तू अशीच जवळ रहावी... - 13 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - 13

तू अशीच जवळ रहावी... - 13

भावना आणि जय कसल्या तरी आवाजाने लगेच भानावर येतात...ते भूतकाळातिल आठवणीतून पटकन बाहेर येतात...

"अहो संपली माझी आयस्क्रीम...मला अजून एक हवी आहे..."ती त्याला लाडात बोलते...तसा तो बारीक डोळे करून तिला पाहतो...

"प्रिन्सेस अशी आयस्क्रीम कोण खात...??"जय तिच्या ओठांच्या कडाला लागलेल आयस्क्रीम पाहून बोलतो...

"काय झालं बर??मी खाते मला आवडत..."ती त्याच्या कडे पाहत बोलते...तसा तो उठतो आणि तिच्या समोर जाऊन झुकतो...तो थोडस तिच्या चेहऱ्याजवळ नेतो...

"ओय नहीं नहीं...मैं खुद साफ कर लुंगी...😰"ती थोडीशी घाबरून बोलत तोंडावर स्वतःचे दोन्ही हात ठेवते...तिच्या अश्या करण्याने त्याचा चेहराच पडतो...😝बिचारा जय...
तो तसाच बाजूला होऊन गाल फुगवून चेअरवर बसतो...भावना आपलं तोंडाला लागलेल आयस्क्रीम चांगलं समोर ठेवलेल्या tissue पेपरने उचलुन पुसून घेते...

"अहो तुम्ही अस का बसला आहात बलून सारखे गाल करून?"ती त्याला पाहून बोलते...

"तुला फुगलेल म्हणायचे आहे का?"जय...

"हा तेच ते एकच असत ना...🙄"ती विचार करत बोलते आणि तशीच उठून सगळं किचनमध्ये ठेवून येते...सगळं आवरुन ती बाहेर येते...तर तिला जय सोफ्यावर विचार करत बसलेला असतो...ते पाहून ती त्याच्याजवळ जाते... तो तिच्या पायलच्या आवाजाने भानावर येतो आणि तिच्याकडे स्वतः चा एक हात करतो...तशी ती हसून त्याला हात देते...तसा तो हसून तिला ओढून स्वतः च्या मांडीवर बसवतो...

"काय आहे आज जास्त च प्रेम ओतू जात आहे असं तुम्हाला नाही वाटत का🤔?"ती त्याच्या गळ्यात हात गुंफवत बोलते...

"काय आहे ना आधी मी तुला छळायचो आणि त्यानंतर तू मला छळायची यातच आपलं जीवन गेलं...पण आता हॅपी आहोत ना म्हणून अस तुला नेहमी जवळ ठेवून प्रेम करावेसे वाटते..."तो हसून तिच्याकडे पाहत बोलतो...त्याच्या अश्या बोलण्याने ती लाजते...

"सॉरी🙉बट माझं प्रेम नेहमीच होत तुमच्या वर म्हणून तर मी त्या तुमच्या चॅलेंज मध्ये हरले ना..."ती नकळतपणे बोलून जाते...पण तिचे ते बोलणे ऐकून तो डोळे बारीक करून तिला पाहतो...

"काय...??म्हणजे तू प्रिन्सेस त्यादिवशी?पण का अस छळतेस तू मला...तुला माहीत आहे आय लव्ह मोअर..."तो स्वतः ची बेअर्ड तिच्या गालावर घासत बोलतो...

"तुम्ही का छळत आहात मला...😣लागली ना बेअर्ड तुमची...माझे गाल लाल झाले..."ती थोडीशी वैतागत बोलते...तिचे बोलणे ऐकून तो गालात हसतो...

"ओके नाही करत बाबा...तू जरा शांत बस...मी 2 मिनटं मध्ये आलो..."तो थोडस तिला बाजूला करत बोलतो आणि तसाच रूममध्ये निघून जातात...काहीवेळात तो हातात तिची डायरी घेऊन येतो आणि पुन्हा तिला मांडीत घेऊन बसतो...

"ओ माझी डायरी...🙄अशी नाही घ्यायची..."ती डायरी त्याच्या हातातुन हिसकावून घेत बोलत असते...

