Jodi Tujhi majhi - 37 in Marathi Fiction Stories by Pradnya Narkhede books and stories PDF | जोडी तुझी माझी - भाग 37

जोडी तुझी माझी - भाग 37

विवेकला आता खूप टेन्शन आलं उद्याच सांगायचं म्हणजे , आणि खरच मी आता सांगून गेलो तर तिकडून आल्यावर सगळे शांत झालेले असतील का?? गौरवी म्हणते तस माझ्यावरच राग गेलेला असेल का ?? काय करू ? मी इथे असतांना सांगितल तर मला रोज त्या रागाला सामोरं तर जावं लागेल पण मी त्यांना मनवण्याचा प्रयत्न तर करू शकेल तिकडे निघून गेल्यावर फोनवरून मी काय बोलणार आहे?? पण नाही सांगितलं तर गौरवी तिला उगाच त्रास होत राहील.. काय करू??? गौरवी राहील उद्या सोबत सांगताना अस करतो देतो सांगून माझी मन हलकं होईल.. हम्मम

कितीतरी वेळ असाच काहीतरी विचार करत विवेक बसला होता त्याला झोप येतच नव्हती.. बऱ्याच उशिरा केव्हातरी त्याला झोप लागली..

इकडे गौरवी ची हि तीच अवस्था होती.. ती तिच्या विवेक सोबत घालवलेले गोड क्षण आठवत होती... पण गोड क्षणांबरोबर कटू आठवणी ही जुळलेल्या होत्याच..

गौरवी ऑफिसमधून जर लवकरच घरी आली तेव्हा सगळे तीचीच वाट बघत बसलेले होते .. आई सगळ्यांना सरबत देत होती.. सगळ्यांना एकत्र बघून नेहमी आनंद होणाऱ्या गौरवी च्या काळजात मात्र आज त्यांना बघून धस्स झालं.. पण तिला आलेलं बघून विवेकच्या पडलेल्या चेहऱ्यावर थोडंसं समाधान आलं.. त्याला सगळं सांगताना ती हवीच होती...

गौ आई - ये बाळा आम्ही सगळे तुझीच वाट बघत होतो, आज विवेकला काहीतरी सांगायचं आहे, तू पटकन जाऊन फ्रेश होऊन ये मी तुझ्यासाठी सरबत आणते मग आपण ऐकूयात..

गौरवी - फक्त हो एवढंच बोलली..

ती फ्रेश होऊन आली.. आणि विवेकने आपला गुन्हा कबुल करायला सुरुवात केली..

विवेक - आई बाबा मी सगळ्यांची आधी माफी मागतो.. मी खूप मोठी चूक, चूक कसली गुन्हाच केलाय.. पण आता मला त्या चुकीची जाणीव झालीय आणि खुप पच्छताप होतोय.. म्हणून मी ती चूक सुधारायची ठरवलंय आणि त्याचाच प्रयत्न करतोय, म्हणून आज सगळं काही तुमच्यापुढे कबुल करणार आहे.. गौरवी अशी निघून आली, नंतर घरी ना येता मैत्रिणी कडे का राहिली आणि आमच्यात काय झालं नेमकं असे बरेच प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडलेले आहेत ना... तुम्ही आमचे पालक असल्यामुळे तुम्हाला सगळं जाणून घेण्याचा तो अधिकारही आहे.. म्हणून आज जाण्या आधी मी तुमच्याशी बोलून जायच ठरवलंय.. कदाचित यानंतर तुम्हाला सगळ्यांना माझा प्रचंड राग येईल ... म्हणून मी आधीच माफी मागतोय... माझी एकच विनंती आहे खूप हिम्मत एकवटून मी आज बोलतोय, माझं पूर्ण बोलून झाल्यानंतर आपण आपली प्रतिक्रिया द्यावी...

तो एक नजर गौरवी कडे टाकतो, ती नजर खाली करून बसलेली असते आणि ऐकत असते.. पुढे तो बोलू लागतो..

आमच्या लग्नाआधी मी एका मुली मध्ये गुंतलो होतो आयशा नाव होतं तिचं.. ........................... आणि विवेक आता भारतात येईपर्यंतच सगळं काही जसच्या तस त्यांना सांगतो.. माझ्यामुळे गौरावीला खूप त्रास झालाय म्हणून मी तिची माफी मागीतली पण आपली फसवणूक झाल्यावर माफी देणं इतकं सोपं नाही मलाही माहिती आहे म्हणून तिने तिचा निर्णय घेतला आहे.. आणि साहजिकच म्हणा किंवा नाईलाजाने मला तो मान्य करावाच लागणार होता...

त्याच्या डोळ्यात पच्छताप आणि आसवं असतात.. बाकी सगळ्यांच्या डोळ्यात राग आणि प्रश्नार्थक चिन्ह असतं.. गौरवीच्या बाबांच्या डोळ्यात मात्र काहीतरी वेगळेच भाव असतात जे गौरवीला कळतच नाहीत आणि गौरवी च्या डोळ्यात काळजी..

