Jodi Tujhi majhi - 25 in Marathi Fiction Stories by Pradnya Narkhede books and stories PDF | जोडी तुझी माझी - भाग 25

जोडी तुझी माझी - भाग 25



गौरवी तिच्या मैत्रिणीकडे आहे आणि सुखरूप आहे. हे कळल्यावर विवेकची काळजी कमी झाली.... पण त्याच्यासमोर आणखी एक कसोटी उभी होती ती म्हणजे इथलं सगळं आवराआवर करून लवकरात लवकर भारतात परतायची आणि गौरावीला माफी मागायची... इथे पर्मनंट ट्रान्सफर घेतलेली असल्यामुळे त्याला पुन्हा बदली करून घेणं अवघड जाणार होतं... आणि तिथे जाऊनही गौरवीची मनधरणी करायची होती... पण तो आता तयार होता... गौरावीला परत मिळवण्यासाठी तो काहीही करायला तयार होता...

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन त्याने लगेच बदलीच अर्ज केला पण लगेच बदली मिळणं शक्य नव्हतं, बदलीला किमान 2 महिने तरी लागणार होते आणि इथल्या प्रोजेक्टची जबाबदारी पूर्ण विवेकवर होती... पण 2 महिने आणखी थांबून गौरावीपासून दूर राहणं त्याला जमणार नव्हतं, म्हणून तो 4 दिवसाची रजा टाकून भारतात आला. ती रजा त्यानी कशी मिळवली हे त्यालाच ठाऊक.. आणि संदीपला कॉल करून सरळ संदीपकडे गेला..

त्याने गौरावीला बरेच फोन करून बघितले पण तिने एकही फोन घेतला नव्हता..कशी घेणार एक तर तिचा राग अजून निवळला नव्हता आणि आजपासून तिला ऑफिस जॉईन करायचं होतं....विवेकच्या आठवणींत तीही खूप झुरत होतीच पण सद्धे त्याला माफ करायची तिची इच्छा नव्हती...

त्याने तिच्या मैत्रिणीला फोन करायचा ठरवलं, पण ती कुठल्या मैत्रिणीकडे आहे हे पण त्याला माहिती नव्हतं, तसं गौरवीच्या जास्त मैत्रिणी नव्हत्याच, पण विवेकने कधीच प्रयत्न ही केला नव्हता हे माहिती करून घेण्याचा की तिची जवळची मैत्रीण कोण आहे.. आणि साहजिकच तीच्या मैत्रिणीचा फोन नंबर याच्याकडे नव्हता... मग आता काय?? संदीपही त्याच्यासारखाच वेंधळा त्यादिवशी भेटून साधं नाव सुद्धा विचारलं नाही त्यानी... विवेक आणखीच बेचैन झाला, रडकुंडीला आला होता... स्वतःचाच राग राग करत होता... थोडावेळ शांत बसून विवेक पुन्हा गौरविचाच फोन लावून बघुयात म्हणून फोन हातात घेतला तर त्यात एक नोटिफिकेशन येऊन पडलं होतं... सोशल मीडिया च्या एका app च नोटिफिकेशन होत ते.. ते बघून विवेकची कळीच खुलली... सोशल मीडिया वर रुपलीने गौरवीचा आणि तिचा जॉब मिळाल्याचं सेलेब्रशन करतानाच एक फोटो पोस्ट केला तशी कंमेंटही दिली आणि त्यात गौरावीला टॅग केलं.. विवेक गौरवी फ्रेंड्स आल्यामुळे त्याला त्याच्या सोशल मीडिया वर तो फोटो दिसला आणि विवेकला तिला शोधण्याचा एक धागा मिळाला... त्यात त्यांनी बघितली की गौरावीला पुन्हा नोकरी मिळालीय, हे बघून तो खुश झाला.. 'एक चूक सुधारली' असा विचार त्याच्या मनात आला. पण त्याच बरोबर आता गौरवी आपल्याबरोबर येणार नाही हे ही त्याला कळलं. पण ठीक आहे आधी बोलूयात तर खरं म्हणून तो पुढच्या तयारीला लागला.

आता गौरवीच्या मैत्रिणीचं नाव त्याला माहिती झालं आणि नंबर त्याने गौरवीच्या आईकडून मिळवला.. आणि तडक रुपलीला फोन केला ,

विवेक - हॅलो, रुपाली???

रुपाली - हो बोलतेय, आपण कोण?

विवेक - मी विवेक बोलतोय, तुझयाशी जरा बोलायचं होत, गौरवीच्या संदर्भात..

