तू अशीच जवळ रहावी... - 12 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - 12

तू अशीच जवळ रहावी... - 12


दुसऱ्या दिवशी जयला पहाटे जाग येते...तो डोळे किलकिले करून आसपास पाहतो तर भावना त्याच्या कुशीत शांत झोपलेली असते...ते पाहून तो गालात हसतो...

"नेहमी एक स्वप्न होत तू अशीच जवळ रहावी माझ्या आजूबाजूला आणि आज ते माझं स्वप्न पूर्ण झालं आहे प्रिन्सेस...आय लव्ह you..."तो अस बोलत तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवतो...काहीवेळ तो तिला तसाच न्याहाळत असतो...ती किती खुश आहे त्याच्यासोबत राहून हे आज तिच्या चेहऱ्यावरून त्याला समजत होते...

"प्रिन्सेस चल उठ ना..."तो अगदी हळू आवाजात तिच्या कानावर किस करत बोलतो...

"नहीं सोने दो ना जी...😣"ती आळसलेल्या आवाजात बोलते आणि त्याच्या कुशीत शिरते...तो तिला अस करताना पाहून हसतो...

"आधी तर जवळ यायची नाही आणि आता सोडत नाही..."तो हसून बोलतो...तो व्यवस्थित तिला झोपवून उठत असतो की ती त्याचा हात धरते...

"तुम्ही झोपा ना प्लीज माझ्यासाठी..."ती त्याला उठताना पाहून बोलते...तसा तो गालात हसतो आणि तिच्या बाजूला पडतो...

"आता मी तुला एवढा का हवा हवासा वाटतो हा...??आधी तर लांब पळायची ना?"तो तिच्या माने खालून हात घालत तिला जवळ घेत विचारतो...

"अले मेले पती परमेश्वर आपको नहीं समजेगा...😌"ती लाडात त्याला बोलते...

"थोडीस झोपायचे होते ना तुला चल झोप..."तो हसूनच तिला आणखीन जवळ घेत कुरवाळत बोलतो...तशी ती हसून त्याच्या कुशीत पुन्हा झोपून जाते...तो देखील काहीवेळाने तिला पाहत झोपी जातो...

साधारण 9 च्या आसपास त्याला जाग येते...तो उठून बाजूला पाहतो तर ती नसते...ते पाहून तो उठतो आणि तसाच घाबरून तिला शोधत खाली जातो...किचनमध्ये आवाज येतो तसा तो तिथे जातो आणि तिला पाहून तो पूर्णतः हँग होतो...

ब्लु रंगाची साडी त्यावर मॅचिंग ब्लाऊझ...गळ्यात छोटसं मंगळसूत्र,डोक्यावर सिंदूर...कानात झुमके आणि हातात चुडा,चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नसताना ती खूप सुंदर दिसत होती...केस धुतल्यामुळे तिने ते मोकळे पाठीवर सोडले होते आणि मस्त ती उभी राहून आपलं काम करत होती...त्याने तिला पाहिले आणि मागूनच तिला मिठी मारली...तशी ती घाबरली...पण तो आहे म्हणून ती रिलॅक्स झाली..."अहो सोडा ना आणि फ्रेश व्हा...😕"ती हळू आवाजात त्याला बोलते...तो तिच ऐकून न ऐकल्यासारखं करतो आणि अजून तिला घट्ट मिठीत घेतो...त्याच्या अश्या करण्याने ती शहारते...

"ऐ जी छोडो ना...😄मेरा उत्तपा रह जायेगा..."ती त्याचे हात पोटावरचे काढत बोलते...पण ते काही निघत नाही...

"माझी काजूकतली नाही निघणार असा कोण करत?थांब मी तुला दाखवतो कस करायचं असत ते..."जय अस म्हणून तिच्या मागे राहूनच तिच्या हाताला धरून बॅटरच पातेल उचलतो आणि त्यातील बॅटर तव्यात टाकतो... भावनाचा अजिबात उत्तप्याकडे लक्ष नसते...ती तर नजर चोरून फक्त त्यालाच पाहत असते...कारण जय शर्टलेस होता...त्यातून त्याची बॉडी दिसत होती...

"मलाच बघत राहणार प्रिन्सेस का त्यात ingredient घालणार आहेस?"जय हसून तिला बोलतो...त्याच्या आवाजाने ती भानावर येत त्यात तिने कट केलेलं इन्ग्रेडीएन्ट घालते...नंतर जय त्यावर झाकण ठेवून त्याला भाजू देतो...असेच करत दोघेही उत्तप्पा बनवतात...

