तू अशीच जवळ रहावी... - भाग 5 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - भाग 5

तू अशीच जवळ रहावी... - भाग 5

भावनाचा मृत्युंजय सोबतचा लग्न मोडण्याचा प्रयत्न फसला होता...तिने हा प्लॅन करून स्वतः च यात फसली गेली होती...मृत्युंजयने तिचा हा प्लॅन उधळून लावला आणि सोबतच एक पूर्ण दिवस त्याच्या सोबत स्पेन्ड करायला सांगितला होता..तिच्याजवळ काही पर्याय नसल्याने तिने त्याला होकार कळवला...तस मृत्युंजय तिला गाडीत बसवून घेऊन गेला...त्याच्या सर्व गाड्या एका मोठ्या महागड्या फाईव्ह स्टार हॉटेल कडे थांबल्या... ते पाहून भावना शॉक झाली...तिच्या मनात वेगवेगळे विचार चालू झाले आणि त्या विचाराने ती घाबरून गेली...खूप वेळ झाला तरीही भावना उतरत नाही हे पाहून मृत्युंजयने तिच्यासमोर एक चुटकी वाजवली...तशी ती दचकून विचारातून बाहेर आली...

"ओहो प्रिन्सेस खूप पुढचा विचार करत होती ना तू...😉पण असा विचार पण करू नको...अस काहीच करणार नाही मी तुझ्यासोबत..."मृत्युंजय थोडस हसतच तिला बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती शॉकमध्येच त्याला पाहत असते...कारण तिच्या मनात काय चालले हे त्याला कसे कळले हा विचार तिच्या मनात आला...

"आता मला कसे कळले हा विचार चालू आहे ना तुझ्या मनात भावना?"मृत्युंजय तिच्याकडे पाहत बोलतो...ती मान हलवूनच त्याला "हो" म्हणते...तीच अस वागणं पाहून तो गालात हसतो...

"काय आहे ना प्रिन्सेस तुझे हे डोळे आणि चेहरा आहे ना तो एकदम बोलका आहे...सगळं काही सांगून जातात ते मला तुझ्या मनात काय चालू असते ते..."मृत्युंजय तिच्या गालावर हात ठेवत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती गप्प बसते...पण त्याचा हात स्वतः च्या गालावर पाहून ती चिडते आणि तसच त्याचा हात झटकून टाकते...तो तिच्या अश्या कृतीवर हसतो आणि दरवाजा खोलून बाहेर पडतो...भावना चा अजिबात मूड नसल्याने ती हाताची घडी घालून गप्प आतमधे बसते...

"आता तू उतरते खाली की लावू फोन घरी..."मृत्युंजय तिला फोन दाखवत बोलतो...त्याच्या हातात फोन पाहून ती लगेच गाडीच्या बाहेर पडते...

"काय काय करेल ना काय माहिती हा माणूस...😣पण मी स्वतःच केला ना हा प्लॅन आता मला भोगावेच लागेल...याला म्हणतात स्वतःच्या पायावर दगड मारणे...😏मी पण भावना सावंत आहे सोडणारच नाही बघ तुला आता..."भावना मनात स्वतःशीच बोलत असते...

"चल बोलून झाले मनात तर...😅काय आहे ना मला सगळं कळत तुझ्या मनात काय चालू आहे ते..."मृत्युंजय हसतच बोलत तिचा हात पकडतो...ती रागातच त्याच्या हातातुन हात सोडवत असते पण त्याच्या त्या भारदस्त हातापुढे भावनाच्या नाजूक हात चालले नाही...म्हणून ती वैतागतच त्याच्यासोबत जाते...मृत्युंजय तिला एका private सेकंशनला घेऊन येतो आणि तिथे असलेल्या एका चेअरवर तिला बसवतो...स्वतः तो हसतच तिच्यासमोरच्या चेअरवर बसतो...थोडावेळ दोघ ही गप्प बसतात...

"तुम्ही माझ्याशीच का लग्न करत आहात?म्हणजे तुम्ही एवढे मोठे बिझनेसमन आणि दिसायला पण एवढे चांगले आहात ना म्हणून आपलं सहजच विचारलं..."भावना शांतता भंग करत कसनुसपणे हसतच त्याला विचारते...तिचा प्रश्न त्याला अपेक्षित होता...म्हणून तो स्वतःचे दोन्ही हात टेबलवर ठेवतो...तो थोडासा विचार करत असतो...

