तू अशीच जवळ रहावी... - 6 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - 6

तू अशीच जवळ रहावी... - 6

"ऐ बाप्पा प्लीज आजच्या दिवस मला वाचव...😣मला कधीच उशिर होत नाही पण आज झाला...आता नवीन बॉस कडून पहिल्याच दिवशी इज्जतीचा फालुदा नाही करायचा आहे...फक्त आजच सांभाळून घे हा...किती फास्ट आली तरीही उशीर झालाच मला...आता मी तरी काय करणार ना रस्ता थोडीच माझ्या बापाचा आहे...त्यावर किती ती गर्दी गाड्यांची बापरे म्हणून मला उशीर झाला...पण नवीन बॉसला हे सांगितले तर तो मला वेड बोलेल...ही पोरगी कसले कारण सांगते वगैरे..." भावना स्वतःशीच बडबडत केबिनच्या आतमध्ये पण आली होती...तरीही तीच बडबड करणं चालूच होते...हे पाहून पुढील माणूस वैतागतो...

"ओ मिस भावना सावंत तुम्ही गप्प बसायचे काय घेणार आहात...?"एक जबरी पुरुषाचा आवाज तिच्या कानावर पडतो...त्या आवाजाने ती दचकून भानावर येते आणि मान वर करून समोर पाहते आणि जबरदस्त शॉक होते...

"तुम्ही....तुम्ही....इथे...पण...😱"भावना घाबरतच बोलते...

"माझं ऑफिस आहे हे आणि मी इथे नाहीतर काय तुमच्या घरी असायला हवं का?😡एकतर ऑफिसला यायला 10 मिनिट लेट केला आणि वर मलाच विचारत आहात..."तो माणूस रागातच तिला विचारतो...

"सॉरी मृत्युंजय...😞पुन्हा अस होणार नाही..."भावना त्याच्याकडे पाहत थोडीशी घाबरत बोलते...

"माझं नाव घ्यायला मी काय तुमचा बॉयफ्रेंड किंवा नवरा नाही आहे...मी तुमचा बॉस आहे...त्यामुळे सरच बोलायचं😤''मृत्युंजय चेअरवरून उठत तिला बोलतो...त्याचा असा राग पाहून ती घाबरते पण मृत्युंजयला अजिबात दया वगैरे येत नाही कारण तो आता ऑफिसमध्ये होता आणि त्याच्यासमोर आता ती फक्त एम्प्लॉयी होती...आता ती देखील त्याला इतर एम्प्लॉयी प्रमाणे होती...म्हणून तो एम्प्लॉयी समजून तिच्यावर चिडत होता...पण त्याच चिडण पाहून तिला खूप वाईट वाटते...का ते माहित नाही पण लगेच स्वतःला भानावर आणत ती त्याच्याजवळ चालतच जाते आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून ती त्याच्यासमोर चुटकी वाजवते...

"तुम्ही आज बॉस आहे ना म्हणून वाचला आहात...😡तूम्ही का माझ्या बॉयफ्रेंडचा विचार करता आहात...ते मी आणि माझा बॉयफ्रेंड बघून घेईन तुम्ही अजिबात माझ्या आयुष्यात दखल द्यायची नाही...मला माहिती आहे ना हे पण तुम्ही मुद्दाम केलं आहे कारण मला दाखवायला मी किती श्रीमंत आणि तू किती मध्यमवर्गीय वगैरे...😡एक गोष्ट नक्की सांगेन मी मरून जाईन पण तुमच्याशी लग्न अजिबात करणार नाही....."भावना बोलत असते पण तेवढ्यात मृत्युंजय तिच्या तोंडावर स्वतःचा हात ठेवतो...कारण तिचे ते बोलणे ऐकून त्याला कसतरी झाले...जस त्याच्या हृदयावर कोणीतरी तलवारीचे वार करत होते असे तिचे शब्द त्याला लागत होते...