"मृत्युंजय तुम्ही फ्रेश व्हा...मी आणते बाहेर...😊''ती थोडीशी किचनमधून त्याला बाहेर ढकलत बोलते...तसा तो हसून निघून जातो...

"हे पण ना...😌"ती हसून बोलते आणि सगळं नाश्ता वगैरे घेऊन डायनिंग टेबलवर येते...काही वेळाने जय पण येतो फ्रेश होऊन आणि तिच्या बाजूला बसतो...

"चल प्रिन्सेस खा लवकर...मला खुप काही बोलायचे आहे तुझ्यासोबत..."तो तिच्यासमोर उत्तप्पा चा घास धरत बोलतो...

"मला माहीत आहे...😒पण मला आईस्क्रीम दिली तरच  मी सांगणार आहे तुम्हाला..."ती तो घास खात बोलते...

"मी तुझ्यासाठी वेडा होतो आणि तू मला सतावत होतीस ना...😏"तो तिला भरवतच बोलतो...

"अभि भि वही करुंगी...😛पहिले वन आईस्क्रीम दो😒"ती त्याचा हात बाजूला काढत बोलते...

"नाही प्रिन्सेस आईस्क्रीम नाही मिळणार तुला...आता कुठे बरी झाली ना तू?एवढ्यात आईस्क्रीम का हवी ना...मी अजिबात देणार नाही तुला..."तो थोडस चिडत बोलतो...

"मला आईस्क्रीम पाहिजे मेरा पहिला प्यार हैं...😭"ती थोडस रडायचे नाटक करत बोलते...

"कितीही नौटंकी केली तरीही नाही मिळणार आईस्क्रीम..."जय बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती आणखीन रडायला लागते...ते पाहून त्यालाच कसतरी वाटते पण तिला अजिबात त्याला आईस्क्रीम द्यायचे नव्हते...

"बनेश्वरच्या बेरकी बाबा बर्व्यांच्या बाहेरच्या बागेतल्या बाकावर बसलेल्या बिनडोक बनीच्या बावळट बोक्याला बंगलोरच्या बुळ्या बबनने बोगद्यात बबितासमोर बदड-बदड बदडले...हे वाक्य न चुकता आठवून बोल...मग आज तुला आईस्क्रीम खायला मिळणार.. "तो हसून तिला बोलतो...त्याचे बोलणे ऐकून तिच्या चेहऱ्यावर😨अस expression येते...

"नको मला...😧इतना मराठी i hate ice cream "ती रडणं बंद करून घाबरून बोलते...कारण मराठी सोबत कट्टी बट्टी होती तिची...(जशी माझी असते...😥)पण मृत्युंजय मात्र तिचे बोलणे ऐकून हसू लागतो...

"जय तुम्ही असच करतात...पत्नी को नहीं सताते ऐसे...☹️"ती चेहरा पाडत बोलते...तिचा पडलेला चेहरा पाहून  त्याचे हसू गायब होते...

"ते वाक्य नाही येत ना आता?? तुला सगळ्यात सोपं देतो हा..."मृत्युंजय विचार करून बोलतो...

"ओके डन👍इस बार आईस्क्रीम मेरी हैं..."ती त्याचे बोलणे ऐकून खुश होत बोलते...

"बघ हा लास्ट चान्स एकदम सोप्प...😅तर तुझं वाक्य हे आहे...
पतीव्रतेचे पुण्यशील पावित्र्य पातकी पुरुषालाही परमेश्वराच्या पावन पदवीला पोहोचवते...आता बोल..."तो हसून बोलतो...त्याला तिची मज्जा घ्यायला खूप आवडायचे कारण तिच्या चेहऱ्यावरचे expression खूप क्युट आणि भारी असायचे...त्यात एवढे दिवस त्याने हे सगळं मिस केलं होतं म्हणून त्याच चालू होते...

"आजसे मैने आईस्क्रीम खाना ही छोड दिया...😭तुम्ही वाईट आहात पाप लागणार तुम्हाला आता मला अस छळतात म्हणून..."भावना त्याच बोलणं ऐकून रडून बोलते...ऑफ कोर्स आईस्क्रीम लव्हर होती ती...😜

"एवढे मराठी वाक्य आले असते तर मराठी ची प्रोफेसर असली असती मी...😭जा तुम्ही आणि ती आईस्क्रीम पण उडत गेली..."भावना आणखीन रडत बोलते...तिचे रडणे पाहून जयला खुप भारी वाटते...कारण एवढे दिवस तिचा आवाज,तिची नौटंकी त्याला पाहायला मिळाली नव्हती...तो तसाच तिला हसून जवळ घेतो...

