Jodi Tujhi majhi - 45 in Marathi Fiction Stories by Pradnya Narkhede books and stories PDF | जोडी तुझी माझी - भाग 45

जोडी तुझी माझी - भाग 45



असेच दिवसामागून दिवस जात होते विवेक आणि गौरवी कामात गुंतलेले होते.. आता त्यांच्यात कुठलाच गैरसमज नव्हता आणि सृष्टी पण आता व्यवस्थितच वागत हाती.. दोघांचही ऑफिस काम घर अस सुरू होत.. एक रविवारी गौरवी विवेकच्या आईवडिलांना भेटून आली..

काही दिवसांनी विवेक आणि संदीप भेटतात.. बऱ्याच वेळा गप्पा केल्यानंतर
विवेक - संदीप, तू काही लपवतोयस का माझ्यापासून??

संदीप - नाही तर, का रे??

विवेक - नाही आज मला तस जाणवतंय की तू काही तरी लपवतोयस..

संदीप - नाही रे , मी काही लपवत नाहीय, खर तर मी तुला आज काही सांगणार आहे, पण कस सांगू हा विचार करतोय..

विवेक - एवढा काय विचार करतोय, बोल बिनधास्त....

अरे बोल..

संदीप - अ.. विवेक... विवेक ... मी लग्न करतोय...

विवेक - काय?? अरे वाह .. पण कुणाशी?? आणि कधी?? मला बोलावणार आहे का??

संदीप - श्वास घे ना जरा, सांगतोय ना..

अ .. गौरवी वहिनीची मैत्रीण रुपालीला ओळखतो ना तू..

विवेक - (काही माहीत नसल्या सारखं) हो ओळखतो तिच्याशी लग्न करतोय का??

संदीप - अ.. हो..

विवेक - अरे वाह .. म्हणजे ओळख माझ्यामुळे झाली आणि माझ्यापासूनंच लपवलं.. वाह वाह.. चल आता पटापट बोल.. केव्हा, कुठे ,कस तुमचं भेटन, बोलण प्रेम वगैरे झालं आणि लग्न म्हंटल्यानंतर मॅटर कुठपर्यंत आलं विचारायची तर गरजच नाही, घरी कळवलंय का तुमच्या??

संदीप - सांगतोय ना जर धीर धर.. मला आणि रुपालीला तुला आणि गौरवी वहिनी दोघांना पण सोबत सांगायचंय तेव्हा आपण कुठे बाहेर जायचा प्लॅन करायचा का?? म्हणजे आपल्याला सोबत राहत येईल आणि आम्हाला तुम्हा दोघांना आमची स्टोरी सांगता येईल.. ते काय आहे ना.. तुला वेगळं आणि मग गौरवी वहिनीला वेगळं , परत परत कशाला?? त्यापेक्षा तुम्हा दोघांना सोबतच सांगु..

विवेक - मला चालेल पण गौरवीला तू किंवा रुपाली विचारा.. मी नाही हा विचारणार..

संदीप - बरं , ठीक आहे.. तू तयार आहेस ना पण

विवेक - हो मी तयार आहे..

संदीप - चालेल मग सांगतो तुला आजच.. कधी जायचं आणि कुठे ते.. चल मग येतो मी बाय.. अजून रुपलीला पण भेटायचं आहे.. ओरडायची नाहीतर..

विवेक - हो हो जा जा आता काय तू माझा मित्र राहिलास, आता काय रुपाली, रुपाली...

संदीप - गप्प रे , नौटंकी ... बाय , भेटू लवकरच..

आणि तो निघून जातो.. रुपलीला भेटून सांगतो की

संदीप - आपल्याला आज गौरवी आणि विवेकला सगळं सांगायचं आहे.. तू तिला बोलावं विवेक येणारच आहे..

त्यांनी भेटण्याची जागा आणि वेळ ठरवली आणि तस विवेक आणि गौरावीला सांगितलं.. गौरवीणेही कुठलेच आढे वेढे ना घेता मी येते अस सांगितलं.. सगळे संध्याकाळी एका रेस्टो मध्ये भेटलेत जेवण आणि गप्पा असा त्यांचा बेत होता.. एक एकांतातला चार खुर्च्या असलेला टेबल बघून ते सगळे तिथे बसलेत.. आणि त्यांच्या गप्पा सुरु झाल्या..