"प्लीज नको बोलू अस...तुझा जीव एवढा पण स्वस्त नाही आहे...स्वतः यम जरी आला तरीही मी त्याला माझ्या प्रिन्सेसला अजिबात घेऊन जायला देणार नाही..." मृत्युंजय तिला स्वतःकडे ओढून घेत तिच्या कानात हळुवारपणे बोलतो...पण त्याच्या त्या बोलण्यात देखील एक वेगळेच दुःख आणि काळजी जाणवून येत होते...इकडे त्याने तिला उलट फिरवून मिठीत घेतले होते...त्यामुळे त्याचे गरम श्वास तिला तिच्या कानाजवळ जाणवत होते...त्याच्या अश्या बोलण्याने तिचा राग तर कुठल्या कुठे गायब झाला...केबिनमध्ये एकदम शांतता निर्माण झाली होती...त्याने देखील तसच तिला स्वतःची मिठीत ठेवले होते...त्याला तिचे बोलणे नकोसे वाटत होते...तिचा प्रेसेन्सच त्याला अनुभवासा वाटत होता...त्याची मान तिच्या खांद्यावर असल्याने आणि त्यात  त्याने स्वतःच्या हाताने तिचा नाजूक एक हात धरला होता...तर दुसरा हात तिच्या कंबरेवर होता...या मुळे तिला कसतरी होत होते...ती अंग चोरून एकदम डोळे बंद करून शांत झाली होती...पण त्याच्या मनात चालू असलेल्या भीतीने त्याच्या हाताची पकड घट्ट होत चालली होती...पण तेवढ्यात केबिनच्या दरवाजा कोणीतरी नॉक करते...तसा मृत्युंजय भानावर येतो आणि तिला सोडतो...ती पण त्याच्यापासून पटकन दूर होते...

"येस coming ..."मृत्युंजय वैतागतच बोलतो...कारण अस कोणीतरी त्याला मध्येच डिस्टर्ब केलं होतं...जे त्याला अजिबात आवडले नव्हते...कारण ती कधीच त्याच्या हाताला लागत नव्हती आणि आता लागली तर अस मध्येच डिस्टर्ब केलं होतं...त्याने coming म्हणताच एक सुंदर अशी मुलगी file घेऊन आतमध्ये आली...जीन्स आणि त्यावर व्हाईट कलरचा शर्ट तिने घातला होता...तिचे ते छोटेसे केस तिने मोकळे सोडले होते...तोंडाला खूप सारा मेकअप आणि ओठांना एकदम भडक अशी लिपस्टिक...एकदम मॉडेल टाईप दिसत होती ती...तिला पाहून भावनाचा चेहरा खुलला पण इकडे मृत्युंजय च्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या...ती मुलगी मात्र भान हरपून त्याला पाहत होती...ते पाहून आता मृत्युंजयला तिचा थोडासा राग येत होता...

"मिस मानसी मला पाहून झालं तर हातातील file द्या..."मृत्युंजय थोडस चिडतच बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती भानावर येते आणि पटकन त्याच्या हातात file देते...मृत्युंजय ती file हातात घेतो आणि तसाच चेअरवर style मध्ये बसतो...

"मिस भावना तुम्ही जाऊ शकतात...उद्यापासून अजिबात लेट चालणार नाही मला...आज ऑफिस सुटल्यावर तुम्ही माझ्यासोबत येणार आहात मिटिंगला..."मृत्युंजय भावनाकडे पाहत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून भावना मान हलवून तिथून निघून जाते...कॅबिन मध्ये तो आणि मानसीच असतात तो मानसीला फुल्ल इग्नोर करत होता...पण ती मात्र सारखीसारखी त्याच्याकडेच पाहत असते...

"मृत्युंजय मी आली तर चालेल का...आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत ना आणि तू किती वर्षांनी आला आहे इथे...आज थोडं celebrate पण करू..."मानसी त्याच्याकडे पाहत आनंदात बोलते...

