Jodi Tujhi majhi - 24 in Marathi Fiction Stories by Pradnya Narkhede books and stories PDF | जोडी तुझी माझी - भाग 24

जोडी तुझी माझी - भाग 24




संदीपला त्याच्या मित्राची स्थिती कळते आणि तो मनापासून त्याला मदत करायची म्हणून प्रयत्न करतो.. गौरवी निघून गेल्यावर संदीप एकदा विवेक कडे सहज म्हणून एक फेरी घालून येतो , काकाकाकूंना भेटायला आलो असा बहाणा बनवून तो घरात शिरतो, घरात कुठेच गौरवी दिसत नाही... चहा पाणी घेऊन तो लगेच निघतो..

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रुपाली ऑफिसमधून येत असताना रस्त्यात एक ठिकाणी तो तिला बघतो , तो तिला लगेच ओळखून रुपलीच्या मागे जातो.. रुपलीला थांबवत..

संदीप - हॅलो, मी संदीप , विवेकचा मित्र.. तुम्ही गौरवी वहिनीच्या मैत्रीण आहेत ना?

रुपाली - हो , तुम्ही माझा पाठलाग का करताहेत आणि तुम्हाला कस माहिती की मी तिची मैत्रीण आहे ते?

संदीप - मी काल तुम्हाला आणि वहिनीला सोबत बघितलं म्हणून... आणि पाठलाग नव्हतो करत मी, खर तर मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं... विवेक आणि गौरवी बद्दल...

रुपाली - हं बोला...

संदीप - अस रस्त्यावर? चहा कॉफी घेता घेता बोलता येईल का? इथे जवळच कॉफी शॉप आहे तिथे बसूयात थोडं..

रुपाली - अम्म्म... ठीक आहे चला...

दोघेही बोलत बोलतच कॉफी house मध्ये येतात... कॉफी ऑर्डर करतात... आणि संदीप विषयाला हात घालतो..

संदीप - गौरवी वहिणीबद्दल काही विचारलं तर तुम्ही मला सांगाल का?

रुपाली - सांगता येण्यासारख असलं तर नक्कीच सांगेल..

संदीप - मला वाटत वहिनिने तुम्हाला सगळं सांगितलं असेलच...

रुपाली - हो तुमचा मित्र, किती विश्वासघाती आहे ते सविस्तर सांगितलं मला तिने, आणि आता तुम्ही काय बोलायला आला आहात? तुमच्या मित्राची बाजू मांडायला आला आहात का?

संदीप - नाही नाही तो चुकला आहे तर मी त्याला बरोबर म्हणणारच नाही.. पण वहिनी बद्दल थोडी काळजी वाटली म्हणून... त्या इकडे आल्यात त्यांनी विवेकला सांगितलं नाहीये, त्याला माहितीच नव्हते की वहिनी इकडे आहे , त्यादिवशी मी वहिनी आणि तुम्हाला बघितलं मार्ट मध्ये, मला वाटलं विवेक पण असेल म्हणून मी त्याला फोन केला तेव्हा मला सगळं कळलं.. मी वहिनीला शोधायला विवेकच्या घरी जाऊन आलो पण तिथे ती नव्हती, आणि विवेकच्या म्हणण्यानुसार ती तिच्या माहेरी सुद्धा नसावी, मला फक्त एवढंच विचारायच आहे की वहिनी कुठे राहतेय? तुम्हाला माहिती आहे का? आणि इथे येऊन अस घरच्यापासून दूर का राहतेय??

रुपाली - झालं का तुमचं आता मी बोलू?

संदीप - अ... हो प्लीज...

रुपाली - गौरवी माझ्यासोबत राहते, तुमचा मित्र कितीही कसाही वागला तरी गौरवी मात्र तिच्या घरच्यांनाच काय पण विवेकच्या घरच्यांनाही कळू नये काही, नाहीतर ते उगाच दुखावतील, म्हणून माझ्याकडे राहतेय... तुमच्या मित्रांनी तिचा विचार नाही केला पण विवेक जीजूची छवी तिच्या माहेरी खराब होऊ नये तिच्या बाबांनी जीजू ला किंवा त्यांच्या घरच्यांना काही बोलू नये संबंध खराब होऊ नयेत म्हणून ती शांत आहे चूप आहे आणि माझ्याकडे राहतेय...

संदीप - अस किती दिवस चालणार, कधीतरी तर माहिती होईलच ना?

