Janu - 3 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | जानू - 3

जानू - 3

कधी कधी भोसले सर ..वर्गाला खेळायला सोडत ..आज ही ४ ला भोसले सर वर्गात आले ..शाळा सुटायला अजून एक तास वेळ होता ....जानू अ तुकडित तर अभय ब मध्ये होता ..त्यामुळे ते एकाच शाळेत असले तरी ..एका वर्गात मात्र नव्हते ...अभय नेहमी चोरून चोरून जानू ला पाहत असे पण जानू ला मात्र याचा पत्ताच नव्हता...भोसले सर नी जानू च्या वर्गाला मैदानावर नेले ...सर्वांना वाटलं बर झाल ..निदान सरांचा लेक्चर तर ऐकावा लागणार नाही ..पण ..भोसले सरांना आज कोणती लहर आली होती कोण जाणे ? त्यांनी सर्वांना कवायत प्रकार घेणार असल्याचं सांगितलं..सर्वजण ओळीत उभे राहिले ..पाहिले ..खडे प्रकार झाले ..एक .. दो.. तीन ..चार....इकडे कवायत प्रकार चालू आणि ..राहिलेले जे ९ वी च्या.. दोन तुकड्याचे विद्यार्थी होते ते सर्व वर्गात बसून खिडकीतून .. मैदानावरची मजा पाहत होते ..कोणी चुकलं की ..सर्वजण मोठ्याने हसायचे ...त्यांचं हसणं ऐकुन बरेच जण ..सारे प्रकार चुकीचे करत होते ..आता बैठे प्रकार चालू झाले .. पहिला प्रकार झाला ..खूप मुल चुकीचं करत होती .. तस...वर्गातली बाकीची मोठ्याने हसायची ..यात जानू च काही लक्ष लागेना ..अभय च मात्र या सर्वाशी काही घेण देण नव्हत ..तो केव्हाचा फक्त एकटक जानू ला पाहत होता ..तिच्या हालचाली ..आपल चुकल की काय ? असा विचार करून तिचं भांबावून जान ..मध्येच तिचे उडणारे केस ..हसणाऱ्या मुलानं कडे ..रागाने टाकले जाणारे तिचे कटाक्ष ....अभय पूर्ण तल्लीन होऊन तिला पाहत .होता...मध्येच सर्वजण खूप हसायला लागले .. मैदाना वरचे ही आणि वर्गातले ...मात्र जानू एकदम ओशाळली होती ....अभय ला काही समजेना सर्वजण हसत आहेत आणि जानू का अशी गप्प..? त्याचं लक्ष तर सार जानू ला पाहण्यात होत ..त्यामुळे काय झालं हे त्याला कळलच नाही..त्याने आपल्या शेजारी बसलेल्या आकाश ला विचारलं '" काय झालं रे ? "

आकाश त्याचं सर्वात जास्त जिगरी दोस्त ..दोघे एकाच डेस्क वर बसत ..खान पिन ..अभ्यास सार एकत्र .. हमम ..पण ते राहायला मात्र एकमेका पासून दूर होते ..
आकाश ने त्याला सांगितलं की ...," जान्हवी च लक्ष नव्हते तर सर तिला ओरडले..पण त्यांनी तिला अस बोलले की ..प्रधान ..हातावर डोकं ठेवा...डोक्यावर हात ठेवा म्हणायला हवं होत ..पण बोलले उल्टच त्यामुळे सर्वजण हसायला लागले ."

आता अभय ला कळले की हीचा चेहरा असा का उतरला ?..सर्वजण आपल्यावर हसले अस तिला वाटलं..बिचारी माझी जानू..काय ते भोसले सर पण ..इतक्या गोड मुलीला कसं रागावू वाटलं त्यांना? अभय ला त्यांचा रागच आला..शाळा सुटली सर्वजण घरी निघाले...जानू ला पाहण्याची खूप इच्छा झाली अभय ला ती अजून हि उदास आहे का ? हे पाहायचं होत त्याला ..तो एका बाजूला उभा राहून जानू वर्गातून बाहेर येण्याची वाट पाहू लागला ...थोड्या वेळाने अभय ला जानू आपल्या मैत्रिणी सोबत येताना दिसली पण ..आता ती उदास नव्हती ..खूप हसत बाहेर आली होती....म्हणजेच तिच्या मैत्रिणींनी तिला हसवलं होत तर...अभय ला जानू उदास नाही पाहून खूप बर वाटल ..तो ही घरी गेला ..तो नेहमी जानू च्या अवतीभवती असायचा ..तिच्या मागून शाळेतून यायचा ..ती चालली की ..तिच्या मागेच असायचा ..पण जानू मात्र आपल्या मैत्रिणी मध्ये मग्न असायची ..तिने कधी अभय कडे लक्ष च नाही दिलं..