"सॉरी मानसी मला हे जमणार नाही...बाय द वे तुझं लग्न तर झालेच असेल ना..."मृत्युंजय थोडस वेगळ्या टोन मध्ये विचारतो...

"नाही रे मला माझ्या टाईपचा मुलगाच मिळाला नाही...😏तुझं झालं का लग्न...???"मानसी...

"नो पण ठरलं आहे माझं लग्न...फक्त ती मिळाली की कधीही करेन तिच्यासोबत...😊माय चॉईस आहे ती..."मृत्युंजय मुद्दाम थोडस हसत तिला लग्नाबद्दल सांगतो...(काय कारण आहे ते पुढे कळेल...😅)त्याचे बोलणे ऐकून तिचा चेहरा पडतो...

"कोण आहे ती लकी मुलगी???नाव तरी सांग?"मानसी कसनुसपणे हसत त्याला विचारते...

"सॉरी पण मी आता नाही सांगू शकत तिचे नाव..." मृत्युंजय file वाचत तिला बोलतो...

"ओके चल बाय मी येते..."मानसी अस बोलून त्याच पुढच न ऐकून घेता तिथून निघून जाते...ती गेल्यावर मृत्युंजय एक मोठा श्वास घेतो आणि कोणाला तरी कॉल करून थोडस बोलून कॉल ठेवतो...

"भावना तुला मी नाही समजावू शकत तू माझ्यासाठी काय आहे ते...ही कंपनी मला तुझ्यासाठी घ्यावि लागली...तुला अपमानित करण्यासाठी नाही तुझा इन्सल्ट करण्यासाठी नाही घेतली प्रिन्सेस...तू अस कस बोलू शकते यार...मला नाही गमवायचे आहे तुला...भीती वाटते त्या गोष्ठीची मला म्हणून हे उपद्याप चालू आहेत...या मानसीच मला काहीतरी करावे लागेल...चिपकु गर्ल...जिने पाहायला पाहिजे ती तर पाहत पण नाही आणि ही नको असलेली मला पाहत असते...😣आज ना दाखवतोच तुला भावना..."मृत्युंजय स्वतःशीच बडबडत असतो...तो तसाच चेअर वर बसून सगळे विचार झाडून आपलं काम करत बसतो...

तो कसाही असला तरीही कामाच्या बाबतीत पर्फेक्ट होता...अब्जाधीश होता तो...पण ते असून पण तो भावना साठी वेडा होता...त्याला भावनाला काही होऊ द्यायचे नव्हते म्हणून त्याने भावना जिथे कामाला असते...ती कंपनी विकत घेतली होती...तिला रोज पाहता येईल या निमित्ताने त्याने हे सर्व केले होते...
******************

इकडे भावना बाहेर येऊन स्वतःच्या डेस्क कडे जाऊन गपचूप खाली मान घालून काम करत बसते...तिच्यासोबत जे काही आतमध्ये घडलं होत त्याने ती गोंधळली होती...ते सर्व काही आठवून तिच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहतो...काम करता करता तिच्या हातातुन पेन खाली पडत ते पाहून तिच्या बाजूला असलेली मानसी अजीब नजरेने तिला पाहते...

"हे हिरोईन आज लक्ष नाही वाटत तुझं कामात??जय ओरडला म्हणून काय?तो असाच आहे उगाच ओरडत राहतो...लहानपणापासूनच तसा आहे...😏पण आता खूप हॅन्डसम दिसत आहे...खूप चारमिंग आहे तो...I love you Jay..."मानसी आनंदातच बोलते...तिचे बोलणे ऐकून भावना तिला पाहत राहते...