"अरे थांब ना प्रिन्सेस...तू एवढे छान मेमरी लिहली आहे आपण दोघ वाचू या ना शोना..."मृत्युंजय प्रेमाने तिला समजावत बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती त्याच्या कडे पाहते आणि त्याच्या कुशीत शिरते...

"तुम्ही वाचा... मी ऐकते...जस्ट फिल करायचे आहे मला तुम्हांला... कारण मी कोमात होती ना तेव्हा एक शक्ती मला तुमच्या पासून दूर नेत होती...खूप दूर जात होती मी आणि सगळे रडत होते...पण शेवटच्या क्षणी असे काही तुमचे बोलणे माझ्या कानावर आले...त्या शक्तीने पण ते बोलणे ऐकले आणि ती मला बोलली,"तुझी वेळ नाही आली...तुझा मृत्युंजय तुझ्या प्रेमाची वाट पाहत आहे...आज जर मी तुला नेले तर प्रेम या गोष्टी पासून तो नेहमी दूर राहील...तुला मी घेऊन जाईन पण तो इथे असून पण काही उपयोगाचा रहाणार नाही...

आजवर कधीही न देवापुढे झुकणारा माणूस तुझ्यासाठी मंदिर, चर्च, गुरुद्वार मध्ये गेला...त्यामुळे त्याचा देवावरचा विश्वास मी नाही मोडणार...आयुष्यात पहिल्यांदा त्याने काहीतरी मागितले आहे आमच्याकडे म्हणून तू जा त्याच्याकडे आणि सुखी संसार करा दोघेही..."ती थोडीशी खुश होत त्याला बोलते...पण तिचे असे बोलणे ऐकून तो इमोशनल होतो...

"तुम्ही खरच गेला होता का जय?"ती हळु आवाजात त्याला बोलते...तिच्या आवाजाने तो भानावर येतो...

"हम्म ...तुझ्यासाठी मी कुठेही जाऊ शकतो...हे गुरुद्वार मधून दिलं आहे..."मृत्युंजय स्वतः च्या हातातील धागा काढत बोलतो...तो तसाच धागा हळूच तिच्या हातात बांधतो... तशी ती त्याला पाहून इमोशनल होते...कधीच त्याला हे धागे दोरे,देव वगैरे या गोष्ठी वर विश्वास नव्हता...आज तो तिच्यासाठी तिथे गेला होता...हे पाहून तिला भरून येत...तिच्या डोळ्यांत पाणी पाहून तो तिला पाहतो...

"काय झाले प्रिन्सेस??"मृत्युंजय काळजीने तिला विचारतो...तशी ती मान हलवून नाही म्हणते...

"मला पण नाही सांगणार का भावना?"मृत्युंजय...

"काही नाही तुमचं प्रेम पाहून थोडस इमोशनल झाले... पण आता तुम्ही माझ्या जवळ आहात हेच खूप आहे माझ्यासाठी... लव्ह यू जय..."ती थोडीशी इमोशनल होत बोलते...

"लव्ह यू टू जान..."मृत्युंजय तिला जवळ घेत बोलतो...तो काही वेळ तसाच तिला कुरवाळत असतो...तिला ते आवडायचे म्हणून ती पण गप्प बसून असते...ती त्याच्या कुशीत लहान बाळासारखी शिरते आणि गप्प शांत बसून त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत असते...तिला ते हल्ली आवडायचे...तो हसून तिला पाहत असतो...

"काय आवडत तुला यात ना ते मला पण कळत नाही...वेडी कुठची...पण तू मला शोधल कस आणि तू बरी झाली कशी...???"मृत्युंजय विचार करून बोलतो...कारण त्याला जाणून घ्यायचे होते तिच्याबद्दल... पण तो संधी शोधून तिला हळूहळू विचारण्याचा प्रयत्न करत असतो...त्याच्या अश्या प्रश्नाने ती डोळे बंद करते...त्याला वाटत तिला सांगायचे नसेल म्हणून तो थोडस बाजूला होऊन सोफ्यावर आडवा होतो...ती ला एका हाताने हळूच तो स्वतः च्या अंगावर घेतो...

"नको सांगू...मी नाही फोर्स करत मग तर झालं..." मृत्युंजय तिचे केस मागे करत प्रेमाने तिला बोलतो...

