Pair Your Mine - Part 11 in Marathi Fiction Stories by Pradnya Narkhede books and stories PDF | जोडी तुझी माझी - भाग 11

जोडी तुझी माझी - भाग 11


विवेक आपल्यावर रागावणार तर नाही ना असा विचार तिच्या मनात आला आणि आता तिला आत जायची भीती वाटू लागली.

विवेक ही इकडे गौरवीचाच विचार करत होता, आपल्याला लागलं तर किती कळवळत होती, आपण किती त्रास दिला तिला तरी सुद्धा अजूनही किती प्रेम करते आपल्यावर, आज माझीच चूक असतानाही स्वतःला दोष देत रडत होती गाडी मध्ये, मी किती मूर्ख होतो की हीच प्रेम समजू शकलो नाही, आजपर्यंत कुठलीच मागणी केली नाही की कुठलाच हट्ट धरला नाही तिने आपल्याकडे , ती करू शकली असती कारण हक्काचा नवरा होतो मी तिचा, पण नाही नेहमी समजून घेतलं मला, आणि आज लागलं मला होतं पण अस वाटत होतं की माझ्या पेक्षा जास्त त्रास तिला होतोय. लग्न करून इकडे आणल्यापासून मी हिला कधीच कुठेच घेऊन गेलो नाही तरी तिने काहीच तक्रार केली नाही, स्वतःच्या पायावर उभी होती तरी मी तिला नोकरी सोडून घरात बसवलं पण हिने एकदाही त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली नाही, मी इतका वाईट वागत राहिलो पण तरी तिनी कोणालाच खबर लागू दिली नाही, इतकी कशी समजदार आहे ही आणि किती सहन करते मला. आता ती आली की मी अगदी मनापासून तिची माफी मागतो. चुकलंच माझं , खुप खुप चुकलं. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागलो होतो मी. पण आज चांगलेच डोळे उघडलेे. आता त्याला तिच्याबद्दल थोडी भावनिक ओढ जाणवू लागली.

विवेक ( स्वतःशीच) - कुठे गेली असेल ही, इतका वेळ कसा लागतोय? मला सोडून तर गेली नसेल ना मी एवढा त्रास दिलाय तिला. पण मला जाणवलंय ग आता प्लीज ये लवकर ये , मला सोडून नको जाऊस. आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं.

तेवढ्यात ती ही घाबरत घाबरतच आत येते, त्याच्या डोळ्यांत पाणी बघून पळतच त्याच्या कडे जाते

गौरवी - काय झालं?तु ठीक तर आहे ना? कुठे दुखतय का? मी डॉक्टरांना आणू का बोलावून ?

विवेक - ( हलकेच एक हातानी डोळ्यांच्या कोर पुसत) अग काहीच नाही झालं, मी ठीक आहे, काही दुखत नाहीय, ये ना बस.

गौरवी - मग हे तुझ्या डोळ्यात पाणी?

विवेक - नाही ते असच काहीतरी खुपत होतं डोळ्यात आता झालाय क्लिअर. मी केव्हाची वाट बघतोय तुझी, कुठे गेली होती? मला वाटलं मला एकट्याला हॉस्पिटल मध्ये सोडून तर नाही ना गेली.

गौरवी - नाही रे अशी कशी तुला सोडून जाईल मी , इथेच मंदिरात....

आणि एकदम बोलता बोलता थांबली पटकन जीभ चावली तिनी, आणि विषय बद्दलवायचा म्हणून

गौरवी - ते जाऊ दे , आता कस वाटतंय तुला? त्रास होतोय का? मला प्लीज माफ कर, माझ्याच मुळे झालं हे सगळं.

आणि एकदम तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती खाली बघत आपल्या डोळ्यातलं पाणी घालवण्याचा वायफळ प्रयत्न करत होती. विवेकला कळू नये आपण हळवं झालोय अस तिला वाटत होतं. पण गौरवीची अवस्था त्याच्या लक्षात आली.

त्यानी तिला आवाज दिला तिने त्याच्याकडे बघितलं.

विवेक - जरा माझ्याजवळ बसशील, मला बोलायच आहे तुझ्याशी.