विज्ञान चा तास होता ..माने सर वर्गात आले ..आज ते विज्ञानाचा प्रॉजेक्ट करायला विषय देणार होते ....रोल नंबर नुसार एक एक जण उभे राहायचे आणि सर त्याला त्यांचा विषय सांगायचे ..आता वेळ होती जानुची...माने सर म्हटलं की जानू ची बत्ती गुल होयची..ती उभी राहिली ..सरांनी तिला विषय दिलं ....विविध फळे व त्यांच्या जाती...तिने तो वहीत लिहून घेतला आणि खाली बसली ..
विज्ञानाचा प्रॉजेक्ट करायचं म्हणून जानू माहिती गोळा करू लागली ..तिला फळे व त्यांची माहिती मिळाली पण फळांच्या जातींची माहिती मिळाली नाही....दुसऱ्या दिवशी ..तिने आपल्या सर्व मैत्रिणी कडे याबद्दल विचारल पण ..कोणाकडेच त्याबद्दल माहिती नव्हती..सर्वांना त्यांच्या त्यांच्या विषायाची माहिती मिळाली होती .. काही जणांनी तर प्रोजेक्ट लिहायचं काम ही सुरू केलं होत ....त्यात अपूर्वा ने जानू ला चांगलीच भीती घातली होती ..जानू तुझा च फक्त प्रोजेक्ट पूर्ण नसणार म्हणजे आता माने सर काय तुझा हात सुजवूनच काढणार....हे ऐकुन तर जानू पूर्ती घाबरली होती .....तिला डोळ्या समोर माने सर ची काठी दिसत होती ....आपण माने सर चा मार खात आहोत अस तिला जागेपणी स्वप्नं पडलं....," ये गप ग आप्रे तुला ते काही काम नसत उगाच तिला घाबरवू नकोस .."
अस म्हणून सखी जानुला समजावू लागली ..जानूला खूप साऱ्या मैत्रिणी होत्या ..पण सखी ही तिची जिवलग मैत्रीण होती ..जानू जेव्हा नवीन आली होती शाळेत ..तेव्हा सखी ला ती खूप आवडायची ..पण जानू हुशार आहे ..त्यात दिसते ही किती सुंदर..बोलते तर किती छान ..सर्वजण तिच्याशी मैत्री करायला पाहतात..त्यात आपण हे अशी ना अभ्यासात हुशार ना दिसायला जानू सारखं सुंदर त्यामुळे जानू आपल्याशी बोलणार नाही असं सखी ला वाटू लागलं त्यामुळे ती जानुशी बोलतच नसे ..पण .. हळु हळू जानू ची आणि सखी ची ओळख झाली होती ..आणि ..सखी जानूची बेस्ट फ्रेंड झाली होती ..ना जानू ला तिच्या विना करमत असे ..ना सखी ला ..सखीचा तर खूप जीव होता जानुवर ....ती नेहमी तिच्या सोबत असे ....अपूर्वा जानू ला माने सर ची भीती दाखवत होती ..त्यामुळे सखी आप्री वर खूपच चिडली होती.. व तिला गप्प बस म्हणून सांगत होती ...
संध्याकाळी घरी जाऊन जाणून बरीच पुस्तक शोधली पण तिला काही माहिती सापडली नाही..आता सारखं नेट वर सर्च करायचं म्हटलं तर ..जानू च्या बाबांचा मोबाईल म्हणजे नुसता डबा त्यात कुठून यावं नेट आणि माहिती ..फक्त फोन येत जातं असे ..
दुसऱ्या दिवशी जानू शाळेत पोहचली ..तर सखी तिची वाटच पाहत होती ..तिला पाहतच सखी तिच्या जवळ गेली आणि खूप खुशीत म्हणाली," अग जानू तुझा प्रोजेक्ट ची माहिती मिळाली ..तो अभय आहे ना ब तुकडीतला त्याच्या कडे आहे .."
क्रमशः


Rate & Review

Gautam pawar

Gautam pawar 8 months ago

Vaishnavi

Vaishnavi 11 months ago

sonali

sonali 1 year ago

Mahesh Jadhav

Mahesh Jadhav 1 year ago

Prakash Gonji

Prakash Gonji 1 year ago