तू अशीच जवळ रहावी... - 16 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - 16

तू अशीच जवळ रहावी... - 16

मागील भागात:-जय भावनाच्या नकळत मेदूवडा उचलतो आणि खातो...तशी भावना डोकं धरते...

आजच्या भागात:-ती तिच्या चेहऱ्यावर एक हात ठेवते आणि बोटाच्या फटीतून त्याचा चेहरा पाहते...मेदूवडा चा एक बाईट तो खातो आणि पटकन तोंड वाकड करून घास बाहेर काढतो...

"आह प्रिन्सेस केवढं तिखट आहे...🤢कस खाल्लं हे तू??"तो तोंडावर हात फिरवत बोलतो...ती पटकन त्याच्याकडे जाते आणि टेबलवरचा भरलेला पाण्याचा ग्लास त्याच्या तोंडाला लावते...

"म्हणून सांगितले होते ना तुम्हाला खाऊ नका...पण नाही ऐकत..."त्याची अवस्था पाहून ती त्याला बोलते...तो गपचूप पाणी पीत असतो...इकडे त्याची अवस्था पाहून तिचे डोळे भरतात...तो तिच्याकडे पाहतो तर त्याला कसतरी वाटते...कारण जेव्हा तिला तिखट लागले तर ती गपचूप खात होती...पण त्याची अवस्था पाहून तिला कसतरी झाले...ती पटकन किचनमध्ये पळत जाऊन हनी घेऊन येते आणि एक चमचात घेऊन ती त्याच्या तोंडाजवळ नेते...तसा तो ते चाखतो...हनी टेस्ट करून तो थोडा नॉर्मलं होतो...

"तुम्ही ओके आहात ना???"ती काळजीने त्याला विचारते...तसा तो मानेने हो बोलतो...

"प्रिन्सेस ते हनी दे इकडे...तू पण तिखट खाल्लं आहे..." मृत्युंजय तिच्या हातातुन बाऊल मागत बोलतो..

"तुम्ही खरच ओके आहात ना??"ती डोळ्यांत पाणी ठेवून बोलते...तसा तो चिडून तिच्या हातातील बाऊल घेतो आणि चमचाभरून तिच्या तोंडाकडे नेतो...डोळ्यांनीच तिला घे बोलतो...तशी ती ते घेते...दोन ते तीन वेळा तो तिला देतो आणि नंतर बाजूला टेबलवर ठेवून तो तिला जवळ घेतो...

"जय..."ती बोलत असते की तिचे ओठ आणि शब्द घशातच राहतात...तिच्यासोबत काय घडलं हे तिला कळायला थोडा वेळ जातो...तिच्या नाजूक ओठांवर त्याच्या ओठांनी ताबा मिळवला होता...ती डोळे बंद करून त्याला प्रतिसाद देते...तो थोडासा passionately तिला किस करायला लागतो...तिचे हात त्याच्या शरीराभोवती फिरतात...पाच मिनिटांनी त्याच मन भरल्यावर तो तिला सोडतो...भावना तर त्याच्या अश्या करण्याने लाजून चुर होते...ती खाली मान घालून गपचूप श्वास घेत असते...त्याला तिच्या अश्या कृतीवर हसू येते...तो हसून तिला जवळ ओढून स्वतःच्या मिठीत घेतो...

"प्रिन्सेस काय करू मी तुझं??कशी आहेस ते अजुनही मला कळत नाही आहे...एवढं प्रेम पाहून खरच मला वाटत जगातील सगळ्यात लकी पर्सन मी आहे अस..."तो प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवत तिला बोलतो...

"मी पण..."ती त्याला घट्ट पकडून बोलते...

"एवढं तिखट होत तर नाही खायचं ना तू??"तो तिला बाजूला करून विचारतो...

"तुम्ही माझ्यासाठी बनवलं ना म्हणून खाल्लं...😊पण असो ना आता...तुम्ही बसा इथे मी बनवते काहीतरी पटकन..."भावना त्याच्या पासून दूर होत बोलते...

"नको ना....माझं पोट भरलं आहे..."तो तिला जवळ घेत खट्याळपणे बोलतो...

"जय आगाऊपणा करू नका हा...गपचूप बसा इथे...मी बनवून आणते काहीतरी..."ती त्याच्या पासून दूर होण्याचा प्रयत्न करत बोलते...तो मान हलवून नाही बोलतो...

"जय असे काय करतात तुम्ही...मी तुमचीच आहे ना...सोडा आतातरी..."ती हसून त्याला बोलते...तसा तो तिला सोडतो...