"काय आहे ना प्रिन्सेस तू माझं पहिल प्रेम आहे लहानपणापासूनच...ते सुद्धा खर वाल...तुझ्या बद्दल ज्या फिलिंग आहेत त्या इतर मुलीबद्दल नाही आहेत म्हणून मला तुझ्याशी लग्न करायचे आहे...बिझनेस आणि चांगला चेहरा पाहून इतर मुली माझ्यावर प्रेम करायला लागतात...पण मला माहिती आहे ना माझी प्रिन्सेस अजिबात तशी नाही आहे तिचा माझ्यावर कितीही राग असला ना तरीही मी एकदिवस तिला माझ्या प्रेमात पाडेल...कारण मला माझ्या प्रेमावर विश्वास आहे..." मृत्युंजय एकदम शांतपणे बोलतो...त्याच्या मनात मात्र एक अनामिकच भीतीची चाहूल त्याला लागत होती...तो खूप शांत पणे भावना बद्दल बोलत होता आणि इकडे आपली भावना मोबाईल मध्ये गेम खेळत होती...तिने अजिबात त्याचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे केले कारण तो काय बोलत होता हे तिला अजिबात ऐकण्यात इंटरेस्ट नव्हता...मृत्युंजय ने भावनाकडे थोडं नाराज होऊन पाहिले...

त्याने तसच वेटरला ऑर्डर देऊन तिचे आणि स्वतःचे फेवरेट जेवण मागवले...जेवण आल्यावर भावना ने हळूच मोबाईल मधून डोकं वर काढलं आणि पाहते तर तिच्या फेवरेट जेवण होते...जेवण पाहून तर भावनाने मोबाईल बाजूला ठेवला...

"हे जय तुम्हाला अजूनही माहिती आहे मला काय आवडते...you are ग्रेट यार...तुम्हाला जी पण मुलगी मिळेल ना ती खरच खूप लकी असणार..."भावना excite होतच बोलते...तिच्या तोंडातून जय ऐकून मृत्युंजयला भरपूर आनंद होतो...कारण तिला लहानपणी त्याचे नाव घेता येत नसायचे म्हणून ती त्याला जय म्हणायची...पण त्याने तो आनंद तिला दाखवला नाही...तो तसाच मान खाली घालून खाऊ लागला...

"भावना सॉरी यार मला मनात नसताना अस तुझ्यासोबत वागावे लागत आहे...काय करणार प्रेम आहे ना माझे तुझ्यावर मला अजिबात कोणती रिस्क घ्यायची नाही आहे तुझ्याबाबतीत म्हणून आसपास रहावे लागत आहे तुझ्या...मी असताना तुला काहीच होऊ देणार नाही..."मृत्युंजय भावनाला पाहत जेवण करत मनातच बोलतो...त्याला भावनाचा हसरा चेहरा पाहून खूप भारी वाटत असते...

"तुम्ही तुमच्या प्लेट कडे बघत खावा...😒मी अजिबात देणार नाही आहे माझी प्लेट हा..."भावना त्याला स्वतःकडे पाहताना पाहून बोलते...तिच्या त्या बालिशपणावर तो गोड अस हसतो...

"किती क्युट आहे ग तू...खा तुझं तू...मला नको आहे..."मृत्युंजय टिशूने स्वतःचे हात पुसत बोलतो...त्याचे जेवण झाल्याने तो मोबाईलवर काही तरी काम करत असतो...भावनाचे जेवण झाल्यावर दोघही त्या हॉटेल मधून बाहेर पडतात...मृत्युंजय तिला तसच शॉपिंगला नेतो...

शॉपिंग हा विषय भावनाचा नावडता होता...हे त्याला माहिती होते पण तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी तो तिला घेऊन आला होता...तो उगाच भावनाला तिथे मॉल मध्ये फिरवत होता...

"मृत्युंजय खूप होत आहे हा तुमचे...😣हवे ते खरेदी करा आणि मला जाऊ द्या घरी...मला अजिबात आवडत नाही शॉपिंग करायला...i hate this मी वाटल्यास मम्मीला पाठवते शॉपिंगला पण मी नाही आता कुठेच येणार तुमच्यासोबत..."भावना चिडतच त्याला बोलते...तिचे बोलणे ऐकून तो बिल पे करतो आणि बॅग्स हातात घेतो...