"आय मिस your voice प्रिन्सेस,तुझं अस बोलणं,क्युट वाले expression हे सगळं मी मिस केलं होतं...आय लव्ह you सो मच..."तो तिला जवळ घेत तिचे डोळे पुसत बोलतो...

"मुझे आईस्क्रीम दोंगे ना..."ती क्यूटपणे फेस करत त्याला विचारते...तसा तो हसून उठतो आणि फ्रीझ मध्ये ठेवलेलं आईसक्रीम घेऊन येतो...आयस्क्रीम पाहून ती भलतीच खुश होते आणि पटकन बॉक्स ओपन करून खाऊ लागते...

"तुला आठवत...तुझ्या मराठी वरून मी तुला चॅलेंज केलं होतं...😂जे की मला माहित होते मी च जिंकणार होतो पण तरीहि तुला केलं..."मृत्युंजय हसतच तिला बोलत असतो...त्याचे ते बोलणे ऐकून ती आयस्क्रीम खाता खाता हसते...

"ऐसा करते हो फिर भि...😑"ती गाल फुगवून बोलते...

"अरे सॉरी ना बाबा...खा आयस्क्रीम तू मी उत्तप्पा खातो...पण काय मराठी बोलली होती तू त्यादिवशी...मी फिदा झालो होतो त्यादिवशी पण एक सांगु ही शिक्षा होती तुझ्यासाठी...माझ्याबद्दल खोटं बोलली त्याची..."मृत्युंजय शेवटचं वाक्य तिच्या डोळ्यांत पाहून बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती नजर खाली करते...

"पुन्हा अस केलं ना प्रिन्सेस तर याचे परिणाम वाईट होतील...किती हर्ट केलं तू मला तेव्हा"जय थोडस गहिवरून बोलतो...

"नाही आता हर्ट करणार मी तुम्हाला...आपण आता हॅपी राहू...पण मराठी थोलिसी जमत नाही ना...😂इसलीए संभालके लो..."ती मुद्दाम हसून बोलते...

"काय यार प्रिन्सेस तू किती भारी त्यादिवशी बोलत होती...आंतरझाल,गरम केंद्रबिंदु..."जय अस म्हणत च भूतकाळात जातो...ती पण त्या आठवणी आठवू लागते...

भूतकाळ:-

भावना आणि जय जंगलातून आल्यापासून एकमेकांसोबत अजिबात बोलत नव्हते...त्याचे पूर्ण लक्ष तिच्यावर असायचे पण ती अजिबात त्याच्याकडे लक्ष द्यायची नाही...दुसऱ्या दिवशी भावना ऑफिसला आली पण जयच्या समोर आली नव्हती...तिचे डोळे मात्र लाल पाहून त्याला थोडस वाईट वाटलं...काहीतरी कारण असेल म्हणून त्याने सोडून दिले...इकडे भावनाच्या मात्र मनात काहीतरी वेगळंच चालू होते...ती काहीतरी हातात घेऊन जयच्या केबिन मध्ये जाते...ती अजिबात नॉक करायची नाही दरवाजा...कारण जयला डीवचायचे असायचे तिला ना म्हणून...😂ती तशीच तणतणत त्याच्या केबिनमध्ये येऊन त्याच्या समोर उभी राहते...फुल्ल attitude मध्ये...

"ओय अब तू मेरा बॉस नहीं भिडू इसलीए अब मुझे डाटना और चिल्लांना छोड दे...😎"ती रावडी भाषेत त्याला बोलते...तिचे तसे बोलणे ऐकून जय काम करता करता उभा राहतो...एक झळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकतो...पण फरक काहीच पडत नाही तिला...

"व्हॉट?ही कोणती पद्धत आहे बोलण्याची...😡ऑफिस आहे घर नाही आहे काही मिस भावना..."मृत्युंजय थोडस चिडत बोलतो...

"हा ना वही तो ये ऑफिस हैं...लेकिन आपका...ये मेरा resigned लेटर मैं जा रही हुं अब यहा से...😄"ती खुश होत त्याच्या हातात लिफाफा ठेवत बोलते...तिचे ते बोलणे ऐकून तो भयंकर चिडतो...