"गुड बॉय..."ती हसून त्याच्या गालावर किस करत बोलते आणि तिथून पळून जाते...जय हसून केसांवर हात फिरवतो...तो वर रूममध्ये जाऊन तिची डायरी घेऊन येतो आणि डायनींग टेबलवर तिची वाट पाहत बसतो...

काहीवेळातच ती त्याच डायट फूड आणि पोहे बनवून घेऊन येते...ती सगळं आणून टेबलवर ठेवते...

"कम बेबी..."जय हसून तिला बोलतो...ती तर त्याच बोलणं ऐकून कपाळावर हात मारते...

"इंग्लंडला आलात म्हणून जास्तच प्रेम ओतू जात आहे का तुमचं??"ती त्याला सर्व्ह करत बोलते...तिचे असे बोलणे ऐकून तो तिचा हात पकडून तिला स्वतःच्या मांडीवर बसवतो...

"काय आहे ना मिसेस मृत्युंजय प्रेम तर मी आधीपासूनच करत आहे...फक्त आता मी ते दाखवत आहे..."जय तिला व्यवस्थित पकडून बोलतो...त्याच्या अश्या करण्याने ती गोड अशी लाजते...कारण हल्ली तिची सकाळ संध्याकाळ त्याच्या स्पर्शाने त्याला पाहून होत होती आणि त्याच तिच्यावर असलेलं प्रेम पाहून तिला खूप भारी वाटत होते...जे तिने स्वप्न पाहिले होते ते आज पूर्ण होत होते...तिचा जय तिच्याजवळ होता....तो एवढा जवळ आला होता की आता तिला काहीच नको होतो...फक्त तो आणि त्याच प्रेम...

"आ करा मिसेस मृत्युंजय..."तो चमच्यात पोहे घेऊन बोलतो...तशी ती भानावर येऊन तोंड उघड करून ते खाते...

"जय आपण इंग्लंडला का आलो??"ती खाता खाता बोलते...तिच्या बोलण्याने तो तिला भरवायच थांबतो...

"लग्न झाल्यावर बायकोला सासरीच आणलं जात ना...??म्हणून आणलं आहे..."तो डोळा मारून तिला बोलतो...

"जय नका ना मस्करी करू....खर बोला ना..."ती...

"प्रिन्सेस 2 इयर्स इकडे राहायचे आहे आपल्याला... इकडचा बिझनेस माझ्याशिवाय कोणीच हँडल नाही करू शकत ना म्हणून...मला तू पण हवी आणि बिझनेस पण...डॅड नंतर मलाच करावं लागतं हे सगळं...तुला माहितीच आहे ना...जर तुला नाही आवडत तर तू जाऊ शकते..."तो तिच्याकडे पाहून बोलतो...

"झालं बोलून तुमचं??"ती शांतपणे त्याला विचारते...तसा तो मान हलवून हो बोलतो...

"मी कुठेच जाणार नाही आहे...माझ्या नवऱ्याच घर आहे हे...तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकतात..."ती हसून त्याच्या गळ्यात हात घालून बोलते...तिच्या अश्या बोलण्यावर तो भलताच खुश होतो...

"जय खूप दुरावा झाला ना?आता नको ना मला दूर करू तुमच्यापासून...प्लीज..."ती त्याला पाहून बोलते...

"कधीच नाही करणार...😊तू फक्त माझीच आहे...."तो हसून बोलतो...

"चला चला तुम्ही पण खावा आता...तुमचं हे डायट फूड..."ती त्याला सलाड भरवत बोलते...

"कधितरी तू पण खा की...काय ते पंजाबी आणि साऊथच्या डिशेस खाते...??"तो...

"नको अजिबात नाही...🤑"ती जीभ दाखवत बोलते... तिच्या या बोलण्यावर तो खळखळून हसतो...

दोघेही मस्त एकमेकांना भरवत खाऊन घेतात...सगळं आवरुन ती कपडे चेंज करायला जात असते की त्याची हाक तिच्या कानावर पडते...

"प्रिन्सेस ये इकडे बस...नको बदलू आजच्या दिवस... एकदम भारी दिसते..."तो तिला पाहून बोलतो...त्याच्या बोलण्याने ती जागीच थांबते...जय तिच्याजवळ जातो आणि तिला काही कळायच्या आत उचलून घेतो...

