तू अशीच जवळ रहावी... - 10 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - 10

तू अशीच जवळ रहावी... - 10


जवळ जवळ सहा महिने होत आले तरीही भावना मध्ये काहीच सुधारणा होत नव्हती...तिच्यात काही प्रोग्रेस होत नाही पाहून मृत्युंजय हताश होत होता...पण वाट पाहन काही त्याने सोडले नव्हते...खूप प्रश्न पडले होते त्याला आणि त्याची उत्तरे फक्त तिच्याजवळ होती...तो तसाच तिच्याजवळ बसून राहायचा...तिच्या एका शब्दासाठी, हालचाली साठी तो आसुसला होता...तिच्याजवळ बसून तो तिला सगळ्या आठवणी जाग्या करत होता...पण हाती निराशाच लागल्याने तो आता हतबल झाला...

"प्लीज ना प्रिन्सेस 6 months झाले आणि तू अजूनही काहीच प्रतिसाद देत नाही...माझी प्रिन्सेस एवढी शांत राहणारी कधीच नव्हती...ती तर एकदम धुडधुडी होती...तिला अस झोपणे आवडत नव्हते..."मृत्युंजय प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलतो...

"एकदा बोल ना ग माझ्यासोबत...एक नवरा म्हणून नको पण एक फ्रेंड म्हणून तरी बोल ना भावना...😢मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं फक्त तुझ्याजवळ आहे..." मृत्युंजय थोडस इमोशनल होऊन बोलतो...पण तरीही काही रिस्पॉन्स नाही...

"ओके तुला नाही बोलायचे आणि असाच मला त्रास देऊन सतवायचे आहे ना तर ठीक आहे...मी ना आता तुझी वाट नाही पाहू शकत...तू करतच नव्हती माझ्यावर प्रेम म्हणून तू अशी वागत आहे...😡मी कोण ना तुझा?जाऊ दे तू तुझ्या ठिकाणी बरोबर आहे आणि मी माझ्या...तू आता उठली असती ना तर मला वाटलं असत तुझं माझ्यावर प्रेम आहे पण तुझं नाहीच आहे माझ्यावर प्रेम...ते फक्त माझं होत तुझ्यावर म्हणून वेड्यासारखा सगळं सोडून इथे आलो पण आता नाही भावना...तू आता तुझ्या मर्जीने लग्न कर कोणासोबतही...मी चाललो आता कायमचा इंग्लंडला परत...पुन्हा कधीच येणार नाही तुझ्या आयुष्यात परत...आजवर मी तुला जो काही त्रास दिला असेल त्याबद्दल सॉरी पण आता कधीच तुला पुन्हा मी त्रास द्यायला येणार नाही...मी नाही येणार परत यावेळी...बाय भावना..."जय थोडस कंठ दाटून थोडस चिडून तिला बोलतो आणि तो तसाच रूमच्या बाहेर निघून जातो...सहनशक्ती त्याची संपली होती...प्रत्येक वेळी विचार करून करून त्याच डोकं बंद पडत होते...कितीतरी वेळा तो तिच्याजवळ बसून स्वतःच्या प्रेमाची कबुली देत होता...पण ती काहीच रिस्पॉन्स करत नाही हे पाहून तो चिडला होता...त्याचे ते बोलणे रूमच्या बाहेर उभे असलेल्या चैतन्य,प्रतीक्षा आणि लँन्सीने ऐकले...ते ऐकून ते पण शॉक झाले होते...पण जयला कुठतरी यातून बाहेर पडावे लागेल याचा विचार करून त्यातील कोणीच त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नाही...त्यात तो भयंकर चिडला होता त्यात आणखीन काही वाईट वागू नये म्हणून तिघे गप्प बसतात...जय आज पूर्णपणे तिला मोकळीक देउन कायमचा तिच्यापासून दूर जात होता...

तो बाहेर पडून स्वतःचे आणि घरच्यांचे aeroplane चे तिकीट बुक करतो...त्याआधी काहीतरी महत्वाचे काम त्याला करायचे होते म्हणून तो पाच दिवसानंतरचे बुकिंग करतो...मृत्युंजय आपले काम चार दिवसांतच आवरतो आणि तो आणि त्याचे कुटुंब रात्रीच सगळं सामान आवरत असतात...त्याच्या आईला आणि आरोही ला अजिबात ते पटत नव्हते पण जयच्या पुढे बोलणे त्यांना जमत नव्हते...मृत्युंजयचा पण पाय तिथून निघत नव्हता कारण भावनाच्या आठवणी अश्या लगेच विसरून जाणे त्याला जमत नव्हते...तरीही देखील तो सगळं पॅक करतो आणि झोपून जातो...