"भावना...😠इथे कोण काम करणार कोण नाही ते मी ठरवतो...कारण बॉस मी आहे..."तो रागात बोलतो...

"ना बाबा ना मैं decide करुंगी मुझे कहा काम करना हैं और कहा नहीं वो...🙄"ती विचार करून बोलते...तिचे ते बोलणे ऐकून तो चिडतो आणि रागातच तीच resigned लेटर फाडून टाकतो...

"ओय फाडा क्यो...😥मुझे नहीं करनी आपके साथ जॉब..."ती थोडीशी ओशाळून बोलते...तिचे बोलणे ऐकून तो विचार करतो आणि काही वेळातच त्याच्या डोक्यात काहीतरी येत तस तो गुढपणे हसून तिच्याजवळ जातो...

"एका शर्थ वर तू हे काम सोडू शकते...बघ तुला मान्य आहे का ते?" मृत्युंजय नजर रोखुन तिला पाहत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती खुश होते आणि पटकन विचार न करता हो बोलून जाते...

"भावना ला कोणतच काम येत नाही अशी गोष्ट आहे ना?ओके तर उद्या चा एक पूर्ण दिवस तू माझ्यासोबत राहणार आहे आणि एकही शब्द हिंदी,इंग्रजी तून न बोलता... हेच चॅलेंज आहे तुझ्यासाठी... तू जर यात जिंकली तर तु ऑफिस सोडून जाऊ शकते मी तुला अडवणार नाही,पण तू हरली तर अजिबात तुला हे ऑफिस सोडायला मिळणार नाही...मी सांगेल ते तू करणार आहेस"जय थोडस गुढपणे हसत बोलतो...

"अरे जय तुम्ही अस नाही करू शकत...🙁तुम्हाला माहीत आहे तरीपण तुम्ही अस करतात..."ती नाराज होत बोलते...

"मी करू शकतो...😒"तो खांदे उडवत बोलतो...

"लँन्सी मराठी हेल्प घेतली तर चालेल का...😕"ती क्यूटपणे त्याला विचारते...

"लँन्सी वगैरे कोणी नाही हेल्प करणार...तुझं तू बघायचं...काय घाबरली का तू???" जय हसून तिला विचारतो...

"भावना नाही घाबरत कोणाला...😓मराठी😥😣😫ओके..."ती कसनुसपणे हसत बोलते आणि पाय आपटच केबिनच्या बाहेर जाते...ती गेल्यावर जय मात्र भरपूर हसतो...

"मला मराठी सांगतात ना हे...😓भावना ये कर कर दिखाईगी...आखिरी पत्नी हुं मैं जय की...😙हारकर जितने वाले को बाजीगर कहते हैं..."भावना हसूनच स्वतःशी बोलते आणि कामाला लागते...तिचे हे बोलणे मानसी ऐकते...

"ही आणि जयची बायको😡हिला तर सोडणारच नाही...लवकरात लवकर हिला बाजूला केले पाहिजे नाहीतर माझा प्लॅन फसेल..."ती चिडून  मनातच बोलते...दोघी ही आपलं काम करून घरी जातात...जय देखील ऑफिस सुटल्यावर घरी जातो...

दुसऱ्या दिवशी भावना तयारी करून ऑफिसला जाण्यासाठी निघत असते की जयच तिच्या घरी येतो...

"तुम्ही इथे...😒??काय काम आहे?"ती जयला दारात आलेलं पाहून विचारते...

"सासूबाईने बोलावले आहे मला म्हणून मी इथे आलो आहे...😄"जय हसून बोलतो आणि घरात येतो...त्याचा आवाज ऐकता भावनाची आईपण किचनमधून बाहेर येते...

"जय हे लग्न नाही होऊ शकत...आम्हाला माफ करा याबद्दल...आम्ही भावनाचे लग्न नाही करू शकत तुमच्यासोबत...तुम्हाला त्याविषयीच थोडं सांगायचे होते म्हणून बोलावलं आहे..."भावनाची आई थोडस अडखळत बोलते...आईचे बोलणे ऐकून भावना आणि जय शॉक होतात...😱

"ये मेरी मम्मा ही हैं ना🤔या गलत पिस पापा ने लाया हैं...जब बोलना था तब तो नहीं बोली फिर अभि क्यो ऐसी बाते कर रही हैं...ओय माताजी ठीक हो ना आप?"भावना स्वतःच्या आईला पाहून मनात बोलते...ती आईला पूर्ण न्याहाळते...