"तुला माहीत आहे त्यादिवशी आपण त्या घरात होतो आणि तू साडीत किचनमध्ये होती...तेव्हा खूप हॉट दिसत होती...मनात असून पण तुझ्याजवळ येऊ शकत नव्हतो... कारण तेव्हा तर तू लग्न मोडायला कारण शोधत होती ना...??म्हणून दूर राहत होतो...किती कंट्रोल केलं मी माझं मला माहीत आहे...बायको असून सुद्धा मानत नव्हती तू..."जय तिच्याकडे पाहून बोलतो...त्याच्या अश्या बोलण्याने तिला कसतरी वाटत...तो तसाच तिला घेऊन बेडरूममध्ये जाऊन बेडवर ठेवतो...तो तिच्या बाजूला बसतो....

"सॉरी ना जय खरच मला तेव्हा काहीच समजत नव्हते...प्रेम असून सुद्धा कळत नव्हतं...पण तुम्ही मात्र कधीच सोडून गेला नाहीत माझ्याजवळ राहून प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतात..."ती त्याच्या डोळ्यात पाहून बोलते...तिच्या बोलण्याने जय बेडवर आडवा होतो आणि तिला जवळ घेतो...

"माझं प्रेम मला मिळणार एक दिवस याची खात्री होती मला म्हणून प्रयत्न सोडला नाही..."जय तिला कुरवाळत बोलतो...दोघेही बोलता बोलता भूतकाळात जातात...

भूतकाळ:-

(आपण आधी गेलो होतो ना 14 पार्ट ला तिथे जात आहोत...)

भावना मस्त अशी फ्रेश होऊन रेड कलरची साडी घालून तयार होऊन किचनमध्ये येते...ती विचारात हरवूनच करत असते...तेवढ्यात ती गाजर किसायला घेते...ती मशीनचा वापर करून ते करते...पण खूप वेळ झाला तरीही मशीन काय चालू होतं नाही...ते पाहून आता तिला थोडा राग येतो...

"आज ही बंद हो ना था क्या तुमहें?मैं कद्दूकस कैसे करू?"ती मशीनला पाहून बोलते...तिला वाटत ती एकटीच तिथे आहे...पण जय किचनच्या दरवाज्यावर उभा राहून तिची मज्जा पाहत असतो...

"चल प्रिन्सेस मी जिंकलो...😎आता तू ऑफिस सोडून नाही जायचं..."जय तिच्याजवळ येऊन बोलतो...त्याच्या अश्या अचानकपणे बोलण्याने ती घाबरते...

"तुम्ही...इथे.....कसली..."ती घाबरून बोलते...

"कसली म्हणजे तूच ओके केलं होतं...पूर्ण दिवस मराठी बोलायचं...पण आता तू हिंदी बोलली...त्यामुळे मी जिंकलो आहे...."तो हसून तिला बोलतो...त्याच्या बोलण्याने तिला आठवत...

"एक चान्स नाही का मिळणार??"ती request करत विचारते...तो सरळ नाही मध्ये मान हलवतो...त्याच अस नाही म्हणणं तिला आवडत नाही म्हणून ती बाजूचाच एक चाकू उचलते...

"ओके मी नाही जात ऑफिस सोडून...😡नुसते छळत राहतात मला...आताच मर्डर करते तुमचा..."ती रागात त्याला चाकू दाखवत बोलते...

"ओके कर ना..."जय हसून तिच्याजवळ येत बोलतो...

"नो चॅलेंज हा...जय...😡मी खरच मारेन तुम्हाला..."ती चाकू त्याला दाखवत बोलते...

"मार ना मग...बघू हिंमत तुझी..."जय अस म्हणून एकदम तिच्याजवळ जातो...तो तिच्या उगड्या कंबरेवर हात ठेवून तिला जवळ ओढतो...त्याच्या अश्या करण्याने तिच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहतो...

"काय झालं प्रिन्सेस मार कि मला...आता तर खूपच जवळ आहे मी..."जय तिला धरूनच बोलतो...त्याच्या आवाजाने ती पटकन भानावर येते...ती झटापट करायला लागते सुटण्यासाठी...त्याच झटापटीत तिच्या हातातील चाकू त्याच्या हाताला लागतो...तसा तो पटकन तिला सोडतो...

"आर यू मॅड....😠???"जय रागातच तिला विचारतो... तिला देखील जय का चिडला ते कळत नव्हते...पण त्याच्या हातातुन रक्त पाहून ती घाबरली होती...

"सो....स...सॉरी....जय .....मला..."ती घाबरून बोलत असते की जय तिला हात दाखवून अडवतो...