दुसऱ्या दिवशी तो आणि त्याचा परिवार एअरपोर्टला येतात...तिघेही दुःखी असतात...पण कोणीच एकमेकांना दाखवत नव्हते...जय चेक इन करून निघणार असतो की तेवढ्यात एक आवाज त्याच्या कानावर पडतो...तसे त्याचे पाऊल जागीच थांबते...

"जीजू जीजू...तुम्ही अस कस वागू शकतात?"एक मुलगी त्याच्याजवळ येऊन बोलते...

"मी काहीही चुकीच वागत नाही आहे प्रतीक्षा...तिला मी नको आहे...तिने कधीच माझ्यावर प्रेम केले नव्हते..."जय निर्विकार पणे बोलतो...

"जय तू स्वतःच कस ठरवले हे सगळे...😡तिच्या माणेवरचा टॅटू तो काही तिने उगाच काढला होता का टाईमपास म्हणून?तिचे जर प्रेम नसते तुझ्यावर तो टॅटू काढलाच नसता...कारण आम्हाला माहीत आहे भावनाला जे आवडत नाही ते अजिबात ती करत नाही...महत्वाचे म्हणजे तुझे लग्न झाले आहे तिच्यासोबत...ते पण तू विसरला का?"चैतन्य त्याच्याजवळ येऊन चिडत बोलतो...

"चैतन्य ते फक्त नाटक होते बाकी काहीच नाही...तिने तीच मंगळसूत्र पण काढून दिले होते मला त्यावेळी...मग कसले लग्न आणि त्यात तिने लग्न तोडण्यासाठी एवढं प्लॅन केले त्यावरून तरी हे नक्की आहे तीच माझ्यावर प्रेम नाही आहे..."जय अस बोलून जात असतो...ते पाहून चैतन्य त्याचा हात धरतो...

"जय मंगळसूत्र तू मागितले होते तिच्याकडून...तिने नाही काही दिले...आज जर तू इथून गेला ना तर तुझी भावना खरच तुटून जाईल...😢नाही जगणार ती तुझ्याशिवाय... मूर्ख माणसा श्वास आहेस तू तिचा हे पण तुला कळले नाही का?प्रेम करते ती तुझ्यावर आजही तेवढेच..."चैतन्य थोडस इमोशनल होऊन बोलतो...त्याचे ते बोलणे जय शॉक होतो...

"व्हॉट आजही म्हणजे?खरच ती माझ्यावर प्रेम करते का?"जय शॉकमध्ये विचारतो...

"जीजू तुम्ही लहानपणापासूनचे भावनाचे एकुलते एक फ्रेंड्स होतात ना...तेव्हा पासून ती तुम्हांला like करते...पण तुम्ही जेव्हा तिला सोडून गेलात तेव्हा तिला तुमचा भरपूर राग आला...त्यानंतर आमच्यामध्ये चर्चा चालायची तुमची पण तुम्ही मोठे बिझनेसमन झालात हे तिला समजल्याने ती थोडीशी तुमच्या विषयापासून दूर रहायची...त्यात मुलींमध्ये तुमची क्रेझ जास्त असल्याने तिला वाटले की ती तुमच्या लायकीची नाही आहे...कारण तुम्ही मोठे असे बाहेर शिकून आलेले आणि भावना मात्र एक साधी सिम्पल फॅमिली मध्ये राहणारी मुलगी तुमचं आणि तीच कधीच मॅच होऊ शकणार नाही हे समजून ती तुमच्यापासून दूर पळायची...पण प्रेम मात्र भरपूर होते तिचे पण मनाला आवर घालून ती दूर रहायची...

मानसीला तुम्ही पकडून दिले हे कळले आम्हाला पण तिचे बोलणे ऐकून घेतले का तुम्ही?भावनाला तिने का मारले वगैरे"प्रतीक्षा शांतपणे त्याला विचारते...तीचे बोलणे ऐकून त्याचे डोळे भरतात...तो मानेने नाही म्हणतो...