गौरवी - हो म्हणत त्याच्या बेडवर काठाला बसते.

विवेक - मंदिरात देवाकडे माझ्यासाठी प्रार्थना करत होतीस ना, माझा विश्वास नाही आणि मी चिढेल म्हणून सांगायचं टाळत होतीस बरोबर?

ती चमकून त्याच्याकडे बघते आणि परत खाली बघत

गौरवी - हो म्हणजे तसचं, प्लीज रागावू नको आय अम सॉरी.. आणि एक तिरका कटाक्ष त्याच्या कडे टाकते. तो थोडस स्मित करत हसतो आणि तिचा हात त्याच्या दोन्ही हातात पकडतो.

विवेक - नाही ग रागावणार, तू माफी मागून मला आणखी लाजीरवाण नको बनवूस, तू प्लीज माफी नको मागूस ग. खर तर मला आज मनापासून तुझी माफी मागायची आहे. गेल्या 3 महिन्यापासून मी तुझ्यासोबत खरच खूप क्रूर वागलो ना. मला एकदा माफ करशील प्लीज, मी वचन देतो यापुढे मी अस कधीच नाही वागणार. फक्त एकदा माफ कर. मी तसा नाहीय ग पण मलाच कळत नव्हतं मी ... मी.... मी असं... ( त्याला पुढे बोलावल्याच जात नव्हतं पण तरी तो प्रयत्न करत होता)

तिला कळलं की विवेकला बोलायला त्रास होतोय तेवढ्यात. ती पटकन त्याच्या ओठांवर आपलं बोट ठेवते

गौरवी - ठीक आहे जे झालं ते झालं मला त्याच स्पष्टीकरण नकोय, मी समजू शकते वर्क लोड आणि त्याचा ताण त्यामुळे तुला चिडचिड होत असावी. पण....

बोलता बोलता ती थांबली.

विवेक - पण काय? प्लीज बोल. इतकं समजून घेत राहिलिस मला पण कधी तक्रार नाही केलीस , काही तक्रार असेल ती ही बोल. बोल ना

गौरवी - तक्रार नाही रे काही , पण जे वागलास त्यापेक्षा एक मैत्रिणीसारखं माझ्यासोबत बोलून बघितलं असतं तर कदाचित आपण दोघांनी मिळून त्यातून मार्ग काढला असता एवढंच. पण ठीक आहे आता तुलाही तुझी चूक कळली आहे ना, आता यापुढे बोलुन बघशील.

त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तिने त्याच्याकडे बघितलं त्याला अस बघून तिचेही डोळे पाण्याने डबडबले होते. आणि तिने त्याला कडकडून मिठी मारली. त्यानीही तिला आपल्या बाहुपाशात सामावून घेतलं. तेवढ्यात डॉक्टर आलेत. आणि ते लगेच वेगळे झाले.

डॉक्टर - कस वाटतंय आता?
विवेक - छान वाटतंय.
डॉक्टर ( मस्करीत) - हो छान तर वाटणारच ना बायकोने मिठी मारली.
विवेक आणि गौरवी दोघेही लाजले.
डॉक्टर - तस तुम्ही फार नशीबवान आहात बरं का खूप काळजी करणारी आणि प्रेम करणारी बायको मिळाली आहे तुम्हाला. तुम्ही बेशुद्ध होता पण तुमची बायको रात्रभर तुमच्या उशाशी बसून देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना करत होती.
डॉक्टरांनी अस सांगताच विवेकने तिच्याकडे बघितलं आणि तीने लाजून तिची मान खाली घातली.

डॉक्टर - ठीक आहे तस तर तुम्ही आता ठीक आहेत पण आजच्या दिवस तरी तुम्हाला इथेच थांबावं लागेल निरीक्षणाखाली. उद्या रिपोर्ट्स आले की त्यानुसार तुम्हाला सुटी देऊ.

एवढं सांगून डॉक्टर निघून गेले.

--------------------------------------
क्रमशः

Rate & Review

Jyotsna

Jyotsna 2 years ago

Dilip Yeole

Dilip Yeole 3 years ago

man

man 3 years ago

Sonali Nikam

Sonali Nikam 3 years ago

Vrushali

Vrushali 3 years ago