"चल आता...किती विचित्र आहे ग तू???तुला चक्क शॉपिंग आवडत नाही...हा तर मुलींचा फेवरेट विषय असतो..."मृत्युंजय तिला बोलतो...

"प्रत्येक मुलीला आवडत अस नाही ना...😒मला विचित्र म्हणायचे नाही तुम्ही हा आधीच सांगते...एकतर माझ्याबद्दल काही माहिती नसताना तुम्ही माझ्यासोबत लग्न करत आहात हेच मला आवडत नाही आहे..."भावना  अस बोलून मॉलच्या बाहेर येऊन गाडीत बसते...तिचे वागणे जरा मृत्युंजयला वेगळेच वाटतं होते...पण तरीही तो सहजासहजी हार मानणार नव्हता...तो तसाच गाडीजवळ आला आणि सगळे बॅग्स गाडीत ठेवून त्याने ड्रायव्हरला गाडी तिथून बाहेर काढायला सांगितली...

"काय माहित पाहिजे मला प्रिन्सेस बोल ना तू?"मृत्युंजय अचानकपणे तिला विचारतो...त्याच्या विचारण्याने ती गुढपणे हसते...

"हे बघा मृत्युंजय तुम्हाला माझ्याबद्दल काहीच माहिती नाही आहे राव...😅म्हणजे मला काय आवडत वगैरे तर कस आपलं नात बनेल ना..."भावना गुढपणे हसतच बोलते तसा तो विचार करतो...

"आता तर ह्यांना माझ्याबद्दल काही माहिती नसले तर मला हेच कारण पुरेसे आहे लग्न मोडायला...😆यांना बहुतेक माझ्याबद्दल काहीच माहिती नसणार जिथे माझ्याबद्दल माझ्या घरातल्याना माहिती नाही मग यांना कसे माहिती असेल ना...😚"भावना मनातच स्वतःशी खुश होत बोलते...

"हा तर भावना तुझा फेवरेट हिरो महेशबाबू आणि हिरोईन समानता आहे...संस्कृत भाषा ही तुझी फेवरेट भाषा आहे...कथक,डान्स,पेंटिंग हे तुला खुप आवडतात... किचनमध्ये जाऊन नवीन रेसिपी बनवणे हे पण तुला आवडते...तु एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे...आधीपासूनच एक हुशार टॅलेंटेड असल्याने लँन्सीला तू बनवले आहे₹...अजूनही तुला नवीन शोध लावायला आवडतात...तुझी ही लहानपणापासूनची आवड आहे...अजून तुझे आवडते....."मृत्युंजय बोलत असतो पुढे तेवढ्यात ती त्याच्या तोंडावर हात ठेवते...

"अहो बस बस 😰किती माहिती आहे...phd करणार आहात का माझ्यावर आता?"भावना शॉकमध्येच त्याला बोलते...तिने तोंडावर हात ठेवल्याने तो गप्पच बसतो...

"एवढं सगळं कसं माहिती तुम्हाला माझ्याबद्दल?CID Officer तर नाही आहात ना तुम्ही..."भावना त्याच्या तोंडावर हात ठेवतच त्याला विचारते...तो उत्तर देत नाही हे पाहून ती चिडते...

"अहो आता बोला ना मगासपासून तर बोलत होतात तुम्ही आणि आता का गप्प आहात...😡"भावना चिडतच बोलते...तिने स्वतःच त्याच तोंड धरले होते मग तो कसा बोलेल ना...😜हे पण तिच्या लक्षात नव्हते...तिचा राग पाहून आता त्याला पण थोडासा राग येतो...तो रागातच तिचा हात बाजूला काढतो...

"पागल आहे का तू असा हात ठेवल्यावर कोण बोलेल ना...?मी CID वगैरे नाही आहे...तुला ओळखतो म्हणून तुझी माहिती काढली...उगाच या छोट्या मेंदूला त्रास देऊ नको..."मृत्युंजय थोडस चिडत तिला बोट उगारत बोलतो...त्याचे चिडणे पाहून ती गप्पच बसते...आता त्याचा मूड पण भावनाने खराब केल्यामुळे तो तीला तिच्या घरी सोडतो आणि आपल्या घरी निघून जातो...