"अहो जीजू भावना तुम्हाला त्यादिवशी प्रपोज करण्यासाठी येणार होती...तिचे प्रेम कबूल करण्यासाठी ती तुम्हाला भेटणार होती...ही गोष्ट तिने तिला सांगितले म्हणून तिने भावनाला हानी पोहचवली...जीजू तुमची प्रिन्सेस तुमच्या लहानपणीच्या ठिकाणी वाट पाहत आहे..."प्रतीक्षा इमोशनल होऊन त्याला बोलते...तिचे ते बोलणे ऐकून जयला आनंद होत असतो आणि डोळयातून पाणी पण येत असते...त्याने काय ऐकले याच्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता...

"जय आज जा तू आमच्या सुनबाई कडे.."जयची आई त्याच्याजवळ येत बोलते...

"आई आई खरच माझी भावना माझी वाट पाहत आहे...😢तीच माझ्यावर आधीपासून प्रेम आहे आणि मी तिला खुप त्रास दिला ना?"जय दुःखी होऊन बोलतो...

"जय जा लवकर तिच्याजवळ..."जयची आई त्याला आनंदात बोलते...कारण त्याला आता तिची गरज होती...आज तो किती खुश होता हे शब्दांत मांडू शकत नव्हता...जयने आईच्या पाया पडल्या आणि तो तसाच थोडस धावत आपल्या गाड्यांकडे आला...त्याला अस धावत येताना पाहून बॉडीगार्ड त्याच्या जवळ आले...

"बॉडीगार्ड आज मला तुमची गरज नाही...तुम्ही आईला आणि आरोहिला घरी घेऊन जावा..."जय बॉडी गार्डला बोलतो आणि तो तसाच ड्राईव्हरकडून गाडीची चावी घेऊन तिथून गाडी फास्ट मध्ये घेऊन बाहेर पडतो... काहीवेळात तो त्याच्या मंजिलवर पोहचतो...तो समोरच दृश्य पाहतो तर त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू पसरते...

एक छोटंसं घर त्याच्या समोर होते...त्या घराच्या आजूबाजूला वेगवेगळी गुलाबाची रोपटे होते...छोटसं असलं तरीही दुमजली होते...एकदम छान प्रकारे ते सजवलेले होते...त्या घराला एक छोटासा गेट होता...ते सगळं पाहून जय आनंदी होतो...निसर्गरम्य अश्या वातावरणात ते घर होते आजूबाजूला कोणाचीच चाहूल,वर्धळ तिथे नव्हती...जय हळूच गाडी पार्क करतो आणि खाली उतरतो...थोडीफार संध्याकाळ झाल्याने वातावरणात गार वारा सुटला होता...जयच्या अंगाला तो वारा स्पर्शून जात होता...त्याने हळूच तो गेट उघडला आणि तिथे फुलेल्या गुलाबांवर हळूच हात फिरवला...तो तसाच काही गुलाबांवर हात फिरवत आनंदात घरात शिरला...

घरात समोरच दृश्य पाहून त्याचे डोळे भरतात...कारण ज्या दिवसाची तो वाट पाहत होता आज तो दिवस त्याच्यासमोर आला होता...ती लाल साडीत,गळ्यात मंगळसूत्र घालून,हातात लाल चुडा घालून केस मोकळे सोडून उभी होती...भांगेत कुंकू देखील होते...तिला तस पाहून तो खुश होतो...तो थोडस पळत जाऊन तिला स्वतःच्या मिठीत कैद करतो...

"आय मिस you प्रिन्सेस...😭मी खुप वाट पाहिली तुझी...मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय...फक्त एकदा मला सांग ना तू?"मृत्युंजय रडतच तिला मिठीत घेतच बोलतो...त्याचे तसे रडणे पाहून तिला वाईट वाटते...पण ती भानावर येत त्याला बाजूला करते...

"सॉरी जास्त इमोशनल झालो मी..."जय भानावर येत डोळे पुसत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहत असते...

"काय आहे🙄एकतर मला त्रास दिला आणि आता अशी पाहत आहे..."जय तिला स्वतःकडे पाहताना पाहून बोलतो...

"तुम्ही कोण🤔मी ओळखते का तुम्हाला?हे राम मेरे पती ने देख लिया तो प्रॉब्लेम होगा...😭ओ मुझे घर से निकाल देगा..."ती नाटक करत खोटं खोट जमिनीवर बसून रडायला लागते...

