तू अशीच जवळ रहावी... - भाग 2 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - भाग 2

तू अशीच जवळ रहावी... - भाग 2

भावना एक मस्त असा रेड ब्लॅक कलरचा पंजाबी ड्रेस घालते...मस्त अशी तयार होऊन ती रूमच्या बाहेर येते...बाहेरच दृश्य पाहून ती पूर्णपणे शॉक होते...तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो...तिच्या हातातुन तिचा मोबाईल खाली पडतो...त्याच्या आवाजाने सगळयांचे लक्ष तिच्यावर जाते...पण भावनाला याचे भान नसते कारण ती अजूनही शॉकमध्येच असते...

"मृत्युंजय😱😱तू म्हणजे तुम्ही इथे"भावना गालावर हात ठेवत शॉकमध्येच बोलते...तिच्या तोंडून नाव ऐकून तिची आई तिच्याजवळ जाते आणि तिला एक चिमटा काढते...

"आहहह मम्मा...😣दुःखल की मला"भावना चिडतच मम्माला बोलते...तिचे बोलणे ऐकून सगळे तिच्याकडे पाहतात...कारण ती ओरडलीच एवढ्या जोरात की त्यांना सर्वांना ऐकू आले...

"अग अस त्यांचे नाव नाही घ्यायचे भावना...आता ते आमचे जावई होणार आहेत ना...तुझे मित्र थोडीच आहे ना ते अस बोलायला..."मम्मा थोडीशी कसनुस पणे हसत बोलते...तिचे बोलणे ऐकून भावना डब्बल शॉक होते...

"व्हॉट जावई?हे कधी झालं?मला कस नाही कळलं?तुझा जावई म्हणजे तुझी पोरगी ना?मला तर बहीण पण नाही मग हा तुझा जावई कसा असेल बर?"भावना शॉकमध्ये तोंडाला येईल ते बडबडत होती...तिचे ते बोलणे ऐकून भावनाची मम्मा तिला खाऊ का गिळू या नजरेने पाहत होती...पण तेवढ्यातच मृत्युंजय भावना कडे येतो...

"हेय princess शांत हो जरा...श्वास तरी घे...😄किती बडबडत आहेस तू?हे पाणी पी..."मृत्युंजय पाण्याचा ग्लास तिच्या हातात देत बोलतो...आधीच बिचारी शॉकमध्ये असल्याने तिने ते ग्लासभर पाणी लगेच संपवून टाकले...मृत्युंजयने तिच्या हातातून ग्लास घेतलं आणि तिला तिथेच सोफ्यावर बसवले...

"हेय भावना रिलॅक्स हो...किती विचार करते तू??अग मला ओळ्खतेच ना मग कशाला घाबरते...तरीही मी पुन्हा तुला माझ्या फॅमिली सोबत ओळख करून देतो..." मृत्युंजय अस बोलून उभा राहतो...

"मी मृत्युंजय सरदेशमुख सरदेशमुख कंपनीचा MD अँड CEO...माझी उंची 6.3 आहे आणि तुझी 5.9 मला आवडते...माझ्या कंपनीचे ऑल इंडिया आणि परदेशात branches आहेत...मी आणि माझी फॅमिली परदेशातच इंग्लंड ला रहात होती...पण तिथे राहून सुद्धा तुझ्याशिवाय एकही दिवस नाही गेला माझा...माझ्या आयुष्यात एकही गर्लफ्रेंड आली नाही आणि मी कोणाला येऊ दिले नाही कारण एवढयाशा हृदयात तू होती ना मग कस कोण येईल बर तिथे...😍मी हॅन्डसम अँड डॅशिंग दिसतो म्हणून इंस्टा फेसबुक वर फोटो टाकतो...😅ते फोटो पाहून येतात मला काही मुलींचे मेसेज पण कोणालाही मी रिप्लाय करत नाही...कारण तुला वाईट वाटले तर...insecure वाली फिलिंग नको ना व्हायला म्हणून अस करतो...आता तू 24 ची झाली दुसरं कोणी माझ्या प्रिन्सेसला घेऊन जाऊ नये ना म्हणून मी इथे आलो तुला घेऊन जायला आपल्या घरी...because i love you ना😘...पण तू अजूनही तशीच आहे cute वाली ...चल झालं माझं इन्ट्रोडकशन..."मृत्युंजय अस बोलत भावना समोरच्या सोफ्यावर जाऊन बसतो...त्याचे ते बोलणे ऐकून भावना सोबत सगळेच शॉक होतात...पण यावर भावनाचे बाबा मात्र टाळ्या वाजवतात...