भावना घरात येते आणि फ्रेश होऊन सोफ्यावर बसते...तिचे आई बाबा तिला अस बसलेले पाहून शॉक होतात...ती मात्र टॉम अँड जेरी कार्टुन टीव्ही वर पाहत हसत असते...तिची आई तिच्याजवळ येते आणि रिमोट घेऊन tv बंद करते...ते पाहून भावना आईकडे पाहते...

"काय झालं आज तुमच्या दोघांचे असे का पाहत आहात मला?"भावना दोघांना स्वतःजवळ पाहताना पाहून विचारते...

"आज तू जयसोबत गेली होती ना?काय झाले त्याचे?"भावनाची आई विचारते...

"गेले होते पण त्याला मी आवडत नाही त्याला दुसरी मुलगी आवडते म्हणून ते आता लग्न मोडणार आहे आणि त्यांना आवडणाऱ्या मुलीसोबत लग्न करणार आहे...😔हे सांगायला त्यांनी मला बोलावले होते...बिचाऱ्याचे प्रेम वापस आले ना म्हणून मला दया आली त्यांची आणि मी सांगितले नकार देते म्हणून...मम्मी पप्पा उद्या आपण जाऊन त्यांना नकार कळवूया...अस बर नसत ना दोन जीवांना वेगळं करणे त्याचे पाप मला नको ना म्हणून मी त्यांना बोलली नकार देते ते...बिचारे भरपूर रडत होते ग...😞मला खूप वाईट वाटलं..."भावना खोटं खोटं चेहरा पाडत नाटकी स्वरात बोलते...तिचे ते बोलणे ऐकून भावनाची आई पण इमोशनल होते...

"किती गुणी बाळ ग माझं ते सगळयांचे विचार करत असते...आपण नक्की नकार कळवूया हा...यापेक्षा चांगला मुलगा तुला पाहू हा..."भावनाची आई इमोशनल होत बोलते...ती तशीच बोलून रूममध्ये निघून जाते...इकडे भावनाचे बाबा तिच्याजवळ येतात...

"काय होत हे का अस वागते तू?मला माहिती आहे भावना
मृत्युंजय अस काही बोलणार नाही तरीपण तू का त्याला अशी छळत असते..."भावनाचे बाबा तिच्याजवळ बसत तिला विचारतात...

"कारण मला नाही जायचे तुम्हाला सोडून...😢मला कोणाशीच लग्न करायचे नाही...त्याच्याशी मी लग्न केले तर मला तुम्हाला सोडून देशाच्या बाहेर जावे लागणार...तुम्ही इकडे आणि मी तिकडे सातासमुद्रापार ते मला नाही पाहिजे म्हणून नको मला मृत्युंजय..."भावना इमोशनल होत बोलते...तिच्या बाबांना मुलीच्या अश्या वागण्यावर हसू येते...ते तसेच तिला जवळ घेतात...

"अरे वेड माझं बाळ ते आम्ही किती दिवस तुला पुरणार ना ...कधी ना कधी आम्ही जाऊच मग तेव्हा तू एकटी पडायला नको...म्हणून तुझं लग्न लावत आहे...कधितरी जावेच लागेल ना म्हणून आता पाहत आहोत आणि मृत्युंजयच तुझ्यावर भरपूर प्रेम आहे म्हणून त्याला तुझ्यासाठी निवडले...मुलं काय खूप मिळाले असते बाळा...पण त्याची ओळख आणि प्रेम तुझ्यावर असणे असा मुलगा भेटणे कठीण होते...जयने स्वतः येऊन त्याचे प्रेम कबूल केले ना तुझ्यावरचे म्हणून आम्ही पुढाकार घेतला...तुला नाही आवडल तर पाहू आपण...तुझ्या मर्जीशिवाय तो लग्नाची तयारी पण करणार नाही अस प्रॉमिस केलं मला...बघ आता तुला काय करायचे ते हा...पण आता काय भारी फसवलं तू मम्मीला...😂ग्रेट आहेस...बघू काय होते आता पुढे आपण..."भावनाचे बाबा थोडस समजावत तिला बोलतात...शेवटच्या ओळी ते हसून बोलतात...

