जानू - 4 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories Free | जानू - 4

जानू - 4

जानू वर्गात येते ..सखी तर तिची वाटच पाहत असते ..जानू दिसताच ती तिच्या कडे जाते आणि ..खूप खुशीत तिला सांगते ..की ..जानू ला जो प्रोजेक्ट हवा होता तो ब तुकडीतील अभय कडे आहे ...तोच अभय जो तिच्या शेजारी राहतो..हे ऐकुन जानू च्या जीवात जीव येतो .

जानू :पण सखी तुला कोणी सांगितलं ग ?

सखी : अग तो अप्रीचा भाऊ आहे ना त्याच्या वर्गात ..अप्रिन भावाला सांगितलं ..तर त्यानेच सांगितलं ..की ..अभय कडे आहे म्हणून..अप्रीन मला रात्री सांगितलं.. ग..म्हटलं चला बर झाल ..एकदाचा जानू चा प्रोजेक्ट तरी मिळाला.

जानू:thank you.. ग सखी ... मला तर खूप टेनशन आल होत ..

सखी : thank you तर त्याला बोल..त्याने प्रोजेक्ट दिला तर ..

जानू: हो ग ..ते तर आहेच पण तो देईल का ग?

सखी :अग मागून तर बघ.

जानू: ह्म्म,ठरलं तर संध्याकाळी जाईन त्याच्या घरी ..बघू दिला तर ..ये पण मला जरा कसं तरीच वाटत मागायला..आम्ही शेजारीच राहतो पण कधी बोललो नाही ग..

सखी:जानू काही पण विचार करू नको ..मागून बघ दिला तर दिला..नाही दिला तर आपण बघू काय करायचं..

जानू: ओके.... बेस्ट फ्रेंड..

जानू न सखीला अस म्हणत मिठीच मारली ..
संध्याकाळी ..जानुचे बाबा बाहेर गेले होते ..जानू ला वाटलं बर झाल ..नाही तर आपण अभय च्या घरी कसं गेलो असतो ..आता बाबा येण्या आधी ..तो प्रोजेक्ट घेऊन यायला हवा ..आई स्वयंपाक घरात जेवण बनवत होती ..जानू आई जवळ गेली ..

जानू:आई मी त्या अभय च्या घरी जाऊन येऊ का ?

आई: काय ग ? आता रात्री काय काम आहे ग ?

जानू :आई मला शाळेत प्रोजेक्ट करायला सांगितलं आहे पण ..त्याची माहिती माझ्या कडे नाही..सखी न सांगितलं की अभय कडे आहे ..मी लगेच जाऊन घेऊन येते ग..नाही तर माझाच अभ्यास पूर्ण नसला की सर मला मरतील.

जानू ची आई शिकली नव्हती ..पण जानू हुशार आहे ..नेहमी शाळेत नंबर काढते ..याचा आई ला अभिमान होता ...जानू न खूप शिकावं आपल्या पायावर उभा राहाव अस आई ला वाटायचं..
जानू ला मार खावा लागेल म्हंटल्यावर आई नी ही तिला जाण्याची परवानगी दिली..

आई: जा ..पण ..बाबा येण्या आधी ये .

जानू: हो लगेच येते .

माने सर नी जो प्रोजेक्ट जानू ला  दिला होता ..तो प्रोजेक्ट योगायोगाने अभय ला ही मिळाला होता..म्हणजेच ..माने सर नी अ तुकडीला प्रोजेक्ट देण्या आधीच ब तुकडीच्या विद्यार्थ्यांना दिला होता..त्यामुळेच अभय च् प्रोजेक्ट आधीच पूर्ण झालं होत .
जानू अभय घरा  च्या समोर जाऊन उभी राहिली..दारातून तिला त्याची आई दिसली..

जानू:काकू अभय आहे  का घरात ?

अभय ची आई: हो आहे ना ..का ग?

जानू: माझं काम होत ..मला त्याची वही हवी होती ..

अभय ची आई:थांब बोलावते ...

अभय आतल्या खोलीत होता ..आई ने त्याला, "  अभय ..अभय ..  "

असा आवाज दिला ..त्याने आतूनच विचारल," ..काय ?"