"किती भारी आहेस तू मृत्युंजय...एवढा चांगला जावई मला शोधून सापडला नसता...मला तर हे लग्न मान्य आहे..."भावनाचे बाबा

"मला पण जावई पसंद आहे...😊"भावनाची मम्मा हसत बोलते...त्यांचे बोलणे ऐकून तर भावना शांतच बसते...

"आम्हाला तर आधीपासूनच भावना आवडायची...😊आता पण सून म्हणून आम्हाला पसंद आहे बर का वैशाली..."एवढा वेळ शांत बसलेली मृत्युंजयची आई बोलते...त्या सर्वांचे बोलणे ऐकून भावना...😮अस करते...

"हा माय प्रिन्सेस ही माझी आई आणि ही माझी बहीण आरोही हिला तर तू ओळ्खतेच ना...😌मला पण तू ओळखतेसच कारण आपण लहानपणापासूनचे friend आहोत ना..."मृत्युंजय हसतच बोलतो...भावना फक्त खाली मान घालून गप्प बसते...कारण ती आता काही बोलली की फॅमिली तीच काही ऐकून घेणार नाही... मृत्युंजय सारखा चांगला मुलगा तिला मिळत होता म्हणून तिची फॅमिली खुश होती...मृत्युंजय ला नकार देण्यासारखे कोणतेच गुण त्याच्यात नव्हते...महत्त्वाचे म्हणजे त्याचे प्रेम होते तिच्यावर हेच तिच्या फॅमिलीला आवडले...पण इथे भावना ची अवस्था मात्र बिकट होती...तिच्या मनात काय चालू होते ते कोणालाच कळत नव्हते...

मृत्युंजय सरदेशमुख आणि भावना लहानपणापासूनचे मित्र होते...दोघेही शेजारी शेजारी म्हणून राहत होते...मृत्युंजय तेव्हा 12 वर्षाचा होता जेव्हा तो भावना ला पहिल्यांदा भेटला होता...भावना तेव्हा जस्ट  8 वर्षांची होती...ती मध्यमवर्गीय होते...पण तो आधीपासूनच श्रीमंत होता...पण भावना कडे असे काही गुण होते ज्या मुळे ती सगळयांना आवडायची...ती लहान असून देखील mature मुलींसारखं वागत होती... आधीपासूनच science विषयात तिला खूप रस होता...नवीन नवीन प्रोजेक्ट तयार करणे हे तिला आवडायचे...मृत्युंजय काहींना काही तरी कारण काढून भावनाच्या घरी यायचा पण भावना बिलकुल त्याच्यासोबत बोलायची नाही...तिला मुलांसोबत बोलायला आवडायचे नाही म्हणून ती दूर राहायची...😅पण तो मात्र तिला चिडायला लावायचा आणि मग दोघांची भांडण व्हायची...😅पुढच्या शिक्षणासाठी तो इंग्लंडला निघून गेला...त्याला तिथे जायचे नव्हते पण मनाशी काहीतरी ठरवून तो निघून गेला...तो इंग्लंडला जात आहे हे समजताच सगळे friend त्याला भेटायला आले होते...पण भावना काही त्याला भेटायला आली नाही म्हणून तो तिच्या घरी गेला...

