला मोठा... हं😏 "

" हिंमत असेल ना तर इथेच थांबायचं हा..." त्याला असं अंग झाकून बोलताना खूप कष्ट घ्यावे लागत होते... तिला तिथेच थांबायला सांगून तो आत जाऊन tshirt घालून आला आणि तीही तिची हिंमत दाखवायला हाताची घडी घालून तिथेच उभी राहिली...

पुन्हा त्यांच्यामधले वाद चालू झाले... तर अशाप्रकारे भांडणानेच त्यांच्या दिवसाची सुरुवात झाली होती... कबिरला शूटला जायचं असल्या कारणाने त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करत तिथून काढता पाय घेतला...

शुटिंग चा दिवस जरा अवघडच जात होता... सतत ह्या चेटकीनीचा चेहरा का डोळ्यासमोर येतोय हेच त्याला समजत नव्हतं... मध्ये मध्ये त्याचं लक्ष नसल्याने सिन चुकत होते आणि त्यामुळे बरेच रिटेक होत होते... त्याने थोडावेळ ब्रेक घेऊन त्याच्या परमप्रिय मित्राला कॉल केला...

" हॅलो मयंक..."

" हा बोल कबीर... कसा आहेस...? "

" अरे विचारूच नकोस कसा आहे ते...! ती सुरपणखा इथे पण टपकलीय..."

" कोण सुरपणखा...? ओह सुहानी..." मयंकला एक क्षण आठवायला गेलाच...

" हो... " कबिरने त्याला घडलेलं सगळं सविस्तर सांगितलं... तिच्या नजरेतून काल जे काही त्याला जाणवत होतं ते त्याने सगळं मयंकला सांगितलं...

आधी तर हे सगळं ऐकून मयंकला विश्वासच बसत नव्हता... तिने चक्क त्याला हात लावून दिला आणि सोबत डान्स पण केला...? ह्या प्रश्नांनी तोही चक्रावला होता...मग त्याने आपलंच डोकं खाजवत काहीतरी विचार केला... मयंकला कबिरची काळजी होती... पण कबिरने जे सांगितलं होतं त्यात फक्त सुहानीची बाजू होती... खरंतर आग दोनो तरफ बराबर लगी थी, ह्या गोष्टीपासून तो अजाण होता... आता हे सगळं पाहता अति हुशार बुद्धिमतेच्या मयंकने त्याला नको तो सल्ला द्यायला सुरुवात केली...

" अरे, May be तू तिला आवडायला लागला आहेस... "

" काही काय बोलतोस... ती कोणत्याच मुलाला डोळ्यासमोर न धरणारी, तुला वाटतं माझ्या प्रेमात पडलीय...? डोकं ठिकाणावर आहे का तुझं...? " कबीर मयंकलाच बडबडत होता...

" कबीर हे असं बोलून तू स्वतःवरच शंका घेतोयस... अरे , तुझ्यावर फ्लॅट होणाऱ्या मुली काय कमी आहेत का अँड you know very well... त्यात ही एक... हे बघ जे काही तू सांगितलंस म्हणजे बघना, फ्लाईट मध्ये ती तुझ्याशी भांडतच होती, त्यानंतर तुम्ही डायरेक्ट पंकजच्या संगीतला भेटलात, तू तिला इतका त्रास देऊनही तिने पुन्हा तुला काहीच केलं नाही... तू गात होतास तेव्हा तुझ्याकडेच एकटक बघत होती... तुझ्यासोबत डोळ्यात डोळे घालून चक्क डान्सही तिने केला... आणि आज सकाळी तर तुझ्याकडे कोणत्या नजरेने बघत होती हे माझ्या पेक्षा तूच चांगलं अनुभवलंयस... आता हे सगळं पाहता हाच निष्कर्ष निघतो की कुठेतरी तिला तू आवडायला लागला आहेस..." मयंकने जे काही मुद्देसुद मांडलं ते कबिरलाही पटलं होतं...

" अरे पण मी काय करू त्याला...? मला तर रागच येतोय तिचा... शूटिंग पण बोंबलीय तिच्यामुळे... डोकं खराब करून ठेवलंय नुसतं..." तो डोक्याला हात लावून बसला होता...