"प्रिन्सेस काय बोलते तू?तुझं तुला कळत ना ?डोक्याला लागलं म्हणून परिणाम तर नाही ना झाला?हे काय सजली आहे तू?"मृत्युंजय तिला तिच्यासोबत खाली बसून प्रश्न विचारतो...

"मेरी शादी हो चुकी हैं...🙁लेकिन म्हणजे माझ्या नवऱ्याला ते मान्य नाही आहे आता मी काय करू बर..."भावना नाराज होत बोलते...तिचे ते बोलणे ऐकून जय शॉक होतो...

"कोणासोबत झाली प्रिन्सेस..😢सॉरी मला माहित नव्हते...पण एक विचारू शकतो का?तुझं माझ्यावर प्रेम खरच होते का?"जय थोडस दुःखी होऊन बोलतो...कारण भावना आज सौभाग्यवती बनून त्याच्यासमोर उभी होती...म्हणून तो बोलत होता...त्याचे ते बोलणे ऐकून ती डोकं खाजवते...

"अरे यार यांना कोणत्या लाईनमध्ये उभं केलं होतं अक्कल वाटताना देवाने...😥माझ्या डोक्याला लागलं आहे पण परिणाम यांच्या डोक्यावर झाला आहे...🤦"भावना मनातच बोलते...

"आज पण नाही का बोलणार तू...😕"तो तिला विचार करताना पाहून बोलतो...

"इतना सज धज के आयी हुं मैं...लेकिन कुछ फायदा ही नहीं हैं...कैसा पती मिला हैं भगवान...😭मुझसे ही पुछ रहा हैं..."भावना मनातच नाटकी स्वरात बोलते...

"काय बोलायचे जय बरं...🤔तुम्ही तर सोडून गेला होतात🙄मग कोण तुम्ही?"ती थोडीशी वैतागत बोलते...

''ओ कोण मी...??चल मग मी जात आहे.."तो थोडस इमोशनल होऊन बोलतो आणि थोडस दुःखी होऊन जात असतो...

"देवदास मुव्ही ना सोच समजकर ही बनायी हैं...ये ऐसे देवदास होते हैं ना इसलीए...🤦अरे यार बात तो सुनी होती इन्होणें तो क्या होता..."भावना मनात बोलते...ती तशीच उभी राहते...

"अहो तिथे ठेवलेली बॅग पण घेऊन जा...तसही काही उपयोग नाही तुमचा...एक गोष्ट लक्षात ठेवा पुन्हा जर सोडून गेलात ना ही भावना हडळ बनून तुमच्या मागे लागेल...😙सात जन्मो का रिश्ता हैं हमारा ऐसे ही थोडी पिच्छा छोडूनगी😌वैसे तो आज करवा चौथ हैं मेरे पती महाशय😄"ती हसून वैतागत बोलते...तिच्या तोंडून पती शब्द ऐकून तो जागीच थांबतो...

"व्हॉट?करवा चौथ?म्हणजे तू माझ्यासाठी?हे सगळं माझ्यासाठी आहे?म्हणजे मीच तुझा पती आहे ना?"जय मागे फिरून शॉकमधून तिला विचारतो...

"नहीं रे बाबा आप कैसे पती होंगे ना...एवढं एक्सप्लॅन करून पण काही फायदा होत नाही माझा...देवा काय करू मी यांचं...अहो कारभारी,धनी अजून काही मराठीतून बोलतात नवऱ्याला ते सगळं काही तुम्ही आहात...😄"भावना थोडीशी हसून त्याला बोलते...तिचे तसे बोलणे ऐकून तो पळतच येतो आणि तिला मिठीत घेतो...

"आय लव्ह you माय प्रिन्सेस...😘😘"जय तिच्या कपाळावर कीस करत बोलतो...तो तसाच तिच्या चेहऱ्यावर किस करतो आणि ती फक्त त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत असते...किती खुश झाला होता तो हे तो शब्दांत मांडू शकत नव्हता...आज जगातील सगळे सुख त्याला मिळाले असे त्याला वाटत होते...तो तसाच तिच्या ओठांवर ओठ टेकवतो तशी ती हसून त्याच्या ओठांवर हात ठेवते...