भूतकाळ:-

मृत्युंजय भावनाला भेटायला तिच्या घरी जातो...तो भावनाच्या मम्माला भेटून भावनाच्या रूममध्ये हळूच जातो...पाहतो तर भावना बेडवर बसून बाहुलीला जवळ घेऊन रडत होती...ते पाहून त्याला कसतरी वाटले...

"ऐ...डॉली...तो...जात आहे ना ग😞आपल्याला सोडून तो खूप लांब जात आहे...त्याची मम्मा बोलली तो पुन्हा कधीच येणार नाही ना इकडे...मग मी कोणासोबत भांडणार ना😢"भावना रडतच त्या बाहुलीला विचारत असते...तिचे ते बोलणे ऐकून दारात थांबलेला तो आतमधे येतो...

"हेय काय हे तू मला भेटायला पण येणार नाही का???मी जात आहे ना मग तुला तर बर वाटत असेल ना...??कारण आता तुला चिडवायला कोणीच येणार नाही ना" मृत्युंजय थोडस हसत बोलतो...तशी ती 8 वर्षाची भावना उठुन बेडवर बसते...

"तू चाललाय ना मग जा तू...😤मला नाही बोलायचे तुझ्यासोबत भावना कट्टी आहे तुझ्यासोबत...निघून जा तू..."भावना थोडीशी रडत रागातच बोलते...तिचे ते बोलणे ऐकून तो हसतो...

"याच भावनाला पाहून मला जायचे होते...चल बाय आता मी निघतो हा...😊"तो थोडस हसत बोलून निघत असतो...तशी ती बेडवरून खाली उतरत त्याच्या मागे जात असते...

"तू तू नको ना जाउ😣तू माझा एकच friend आहे ना...मग friend अस सोडून जात नाही..."भावना क्युट फेस करत बोलते...त्याला तिचे ते बोलतानाचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन भरपूर आवडायचे...कारण ती खूप क्युट पणे बोलायची...

"अग माझी राणी मी नंतर तुला घेऊन जायला येईन की...मला शिक्षण घेऊन मोठे बनायचे आहे ना म्हणून जात आहे मी...मी येईल ना बाळा नंतर..."मृत्युंजय तिला समजावत बोलतो...

"मला माहिती आहे तू खोटं बोलत आहे...जा तू निघून मी नाही बोलणार तुझ्यासोबत कधीच...😞"भावना अस बोलून त्याला रुममधून हाकलून देते...

"प्रिन्सेस तुला घेऊन जायला मी नक्कीच परत येईन हे मी तुला वचन देतो..."तो मनाशीच बोलून निघून जातो... त्याला गेलेलं पाहून ती रडू लागते...तो शिक्षणासाठी इंग्लंडला निघून जातो...इकडे छोटी भावना मात्र नेहमी चिडचिड करत असायची...कारण तो नव्हता तिच्याजवळ आणि तिला जास्त करून तोच आठवायचा...त्याची परिस्थिती पण काही वेगळी नव्हती सारखीच होती...पण भावनाची अवस्था पाहून एक व्यक्ती मात्र खुश होती...मृत्युंजय खूप वर्ष झाली तरीही तो तिला भेटायला आला नाही म्हणून भावनाला तो आता आवडायचा नाही...तिच्या friend कडून तिला त्याच्याबद्दल माहिती होते पण ती त्यात जास्त इंटरेस्ट घेत नव्हती...कारण तिला राग यायचा त्याचा पण तो मात्र तिच्यावरच प्रेम करत होता...शरीराने तो तिथे होता पण मन मात्र तिच्याजवळच होते...पण तिला कधीच ते कळले नाही...
*******************
वर्तमानकाळ:-

हे सर्व गोष्टी आठवून तिला वाईट वाटते...ती तशीच कोणासोबत न बोलता रूममध्ये निघून जाते...तिला अस मधूनच गेलेलं पाहून तिची आई तिच्या मागे जातं असते...पण मृत्युंजय त्यांना अडवतो...