विवेक - चला बोला पटापट तुम्ही दोघे आता, मला खूप घाई झाली आहे सगळं माहिती करून घेण्याची.. दोघे पण तुम्ही बरेच छुपेरुस्तुम निघालेत..

रुपाली - तस काही नाहीय जीजू, आम्ही सांंगणारच होतो..

गौरवी - कधी? आम्ही विचारल्यावर की सरळ लग्न करून झाल्यावर?? रूप तू माझ्यापासून पण लपवलस??

रुपाली - अग नाही ग, आता चिढू नका ना तुम्ही, सांगतेय ना..

गौरवी - बर बर बोला..

रुपाली - तुला आठवते आपण एकदा मॉल मध्ये गेलो होतो आणि यानी तुला तिथे बघितलं, त्यानंतर हा मला एकदा भेटला होता तुझ्याविषयी विचारायसाठी पण ते मी तुला सांगितलं नव्हतं तेव्हा... तेव्हा मी याला बराच बोलले होते कारण माझा जिजुवरचा राग आणि हा त्यांचा मित्र.. मग काय तो सगळा राग याच्या वरच निघाला.... सॉरी जीजू पण मला तेव्हा खरच तुमचा राग आलेला होता..

विवेक - हम्म , मी समजू शकतो ते बाजूला ठेव आणि पुढचं सांग..

संदीप - नंतर वाहिनीचा अकॅसिडेंन्ट झाला तेव्हा आम्ही आणखी जवळ आलो , फोन नं वगैरे घेतलेत एकमेकांचे, म्हणजे काही लागलं तर रुपाली मला सांगत होती. एक दोन वेळा मी तिला हॉस्पिटलमध्ये पण सोडून दिल होतं गौरवी वहिनी जवळ..

रुपाली - आणि मग असच आमच हळूहळू बोलणं वाढलं.. मग बोलता बोलता भेटायला लागलो, तुमच्याविषयी बोलता बोलता कधी आमच्याविषयी भावना उत्पन्न व्हायला लागल्यात कळलच नाही.. दोघांनाही मनात ओढ जाणवत होती पण बोलण्याची हिम्मत कुणीच करत नव्हतं..

संदीप - हो मग काय, ही माहिती आहे ना कशी बोलते, काही चुकलं तर पूर्ण इज्जतच काढायची, म्हणून माझी हिम्मत होत नव्हती, पण मला तिचा तोच स्पष्टवक्तेपणा आवडला होता मग मी विचार केला तिच्यात जे मला आवडतंय त्यालाच मी घाबरतोय अस कस चालेल, म्हणून केली हिम्मत..

रुपाली - हो आणि हिम्मत केली ती कुठे? कंपनीच्या गेट वर..

विवेक - काय? संदीप नाक कापलस लेका, ही काय जागा आहे का मनातलं बोलण्याची??

रुपाली - मग काय सगळे येणारे जाणारे बघत होते, आमच्याकडे ऑफिस सुटलेले होतं तेव्हा.. अश्या परिस्थितीमध्ये मी काय बोलणार होते याला..

विवेक - बर मग ?? तू काय बोललीस या येड्याला??

रुपाली - तो माझ्या मनातील बोलला होता ना जीजू, तेव्हा मला चिढावस पण वाटत नव्हतं आणि काही बोलू पण शकत नव्हती, मला तर सगळ्या बाजूने पॅक केल्यासारखं झालं.. पण मग मीच त्याला म्हंटल.. आपण कॉफी शॉप मध्ये किंवा एखाद्या गार्डन मध्ये जायचं का?? मला बोलायचंय..

