Janu - 8 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | जानू - 8

जानू - 8


अभय च जानू वरच प्रेम दिवसेंदिवस वाढू लागलं होत व जानू चा अभय वरचा राग वाढत होता .चाळीत बरेच जण आता तिला चिडवत होते.अभय च्या अशा एकटक पाहण्याने तिला खूप अवघडून गेल्या सारखं होत होत..बाबा ना कोणी काही बोललं तर उगाच परत घरात टेन्शन आणि जर बाबा नी आपल कॉलेज च बंद केलं तर ?या विचारांनी ती खूप गोंधळून गेली होती..पण अभय त्याच तर वेगळच विश्व कोण काय म्हणत कोण काय बोलत याच्या कडे लक्ष तो देत कुठे होता ? आणि याचाच राग जाणूच्या मनात भरत होता.

आज जानू चा वाढदिवस होता ..अभय खूप खुश होता ..जानू ला काय द्यावं हे तर त्याला कळतच नव्हतं...खूप विचार करून करून शेवटी त्याने एक शुभेच्या कार्ड घेतलं होत ..त्यावर फुलांची छान शी डिझाईन होती ..आत मोठ्या अक्षरात वाढदिवसाच्या शुभेच्छा लिहल होत .जानू च कॉलेज होत .. नेहमी प्रमाणे जानू आवरून कॉलेज ला निघाली होती .अभय ही आज लवकर उठून तयार झाला होता तो जानू जाण्याची वाटच पाहत होता.जानू जाताना दिसली तसा तो तिच्या मागे पळतच गेला व तिच्या जवळ जात बोलला.

अभय:जानू ,वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या ..

त्याने धापा टाकतच म्हटलं..तो पळत आला होता त्यामुळे त्याचा दम भरला होता.त्याने लगेच शुभेच्छा कार्ड तिच्या समोर धरल .

जानू ने मागे वळून पाहिलं.तिने कार्ड हातात घेतलं आणि अभय ने शुभेच्छा देण्यासाठी पुढे केलेला हात पाहून ती त्याला एक शब्द ही न बोलता पुढे निघून गेली.
आज दिवस भर जानू खूप टेन्शन मध्ये होती..कारण अभय तिच्या मागे आलेला त्याने कार्ड दिलेलं ..शेजारच्या काकांनी पाहिलं होत ..तिला आता बाबा आठवू लागले होते ..काय बोलतील ते आपण काय उत्तर देणार ? कॉलेज ला च जावू नको म्हंटले तर काय करायचं? अनेक प्रश्न तिच्या डोक्यात फिरत होते .अभय च ही तेच हाल होत .. जानू आपल्या सोबत का बोलली नाही? ..साधं तिने thanks पण बोलू नये?

संध्याकाळी जानू ने मिहू ला घरी बोलावलं.

जानू:मिहिर माझं एक काम करशील ?

मिहिर : हा सांग ना दीदी .

जानू ने बॅग मधून सकाळी अभय नी दिलेलं कार्ड काढलं आणि ते मिहिर ला दिलं .

जानू: हे कार्ड अभय दादा ला देऊन येशील.

मिहिर ला वाटलं जानू च कार्ड अभय ला देत आहे त्याला वाटलं दादा खुश होईल..तो पळतच अभय च्या घरी गेला ..त्याने ते कार्ड अभय ला दिलं..कार्ड परत दिलेलं पाहून अभय ला काहीच कळेना .

मिहिर : दादा तुझी ते मजा आहे दीदी न तुला कार्ड दिलं.

अभय: तू कार्ड का घेऊन आलास ? गाढवा मीच सकाळी तिला दिलं होत .. तिचा वाढदिवस आहे आज म्हणून आणि तू परत घेऊन आलास ?

आता मिहिर ला आपली चूक कळली ..अभय नी त्याला परत जानू च्या घरी पाठवलं..कार्ड परत का दिलं ? हे विचारायला..पण जानू ने मला नकोय इतकंच सांगून त्याला परत पाठवल..जानू ने जे सांगितलं ते मिहिर ने अभय ला येऊन सांगितलं..अभय ला खूप वाईट वाटत होत ..का जानू अशी का वागली ? फक्त एक कार्ड च होत ते ..खूप उदास होता तो ..त्याने कार्ड परत का दिल हे जानू ला विचारायचं अस ठरवल.

जानू ने कार्ड परत का दिलं हे अभय तिला विचारायचं ठरवतो पण जानू शी बोलायचं कसं ? दुसऱ्या दिवशी जानू नळावर पाणी भरायला जात असते ..अभय तिला पाहतो आणि तो ही नळावर जातो ..जानू काहीच बोलत नाही..मग अभय च विचारतो ..जानू,कार्ड परत का दिलं?
जानू ला राग येतो ..ती रागातच त्याला बोलते.

जानू:तुला काही कळत का नाही रे ?काय गरज होती कार्ड देण्याची ?

अभय: अग ,तुझा वाढदिवस होता म्हणून ..