"जय तुम्ही मानसीला का शिक्षा केली???"भावना शांतपणे त्याच्या कुशीत राहून त्याला प्रश्न विचारते...तिच्या अश्या प्रश्नाने तो शॉक पण होतो आणि चिडतो देखील...

"भावना मला नाही पाहिजे ती मुलगी आपल्या दोघात...😤पुन्हा हे नाव नाही आलं पाहिजे..."जय थोडस रागात तिला बोलत उठत असतो...तशी ती त्याला घट्ट पकडते...

"जय आपली मैत्रीण होती ना ती...😢मग मैत्रीण सोबत अस वागायचे का...मग आपल्यात आणि तिच्यात काय फरक ना...??तुमच्या वर किती तरी मुली फिदा असतात...म्हणून काय तुम्ही सगळयांना अस करणार का...???"ती शांतपणे त्याला विचारते...

"जस्ट शट आप भावना...😡मैत्रीण असणं वेगळं होत...ती एक खुनी आहे???कळत का तुला?तुला मारण्याचा प्रयत्न केला तिने???राहिला प्रश्न बाकीच्या मुलींचा ते वेगळं आहे...त्या मानसी सारख्या माझ्या प्रिन्सेस ला तर मारायला आल्या नव्हत्या ना???मानसीला सगळं माहीत असून तरीही तिने अस काम केलं...😡तू घे तिची बाजू नेहमीसारखी... एवढं करून तिने तुला काहीच कळत नाही का???की कळून घ्यायच नाही तुला???माणसाने असावा चांगलं पण एवढं ही नाही भावना???जगाला का बघते तू अशी तुझ्या नजरेने?नाही आहे चांगलं जग तस?मी का आलो होतो तेव्हा माहीत आहे तुझ्या याच स्वभावामुळे मला यावं लागलं इथे...त्यात ते पंडितजींचे बोलणे तुझ्याबद्दल चे ऐकून मला यावे लागले...एवढं सगळं रामायण घडलं मानसी मुळे आणि तू आहे की...😤जाऊ दे मला बोलायचेच नाही तुझ्यासोबत... पुन्हा वाद होतील आपल्यात त्यामुळे प्लीज मला एकट राहू दे काही वेळापूरत..."जय तिला बाजूला करत थोडस चिडत बोलतो...तो तसाच तिला सोडून रूममध्ये निघून जातो आणि रूमचा दरवाजा बंद करतो...

भावनाचे बोलणे ऐकून त्याला भरपूर राग आला होता...मानसी ने तिला मारण्याचा प्रयत्न केला हे ऐकूनच त्याला भरपूर राग आला होता...त्यात अजूनही भावना तिची बाजू घेत आहे हे ऐकून त्याचा राग बाहेर पडला...

इकडे त्याचे असे बोलणे ऐकून तिचे डोळे भरतात...तिचा स्वभाव तसा नसल्याने ती मानसी बद्दल विचार करत होती...मानसीला दिलेली शिक्षा तिला आरु कडून कळली होती...पण एवढ्याश्या गोष्ठी साठी मोठी शिक्षा हे तिला पटत नव्हतं...शेवटी मानसी तिची खास मैत्रीण होती...असे अनेक विचार तिच्या मनात येतात...ती तशीच रडत सोफ्यावर बसते...पण काहीतरी विचार तिच्या डोक्यात येतो...तशी ती डोळे पुसते आणि बाहेर जाते...बाहेर गेल्या गेल्या तिला गुलाबाची झाड दिसतात...ते पाहून आपसूकच तिच्या चेहऱ्यावर गोड हसू येते...

"तुला माहीत आहे गुलाब राव...लहानपणी आम्ही दोघांनी तुम्हाला लावले आणि त्यादिवशी पण काही जणांना लावले...पण आज ते नाराज आहे ना माझ्यामुळे...तर त्यांना मनवा ना तुम्ही..."ती एका गुलाबाच्या झाडाकडे जात बोलते...तिचे असे बोलणे जय रूमच्या गॅलरीत राहून ऐकत असतो...