"मम्मा थांबा तुम्ही इथे,मी पाहतो काय झाले ते हा...मॅडम माझ्यावर नाराज असणारच ना...😊मी जाऊन मनवतो माझ्या बायकोला...😊"मृत्युंजय अस बोलत भावनाच्या रूमच्या दरवाजाकडे थांबतो...पाहतो तर भावना मस्त अशी सोफ्यावर पडली होती आणि तिच्या समोर एक रोबो  उभा होता...

"Hey लँन्सी काहितरी असा प्लॅन सांग ना लग्न मोडायचा...😒 मी तुला बनवलं ना मग तू मला सांग...तुला तेवढं तर डोकं असेलच ना...मला नाही करायचे आहे त्यांच्याशी लग्न..."भावना वैतागत बोलते...

"हेय भावना i am machine...मी तुझी काहीच हेल्प करू शकत नाही यामध्ये..."लँन्सी तिच्याकडे पाहत बोलते...तिचे तसे बोलणे ऐकून भावना शॉक होते...

"हे लँन्सी प्रोग्राम चेंझ केला का ग तुझा???कारण तू अस कधीच बोलत नाही ना म्हणून...🙄"भावना थोडीशी उठून तिच्याकडे येत बोलते...ते पाहून मृत्युंजय आत रूममध्ये येतो...

"वा लँन्सी कसली भारी आहेस ग तू...😍माझ्या बायकोला अजिबात मदत करत नाही म्हणजे मी तुला पसंद आहे तर...😚मी लग्न झाल्यावर तुला पण घेऊन जाणार..."मृत्युंजय थोडस हसत बोलतो...त्याला अचानक रूममध्ये आलेलं पाहून ती चिडते...

"अहो मिस्टर तुम्ही इथे काय करत आहात...तुम्ही जावा बाहेर...नाहीतर मी काय करेल ना मला पण माहिती नाही😡"भावना चिडत बोलते...तिला तस चिडलेले पाहून त्याला मज्जा वाटते...

"ओ कर ना काहीतरी मला...😜मी त्याचीच वाट पाहत आहे...अजिबात कोणाला सांगणार नाही हा मी बाहेर..." मृत्युंजय खट्याळपणे हसत तिच्याजवळ येत बोलतो...

"अहो..😱काही काय बोलत आहात तुम्ही...जरा तरी लाज बाळगा...मी अजून एक छोटी मुलगी आहे आणि तुम्ही माझ्यासमोर असलं बोलत आहात..."भावना शॉकमध्ये बोलते...तिचे ते चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आधीपासूनच त्याला वेड लावायचे...म्हणून तो ते पाहून गालात असतो...

"ऐ कसली लाज प्रिन्सेस...मी तर तुझा नवरा बनणार आहे काही दिवसांनी...😜त्यात तुम्ही मॅडम 24 च्या झाला आहात..."तो खट्याळपणे बोलत असतो...त्याचे बोलणे ऐकून ती आता भयंकर तापते...

"मृत्युंजय मी आधीच सांगत आहे हा तुम्हाला...मला नाही करायचे लग्न वगैरे...😡गपचुप बाहेर जायच आणि कारण सांगून नकार द्यायचा..."भावना चिडतच बोलते...

"अरे अस कस मी सांगू ना...😆मला तर तू आवडते आधीपासूनच...😙मग मी नाही सांगणार काही...पण तू सांगते ना म्हणुन जाऊन सांगतो बाहेर...चल ये बाहेर"मृत्युंजय गुढपणे हसत बोलतो...त्याचे ते बोलणे ऐकून ती खुश होते...तो सगळ्यात आधी बाहेर जातो...