" कबीर... अरे तुझ्याकडे तर समोरून संधी चालून आलीय... हीच बदला घ्यायची वेळ आहे... तुझा किती अपमान केलाय तिने, विसरलास...? "

" हं... ते कसं विसरू शकतो...?" कबिरला पुन्हा सगळ्या जुन्या गोष्टी आठवू लागल्या... आपसूकच त्याच्या हाताची मूठ घट्ट आवळली गेली...

" हे बघ, आता ती जर तुझ्या आट्यात येतेय तर त्याहून कोणती गोष्ट चांगली असणार आहे तुझ्यासाठी...?? तिची लायकी दाखवायची हीच खरी वेळ आहे... अशा लोकांना प्रेमाने मारायचं..." मयंक कबिरला मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीला आठवून बोलत होता...

" हां रे... मला कसं नाही सुचलं हे... यू आर राईट आणि पटवण्यात तर मी चांगलाच माहीर आहे... तिच्या गर्वाचं घर मी कसं प्रेमाने खाली करतो ते बघच आता... नाही ना तिला सॉरी बोलायला लावलं तर नावाचा कबीर नाही..." डोक्यात राग घालून त्याने तो निर्णय घेतला... बदल्याची भावना किती विचित्र असते, हे ही त्यावेळी त्याच्या लक्षात येत नव्हतं... तिची जिरवण हा एकच विडा त्याने त्यावेळी उचलला होता...

पण म्हणतात ना कर भला तो हो भलं... तुमचं नशीबच तुम्हाला त्या वाटेवर घेऊन जातं... जे काही तुमच्या आयुष्यात लिहिलंय तेच घडणार असतं आणि तेच घडत होतं... त्यादिवशी मात्र कबिरने हसत हसतच ते शुटिंग संपवलं...

कबिरशी सकाळ सकाळ झालेल्या वादामुळे सुहानीची चिडचिड होत होती... दिवसभर ती रूममध्ये एकटीच टाईमपास करत बसली होती... त्यावेळेत तिने राहुल ला कॉल करून आईची चौकशी केली... तिला टेन्शन नको म्हणून त्याने डॉक्टर काय म्हणाले ते सांगितलं नव्हतं... ती आल्यावरच पुढचं डिसीजन घेऊया असा विचार करून तो मोजकच बोलला... रितूलाही फोन करून तिने ऑफिसच्या कामाचा आढावा घेतला होता... सगळं काही ठीकच चाललं होतं...

ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण , संध्याकाळी स्नॅक्स ह्यातच दिवस कसाबसा निघून गेला... त्या दिवसभरच्या वेळेत तिने एक दोनदा बाल्कनीत जाऊन शेजारी राहत असलेल्या कबिरचा आढावाही घेतला होता... तो रूम मध्ये नसल्याची तिला संपूर्ण दिवसात खात्री झालीच होती त्यामुळे तो एकाच दिवसासाठी आला असावा... असा विचार करून ती निर्धास्त झाली....

तो नसल्याची जाणीव असूनही, हळदीच्या कार्यक्रमात तिची नजर त्याला शोधतच होती... पण तो काही दिसत नव्हता... रात्री जेवणं आटपेपर्यंत ती त्याचाच विचार करत होती... त्याच्या येणाऱ्या वायफळ विचारांनी ती स्वतःवरच वैतागत होती...

उद्या लग्न समारंभ पार पडताच रात्रीच्या फ्लाईटने निघायचंय ह्या विचाराने ती बॅग आवरू लागली... सकाळी लवकर उठायचं म्हणून तिने लवकर झोपूनही घेतलं...

कबीर शूटिंग संपवून पहाटे चार च्या सुमारास हॉटेलवर आला... डोळ्यावर झोप होती, थकून भागून तो आपल्या रूममध्ये जातच होता की त्याला सुहानी ची रूम दिसली... ती झोपलीच असणार असा काहीसा विचार करून तो चार पाच वेळा तिच्या दाराची बेल वाजवून स्वतःच्या खोलीत पळाला...

साखरझोपेत असलेली सुहानी कशीबशी उठत दरवाजा उघडून बघत होती पण बाहेर कोणीच नव्हतं... ती आत येऊन पुन्हा बेडवर कलंडली पण आता तिला काही झोप येत नव्हती... शेवटी डोळे चोळत, आळस झटकत ती बाल्कनीत जाऊन उभी राहिली... तेवढ्यात शेजारून तिला हाक ऐकू आली...

" हाय... गुड मॉर्निंग..." कबिरच होता तो...