"मिस भावना खुप उशिर झाला आहे...आपण निघुया..." तो रक्तात भरलेला हात एका हाताने धरूनच बोलतो...तो एवढं बोलून बाहेर पडत असतो की तशी ती त्याचा हात धरते आणि त्याला अडवते...तो रागात काही बोलायला जाणार त्या आधीच ती स्वतःच्या साडीच्या पदराचा तुकडा काढुन त्याच्या हाताला बांधते...जय फक्त तिला पाहत असतो...त्याच रक्त पाहून तिला कसतरी वाटत असते...पण ती गपचूप खाली मान घालून त्याच्या हाताला पट्टी करत असते...रागात असणारा तो तिला अस पाहून शांत होतो...

"चला मिस भावना...खूप झालं तुमचं नाटक...आधी जखमा द्यायचा आणि मग अस पट्टी करायची..."जय तिला पाहून पुटपुटतो...

"अंम जास्त दुखत नाही ना??"ती काळजीने विचारते...तो तिच्या हातातुन हात काढून घेत रागानेच तिथून निघून जातो...तिने चाकू मारल्याचे आठवलं म्हणून त्याला राग येत होता...तो गेल्यावर ती सुद्धा सगळं आवरुन बाहेर पडते...जय गाडीत बसून तिची वाट पाहत असतो... काहीवेळात ती देखील स्वतःला नीट करून बाहेर पडते... बाहेर पडताना ती एकदा गुलाबाच्या रोपट्यांवर प्रेमाने हात फिरवते आणि गपचूप जाऊन त्याच्या बाजूच्या सीटवर बसते...ती बसल्यावर तो गाडी स्टार्ट करतो आणि न बोलता तो तिल तिथून घेऊन जातो...

रात्र होत आली होती...रस्त्यात एकदम शांतता पसरली होती...जशी गाडीत होती तशीच...तो बोलत नव्हता आणि ती पण...दोघांना ती शांतता नको होती...पण बोलायला कोणच पुढाकार घेत नाही...बाहेर अचानक पावसाच्या सरी बरसायला सुरवात होतात...त्यात मातीचा सुगंध...तिला ते पाहून खूप भारी वाटत...

"जय मला पावसात भिजायच आहे...प्लीज थांबवा ना गाडी..."ती अचानकपणे excited होत बोलते... मगासपासून गाडीत पसरलेली शांतता तिच्या आवाजाने दूर होते...तिचे बोलणे ऐकून तो गाडी थांबवतो...तो काही तिला बोलणार त्या आधीच ती गाडीचे दार खोलून पसार झालेली असते...

"ही मुलगी पण ना..😡कधीच ऐकून घेत नाही...कस होणार जय तुझं..."तो रागातच गाडीच्या बाहेर पडत बोलतो...पण समोरच दृश्य पाहून त्याचा राग गायब होतो...कारण ती साडीत चिंब होऊन गोल फिरत होती...मधेच ती बागडत होती...तिचे लांबसडक केस पूर्णपणे भिझले होते...पूर्ण जगाचा विसर पडून ती आपल्याच धुंदीत आनंदी राहत होती...तिच्या चेहऱ्यावरचे ते खट्याळ भाव तो स्वतःच्या नजरेत भरून घेत होता...पावसात भिजल्यामुळे तिचे सौंदर्य आणखीन खुलले होती...तीच मादक सौंदर्य पाहून त्याला देखील स्वतःच्या मनाला  रोखता आलं नाही...तो पावलं टाकत तिच्याजवळ गेला...त्याला स्वतःजवळ येताना पाहून ती थांबली...

"जय खूप झालं भिजून...चला जाऊया..."ती त्याला जवळ आलेलं पाहून बोलते...

"कुठे जाऊया हुं??"तो एकदम तिच्याजवळ येत बोलतो...

"घरी..."ती हळु आवाजात बोलते...

"आता नको जाऊया..."तो...

"तुम्ही बसा भिजत...😣मीच जाते..."ती अस म्हणून वैतागत तिथून निघून जाते...तिच्या जाण्याने तो भानावर येतो...

"ही कधीच रोमॅण्टिक नाही होऊ शकत का??आधी स्वतःच वेड करायचा आणि मग अस हुं...''जय तिला गेलेलं पाहून बोलतो...

"मूवी सारख करत होतात ना जय??पण मी अजिबात असलं काही करू देणार नाही...😏आले मोठे मला किस करणारे?मी मुव्ही बघते म्हणून बर झालं नाहीतर यांनी आज मला किस केलं असत..."ती स्वतःशीच गाडीत बसून बोलते...जय तेवढ्यात गाडीजवळ येऊन तीच ते बोलणं ऐकतो...ते बोलणं ऐकून तो गालात हसतो...खूप क्युट पणे ती स्वतःशी बडबडत असायची...तो चेहरा नॉर्मलं करून गाडीत बसतो...