"हे लँन्सी मी आज खूप खुश आहे कारण आता ते स्वतःच लग्न मोडत आहे i am so हॅप्पी...😙😙"भावना अस बोलत लँन्सीला मिठी मारते आणि बाजूला होते...खुश होऊन ती बाहेर जाते...सगळे त्या दोघांकडे पाहत असतात...भावनाचा हॅप्पी चेहरा पाहून सगळयांना बरे वाटते...पण यांना कुठे माहिती होते भावना कशाला खुश होती ते...😂

"काका काकी तुमच्या मुलीला आवरा भरपूरच प्रेम ओतू जात होते माझ्यावर..😆तुम्ही ना लवकर आमच्या लग्नाची तारीख काढा नाहीतर माझं काही खर नाही हा...😜तुम्ही म्हणत असशाल तर आता पण मी तयार आहे लग्नाला..." मृत्युंजय सगळयांना पाहत बोलतो...त्याचे ते बोलणे ऐकून सगळे खुश होतात...पण भावना मात्र शॉक होते...

"व्हॉट मी कधी...😱😲"भावना शॉकमध्येच मनात बोलते...तिचे ते भाव पाहून तो गालात हसतो...ती एक रागात कटाक्ष टाकते...तसा तो केसांवर एक हात फिरवून तिला पाहून हसून दाखवतो...

"ये भावना दि आजपासून तू माझी वहिनी बनणार i am so happy फॉर both of you..."आरोही भावनाला मिठी मारतच बोलते...भावना कसनुस पणे हसून तिला जवळ घेते...इथे सर्व आनंदात लग्नाबद्दल बोलत असतात...पण भावना मात्र वेगळ्याच विचारात हरवलेली असते...ते पाहून मृत्युंजय तिचा हात धरतो...तशी ती विचारातून बाहेर येते आणि रागातच त्याचा हात झटकते...ते पाहून तो हसतो...

"माझी cutiepie किती तो राग या नाकावर...अस बर दिसत नाही तुला राग...आय स्वेर आता नाही सोडून जाणार तुला हा..."मृत्युंजय हसतच तिला पाहत बोलतो... पण ती मात्र रागातच गपचूप बसते...समोरच्या परिस्थितीच भान राखून ती गप्प बसते...ते पाहून मृत्युंजय  हसतो...

काहीवेळाने मृत्युंजयची फॅमिली आनंदाने त्यांच्या घरी निघून जाते...तशी भावना सुटकेचा श्वास घेऊन रूममध्ये निघून जाते...ती मनाशीच काहीतरी ठरवून गुढपणे हसून झोपून जाते...
*******************

वर्तमानकाळ:-

खूप वेळ झाला तरीही मृत्युंजय तिच्याजवळ बसलेला असतो...ते पाहून स्क्रीन वरून त्यांना पाहणारी मुलगी हसते...

"अरे नाही उठणार ती...कारण ती कोमात गेली आहे...मी माझ्या या हाताने तिला मारले...हा हा हा"ती मुलगी स्क्रीन कडे पाहत विचित्र पणे हसते...तशीच ती हसतच भूतकाळात जाते...

भूतकाळ:-

भावना अशी मस्त तयार होऊन आरश्यासमोर स्वतःला पाहत होती...आजवर ती तयार होत होती...पण कधी ती आरश्यासमोर जास्त वेळ बसायची नाही...पण आज ती सारखी सारखी स्वतःचा ड्रेस नीट आहे का नाही,काही राहील तर नाही ना हे पाहत होती...स्वतःला पाहून ती गालातच हसली...

"हे प्रिन्सेस you are so cute अँड beautiful...😘😘" मृत्युंजय तिला आरश्यात तयार होऊन पाहताना बोलतो... त्याचे ते बोलणे ऐकून ती लाजून चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवते...

"नको ना तुम्ही अस छळू मला..."ती लाजत बोलते...खूप वेळ झाला तरीही मागून आवाज नाही आला तस ती चेहऱ्यावरचे हात बाजूला काढते आणि आरश्यात पाहते तर कोणीच नसते...ते पाहून ती स्वतःच्याच विचारांवर हसते...