"Love you dad...तुम्हीच माझे पप्पा आहात ती मम्मी तर जावयाला घेऊन बसली आहे डोक्यावर...😣"भावना थोडीशी वैतागत बोलते...तिच्या या बोलण्यावर बाबा हसतात आणि एक तिच्या डोक्यात टपली मारून निघून जातात...भावना आपली पुन्हा tv ऑन करून टॉम अँड जेरी पाहत बसते...काही वेळाने कार्यक्रम संपतो...तशी ती रूममध्ये जाते...पाहते तर लँन्सी ने पूर्ण रूम खराब केली होती...

"हे लँन्सी काय केलं तू हे...अग तुला मी चांगल्या साठी तयार केलं हे असा पसारा मांडण्यासाठी नाही केलं होतं...आता गपचुप पणे आवर तू...😣"भावना लँन्सीला ओरडत बोलते...

"हेय भावना रूममध्ये उंदीर घुसला आहे मी त्यालाच शोधत आहे..."लॅन्सी बोलते...तिचे बोलणे ऐकून भावना पळतच एका ठिकाणी जाते...

"ओ नो माझ्या विवानच खराब केलं...😢आता मी काय करू हे कुठे मिळणार पण नाही..."भावना काही तरी हातात धरत दुःखी होऊन बोलते...ती तसच ते उचलून सरळ करून ती कपाटात ठेवते...

"हेय रिलॅक्स भावना मी धरते उंदीर आणि मारून टाकते..."लँन्सी भावनाला दुःखी झालेलं पाहून बोलते...तिचे बोलणे ऐकून भावना डोळे पुसते...

"ऐ अस काही करायचे नाही हा तू...त्याला मारायचे नाही त्याला प्रेमाने बाहेर सोडून ये...त्याला पण जगण्याचा अधिकार आहे...😊"भावना थोडीशी काळजीने आणि प्रेमाने बोलते...तिचे बोलणे ऐकून लँन्सी गप्प रहाते...ती तशीच उंदीर शोधते आणि त्या उंदराला बाहेर सोडून येते...ते पाहून भावना खुश होते...ती आनंदातच तिला मिठी मारते...

"माझी शहाणी लँन्सी ती किती भारी काम केलं तू...त्याला काही हानी न करता तू सोडून आली...मला म्हणून तू खूप आवडते...I love you लँन्सी..."भावना हसतच तिला बोलते...तीच ते वागणे आणखीन कोणीतरी पाहत होते...ती व्यक्ती भावनाचा बालिशपणा आणि तीच उंदराप्रतीची असलेली काळजी पाहून गालातच हसत होती...का माहिती नाही पण भावनाचा विचित्र वागणं त्या व्यक्तीला भरपूर आवडत होते...त्या व्यक्तीने तसच पुढे होऊन स्वतःच्या लॅपटॉपवर स्वतःचे ओठ टेकवले आणि बाजूला झाली...का कोणास ठाऊक माहिती नाही पण इकडे भावनाला देखील ते फिल झालं...तिने लँन्सी पासून दूर होऊन गालावर उलटा हात फिरवला...ते पाहून ती व्यक्ती पण शॉक झाली...

"देवानेच आपली जोडी बनवली आहे...पण तुला ते मान्य नाही...फिल तर तुला पण होत आहे...पण डोक्यात घुसत नाही तुझ्या...का अशी वागत आहे माहिती नाही...पण एकदिवस नक्कीच तुला कळेल आणि त्या दिवसाची मी वाट पाहीन...किती क्युट आहे यार तू...😍उंदराची एवढी काळजी...आजपर्यंत भरपूर लोक पाहिले पण तुझ्यासारखं पिस नाही पाहिलं...😂अशी कशी ग तू आहे?पण हा विवान कोण आहे बर...🙄माझ्याकडून कस हे नाव सुटलं...बाकीच्या सर्वांना मी ओळखतो पण विवान कोण?का त्याच्यासाठी तुझ्या डोळ्यात पाणी आले...???बॉयफ्रेंड वगैरे तर नाही ना?मृत्युंजय हे शोधले पाहिजे तुला...ही पोरगी ना कशी आहे देव जाणे...पण हिला तर तुलाच सांभाळावे लागेल..."मृत्युंजय लॅपटॉपकडे पाहत बोलतो...