"नको आता...करवा चौथ चा उपवास आहे माझा त्यामुळे हे अजिबात चालणार नाही...चला व्हा बाजूला..."शेवतच वाक्य ती हसून त्याला ढकलत बोलते...ती हसून तिथुन जात असते...तेवढ्यात तो तिच्या उगड्या कंबरेत हात घालून तिला जवळ ओढतो...त्याच्या अश्या करण्याने ती शहारते...

"जय...🙈नो ना प्लीज..."ती थोडीशी लाजत बोलते...त्याच्या अश्या करण्याने तिचा चेहरा एकदम गुलाबी झाला होता...तो आज तिच्या रुपात हरवला होता...डोक्यावर डॉक्टरची पट्टी बांधलेली होती...तिच्या भांगेत कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र होत तिच्या...जी त्याच्यापासून लांब पळायची आणि त्याला सतवायची...आज तीच भावना त्याच्या स्पर्शाने लाजत होती...जंगलातील लग्नाला तिने खूपच मनावर घेतले होते आज...भलेही ते लग्न आधी त्यांना नाटक वाटत होते पण  तिच्यासाठी ते खूप काही होते...सगळे विधी त्यांच्या लग्नाच्या झालेल्या होत्या...म्हणून ती आज ते सत्य मानून त्याच्यासमोर सजून उभी राहिली होती...

"नाही सोडणार आज प्रिन्सेस मी तुला...😉मला त्रास दिला ना त्याचा बदला तर घेतला पाहिजे आणि एवढी बायको सुंदर सजून धजून समोर असताना पती कैसे शांत रहे सकता हैं..."जय तिच्या नाकावर नाक घासत बोलतो...

"ओय रूको रूको...😅मुझे मेरा व्रत तोडणे तो दो...कल से भुकी हुं मैं...😕"भावना थोडीशी वैतागत बोलते...तिचे तसे बोलणे ऐकून तो तिला सोडतो...

"काय तू उपाशी आहे प्रिन्सेस...तुला अजून बर नाही आहे तरीही तू व्रत का केलं...😡खरच वेडी आहे तू...नको ते करत बसते..."जय ती उपाशी आहे हे ऐकून थोडस चिडत बोलतो...तो तसाच तिथे जवळ असलेला पाण्याचा ग्लास तिच्याजवळ घेऊन येतो...

"जय फक्त काहीच मिनिटे थांबा ना...चंद्र येईलच एवढ्यात बाहेर...😕"भावना क्युट फेस करत बोलते... तसा जय नाही मध्ये मान हलवतो...तशी ती हळूच तिथून पळते आणि वरती रूममध्ये जाते...

"भावना...😤मी अजिबात काही ऐकणार नाही तुझ..."जय ग्लास ठेवत तिच्या मागे पायऱ्यावरून पळतो...

"जय नको ना...😖मला नाही सोडायचा...काही मिनिट राहिली ना...तो पर्यंत आपण गप्पा मारू ना?"भावना लाडीगोडी लावत बोलते...तिचे बोलणे ऐकून जय स्वतःचा मोबाईल काढतो आणि तिच्यासमोर धरतो...

"भावना उदयपूरला आला आहे चंद्र...हा बघून तू व्रत खोलु शकते..."तो मोबाईल दाखवत बोलतो...

"अहो नाही करत मी अस...😓अस थोडीच कुठे असते...मैने कहा नहीं करुंगी मतलब नहीं...😫"भावना अस बोलून बेडवर हाताची घडी घालून गपचूप फुगून बसते...तिचे तसे वागणे पाहून तो शांत होतो...

"प्रिन्सेस कसला हट्ट हा?माझ्या आयुष्यापेक्षा मला तू महत्त्वाची आहे म्हणून बोलतो ना मी..."जय तिच्याजवळ बसत बोलतो...भावना त्याला काहीच रिप्लाय करत नाही...तसा तो गप्प बसतो...खुप वेळ रूममध्ये शांतता असते...