तीही मंद स्मित देत त्याला " गुड मॉर्निंग " म्हणाली... पण आपण कोणाला विश केलं, हे लक्षात येताच तिला धक्का बसला... तिने पुन्हा डोळे चोळत चोळत खात्री करून घेतली... " कबीर.... नाही... तो कसा असेल...? मला भास होतोय वाटतं..." ती स्वतःच्याच विचारात गढली होती की पुन्हा त्याचे बोल तिच्या कानावर पडले...

" झाली का झोप...? " तो अगदी हसून तिच्याशी बोलत होता... त्याचं ते सौम्य वागणं पाहून तिलाही आश्चर्य वाटलं...
काल सकाळी हाच भांडून गेलेला ना, आणि आता एवढा हसून गुड मॉर्निंग करतोय...? तिच्या कपाळावरच्या आठ्या त्याला बरंच काही सांगत होत्या...

" तू, इथे ...? " ती मोठ्यानेच म्हणाली...

" शूट होतं ना, आत्ता आलो... कॉफी घेणार...?? " तो तिच्या प्रश्नांची खूपच निरागसतेने उत्तरं देत होता... कॉफी विचारून तर त्याने पहिला चौका मारला...

त्याच्यात झालेला आमूलाग्र बदल तिच्यासाठी अनाकलनीय होता... ह्यानेच दरवाजाची बेल वाजवली असणार, मुद्दाम त्रास देतोय मला... पण एवढा चांगल्यापणी कसा काय बोलतोय...? जाऊदे मला काय करायचंय... ती विचार करतच आत निघून गेली पण त्याला मात्र आजचा एक एक क्षण महत्वाचा वाटत होता... आजच्या दिवशी त्याने तिच्याशी फ्रेंड शिप तरी करायचा प्लॅन केलाच होता... पण अजून संपूर्ण दिवस बाकी होता आणि तसही तो दमून आला असल्याने झोपून गेला...

त्याला बघून तिला आनंद झाला होता की दुःख, हे तिचं तिलाही समजत नव्हतं... विचारांच्या चक्रात तिचाही केव्हाचा तरी डोळा लागला... थेट जाग आली ती सकाळी ९ च्या ठोक्याला...

लग्नाचा मंडप सजला होता... नवरा-नवरी एकीकडे लगीन विधी पूर्ण करत होते... तर दुसरीकडे कबीर आणि सुहानी आपापल्या रूम मध्ये आरशासमोर नटायला बराच वेळ घेत होते... काव्याचा निरोप घेऊन एक व्यक्ती सुहानीला मंडपात घेऊन जायला आली होती... आधीच उशीर झाल्याने सुहानी घाईघाईतच निघाली होती... पंकजनेही कबीर आलाय का हे पाहायला मिळालेल्या वेळात त्याला कॉल केला... त्याच्याशी फोनवर बोलतच कबीर रूमच्या बाहेर पडला... दोघंही एकत्रच बाहेर पडले आणि क्षणातच एकमेकांना धडकले...

सुहानीला कबिरचा इतका जोरात धक्का लागला की ती मागच्यामागेच पडणार होती... साडीच्या निऱ्या तिच्या पायात अशा काही घुटमळल्या की तिला स्वतःला सावरणच कठीण होऊन बसलं... तिचा तोल जातोय हे पाहून कबिरने पटकन तिच्या हाताला धरून आपल्या जवळ ओढलं... त्याच्या हाताची पकड इतकी घट्ट होती की ती जराशी विव्हळली... पडण्याच्या भीतीने तिने गच्च मिटून घेतलेले डोळे, तिचा फुलणारा तो श्वास, तिने दोन्ही हातांनी पकडलेले त्याचे भरीव दंड हे सगळं तो एकेक करून गंमतीने बघत होता... तिने अलगद डोळे उघडले... त्याला इतक्या जवळ पाहून तिचं हृदय पुन्हा धडधडू लागलं होतं, त्याचीही अवस्था काही वेगळी नव्हती... लाल रंगाच्या नेटेड एम्ब्रॉयडर साडीत ती खूप सुंदर दिसत होती... तिच्या डोळ्यातल्या काजळामुळे तिचे डोळे त्याला अधिकच बोलके भासत होते... ओठांवर लावलेली ती लाल लिपस्टिक त्यात तो पुन्हा हरवून गेला... कपाळावरची टिकली, कानात झुलणारे झुमके, नाकात छोटीशी डायमंडची नथ तिचं रूप आणखीनच खुलवत होती... तीही त्याच्याकडे अशीच काहीशी बघत राहिली... त्याचे डोळे तिला त्याच्या बाहुपाशातून निघण्याची परवानगी जणू देतच नव्हते... सफेद शर्ट आणि त्यावर काळ कोट घातलेला कबीर, तिच्या नजरेला काहीतरीच भारी वाटत होता... तिला बोलवायला आलेल्या त्या व्यक्तीने सुहानीला हाक मारली तसे दोघही भानावर आले... ती त्याला काही बोलणार तोच तिला शब्दच सुचेनासे झाले होते... त्यामुळे तोही त्याचं हसू थांबवू शकला नव्हता... तिची उडालेली तारांबळ पाहून तो आतल्याआत खुश होत होता... त्याचा कुठेतरी प्रभाव पडतोय हेच त्याला वाटत होतं... पण तिच्यासोबत तोही त्या प्रभावाखाली येत होता ह्याला तो अनभिज्ञ होता...