रुपाली - वाह जीजू, तिने फोन नाही उचलला म्हणून मला फोन केला, हम्म बोला..

विवेक - रुपाली मी खरच खूप दिलगीर आहे ग, खूप पच्छताप होतोय मला माझ्या वागण्याचा, फक्त एकदा मला गौरवीने माफी मागायचा तरी चान्स द्यावा एवढीच विनंती आहे माझी तिला, नंतर ती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल.. तू प्लीज माझी थोडीशी मदत करशील का?

रुपाली - काय मदत हवी आहे तुम्हाला?

विवेक - मला तिला एकदा भेटायचंय, तू तिला माझ्याशी बोलायला तयार करशील का? ती खूप चिढली आहे ग माझ्यावर...

रुपाली - भेटायचंय? म्हणजे ? तुम्ही आलात का इकडे? एवढ्या लवकर...

विवेक - हो मी आलोय इकडे फक्त तिला भेटायला..

रुपाली - अच्छा, जीजू ती चिढणार नाहीतर काय करेल तिच्या ठिकाणी तुम्ही स्वतःला ठेऊन बघा एकदा... राहिला प्रश्न तुमच्याशी बोलण्यासाठी तयार करायचा तर मी तिच्याशी बोलून बघेल पण कुठलीच जबरदस्ती मी तिला करणार नाही तो सर्वस्वी तिचा निर्णय असेल...

विवेक - ती वागतेय ते चुकीचं आहे म्हणतच नाहीय ग मी तिच्या ठिकाणी मी असतो तर मलाच माहिती नाही मी कसा वागलो असतो, त्यामानाने ती खूप शांत आहे, पण माझा विचार पण करून बघ ना ग किती तरी रात्री गेल्यात झोप नाही, कुठेच लक्ष लागत नाहीय, खूप अपराधी वाटतंय, अस वाटतंय सगळं काही सूटत चाललंय पण मला काहीच सावरता येत नाहीय, कधी कधी तर वाटत जर गौरवी नाहीतर मी तरी का आहे, आजच संपवाव सगळं आणि मोकळं व्हावं या सर्व अपराधातून .. पण तिची माफी मागितल्या शिवाय तिथेही शांत वाटणार नाही मला..
विवेक बोलता बोलता कधी भावुक होऊन रडायला लागला त्यालाही कळलं नाही... पुन्हा स्वतःला सावरत...
विवेक - तू म्हणशील तसं ... फक्त तिला सांग मी इकडे आलोय तिला भेटायला..

रुपाली - ठीक आहे जीजू मी सांगते तिला... तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल, तिला नवीन जॉब मिळालाय, आज तिचा पहिला दिवस होता...

विवेक - तुझ्या स्टेटस वरून कळलं मला... मी वाट पाहतोय तुझ्या फोनची ती काय म्हणते मला नक्की सांग...

रुपाली - हो सांगते..
म्हणून फोन ठेऊन देते... आणि आपलं काम करत बसते... ऑफिस सुटल्यावर त्या दोघीही घरी जायला निघतात.. गौरवी बिल्डिंगच्या खाली गेट जवळ उभी असते आणि रुपाली गाडी काढत असते.. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला समोर एक साधारण हॉटेल असतं आणि त्या हॉटेल मध्ये थोडं बाहेरच्या बाजूने दोघे मित्र बसलेलले असतात , गौरवी रुपलीची वाट बघत इकडे तिकडे बघत असते तेवढ्यात तिची नजर हॉटेलमधल्या त्या दोघांवर पडते, त्यातला एक माणूस गौरावीला ओळखीचा वाटतो, म्हणून ती जरा आणखी निरखून बघते तर तो विवेक असतो, चेहऱ्यावरून खूप थकलेला, तब्येत जरा उतरलेली त्यामुळे तिला त्याला ओळखायला थोडा वेळ जातो, पण त्याला इथे बघून तीच डोकं सुन्न पडतं, तिला काहीच सुचत नाही, त्याला बघून ती जरा हळवी होते आणि वाऱ्याच्या वेगाने सुसाट रस्त्यावर त्याच्याकडे धावत सुटते, इकडे तिकडे काहीही न बघता ती रस्त्याच्या मधोमध येते आणि एक गाडी तिला धडकते...

--------------------------------------------

Rate & Review

Priyanka Padwal

Priyanka Padwal 2 years ago

khup chan pratek part madhe sanpence ahe त्यामुळे वाचायला खूप छान वाटते

Dilip Yeole

Dilip Yeole 3 years ago

man

man 3 years ago

स्वाती जगताप
Nanda Madhave

Nanda Madhave 3 years ago