हो तो मृत्युंजयच होता...ज्याने लँन्सीच्या मदतीने भावनावर लक्ष ठेवण्यासाठी लँन्सीमध्ये कॅमेरा लावला होता...त्याला भावनाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायचे होते म्हणून त्याने अस केलं होतं...लँन्सी ने भावनाचे तिच्या आई बाबांसोबत चालेल बोलण पण त्याला लपून छपून दाखवले...भावनाचे बोलणे ऐकून तो स्वतःच शॉक झाला होता...पण जेव्हा तिचे आई वडिलाप्रतीची काळजी पाहून तो काहीतरी स्वतःशीच ठरवतो आणि लॅपटॉप बंद करून झोपी जातो...इकडे भावना पण रूम आवरुन मस्त अशी आनंदात झोपी जाते...
*************************

दुसऱ्या दिवशी भावना लवकर उठते आणि स्वतःच सगळं आवरुन तयार होते...ती तशीच मस्त तयार होत असते...तेवढ्यात तिची आई तिथे येते...

"भावना हा डब्बा आणि बॉटल...😊जा उशीर होत असेल ना ऑफिसला म्हणून आज मी केल..."भावनाची आई तिच्याजवळ येत डब्बा,बॉटल देत बोलते...

"मम्मा सॉरी मी उठली होती पण ऑफिसच काम आवरत बसली होती...त्यात आज नविन बॉस येणार आहेत कंपनीत...मानसी सांगत होती खूप खडूस आहे तो बॉस...त्याला सगळं वेळेवर लागत आणि कामात चुका चालत नाही म्हणून सगळं करत बसली होती..."भावना स्वतःचे फाईल बॅगमध्ये ठेवत बोलते...

"अस आहे तर मग लवकर निघ..."भावनाची आई...तिचे बोलणे ऐकून भावना पटकन सगळ आवरुन बॅग घेऊन बाहेर पडते...ती स्कूटीला चावी लावते आणि भुर्रकन फास्ट स्पीडने ऑफिसच्या दिशेने जात असते...

तीला एवढं सगळं करून देखील उशीरच होतो ऑफिसला पोहचायला...कारण ऑलरेडी नवीन बॉसच्या गाड्या आलेल्या असतात...हे तिला पार्किंग मध्ये लावलेल्या गाड्यांना पाहून समजते...ते पाहून थोडीशी ती घाबरते...ती तशीच स्कुटी पार्किंग करून धावतच ऑफिसच्या बिल्डिंग मध्ये पळते...ती लेट आल्याने सगळे तिलाच पाहत असतात...

"मॅडम तुम्हाला नवीन बॉसने केबिनला बोलवल आहे..."एक मुलगी भावना जवळ येत बोलते...तिचे बोलणे ऐकून आता ती जास्तच घाबरते...पण स्वतःला सावरून ती केबिनच्या दिशेने जाऊ लागते...

"ऐ बाप्पा प्लीज आजच्या दिवस मला वाचव...😣मला कधीच उशिर होत नाही पण आज झाला...आता नवीन बॉस कडून पहिल्याच दिवशी इज्जतीचा फालुदा नाही करायचा आहे...फक्त आजच सांभाळून घे हा...किती फास्ट आली तरीही उशीर झालाच मला...आता मी तरी काय करणार ना रस्ता थोडीच माझ्या बापाचा आहे...त्यावर किती ती गर्दी गाड्यांची बापरे म्हणून मला उशीर झाला...पण नवीन बॉसला हे सांगितले तर तो मला वेड बोलेल...ही पोरगी कसले कारण सांगते वगैरे..." भावना स्वतःशीच बडबडत केबिनच्या आतमध्ये पण आली होती...तरीही तीच बडबड करणं चालूच होते...हे पाहून पुढील माणूस वैतागतो...

"ओ मिस भावना सावंत तुम्ही गप्प बसायचे काय घेणार आहात...?"एक जबरी पुरुषाचा आवाज तिच्या कानावर पडतो...त्या आवाजाने ती दचकून भानावर येते आणि मान वर करून समोर पाहते आणि जबरदस्त शॉक होते...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
          ©®भावना सावंत(भूवि❤️)
*********************************

Rate & Review

Karuna magare

Karuna magare 2 months ago

Sanap Sambhaji

Sanap Sambhaji 5 months ago

Rajendra Raut

Rajendra Raut 5 months ago

mangal veer

mangal veer 5 months ago

madhuri devarde

madhuri devarde 5 months ago