जानू: मग ,काय झालं ? तुला तर काहीच कळतं नाही रे ..शेजारचे काका तुझ्या मागेच होते ..त्यांनी पाहिलं तू कार्ड देताना.

अभय: पाहू दे ना ..त्यात काय एक कार्ड तर होत.

जानू ला त्याचं बोलणं ऐकून परत राग येतो ..ती तिथून निघून जाते ..
अभय ला जानू अस रागात गेलेलं पाहून खूप दुःख होत ..खूपच उदास होतो तो . पण त्याच वेड काही कमी होत नाही ..आता जानू त्याच्याशी बोलणं ही टाळत असते .. पण त्याला अजिबात तिचा राग येत नाही..ती बोलत नसली तरी आपण रोज तिला पाहतो यातच त्याचं सुख ..तिच्या चेहऱ्यावरची स्मआईल म्हणजे अभय च्या सर्व दुखावरच औषध..ती खुश तर अभय खुश ती उदास तर अभय उदास.

दिवाळी सणाला जानू ने एक पिवळ्या रंगाचा चुडीदार घेतलेला ..तो तिला इतका छान दिसत असतो की अभय ला फक्त जानू ला पाहत बसावस वाटत असत..तो तिला दुरून पाहतो .. व अगदी तसाच तिच्या ड्रेस ला मॅच होईल असा शर्ट स्वतः ला घेऊन येतो .
जानू आणि अभय च बोलणं आता बरच कमी झालं होत ..पण अभय मात्र सतत तिच्या विचारात ,तिच्या काळजीत दंग असायचा.

कॉलेज सुटलं होत जानू मैत्रिणी सोबत स्टँड वर आली होती ..अभय ही आज लवकरच स्टँड वर आला होता. .कॉलेज चे लेक्चर बुडवून जानू ला पाहण्यासाठी तिच्या सोबत घरी जाण्यासाठी ..बस आली ..जागा भरपूर होती त्यामुळे सर्वजण एक एकटे सिट वर बसले होते.. अभय ही जानू च्या सिट मागे ती दिसेल असा बसला होता.जानू खिडकी कडेला बसली होती ..खिडकीला डोकं टेकवून ..तिचा चेहरा उदास होता.. अभय ला खूप वाटलं तिला विचाराव ..ती उदास का आहे ? पण तिच्या मैत्रिणी बस मध्ये आहेत ..आता बोललं तर परत जानू ला राग येईल ..म्हणून तो शांत बसून होता ..फक्त तिला निहाळत ..

इतक्यात बाहेर पाऊस सुरू झाला..जानू शेजारची खिडकी थोडीशी उघडी होती त्यातून पाणी जानू च्या अंगावर उडत होत..बराच वेळ ती खिडकी बंद करायचा प्रयत्न करत होती पण खिडकी बंद होतच नव्हती... अभय बराच वेळ झाला तिची धडपड पाहत होता.. न राहून तो तिच्या समोर आला आणि त्याने ती खिडकी बंद केली..
जानू ने त्याच्या कडे पाहिलं ..खूप राग होता तिच्या डोळ्यात ..ती अभय वर ओरडली.

जानू: तुला कोणी सांगितलं बंद करायला ?

अभय ला जानू इतकी चिडलेली पाहून काय बोलावं तेच कळेना ..पण तिचा राग पाहून ..हदय यात हजार सूया टोचाव्या अस त्याला वाटलं ..तो शांत पने जाऊन आपल्या सिट वर बसला..जानू ने त्याने बंद केलेली खिडकी परत उघडी केली आणि त्यातून येणाऱ्या पाण्यात ती तशीच भिजत राहिली.

अभय च मन खूप तुटलं होत आज ..का जानू इतका राग करते माझा? मी इतका वाईट आहे का ? नेहमी हसणारी जानू ...आज तिच्या डोळ्यात किती राग होता आपल्या साठी ..का ? तिला त्रास होत असेल तर नको आपण तिला त्रास होईल अस वागायला ..आपण तिला दुरूनच पाहून खुश राहू.. जानू खुश असली ..तिच्या चेहऱ्यावर हसू असेल तर बस अजून काय हवं आपल्याला..?
आज जानू ला ही स्वतः चा राग येत असतो ..का इतकं का चिडलो आपण अभय वर बिचारा आपली मदतच तर करत होता..कॉलेज मधला राग आपण त्याच्या वर काढला..खरंच मी खूप वाईट आहे ..कशाला उगाच ओरडले त्याच्या वर .. सॉरी बोलू का त्याला? ह म म..उद्या च बोलू ..पण नको ..तो परत काही तर वेगळं समजायचं .. त स् ही तो अलीकडे खूपच वेड्यागत वागत आहे. .येऊ दे राग आला त्याला आपला तर ..निदान तो त्याच वेडेपण तर सोडेल...नकोच सॉरी बोलायला..हो ..नाही बोलायचं त्याला सॉरी.

क्रमशः


Rate & Review

Swati Jagtap

Swati Jagtap 11 months ago

Vijay

Vijay 12 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 12 months ago