गौरवी च्या बाबांनी गौरवीकडे बघितलं ती त्यांच्याच कडे काळजीने बघत होती त्यांचा राग आता अनावर होईल तर त्यांना कस सावरायच याची काळजी तिला वाटत होती.. गौरवीचे बाबा उठणारच तेवढ्यात विवेकचे बाबा उठले आणि त्यांनी एक सणसणीत विवेकच्या कानाखाली वाजवली.. ते बघून सगळे एकदम उभे राहिले.. आणि विवेक गाल चोळत डोळ्यात पाणी घेऊन जमिनीला नजर खिळवून उभा होता..

खरं तर गौ. बाबा किंवा वि. आई अस काही करू शकतात अस वाटलं होतं पण आधीचा रेकॉर्ड बघता विवेकच्या बाबांकडून ही प्रतिक्रिया सर्वांनाच अनपेक्षित होती.. राग सर्वांनाच आला होता.. पण आता सर्वांना रागासोबत काळजीही वाटत होती..

वि. बाबा - एवढं सगळं वागताना करताना लाज नाही वाटली का रे?? असे संस्कार दिलेत आम्ही??? कुठे कमी पडलो होतो का?? लग्नाआधी हजारदा विचारलं तुला तुझ्या मनात कुणी आहे का तेव्हा का नाही सांगितलं हे सगळं तुझं पुराण?? गौरवीने काय बिघडवलं होतं रे तुझं?? आज मला पच्छताप होतोय की मी तुझ्यासारख्या नालायक मुलासाठी गौरवी सारखी समजूतदार मुलगी निवडली.. तिने समजूनच घेतलं ना नेहमी तुला म्हणून तू तिचा फायदा घेतला.. आणि आज तिच्याकडून तू माफीची अपेक्षा करतोय??? अरे तिने तुझ्यासोबत राहायचं तर दूरच राहील पण तुझ्याकडे बघायलाही नको.. गौरवीचा जो काही निर्णय असेल पण आजपासून तू माझा कुणीच नाही..

चढ्या आवाजात एवढं सगळं एक श्वासात बोलून ते घराबाहेर निघून गेले.. सगळे त्यांच्या कडेच बघत होते.. गौ बाबा त्यांच्या कडे जाणार तोच गौरवी ने त्यांना थांबविलं आणि स्वतः त्यांच्या मागे गेली.. ते गार्डन मध्ये घराकडे पाठ करून उभे होते.. गौरवी त्यांच्या जवळ गेली.. आणि पाठी मागूनच तिने त्यांना हाक मारली..

गौरवी - बाबा, तुमची हरकत नसेल तर मी बोलू शकते का??

विवेंकच्या बाबांच्या डोळयांच्या कडा पणावल्या होत्या त्या पुसतच ते गौरविकडे वळले..

वि बाबा - मला माफ कर बाळा, नकळत मी ही तुझा गुन्हेगार आहे.. मला खरच नव्हतं माहिती विवेकच अस काही असेल आणि आम्ही तर नेहमी त्याला स्त्रियांचा आदर करायचं शिकवलं पण आदर तर दूर पण त्यांनी छळ केला ?? आज कुणी दुसऱ्यानी मला सांगितलं असत ना हे सगळं तर मी कदाचित विश्वासच करू शकलो नसतो पण त्यानीच सगळं कबुल केलाय म्हंटल्यावर..... कुठे तरी कमी पडलो आम्ही पालकत्व करण्यात त्याला चांगले संस्कार घालण्यात... आज तुझ्या पुढे उभं राहतानाही खूप लाजिरवाण वाटतेय..

गौरवी - बाबा सर्वात आधी तर तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका तुम्ही कुठेच नाही चुकलात... बाबा मुलांना संस्कार आई वडील देतात पण ते संस्कार मुलांनी किती पाळायचे हे त्यांच्यावर असते.. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका.. आणि शांत व्हा बाबा.. तुमच्यासाठी असा राग बरा नाही.. तुमच्या तब्येतीवर असर होऊ शकतो.. आणि अस तुम्ही अचानक आपल्या मुलाशी संबंध तोडून टाकणं योग्य आहे का?? तुम्ही कितीही नाही म्हंटल तरी तो तुमचाच मुलगा राहणार आहे.. हा पर्याय नाही बाबा.. रागात निर्णय घेऊ नका प्लीज... घरात चला ना मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचंय.. तुम्हाला माझा निर्णय नाही का ऐकायचा??

वि बाबा - किती समजूतदार आहेत तू.. पण मी विवेकला माफ नाही करणार.. तू सुनेपेक्षा जास्त मुलगी आहेस माझी आणि माझ्या मुलीबरोबर अस झालं असत तर मी नक्कीच सहन नसत केलं खरतर माझ्या मुलीला त्याच्या बरोबर राहायला पण मनाई च केली असती.. पण तुला काय बोलू बाळा.. तुझा जो काही निर्णय असेल त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल.. चल घरात सांग तुझा निर्णय ..

क्रमशः

Rate & Review

स्वाती जगताप
Megha Joshi

Megha Joshi 3 years ago

man

man 3 years ago

Aboli

Aboli 3 years ago

waiting for next part

Manali Sawant

Manali Sawant 3 years ago