"जान ला जय आवडतो ना पण जय ला मी आवडते... पण जान एकदम पर्फेक्ट आहे त्याच्यासाठी एकदम मॉडेल,रिच टाईप आणि महत्वाचे म्हणजे ही पण लहानपणापासून त्याची फ्रेंड आहे ना?मग जोडून देऊ का यांच?🙄ओ नको नको तो अजून काही करेल माहिती नाही...अस थोडी प्रेम होते ना?पण जय च आणि हीच तर पटत पन नाही मग...🤔आज जयच वागणं अस का होत अजीब?एरव्ही लहानपणी स्पर्श होयचा पण तेव्हा काहीच वाटायचे नाही...पण आजच्या स्पर्शाने मला कसतरीच होत आहे...तो स्पर्श एकदम वेगळा होता...🙄काय होत आहे माझ्यासोबत मलाच कळत नाही...या माणसांपासून मी दूर जाते आहे तर ते जवळ येऊन आणखीन स्वतःचा विचार करायला लावत आहेत..."भावना मनातच स्वतःशी बोलत विचार करत असते...ती काही बोलत नाही हे पाहून मानसी तिच्याजवळ येते आणि तिच्या हातावर हात ठेवते...तशी भावना दचकून विचारातून बाहेर येते...

"अग मी तुला काहीतरी सांगितले आणि तू कोणत्या विचारात गुंतली आहे..."मानसी थोडीशी हसून भावनाला बोलते...

"अग काही नाही जान...पण जयचे लग्न ठरले आहे तरीही तू..."भावना तिच्याकडे पाहत बोलते...

"हेय मी अशीच मस्करी केली...😊नॉट सिरिअस हा..."मानसी जबरदस्ती हसुन बोलते...

"ओह अस आहे तर...चल मला काम करायचे आहे..."भावना पेन उचलत बोलते आणि कामाला लागते...मानसीला मात्र भावनाचे वागणे थोडेसे खटकत होते...कारण आज भावना तिला थोडी वेगळी भासत  होती...

"काही झाले तरी ही जय माझाच आहे...मी काहीही करून त्याला मिळवणारच...ती मुलगी मग भलेही कोणी असली तरीही तिला सोडणार नाही...कारण लहानपणापासून मी त्याच्यावर प्रेम करत आले...असच माझं प्रेम मी सोडणार नाही...😤dad ला सांगावेच लागेल...त्या आधी जयच्या आईपासून सुरवात करते..."मानसी रागातच मनात बोलते आणि कामाला लागते...

इकडे भावनाचे आज अजिबात कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हते...कारण आज तिला मृत्युंजय सोबत जायचे होते...सकाळच्या प्रसंगामुळे ती गोंधळली होती...त्यात पुन्हा त्याच्यासोबत जायला तिचे मन नव्हते...पण त्याने सांगितले आणि त्या तो तिचा बॉस असल्याने तिला नाही म्हणताच येत नव्हते...ती कसतरी संध्याकाळ पर्यंत स्वतःचे सगळे आवरत जयची वाट पहात काम करत बसली होती...अर्ध्याच्या वरती लोक घरी जाण्यासाठी निघाली होती...त्यात जयला पण काही काम  अचानक आले म्हणून तो देखील ऑफिस मधून निघून गेला...पण त्यावेळी भावना कामात गुंतली होती म्हणून तिला ते कळलेच नाही...तिने घड्याळ मध्ये पाहिले तर 7 वाजले होते...ते पाहून ती जयच्या केबिन कडे गेले...

"सर तुम्ही कुठे आहात...???"भावना केबिन मध्ये येत बोलते...तेवढ्यात ऑफिसमधील लाईट अचानकपणे जातात ते पाहून ती घाबरते...

"जय प्लीज अशी मस्करी अजिबात नाही चालत मला...😢भीती वाटते ना मला..."भावना जड आवाजात घाबरून बोलते...कारण पूर्ण ऑफिसमध्ये काळोख पसरला होता...त्यात ती मोबाईल पण डेस्कवर विसरली होती...ती बोलते पण तिला काही प्रतिसाद मिळत नाही म्हणून ती पूर्ण पणे भितीने घाबरते...