"ऐ पागल आज ते इंग्लड वरून येणार आहेत आणि तू कसला विचार करत आहे...😅आज तरीही सांग हा त्यांना तुझ्या मनातील भावना...खूप छळलय ना मी पण आता नाही छळणार तुम्हाला जय..."भावना स्वतःशीच बोलत हसते आणि मस्त अस व्हाईट,स्काय ब्लू टाईप अनारकली ड्रेस घालून ती तयार होते...आज तिने तिचे केस पूर्णतः मोकळे सोडले होते...लांबसडक तिचे काळेभोर केस कोणालाही आवडतील असेच होते... थोडासा मेकअप आणि चेहऱ्यावर तीच नेहमीच हसू ठेवून ती मोबाईल,स्कुटी ची चावी घेऊन घराच्या बाहेर आली...ती स्कुटीवर ओढणी एका बाजूला बांधून बसली आणि स्कुटी स्टार्ट करणार तर तिला कोणाचा तरी कॉल आला तस तिने नाव पाहिले आणि हसून तिने तो मोबाईल receive केला...

📲"Hi जान बोल ना ग काय काम आहे??"भावना हसून बोलते...

📲"काही काम नाही ग पण आज तुझा आवाज एवढा भारी कसा ग??आज खूप खुश दिसत आहेस बहुतेक तू??"पलीकडून एक मुलगी बोलते...

📲"हो जान आज मी खूप खुप खुश आहे कारण आज मी त्यांना माझ्या मनातील भावना सांगणार आहे...🙈खूप छळल ना मी त्यांना पण आता नाही देणार त्यांना त्रास आता फक्त ते आणि मी...त्यांना भेटायसाठी मी ऐअरपोर्ट वर जात आहे...15 दिवसांत मला त्यांचे महत्त्व कळले...म्हणून आता मी नाही त्यांना दूर करू शकत..."भावना हसून भरभरून बोलत असते...

📲"हेय काय हे किती बोलते तू...चल मला काम आहे तू आणि तो बघून घ्या काय ते..."ती मुलगी वेगळ्या टोन मध्ये बोलते आणि तसाच फोन कट करते...

"हॅलो हॅलो...हिला काय झालं बर मध्येच जाऊ दे ते सोड भावना...😣काहीतरी काम आलं असेल ना म्हणून कट केला असेल...तू तुझं काम कर"भावना स्वतःशीच बोलते आणि गाडी स्टार्ट करून भुर्रकन तिथून निघून जाते...भावना एका ठिकाणी स्कुटी थांबवते आणि मस्त असा फुलांचा गुच्छा घेते...ती तशीच गुच्छा समोर ठेवते आणि स्कुटी स्टार्ट करते...तशीच ती ऐअरपोर्टच्या दिशेने निघून जाते...ऐअरपोर्टच्या रस्त्यावर तिला एक सुनसान रस्ता लागतो...त्या रस्त्यावर तिला एक छोटंसं कुत्र्याच पिल्लु जखमी अवस्थेत दिसत...ते पाहून ती स्कुटी थांबवते आणि रस्त्याच्या पलीकडे जाऊन त्या कुत्र्याच्या पिल्लूला उचलते...

"ऐ पिल्लु काय झालं तुला हे??बघ किती लागलं ना तुला?थांब हा मी तुला पट्टी करते...तुझं कोणीच नाही ना म्हणून मी तुला माझ्या घरी घेऊन जाते हा...😊"भावना अस बोलत स्वतःच्या ओढणीचा छोटासा तुकडा काढते आणि त्या पिल्लुच्या पायाला बांधते...तस ते पिल्लु ओरडायला लागते...