संपूर्ण लग्न समारंभात त्या दोघांचा नजरेचा खेळ रंगला होता... काहीही करून तिच्याशी आज बोलणं हे त्याच्यासाठी गरजेचं झालं होतं त्यामुळे तो अधूनमधून संधी शोधतच होता... मध्ये मध्ये ती कुठे दिसेनाशी होत होती पण त्यातूनही जेवणाच्या वेळेस त्याला ती भेटली... जेवताना तो तिच्या शेजारीच जाऊन बसला...

पर्वा त्याने तिला डान्स करताना बराच त्रास दिला होता आणि आज सकाळी बेल वाजवून तिची झोपमोडही केली होती... त्रास तर त्याने दिला होता आणि त्याच त्रासाचा बदला सुहानीला पण घ्यायचा होता... ती हे ठरवूनच तिच्या रूममधून लूज मोशनच्या औषधाची बाटली सोबत घेऊन आली होती... तिची ती पूर्वीपासूनचीच सवय होती... कोणी त्रास दिला तर त्या बाटलीने त्या व्यक्तीची हवा काढायची... त्यामुळे कुठे येता जाता हे हत्यार ती स्वतःजवळ नेहमी बाळगून असायची... जेवायला बसलेला कबीर तिच्याशी खोट्या आदरानेच बोलत होता... त्याच्याही डोक्यात तिला भुलवायचा प्लॅन शिजत होता आणि तिच्याही डोक्यात त्याची हवा काढायचा प्लॅन होता... त्यामुळे दोघेही एकमेकांशी हसूनच बोलत होती... अचानक तिला ठसका लागला तसा तो पाण्यासाठी वेटर ला बघत होता पण आजूबाजूला कोणताच वेटर दिसत नसल्याने तो धावतच पाणी आणायला गेला... साहजिकच तिने आजूबाजूला कोणी बघत नाहीए ह्याची खात्री करून त्या बाटलीतलं थोडं औषध त्याच्या भाजीच्या ग्रेव्हीत आणि डाळीत टाकलं आणि पुन्हा खोकण्याचं नाटक करत बसली...

कबिरने तिला पाणी आणून पाजलं... तशी ती थोडी शांत झाली मग पुन्हा दोघ गप्पा करत जेवले... कबिरने बोलण्या बोलण्यात तिच्याशी मैत्रीही केली... " जुने सर्व हेवे दावे विसरून आपण नव्याने सुरुवात करू..." म्हणत त्याने मैत्रीचा हात पुढे केला, तिनेही हसतच सहमती दर्शवली... पण मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं... त्याला असं जेवताना पाहून तिला मज्जाच वाटत होती... आता समजेल, मेरे से पंगा लेने से क्या भूगतना पडता हैं...! ती स्वतःच्या विचारातच हसत होती पण कबिरला वाटत होतं की ती त्याच्याकडे बघून हसतेय... दोघांनाही त्यांचे प्लॅन वर्क होतायत असंच दिसत होतं...

क्रमशः-------------◆

Rate & Review

kirti kharmare

kirti kharmare 2 months ago

Dhanshri Pardeshi
Vanita Khamkae

Vanita Khamkae 2 years ago

Sujata

Sujata 2 years ago

Surekha

Surekha 2 years ago