रुपाली - हो मी ही तिला तेच म्हंटल पण ती वेडी भोळी बसली आहे तुमच्या मित्राची वाट बघत... मनात राग आहे पण खूप प्रेमही आहे, थोडावेळ गेला की होईल सगळं ठीक अस तिला वाटतं, पण तरी भीती पण वाटते की जीजू तिला शोधतील ना की परत जातील त्याच्या गर्लफ्रेंड कडे... तरी वेड्यासारखी रोज वाट पाहते, की जीजू येतील आणि तिला सॉरी म्हणतील आणि ही त्यांना माफ करेल... वेडी आहे ती... इतकं सगळं झाल्यावरही असा विचार करते .. आता तुम्ही माझ्याशी बोलून झाल्यावर तुमच्या मित्राशी बोलणारच ना नक्की, तर सांगा त्यांना की काय गमावलं आहे त्यांनी...

संदीप - हो, त्यालाही कळलं आहे ते त्याला जाणीव झाली आहे त्याच्या चुकीची, गौरावी वहिनीला भेटायला खूप अधीर झाला आहे तो ही.. मी सांगितल्यावर लगेच येईल बघा त्यांना परत न्यायला...

रुपाली - परत न्यायला?? परत गौरवी जाईल का त्यांच्यासोबत? नाही मी तिला नाही जाऊ देणार अजिबात नाही... आधीच तिकडे नेऊन त्यांनी खूप अत्याचार केलेत तिच्यावर , परत आणखी काही केलं तर ,... मी नाही हा तिला नेऊ देणार अजिबात.. तुमच्या मित्राला सांगा माझा निरोप जर खरोखर पच्छाताप होत असेल तर तुमचं तिकडेच सगळं आवरून इकडे ट्रान्सफर घ्या म्हणावं... तिच आधीच जीवन तिला परत करा म्हणावं तर त्यांच्या पच्चातापला अर्थ आहे ... गौरवी भोळी असेल पण आता मी कायम सोबत असेल तिच्या खूप फायदा घेतला तुमच्या मित्रांनी तिचा आता बस झालं...

संदीप - अ ... प्लीज शांत व्हा, त्या दोघांचा निर्णय त्यांचा त्यांच्यावर सोडावा अस नाही का वाटत तुम्हाला, म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की नवरा बायको मध्ये आपण बोलणार कोण ना!!

रुपाली - अगदी बरोबर आहे तुमचं, पण जर गौरवी आणि जीजू सोबत असते तर मी नसतेच बोलले, पण आता ती माझ्यासोबत राहतेय मी रोज तिची अवस्था बघतेय, जिजुनी जो विश्वासघात केली त्यामुळे तुटून गेलीय ती, माझी हसती खेळती मैत्रीण, अगदी शांत होऊन गेलीय निरस होऊन गेलीय ती आणि मी तिची मैत्रीन आहे, म्हणून मी तर बोलणार, मला नाही बघवत तिला अस...

संदीप - बरं जशी तुमची इच्छा.... तुमच्या एवढी धीट असती ना वहिनी तर विवेक आधीच सुधारला असता... असो..

रुपाली - हम्म, बोलून झालं असेल तर निघायचं का?

संदीप - अ .. हो निघुयात...

एक मिनिट एक विचारायचं होतं

रुपाली - हं बोला...

संदीप - यदा कदाचित जर विवेक आणि वहिनीला परत एकत्र आणायला मदत लागली तर तुम्ही साथ द्याल का?

रुपाली - खर तर दिलीच नसती, पण गौरवी वेडी आहे जिजुच्या प्रेमासाठी, त्यामुळे देईल मी...

संदीप -धन्यवाद...

आणि दोघेही निघून जातात...

आज गौरवीच interview होतो आणि खूप छान गेला असतो म्हणून ती बराच वेलची रुपलीची वाट बघत असते, पण नेमकं रुपलीला आज उशीर होत असतो, तिला थो6डी काळजी थोडा राग अस तिच्या मनाची चलबिचल सुरू असते, तेवढ्यात रुपाली येते आणि खूप दिवसांनंतर गौरवी खूप खुश होऊन रुपलीला मिठी मारते... आणि जे जे झालं ते सांगायला लागते... तिला अस बघून रुपलीला खूप छान वाटतं.. दोघीही आज गौरावीला परत नोकरी मिळल्याबद्दल घरच्याघरीच celebrate करतात..

इकडे घरी पोचून संदीप विवेकला फोन करतो आणि जे झालं ते सगळं सविस्तर विवेकला सांगतो....

---------------–---------------------------------------------

Rate & Review

Dilip Yeole

Dilip Yeole 3 years ago

man

man 3 years ago

Sonali Nikam

Sonali Nikam 3 years ago

Arati

Arati 3 years ago

Nanda Madhave

Nanda Madhave 3 years ago