"ऐ पिल्लु मी डॉक्टर तर नाही आहे😣पण अस तुझे रक्त थांबवण्यासाठी बांधत आहे त्यामुळे तू समजून घे ना मला...आपण डॉक्टर कडे जाऊ...आणि तुला बर करू हा..."भावना त्या पिल्लाला पाहत बोलते...तस ते पिल्लु थोडस गप्प होते...त्याला तहान लागली असेल असा विचार करून ती रस्त्याच्या पलीकडे ठेवलेल्या स्कुटीकडे जात असते...तीच संधी साधून एक मोठा ट्रक भरधाव  वेगात तिच्याजवळ येतो आणि तिला काही कळणाच्या आत तिला उडवून जातो...त्याने उडवल्याने भावना दूर अंतरावर त्या पिल्लाकडे फेकली जाते...ती पूर्णपणे रक्तबंबाळ होऊन तिथे रस्त्यावर पडलेली असते...तो ट्रक मात्र तिला उडवून पळून जातो...पिल्लाला पाणी पाजायला जाणारी ती स्वतःच "पाणी पाणी"करत असते...कारण एवढया जबरदस्त पणे तिला उडवले होते की तिला उठता देखील येत नव्हते...तिचा फोनवर सारखे सारखे कॉल येत होते...पण तो फोन उचलण्या इतपत पण तिच्यात शक्ती नव्हती...शेवटी बळ एकवटून तिने तिच्या गळ्यातील लॉकेट मधील पेन बाहेर काढले...

तिला त्या अवस्थेत पाहून एक महागडी गाडी तिच्याजवळ येते...त्यातून एक मुलगी बाहेर येऊन भावनाकडे पाहत राहते...

"प्लीज...हेल्प...मी... जान...😢"भावना आशेने तिला पाहते...

"हेल्प माय फूट...तुला मारण्यासाठी मीच प्रयत्न केला आणि तुला सहजासहजी अशी मदत करून जगू देते तर...😡जा तू उडत गेली...जय फक्त माझा आहे आणि माझाच राहणार...चू चू चू....😥काय करू भावना मला नाही मारायचे होते तुला...पण तू जय वर प्रेम करायला लागली ना म्हणून मला अस वागावे लागले...काय आहे ना प्रत्येक गोष्टीत तू नंबर ला होती तेव्हा पासून माझ्या मनात राग होता...पण तरीही मी तुला सोडलं पण आता नाही जय फक्त माझा आहे आणि माझाच राहणार...😡अकॅसिडेंट करून सुद्धा तू वाचली पण आता नाही..."ती मुलगी अस बोलत जमिनीवर रक्तबंबाळ पडलेल्या भावनाच्या डोक्यात तिने आणलेला लोखंडी रॉड रागातच जोरात घालते...तिच्या त्या मारं मुळे भावनाचे डोकं सुन्न होते...त्या मुलीला पाहून आधीच ती शॉक झाली होती आणि तिचे ते वागणे असहनियहोते तिच्यासाठी...ती मुलगी आसुरी हास्य करून गाडीत बसते...

"बाय बाय मेरी जान खूप चांगली होतीस ग तू...पण तू एकच चूक केली...मी चालले तुझ्या जयकडे हा...ओ सॉरी माझ्या जयकडे"ती मुलगी गाडीत बसून अस बोलून निघून जाते...ती गेली तशी भावना हिंमत करते आणि पेनच झाकण काढते...

"बु...कॉल...लँन्सी..."भावना अस बोलून डोळे बंद करते...रॉडचा मार एवढा जबरदस्त होता ना त्यामुळे जास्त वेळ जागणे तिला जमलेच नाही...डोळे बंद करताना एकच चेहरा तिच्यासमोर आला आणि त्या चेहऱ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक हसू आले...

"भावना...dangerous...भावना...dangerous..."बु लँन्सीने  कॉल उचलल्यावर बोलतो...तशी लँन्सी तिच्यात असलेल्या फिचरने भावनाला पाहते...तर भावना तिला रक्तबंबाळ अवस्थेत दिसते...तसे ती ते फोटो स्वतः मध्ये कॅपचर करते आणि मृत्युंजयला पाठवते...मृत्युंजय ऐअरपोर्टच्या बाहेर आलेला असतो...ते फोटो पाहून तो दुःखी होतो आणि तसाच तो त्या ठिकाणी जातो...पाहतो तर भावना त्याच अवस्थेत असते...ते पाहून तो घाबरतो... तिची तशी अवस्था पाहून त्याचे डोळे भरतात...