"नको प्रिन्सेस अशी राहू तू...जगाला अस नको पाहू तू...तुला तर फक्त तिने तुला एवढं मारलं एवढंच कळलं आहे...बाकी किती काय केले हे तुला नाही कळलं...मैत्रीण अशी असेल यावर तुझा कधीच विश्वास नसेल...तू निर्मळ झऱ्यासारखी आहे पण त्या मानसीत तुझा एक परसेंट गुण नाही आहे..."मृत्युंजय हाताची घडी घालून भावनाला पाहत बोलतो...भावनाला प्राण्याप्रमाणेच गुलाबाची झाड देखील तेवढीच आवडायची हे त्याला कळलं होतं म्हणून तो त्या दिवशी भावनाचा मूड चांगला करण्यासाठी इकडे घेऊन आला होता....तो तिला पाहतच भूतकाळात जातो...

भूतकाळ:-

गाडीत दोघेही शांत असतात...जयच मन थोडस चलबिचल होते भावनाच्या बोलण्याने...आईने आणि मृत्युंजयने भावनाच्या मनात नक्की त्याच्या बद्दल फिलिंग आहे का नाही?हे जाणण्यासाठी प्लॅन केला होता... त्यांचा प्लॅन तर success झाला होता थोडाफार पण भावना आधी कोणावर तरी प्रेम करायची आणि तो माणूस या जगात नाही आहे हे ऐकून मृत्युंजयला कसतरी वाटलं...पण भावनाचा मूड त्याला ठीक करायचा होता म्हणून त्याने ड्राईव्हरला गाडी एका ठिकाणी घ्यायला सांगितली...भावना आपल्या विचारात गुंतल्याने तिला कुठे जातो हे कळले नव्हते...गाडी एका ठिकाणी थांबते... तसा जय खाली उतरतो...

"उतर खाली भावना..."जय थोडस मोठ्याने बोलतो...त्याच्या आवाजाने ती भानावर येते...

"अंम... कुठे आलो आपण..."ती हळुवारपणे त्याला विचारते...

"आजचा टास्क लक्षात आहे ना?त्यामुळे मला प्रश्न न विचारता खाली उतरायचे..."तो तिच्यावर नजर रोखत बोलतो...त्याच्या अश्या बोलण्याने ती लगेच खाली उतरते...समोर पाहते तस काही क्षणापूर्वी कोमजलेली ती लगेच खुश होते आणि पळतच तिथे जाते...इकडे मृत्युंजय ड्रायव्हरला आणि बॉडीगार्डला घरी पाठवून देतो...फक्त एक गाडी त्याची फेवरेट तिथे थांबते बाकी सगळे निघून जातात...

"ऐ वाव...😍😍माझी गुलाब...किती दिवसांनी नाही वर्षांनी भेटत आहोत आपण आय लव्ह..."ती आनंदात बोलत असते की ती बोलायची थांबते...जय तिला पाहून न पाहिल्यासारखे करत आतमधे निघून जातो...तो गेला तशी ती खुश होते...

"तुम्ही मोठे झालात पण हा माणूस आहे तसा आहे खडूस, सडू कुठचा...पण माझा आहे ना...😙हा पण अस सांगितले तर त्याला किंमत नाही राहणार इसलीए थोडी तकलीफ दुंगी उसे...शादी तो हो चुकी हैं ना मेरी...लेकिन उसको सताने में मजा ही कुछ और हैं...ये तुम्हारा और मेरा सिक्रेट हैं हा...किसींको बताना नहीं..."भावना गुलाबाच्या झाडांकडे राहून हसून त्यांना बोलते...ती तशीच घरात जाते...आसपास जय आहे ना का नाही पाहते...तर तो तिला कुठेच दिसत नाही...हे पाहून ती नाचू लागते...

"अरे काय भारी आहेस तू...😍मी खूप मिस केलं तुला यार...ये माझं घर...😄"ती घराला पाहून बोलते आणि गोल गिरकी घेते...कारण या घरातील प्रत्येक गोष्ट तिच्या आवडीची होती...म्हणून ती त्या घराला पाहून खुश झाली होती...इकडे तो एका ठिकाणी लपून राहून तिची खुशी पाहत होता...त्याला खुप भारी वाटत होतं तिचा असा हसरा चेहरा पाहून...तो तिची खुशी पाहून गालात हसतो...