"जय तुम्ही खूप वाईट आहात...😢मी अजिबात तुमच्या सोबत बोलणार नाही..."भावना रडतच एकाठिकाणी खाली बसत बोलते...तिला अंधाराचा फोबिया होता हे तिच्या आई वडिलांना माहिती होते...म्हणून ते तिला एकटीला सोडत नव्हते...लॅन्सी त्यासाठीच तिच्या रूममध्ये असायची...तिला सोबत करायची ती...पण आज कोणीच नव्हते तिच्यासोबत हे पाहून ती आणखीन घाबरली होती...मिट्ट काळोखात ती रडतच हुंदके देत तिथेच बसली होती...
********************

भावनाच्या घरी:-

भावनाचे बाबा आपलं काम करून घरी येतात...ते मस्त फ्रेश होऊन भावनाच्या रूममध्ये जातात...पाहतात तर तिथे लँन्सी काहीतरी करत असते...पण भावना कुठेच नसते...

"लॅन्सी काय झालं?"भावनाचे बाबा तिच्याजवळ येत तिला  विचारतात...

"भावना रडत आहे...फोबिया प्रॉब्लेम...हार्टबीट पण फास्ट झाले आहे..."लॅन्सी बोलते...तिचे बोलणे ऐकून तिचे बाबा घाबरतात...

"लँन्सी तुला कस कळलं...ती कुठे आहे...हे सांग मला...मी आता जातो तिथे..."भावनाचे बाबा घाबरून बोलतात...

"Dad शांत व्हा...या device मुळे कळलं...मी जाते तिथे..."लँन्सी अस बोलून आपले एक बटन दाबते आणि काही क्षणात हवेच्या स्पीडने स्वतःचे विल्स काढून  ती धावतच ऑफिसला जाते...ती धावता धावता स्वतःच्या फिचरने कॅबला कॉल पण करून भावनाच्या ऑफिसकडे बोलावून घेते...लँन्सी धावत ऑफिसला पोहचते...

"ओ कोण तुम्ही आणि एवढया रात्री इथे काय करत आहात..."ऑफिसकडे कामाला असलेला वॉचमन लॅन्सीला बोलतो...पण तिला त्याच्यासोबत बोलण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता म्हणून ती सरळ ऑफिसच्या दिशेने जाते...पण तो वॉचमन पुन्हा तिला अडवत असतो...ते पाहून ती त्याला एक पोटात पंच देते...मशीन असल्याने तिचा पंच जबरदस्त त्या वॉचमन ला बसतो आणि तो जमिनीवर कळवळत पडतो...लॅन्सी तशीच चालत त्याच्या जवळ जाते...ते पाहून तो घाबरतो...पण लँन्सी त्याच्याजवळ जाऊन त्याच्या वरच्या खिश्यातुन चाव्यांचा गूच्छा घेते आणि ती तशीच स्वतःच्या विल्सने धावत ऑफिसकडे जाऊन चावी लावून दरवाजा खोलते...सगळ्यात आधी ती स्वतःच्या फिचरने इलेक्ट्रिसिटीच्या एका ट्यूब लाईटच्या कनेक्शनला हात लावते...तशी ती ट्यूब लाईट चालू होते...ती तसच एक एक करून थोडया फार लाईट लावते आणि भावना असलेल्या ठिकाणी जाते...ती समोर पाहते तर भावना जमिनीवर बेशुद्ध होऊन पडली होती...लँन्सी तिच्याजवळ येऊन तिला उठवते...पण भावनाकडून नो रिस्पॉन्स असतो...ती तशीच भावनाला उचलून घेते आणि बाहेर आणते...भावनाला तस आणताना पाहून कॅब वाला ड्राइव्हर आणि वॉचमन लँन्सीला पाहतच राहतो...😱

इकडे भावनाचे बाबा पण भावनाला त्या अवस्थेत पाहून घाबरतात...लँन्सीच्या कॅमेरा फीचर मधून ते दृश्य ते मोबाईलवर पाहत होते...