"प्रिन्सेस काय झालं हे तुला...उठ ना ग प्रिन्सेस...तुला मला त्रास द्यायचा आहे ना तेवढा दे...😭पण असा वाला नको ना..."मृत्युंजय तिला कवटाळतच बोलतो...तिचे ते रक्त पाहून त्याच्या काळजाचे पाणी पाणी होते...तो तसाच तिला स्वतःच्या हातात उचलून घेतो आणि गाडीत टाकतो...त्याचे बॉडी गार्ड त्याला मदत करण्यासाठी पुढे येत असतात तस तो त्यांना नको बोलतो...तो तसाच गाडीत तीच डोकं स्वतःच्या हृदयाशी धरून रडत असतो...तिच्यासोबतच्या प्रत्येक आठवणी त्याच्या डोळ्यासमोर जात होत्या...पाण्याच्या धारा तर चालूच होत्या...कारण तिची हालचाल काहीच होत नव्हती...

थोड्यावेळाने तो तिला हॉस्पिटलला घेऊन येतो...मृत्युंजय हा मोठा बिझनेस आणि पॉवर वाला माणूस असल्याने डॉक्टर पण मागचा पुढचा विचार न करता तिच्यावर उपचार करायला सुरुवात करतात...भावनाच्या अकॅसिडेंट ची बातमी सगळयांना कळल्याने सगळे तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये येतात...तब्बल 15 तासाचे ऑपेरेशन करून डॉक्टर बाहेर येतात...

"काय झालं डॉक्टर??😢ती ठीक आहे ना??"मृत्युंजय थोडस दुःखी होऊन विचारतो...त्याचे ते बोलणे ऐकून डॉक्टर खाली मान घालतात...

"बोला डॉक्टर ती ठीक आहे का नाही ते...😡"मृत्युंजय डॉक्टरची कॉलर पकडत विचारतो...त्याचा तो अवतार पाहून डॉक्टर घाबरतात...

"सॉरी सर आम्ही सगळे प्रयत्न केले पण त्या कोमा मध्ये गेल्या...डोक्याला जबरदस्त मार बसल्याने त्या कोमात गेल्या..."डॉक्टर घाबरून बोलतो...त्याचे ते बोलणे ऐकून मृत्युंजय मागे सरकतो आणि तिथेच असलेल्या चेअरवर जाऊन बसतो...

"भावना$$$😭😭तू नाही अशी वागू शकत..."मृत्युंजय जोरात आवाज देत रडू लागतो...आजवर कधी ही न रडलेला माणूस असा रडत होता हे पाहून सगळयांना वाईट वाटतं होते...पण त्याचे प्रेम होती ती आणि प्रेमाच्या व्यक्तीसोबत असे झाले तर कोणालाही दुःख होणारच ना...त्याचे काळीज कोणीतरी त्याच्या पासून दूर नेत आहे असे त्याला वाटू लागले...😢डॉक्टरचे बोलणे ऐकून भावनाच्या आईला पण चांगलाच धक्का बसला...त्या पण तिथेच रडत बसल्या...भावनाचा मित्र परिवार पण शॉक मध्येच होता...पण या सगळ्यात एक व्यक्ती मात्र खुश होती...ती डोळयातून पाणी गाळण्याचे नाटक करत होती...पण तिच्या चेहऱ्यावर वेगळेच असे हास्य होते... यात कोणाचेच लक्ष त्या व्यक्तीवर नव्हते...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमश:
        ©®भावना सावंत(भूवि❤️)
***************************

Rate & Review

Karuna magare

Karuna magare 2 months ago

Maithili Ghadigaonkar
Swati Jagtap

Swati Jagtap 4 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 10 months ago

Manali Sawant

Manali Sawant 10 months ago