संदीप - मी काय बोलणार होतो, हो बोललो आणि ही निघून पण गेली राव.. कुठं नेमकं भेटायचंय वगैरे काहीच नाही सांगितलं.. मी बसलो तसाच विचार करत.. उत्तर पण नाही दिलं कुठे भेटायचं ते पण नाही सांगितलं आणि गेली निघून.. आता काय करू?? मला वाटलं तिला आवडलेलं नाही ती आता बोलणार नाहीय बहुतेक मी माती खाल्ली की काय?? बापरे तेव्हा काय काय वाटलं होतं मला .. मग माझ्या लक्षात आलं.. की ही जागा नाही प्रोपोज करण्याची आणि मग तर झालं चांदण्याचा दिसल्या मला डोळ्यापुढे.. आत तर मी गेलो , ही बया आता माझा पूर्ण खुरदा करणार.. oops चला आता.. निघतच होतो तर msg आला घराजवळच्या ccd मध्ये ये.. आणि मग एक सुस्कारा सोडला आणि निघालो.. तिथे पोचलो तर ही आत बसलेली होती एका कोपऱ्यातल्या टेबल वर कुठेतरी बघत.. मी गेलो आणि पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत .. हॅलो, I M sorry... मी चुकलो का? म्हणजे मला बोलायचं होत कधीपासून म्हणून मी विचारलं तु चुकीचा विचार नको करु प्लीज, मला माफ कर पण रागावू नको..माझं मलाही कळत नव्हतं मी काय बोलत होतो पण मी बोलतच होतो आणि ही काहीच बोलत नव्हती.. मग मी थांबलो जरा.. मला वाटलं आता बोलेल, मी तिला एक आवाज दिला तिने वर बघितलं तर तिच्या डोळ्यात पाणी.. बापरे मी इतका घाबरलो होतो.. माझी काय अवस्था झाली होती जी मुलगी दुसऱ्याला रडवते आज तिच्या डोळ्यात पाणी ते ही माझ्यामुळे.. मला खूप वाईट वाटत होतं... मी जवळ जाऊन खूपदा सॉरी बोललो.. नंतर ही तिच्या मूळ पदावर आली.. म्हणजे चिडली.. मग मी चुपचाप शांत बसलो ... नंतर ती जे बोलली मला तर जमिनीपासून 2 फूट उंच असल्यासारखं वाटत होतं...

विवेक - काय बोलली ती??

संदीप - हेच की मी पण तुझ्यावर प्रेम करते आणि मला लग्न करायचंय.. मला ना तिथेच नाचावस वाटत होतं..

रुपाली - हो आणि उत्तर ऐकून काय रिऍक्शन दिली ते सांग.. तुम्हाला माहिती आहे जीजू हा पूर्ण वेडा आहे.. माझं उत्तर ऐकून हा वेडा सरळ ccd मधून बाहेर पळत गेला.. मला काही कळलच नाही नेमकं काय झालं.. आणि पळतच आला पुन्हा .. आणि मग लेट करंट लागल्यासारखा thank यु बोलला.. म्हंटल नशीब आला मला वाटलं हा गेला की काय..

विवेक - (जोरजोरात हसत) किती वेडेपणा करतो तू संदीप अजूनही.. रुपाली आता या वेड्याला तुलाच सांभाळायचं आहे हं... बर मग पुढे

रुपाली - पुढे मग झाली लव्ह स्टोरी सुरू, सुटी आली की बाहेर फिरायला जायचं वगैरे ..

विवेक - घरी कळवलं का मग तुम्ही लग्न करायचंय तर??

रुपाली - मी घरी पुसटशी कल्पना दिली आहे पण समोरासमोरच बोलेल त्यांच्याशी.. अस फोनवर बोलणं योग्य नाही वाटत मला.. आणि या उतावीळ नी सांगितलं घरी..

संदीप - हो मग काय? मला नाही असं वाट वगैरे बघता येत.. आई बाबा आले होते इकडे मग मी भेटवल त्यांना आणि हिला, त्यांना ही आवडली आहे त्यांचा काही प्रश्न नाही आता ही कधी सांगते घरी आणि हिच्या घरचे काय बोलतात काय माहिती..

रुपाली - सांगते लवकरच आणि ते होच बोलतील मला माहिती आहे..

संदीप - मग सांग ना लवकर, मला लवकर लग्न करायचंय मला आता थांबल्या जात नाहीय..

विवेक - ओहह रोमिओ आम्ही आहोत इथेच जरा कंट्रोल..

रुपाली - संदीप तुला घरच्यांच्या आधी माझी bestie माझी sis गौरवी ची परमिशन घ्यावी लागेल.. तिने हो म्हंटल तरच घरचे हो बोलतील.. तर सांग गौरवी तू काय म्हणतेस??

क्रमशः

Rate & Review

Rajan Bhagat

Rajan Bhagat 3 years ago

Dilip Yeole

Dilip Yeole 3 years ago

Nanda Madhave

Nanda Madhave 3 years ago

Priti

Priti 3 years ago

Rajani

Rajani 3 years ago