"हा ही तर माझीच मम्मी आहे...पण ही अस का बोलत आहे बर🙄हिने अस केलं तर मी जयला कस सतावू शकते ना?जाऊ दे हिला काय आपले फिलिंग कळत नाही...सावत्र तर नाही आहे ना...🤔भावना फालतू विचार बंद कर आणि तिला बोल ऐ"भावना स्वतःशीच मनात बोलते...

"ओके आई तुम्हाला वाटत तस आपण करू...शेवटी तुमची मुलगी ना...तुम्ही हवं तसं करा..."तो निर्विकार पणे बोलते...

"मम्मी तर अशी बोलली ठीक होती...पण या माणसाला काय झाले??प्रेम करतो काय हा दुसऱ्या मुलीवर खरच...🙄अस असेल तर ठीक आहे लेकिन मैं देवदास और देवदासी नहीं बनुगी...😣हे भगवान ये दोनो बहोत दिमाग खा रहे मेरा...उठा ले मुझे..."ती मनातच या दोघांना पाहून बडबडत असते...

"ओय नाही नाही हे मी काय बोलली...ऐ तस नाही उचलायच मला...यहा से बाहर निकाल दे म्हणायचे होते...मिस्टेक क्लिअर कर हा..."ती थोडीशी वैतागत बोलते...

"चलायचे का मॅडम आपण..."जय तिच्याजवळ येत निर्विकार पणे बोलतो...त्याच्या आवाजाने ती दचकून भानावर येते...

"तुम्ही अस कस बोलू शकतात यार...😤दोघेच आपलं ठरवून मोकळे होतात...मी काय पब्लीक प्रॉपर्टी आहे का...ह्या माणसासोबत ठरलेल लग्न कॅन्सल करून दुसऱ्या माणसासोबत...पुन्हा त्याच्यासोबत कॅन्सल करून तिसऱ्यासोबत...दोघेच ठरवत बसा काय ते मी कोणत्याही मुलांसोबत लग्न करणार नाही...😤ज्यांना कोणाला सोडून जायचं आहे मला सोडून जाऊ शकतात...भावनाच आयुष्य कधीच थांबणार नाही कोणामुळे ही...तसही ज्याला जवळ केलं प्रेम केलं ती व्यक्ती आयुष्यातून हिरावून घेतली आहे देवाने माझ्या त्यामुळे मला नाही फरक पडत कोणाच्या येण्या जाण्याने..."ती रागातच बोलते पण शेवटचं वाक्य बोलताना तिचा आवाज कापरा होतो...ती त्या दोघांचे काहीही न ऐकता खाली निघून जाते...जय देखील तिच्या मागून निघून जातो...पण तिच्या त्या बोलण्याने आईचे डोळे भरतात...

"कधीच सोडणार नाही आहे भावना तू त्या आठवणी...आम्ही प्रयत्न करत आहोत पण आज पुन्हा एकदा तुला त्याची आठवण करून दिली मी...😢तू जर तेच धरून बसली तर कधीच कोणाला जवळ येऊ देणार नाही...ते तुला मागे सोडावे लागेल आणि जयबद्दल तुझे डोळे वेगळं सांगतात पण तू ते मान्य करत नाही आहे...आई आहे मी तुझी...जयच तुला यातून बाहेर काढेल..."भावनाची आई थोडीशी दुःखी होऊन बोलते...

आज त्यांच्या बोलण्याने ती हर्ट झाली होती...कोणत्यातरी दुःखाची जाणीव त्या दोघींना झाली...म्हणून दोघी ही हर्ट झाल्या होत्या...त्या डोळे पुसतात आणि कामाला लागतात...इकडे खाली येऊन भावना नॉर्मल होते आणि गपचूप जाऊन जयच्या गाडीत बसते...जय पण काहीवेळाने येऊन गाडीत बसतो...तो आणि ती अजिबात एकमेकांसोबत बोलत नसतात...

"चलायचे का सर..."ड्राईव्हर  विचारतात...

"हो चला..."जय थोडस निर्विकारपणे बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ड्रायव्हर गाडी स्टार्ट करतात आणि तिथून काहीवेळात निघून जातात...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
                ©®भावना सावंत(भूवि❤️)
********************************

Rate & Review

Mamata

Mamata 3 months ago

Swati Jagtap

Swati Jagtap 3 months ago

टिना

टिना 4 months ago

Karuna

Karuna 4 months ago

madhuri devarde

madhuri devarde 4 months ago