"प्रिन्सेस मला माहित आहे ना तुझा चेहरा कसा खुलवायचा तो...तू अशीच हसत रहा...खुप भारी वाटत असते अशी हसताना..."तो मनातच तिला पाहून बोलतो...तो चेहऱ्यावरचे हावभाव थोडेसे बदलून तिच्याजवळ जातो...

"मिस भावना तुमच्या लक्षात आहे ना???"तो त्याच्या बॉसी टोन मध्ये बोलतो...त्याचा आवाज ऐकून ती दचकते...गिरकी घेत असताना ती खाली पडत असते तसा तो तिला धरतो...

"प्रिन्सेस जरा नीट रहा की...😤काय बालिशपणा करत असते?लहान आहोत का आता आपण?जे तू या घरात आली की कहर करत असतेस?का एवढा आनंद होतो तुला याचे कारण सांगशील का?"तो तिला सरळ उभा करत थोडस चिडत बोलतो...कारण पडली असती तर टेबलची कट तिला लागली असती...ऐनवेळी त्याने येऊन सावरल्याने तिला ते लागलं नव्हतं...

"माफ करा मालक...😔"ती शांत पणे त्याला बोलते...

"व्हॉट मालक??"तो चिडतच विचारतो....

"हा तुम्ही मराठीत सांगितले बोलायला म्हणून तुम्ही मालक...😒आवाज खाली करायचा हे घर माझे आहे त्यामुळे शांत रहायचे..."ती त्याला धमकी देत बोलते...

"ओह सिरिअसली...हे घर माझे आहे आणि माझ्या बायकोचे..."तो चिडून बोलतो...

"बायको🤥😱 मग तुम्ही का माझ्या मागे आहात??बायको असताना?अरे मग सांगायचे होते ना तस...उगाच कशाला वेळ दुरुपयोगी केला..."ती थोडीशी शॉकमध्ये बोलते...

"हा नाही सांगितले माझी इच्छा मला दोन बायका करायच्या आहेत म्हणून तू एक आणि दुसरी एक..."मृत्युंजय थोडस हसत बोलतो...

"देवा नेहमी का रे तुझ्या पामराला छळत असतो तू...😟आता दुसरा पाहावा लागेल ना...कोण बघू?संतोष की अर्णव...😕''ती नाराज होत बोलते...पण तिचे बोलणे ऐकून तो मात्र भयंकर चिडतो...

"व्हॉट😡???तू काय मार्केट ला शोधत असते का मुलं आणि ऑफिस म्हणजे काय विवाह मंडळ आहे का मुलं शोधते ते...जा आपलं काम कर..."तो चिडून बोलतो...

"पण अर्णव भारी आहे ना...😜कसला मस्त दिसतो तो..."ती हसून त्याच्याजवळ जात त्याला बोलते...तसा तो तिच्या कंबरेत हात घालून रागातच तिला स्वतःजवळ ओढतो...

"माझ्याशिवाय कोणी तुला पाहण्याचा प्रयत्न जरी केला ना त्याला हा जय अजिबात सोडणार नाही...😤तू फक्त माझी आहेस..."तो रागातच तिला घट्ट पकडत बोलतो... त्याच्या अश्या वागण्याने ती घाबरते...त्यात त्याने असे पकडून ठेवल्याने तिला कसतरी होत होते...

"मग तुमची पहिली बायको ला तुम्ही असच बोलतात का??"ती न राहवून हळू आवाजात तिला पडलेला प्रश्न विचारते...

"माझी पहिली बायको खूप रोमॅण्टिक आहे...😉पण तू एक percent पण नाही तरीही तुला झेलतो आहे मी ते बघ..."जय थोडस झुकून तिच्या कानाकडे बोलतो... त्याचे गरम श्वास कानाकडे जाणवल्याने ती थोडीशी अंग चोरते...पण त्याच बोलणं कानावर पडताच ती पटकन त्याच्यापासून दूर होते आणि तशीच रूममध्ये पळून जाते...ती पळून गेल्यावर जय हसतो...

"वेडी आहेस खरच तू....पहिली बायको म्हणे..."जय हसून बोलत किचनमध्ये जातो आणि मस्त अस भावनासाठी काहीतरी करायला लागतो...