अभय ची आई:अरे ती शेजारची जानू आली आहे ..तिला तुझी वही हवी आहे ..बाहेर ये जरा..

जानू च नाव ऐकुन ..तो दचकला .पण..नंतर त्याला ..वाटलं आई दुसरच काही तरी बोलली असेल ..आपल्यालाच जानू ऐकायला आल असेल... त स..ही आज काल आपल्याला सर्वबाजुला जानू च दिसत आहे ....असा विचार करत करत तो बाहेर आला ..त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास च बसेना ..खरंच जानू दारात उभी होती ..पुतळ्या सारखा तो तिच्या समोर  उभा राहिला....
अभय च्या आईने तिला आत बोलावले होते पण बाबा येतील मला लगेच जायचं आहे ..आई ने बोलावलं आहे म्हणून ती घरात गेली नव्हती ....अभय येऊन तिच्या समोर उभा राहिला ..तो तिला काही विचारेनाच ...आणि जानू ला ही काही बोलवेना ....तो तस्साच उभा आहे पाहून ..मग जानू च बोलली

जानू : मला तुझा विज्ञानाचा प्रॉजेक्ट हवा आहे ..तो फळांचा ..मला ही तोच विषय आला आहे ..पण माझ्या कडे माहिती नाही त्याबद्दल...

जानू बोलत होती आणि अभय मात्र तोंडाला कुलूप लावून तिला पाहत गप्पच उभा ..
जानू ला वाटलं याला देयच नसेल ..ती परत एकदा बोलली ...

जानू: अरे मी लगेच परत देईन उद्याच ...

अभय ची तिच्या बोलण्याने तंद्री तुटली ...भानावर येत तो ..तो इतकंच बोलला

अभय: ..देतो ना ....

आणि घरात पाळला..प्रोजेक्ट सोडून तो बॅग मधल काय काय बाहेर काढू लागला ..सगळी बॅग च त्याने उलटी केली ..प्रोजेक्ट तर समोरच होता ..पण आपण काय शोधतो हेच त्याला कळत नव्हते....
तो स्वतः वरच हसत होता...एक मोठा श्वास त्याने घेतला..जानू ला प्रोजेक्ट हवाय ..हे तो स्वतः ला च सांगू लागला ..तितक्यात लक्ष गेलं ..समोर तर होता प्रोजेक्ट ..त्याने तो उचलला...आणि दरवाजात आला..जानू उभीच होती ..
किती वेळ लावतो आहे ..हा बाबा घरी आले तर परत मला ओरडतील ..तेवढयात अभय हातात प्रोजेक्ट घेऊन आला..

अभय: हा घे ..

म्हणून त्याने तो जानू च्या हातात दिला.

जानू: मी लगेच उद्या आणून देईन

म्हणून जानू निघून गेली ..तो फक्त हम्म इतकंच बोलला..जानू गेली ..आणि अभय ला काय करावं तेच कळेना ..जानू स्वतः आपल्या कडे आली होती..आपल्याशी बोलली ..या गोष्टीवर त्यांचा विश्र्वासच बसत नव्हता ....खरंच जानू आली होती का ..हे पाहण्यासाठी त्याने स्वतःला एक चिमटा काढला..," आई ग..म्हणजे खरंच होत हे स्वप्न नव्हत तर .. "

अभय खुशीत घरात पळाला...टीव्ही चालू करून त्याने ..आवाज मोठा केला ..टीव्ही वरती छान स रोमँटिक साँग लागलं होत .. तो..त्या गाण्यावर नाचत होता ....माधुरी आणि सलमान ..च साँग लागलं होत ..त्याला माधुरी मध्ये ही जानू दिसू लागली होती .. तो ..भान हरपून तिला पाहत होता .हसत होता

ये मौसम का जादू हैं मितवा
ना अब दिलं पे काबू हैं मितवा
नैना जिसमे खो गये ..
दिवाने से हो गये..
                              क्रमशः


Rate & Review

Gautam pawar

Gautam pawar 2 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 6 months ago

Amol Jadhav Aj

Amol Jadhav Aj 6 months ago

Mansi Gaikwad

Mansi Gaikwad 6 months ago

Shri Swami Samartha