"ये आ गया चंद्रमा...😍चला चला पटकन उठा तुम्ही..."भावना खिडकीच्या दिशेला बाहेर पाहत आनंदात बोलते...तिचे बोलणे ऐकून जय उठतो...ती त्याचा हात धरून त्याला खुशीच गॅलरीत घेऊन येते...ती त्याला गॅलरीत उभं करते आणि डोक्यावर व्यवस्थित पदर घेते...जय फक्त तिला पाहत राहतो...ती गॅलरीत ठेवलेली पूजेची थाली हातात घेते...जयसाठी हे नवीन होत म्हणून तो फक्त पाहत राहतो...ती सगळ्यात आधी चंद्राची पूजा करते आणि मग जयच्या कपाळावर छोटासा कुंकवाचा टीका लावते...चंद्रासोबत त्याची पण पूजा ती करते...मस्त चाळणी हातात घेऊन ती त्याला आणि चंद्राला हसून पाहते...ते पाहून जय गालात हसतो...ती चंद्राला पाणी अर्पण करते आणि डोळे बंद करून जयच्या आणि तिच्या आयुष्याच्या सुखासाठी मागणी करते...ती जयला सांगते समजावून तस जय करत असतो...तो भावनाला चंद्राच्या साथीने पाणी पाजतो आणि तिच्या ताटात असलेल्या मिठाईचा तुकडा तिला भरवतो...ती हसूनच तो खाते...जय राहिलेला अर्धा खात असतो...ते पाहून ती त्याला अडवते...

"अहो माझा आहे ना तो उष्टा...😫"भावना थोडीशी अडखळत बोलते...

"अरे त्यात काय झाले प्रेम वाढते बाळा तुला नाही कळणार...😌"जय अस म्हणून तो पेढा खातो...

"झालं ना आता आधी जेवण करूया आणि मग बाकीच पिल्लु..."जय अस बोलून तिला काही कळायच्या आत उचलून घेतो...तशी ती हसून त्याच्या गळ्यात हात गुंफवते...

"नाटक करत असते ना...आता मला माझ्या सगळया प्रश्नांची नाटक न करता उत्तर देशील का खरी खरी हवी मला..."जय आशेने तिच्याकडे पाहून बोलतो...तशी ती हसते आणि हळूच त्याच्या गालावर किस करते...

"अले मेले पतीदेव आपको जवाब चाहीए...मैं हु ना आपकी चो चिट वाली पत्नी जवाब दे नो को...🙈तस तुम्हाला कोणत्या भाषेत हवं answer?"ती लाजत लाडात बोलते...

"भावना च्या भाषेत मिळेल का मला उत्तर..."तो तिला एकदम वरती करत तिच्या कानाकडे जाऊन हळु आवाजात बोलतो...

"ओह मिन्स अस आहे तर...😌"ती अस बोलुन लाजते...जय तसच तिला खाली घेऊन येतो आणि चेअरवर बसवतो...तो टेबलवर पाहतो तर सगळे त्याच्या आवडीचे पदार्थ असतात...ते पाहून तो हसतो...

"माझी काजूकतली...😘"जय सगळे पदार्थ पाहून भावनाला बोलतो...

"मैने तो ये कुछ बनाया ही नहीं फिर कहा दिखी आपको काजूकतली?"भावनाला न कळल्याने बिचारी विचारते...😂

"अग तुला बोललो मी...एकदम काजूकतली सारखी आहे म्हणून...😘unexpected होत हे सगळं"जय तिला जवळ घेत बोलतो...

"ओह काहीही असत तुमचं...हाव तुका मोग करता...🙈"भावना लाजून शेवटचे वाक्य बोलते...

"व्हॉट?तू मला आय लव्ह यू म्हटली...किती दिवस वाट पाहत होतो तुझी...ummah😘😘😘"जय आनंदात तिला मिठीत घेत कुरवाळत बोलतो...

"नको अस करू...तुमची बेअर्ड लागते मला...😥तुम्ही ना ती कमी करा...किती वाढवली..."भावना जयला बाजूला करत बोलते...

"देवा काय मुलगी आहे मी इकडे रोमँटिक होत आहे आणि ही...🤦आता एवढी सजली आहे तर कोण कंट्रोल करेल ना तरीही मी करत आहे..."जय मनातच बोलतो...

"अहो कट करणार ना तुम्ही???"ती क्यूटपणे त्याला विचारते तसा तो भानावर येतो...पुढे पाहतो आणि घाबरतो...

"मम्मा हडळ😭😭"ती अचानक बोलून रडू लागते...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
              ©®भावना सावंत(भूवि❤️)
*************************

Rate & Review

Swati Jagtap

Swati Jagtap 3 months ago

Rajendra Raut

Rajendra Raut 4 months ago

टिना

टिना 4 months ago

Arati

Arati 4 months ago

madhuri devarde

madhuri devarde 4 months ago