"यांची पहिली बायको असताना त्यांनी माझ्यासोबत लग्न का केलं बर...🙄मी त्या मुलीचा हक्क तर घेत नाही आहे ना...भावना या माणसापासून दूर राहिले पाहिजे... माझ्यामुळे कोणावर अन्याय होता कामा नये...😑आता लग्न मोडलंच आहे तर मी का विचार करू ना...पण मला बघायची आहे जयची बायको कोण आहे त्यासाठी मला ऑफिसमध्ये राहायला हवे...."ती मनातच स्वतःशी ठरवून फ्रेश होऊन बाहेर येते...

"मालक येथील माझ आंतरजाल चालत नाही आहे म्हणून माझा भ्रमण ध्वनी काम करत नाही...😒मला इथे नाही काम करायचे..."ती किचनमध्ये जयकडे येत बोलते... कारण त्याच्या पहिल्या बायकोबद्दल ऐकून तिला तिथं राहवेसे वाटत नव्हते म्हणून ती कारण शोधत होती तिथून जायचे...

"मग काय करायचे बर आपण...🤔???तो पर्यंत आपण हे सूप खाऊ..."जय हसून तिच्या तोंडाकडे सूप चा चमचा नेत बोलतो...

"नाही पाहिजे मला...😏"ती त्याच्या चमच्यातिल खाऊन बाजूला करत बोलते...तिच्या या बोलण्यावर तो गालात हसतो...तो पुन्हा हसून तिच्याजवळ चमचा नेतो...

"आता तुम्ही एवढं केलेच आहे तर खाते ना मी...😒"ती चमचा तोंडात टाकून खाऊन झाल्यावर बोलते...ती तशीच किचन ओट्यावर बसते आणि जय तिला भरवत असतो...

"तुम्ही तुमच्या बायकोला पण असच सूप देत असशाल ना...😕अर्णव ने पण मला द्यायला हवे असे...मी तर त्याला सांगून ठेवणार बाबा..."भावना मनभरून बोलत असते की जय जोरात बाऊल आपटून ओट्यावर ठेवतो आणि रागातच तिथून निघून जातो...

"आता या माणसाला काय झाले...🤔याने जर दोन बायका केल्या तर याला जेल होईल...पण मला अस नको आहे म्हणून मी अर्णव चा विचार करते...मग हा का फुगतो..."ती खात खात स्वतःशी बोलते...ती थोडस खाऊन बाहेर येते...तो तिला सोफ्यावर बसलेला दिसतो...

"ओ मालक असे का चिडला तुम्ही बर....🤔??तुम्ही विचार करा दोन बायका असल्या तरी तुम्हाला जेल होईल मग त्यापेक्षा आपण फक्त मित्र मैत्रीण राहू...👍ते सुद्धा चांगले वाले...मी अर्णवशी लग्न करेल ओके...तसही त्याने मला..."ती त्याच्याजवळ जाऊन बोलत असते की तेवढ्यात तिला काहीतरी आठवत तशी ती गप्प बसते...

"काय केलं तुला त्याने...😤बोलच तू आजच त्याला कामावरून काढून टाकणार आहे मी..."तो रागातच उठत तिला विचारतो...त्याचे बोलणे ऐकून ती घाबरते...

"काहीच नाही...मी काहीच नाही बोलले...😫"भावना कसतरी बोलते...पण तिचे उत्तर ऐकून त्याचे समाधान झाले नव्हते...तो रागातच कोणाला तरी कॉल करतो...

"त्या अर्णव चा चांगला समाचार घ्या...😤"जय कॉल वर कोणाला तरी बोलत असतो...तेवढ्यात भावना घाबरून त्याच्या हातातुन फोन घेते...

"अहो दादा अस नका करू हा...😰काहीच नाही केलं त्या बिचाऱ्याने...मी सांगते म्हणून तरी काही करू नका..."भावना थोडीशी घाबरून कॉल वर बोलते आणि पटकन कॉल कट करते...

"मी बॉस आहे तुझा...😡नवरा नाही काही...तू माझ्या हातातुन मोबाईल काढून का घेतला...???तू एक एम्प्लॉयी आहे तीसुद्धा अक्कल कमी असलेली..."तो रागातच तिला बोलतो...पण ती तेवढ्या शांततेत उभी असते...