"लँन्सी भावनाला शर्मा अंकल कडे घेऊन जा...मी पण तिथेच येत आहे..."भावनाचे बाबा तिला ऑर्डर देत बोलतात...त्यांचे बोलणे ऐकून लँन्सी भावनाला कॅब मध्ये टाकते आणि स्वतः तिच्या बाजूला बसून ड्रायव्हर ऍड्रेस देते...ड्रायव्हरने वॉचमन ची हालत पाहिल्याने तो घाबरूनच गाडी काढतो आणि तिथून तिला ऍड्रेसच्या ठिकाणी पोचवायला तयार होतो...

मृत्युंजय बिझी असल्याने याला हे सगळं प्रकरण कळलेच नव्हते...लँन्सी आणि भावनाचे बाबा दोघेच हे सर्व अतिशय उत्तम रित्या काम पार पाडत होते...भावनाचे बाबा आधीच शर्मा अंकल च्या क्लिकला पोहचले होते...ते  आणि शर्मा अंकल बाहेर उभे राहून लँन्सी च्या येण्याची वाट पाहत होते...काही क्षणात लँन्सी भावनाला घेऊन आली...तसे शर्मा अंकल ने स्ट्रेचर मागवून भावनाला गाडीतुन बाहेर काढले आणि लगेच तिला आतमध्ये घेऊन तिच्यावर उपचार करायला देखील सुरवात केली...इकडे भावनाच्या बाबांनी ड्रायव्हरला पैसे देऊन त्याचे आभार मानले आणि ते,लँन्सी भावना जवळ गेले...

"शर्मा काय झाले रे माझ्या मुलीला...???वैशाली ला पण सांगितले नाही रे मी..."भावनाचे बाबा काळजीने बोलतात...

"अरे मित्रा तुला माहिती आहे ना तिला फोबिया आहे...त्यामुळेच तिला त्रास झाला...खूप पॅनिक झाली ती  त्यात तिने काही खाल्ले पण नाही...त्यामुळे अशी अवस्था झाली...पण होईल ती 4 ते 5 दिवसांत बरी...अजिबात तिला बाहेर पडायला देऊ नको...थोडस शांत बसव एकाठिकाणी जरा 5 सहा दिवस...मग बघ ती पुन्हा आधीसारखी होईल...☺️"शर्मा अंकल भावनाच्या बाबांना बोलतात...त्यांचे बोलणे ऐकून भावनाचे बाबा रिलॅक्स होतात...शर्मा अंकलच बोलणे ऐकून भावनाचे बाबा आणि लँन्सी बाहेर येतात...

"लँन्सी तू फक्त मशीन नाही आहेस...तू माझ्यासाठी खूप काही आहे...एका मोठया मुलीसारखी आहेस तू...आज तू नसती तर माझी भावना मला मिळाली नसती...तू खरच खूप ग्रेट आहे..."भावनाचे बाबा लँन्सीकडे येत बोलतात...

"भावनाने मला...तयार...केलं आहे...तिच्यासाठी काहीपण..."लँन्सी ऍक्टिग करत बोलते...तिची ती ऍक्टिन पाहून भावनाचे बाबा थोडे हसतात...

"भावना सोबत आणि त्या कार्टुन सोबत राहून तू पण तशीच झाली आहे...घरात नाटक कंपनीच आहे माझ्या...बर जयला कॉल कर..."भावनाचे बाबा लँन्सीला बोलतात...त्यांचे बोलणे ऐकून लँन्सी नाही मध्ये मान हलवते...ते पाहून भावनाचे बाबा शॉक होतात...

"का नाही करणार?अग त्याला माहिती असल पाहिजे ना हे सर्व?"भावनाचे बाबा समजवण्याच्या सुरात बोलतात... पण तरीही ती नाही मध्ये मान हलवते...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
      ©®भावना सावंत(भूवि❤️)
**************************

Rate & Review

Maithili Ghadigaonkar
Swati Jagtap

Swati Jagtap 3 months ago

Priya Gavali

Priya Gavali 4 months ago

टिना

टिना 4 months ago

Bhavana Sawant

Bhavana Sawant Matrubharti Verified 4 months ago