"हा तुमचा भ्रमणध्वनी घ्या...असे काही करू नये माणसाने...सगळ्यात मोठं पाप असत ते...कोणाला मारणे म्हणजे...😧"ती घाबरून एक एक शब्द जुळवत बोलते...

"तुझं ना काहीच होऊ शकत नाही..."तो थोडस वैतागून बोलतो...

"अरे अस कस होऊ शकत नाही...😕लग्न होईल ना माझे,मग छोटे छोट एक बाळ होईल...😍😍माझ्यासारखी गोंडस एक परी हा हा...जी मला खूप प्रेम करेल...आम्ही दोघे मिळून तिच्या बाबांना भरपूर त्रास देऊ..."भावना स्वप्न रंगवत बोलते...तिचे असे बोलणे ऐकून तर त्याचा पारा चढतो...

"जस्ट shut आप भावना...😡काम कर मग बघ स्वप्न...मला नाही इंटरेस्ट मुलांमध्ये..."तो रागातच बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती नाराज होते...

"अरे तुम्हाला मुलगी झाली आणि ती तुमच्या बायकोसारखी असली तर तुम्हाला नाही आवडणार का...???😒"ती त्याच्याकडे पाहून विचारते...

"आधी ना माझ्या बायकोचे करियर मला घडवायचे आहे सध्या एवढी हुशार असून ना नको त्या ठिकाणी काम करत बसली आहे...side निवडताना पण चुकीची निवडली आहे पण तिला मी तिच्या विषयात डॉक्टरेट करायला लावणार आहे आणि मग मुला बाळांचे पाहणार आहे..."तो विचार करून बोलतो...

"किती भारी आहात तुम्ही...😍अशी पण लोक असतात आजच कळलं...बरोबर आहे तिला शिकवले पाहिजे...मी तर अजिबात जाणार नाही शिकायला...मी गेली तर आई बाबा एकटे पडतील ना म्हणून नाही गेली मी...आता नोकरी करते ना ते बस झालं..."ती...

"पण का असा विचार करते तू आई वडील एकटे राहतील???तू रोबोटिक्स, artificial intelligence विषयांत हुशार आहेस त्यातून तुझी डिग्री झाली तर त्याचा उपयोग सर्वांना होईल...लँन्सी ला जस बनवलं तस आणखीन वस्तू बनवशील तू? मेन गोष्ट तू एक साधी डिग्री घेऊन ऑफिसला आली पण तुझं डोकं मोठया डिग्री वाल्या लोकांपेक्षा फास्ट आहे??तुझं नॉलेज कितीतरी भयंकर प्रमाणात आहे...जर तू पुढे शिकली तर आई बाबा खुश होतील की आणि आम्ही आहोतच तुझ्यासोबत...☺️

ऑस्ट्रेलिया च्या संशोधन साईड ला तुझं selection झाले होते...तू ते नाकारून का इथे जॉब करत आहे???"तो शांतपणे तिच्या डोळ्यांत पाहत तिला प्रश्न विचारतो...

"मला नकोय ते...🙁"ती चेहरा पाडत बोलते...

"का नको आहे ते तरी सांग?आता देखील तुला बाहेरच्या देशातून बोलावले आहे तू बनवलेली अपंगांसाठीची आर्टिफिशल टेक्नॉलॉजी वाली स्टीक कमालीचे काम करत आहे...त्यांना ते आवडलं...एवढं सगळं असताना का नको आहे याचे कारण तरी सांग मला???तुझ्या हसऱ्या चेहऱ्या मागे जे दुःख तू लपवत आहे जगापासून ते बाहेर काढ भावना...अशी आत मध्ये घुटमळत राहून तू स्वतःला फसवत आहे अजून किती फसवशील स्वतःला??"तो महत्वाच्या मुद्द्यावर येत बोलतो...त्याचे असे बोलणे ऐकून तिचे डोळे भरतात...तिला त्याच्यासमोर राहणे पण कठीण वाटत होते म्हणून ती तिथून पळून जात असते तसा तो तिचा हात पकडतो...

"आज तुला बोलावेच लागेल भावना...😡तू अशी नाही पळू शकत...स्वतः पासून,जगापासून खूप पळत आहेस पण आज माझ्यापासून नाही पळू शकत...मला कारण हवे आहे....माझी पहिली बायको तू आहेस आणि तुझ्या प्रत्येक गोष्ठी आज मला जाणून घ्यायच्या आहेत..."जय थोडंस चिडून तिला बोलतो...

त्याच्या अश्या बोलण्याने ती मागे वळते...ती खाली मान घालून त्याच्यासमोर उभी राहते...तसा तो तिचा चेहरा दोन्ही हाताने पकडतो आणि वर करतो...त्याला तिचे भरलेले डोळे दिसतात...

"बोल प्रिन्सेस...काय आहे ते??मी नेहमी तुझ्यासोबत असेन...पण तू अशी आतमध्ये नको कोलमडून जाऊ...तू अशी आतमधे कोलमडत राहिली तर मी नाही राहू शकत सुखी...आपलं लग्न झालेले असेल पण तू माझ्यासोबत असून नसशील...तुला तस हवं आहे का???मी तुला वेळ दिला असता पण तू खूप वर्ष त्यात अडकून बसली आहे आणि आता मला वेळ नाही द्यावासा वाटत तुला...अस वागणं नको आहे प्रिन्सेस तुझ्या मम्माला...तू जेवढी स्ट्रॉंग दाखवते तेवढी तू मनाने नाही आहे...त्यासाठी जे काही आहे ते बोल आणि विषय संपव..."जय तिचा चेहरा ओंजळीत पकडून तिला बोलतो...त्याचे असे बोलणे ऐकून तिला आणखीन भरून येत...

"जय...मी...काहीच...केलं...नव्हतं...😭सगळे...मला... बोलतात...😭"ती रडत रडत त्याला बोलते...तिचे रडणे ऐकून त्यालाच कसतरी होते...पण आज त्याने काहीतरी ठरवले होते...म्हणून आज त्याने मनाला स्वतःच्या बंधने घातले होते...ती रडत रडतच खाली बसते...तीच रडणं पाहून त्याचा धीर सुटत होता...पण तो तेवढाच स्ट्रॉंग तिच्यासमोर राहत होता...

"शु$$$ प्रिन्सेस रडून काहीच होणार नाही आहे...गेलेली वस्तू पुन्हा नाही येणार..."जय खाली बसून तिला जवळ घेत बोलतो...तरीही तीच रडणं काही थांबत नव्हतं... भावनाच्या घरी राहून लँन्सी मार्फत भावनाचे रडणे तिच्या आई बाबांना दिसत होते...आपल्या मुलीला अस रडताना पाहून दोघांना कसतरी होत होते...पण जय समोर असल्याने ते शांत बसले होते...आज सगळयांनी काहीतरी ठरवले होते...म्हणून ते फक्त तिला पाहू शकत होते... लँन्सी तिला रडताना पाहून जात असते...तसे भावनाचे बाबा तिला अडवतात...

"तू नको जाऊ तिथे...आज तुझी गरज नाही बाळा...आज पासून ती त्याची जबाबदारी आहे...तो त्याची जबाबदारी पार पाडत आहे...त्याने वचन दिल आहे आम्हाला तिला सगळ्यातून बाहेर काढेल म्हणून तो तिला घेऊन गेला आहे...तर त्याला करू दे त्याच काम..."भावनाचे बाबा लँन्सीला बोलतात...

"हे सगळं बंद करा तुम्ही दोघी...त्याला हॅण्डल करायला येईल ते...काही गोष्ठी आई वडिलांकडे नाही शेअर्स करता येत आणि आपली मुलगी फ्रेंड्स मध्ये पण शेअर करत नाही त्यामुळे आज तिला तिच्या हक्काच्या माणसाकडे मोकळं होऊ द्या..."भावनाचे बाबा भावनाच्या आईकडे जात बोलतात...त्यांचे बोलणे ऐकून लँन्सी लॅपटॉप बंद करते...आईला पण ते योग्य वाटते म्हणून त्या पण गप्प बसतात...
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
          ©®भावना सावंत(भूवि❤️)

Rate & Review

sanjana kadam

sanjana kadam 3 months ago

Swati Jagtap

Swati Jagtap 3 months ago

टिना

टिना 4 months ago

Nitin  Chavhan

Nitin Chavhan 4 months ago

uttam parit

uttam parit 4 months ago