"मॅडम सीटबेल्ट लावता का तुम्ही???"तो तिच्याकडे पाहून बोलतो...

"ऐ ड्रायव्हर मला जास्त शिकवू नको हा...मला सगळं येत..."ती त्याच्याकडे पाहून बोलते...नंतर तिला आठवते जय तिच्यासोबत आहे...तस ती तोंडावर हात ठेवते...

"व्हॉट ड्रायव्हर??सिरियसली?"तो तिच्यावर कटाक्ष टाकून बोलतो...

"नाही नाही तुम्ही तर बॉस आहात....ते चुकून बोलली..." ती ओशाळून बोलते...

"इट्स ओके पण पुन्हा ड्रायव्हर बोलली तर गाडीच्या बाहेर टाकेन...."तो चिडून बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती घाबरते आणि गप्प सीटबेल्ट लावून बसते...तसा तो हसून गाडी चालू करून तिथून निघून जातो...

"तू कितीही लपवल ना प्रिन्सेस तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेलं प्रेम मला कळत...पण ते तुला कळत नाही आहे राणी...जेव्हा कळेल तेव्हाच मी कायमचा तुझा होईन... पण सध्या खूप मेहनत घ्यावी लागणार आहे मला तुझ्यासाठी..."जय मनातच स्वतःशी बोलतो...

"मला काय होत असत तेच कळत नाही...का खेचली जाते मी त्यांच्याकडे??ते नाही आहे माझ्या लायक...त्यांनी दुसऱ्या मुली पाहून लग्न करावे हीच एक ईच्छा आहे... पण ते जवळ आल्यावर मनाला आवर घालता येत नाही...काय आहे दोघांमध्ये तेच कळत नाही...प्रेम म्हणजे हेच का ते??मला का काळजी वाटत असते त्यांच्या बद्दल??काय होत आहे माझ्यासोबत तेच कळत नाही आहे??जेवढ दूर पळायचा प्रयत्न करते तेवढं जबरदस्त फिलिंग निर्माण होत आहे त्यांच्याबद्दल...प्लीज देवा मला नाही पडायचे या सगळ्यात...ते कधीच माझे नाही होऊ शकत..."ती मनातच स्वतःशी बोलत असते...ती एवढी स्वतःत हरवलेली असते की तीच घर आलेलं पण तिला समजत नाही...

"भावना उतर खाली घर आलं आहे तुझं..."मृत्युंजय तिला विचारात हरवलेलं पाहून बोलतो...त्याच्या आवाजाने ती भानावर येते आणि आसपास पाहते...स्वतःच घर आलेलं पाहून ती पटकन गाडीच्या बाहेर उतरत असते की तेवढ्यात ती ओरडते...

"आह$$ मम्मी..."ती वेदनेन बोलते...तिचा तसा आवाज ऐकून तो काळजीने तिच्याकडे पाहतो...

"काय झालं प्रिन्सेस तुला??"जय तिला काळजीने विचारतो...

"जय मोंच आली आहे...😟"ती एका पायाला धरत बोलते...तिचे बोलणे ऐकुन तो गाडीच्या खाली उतरतो आणि दरवाजा ओपन करून तिच्या बाजूला जातो...

"ये इकडे...मी घेतो तुला...वरती जाऊन आपण इलाज करू..."तो अस बोलून सरळ तिला स्वतःच्या दोन्ही हातात उचलून घेतो...

"आउच😧"ती...

"प्रिन्सेस दोन मिनिटे थांब बाळा...आपण घरात जाऊ आणि बर करू..."तो तिला धीर देत बोलतो...पाय मुरगळल्यामुळे तिला त्रास होत होता...तो त्रास त्याला बघवत नव्हता म्हणून तो मागचा पुढचा विचार न करता तिला स्वतःच्या दोन्ही हातात उचलुन घेतो...तो तिच्या घराच्या दरवाजा समोर येतो आणि आवाज देतो...त्याच्या आवाजाने दरवाजा ओपन होतो...

"आल्या महाराणी...या या आम्ही तुमचीच वाट पाहत होतो...बघा सासूबाई आपण या पोरीचे गुणगान गातो आणि ही पोरगी तर आपल्या आशिकसोबत गुण उधळत असते..."एक 45 ते 50 वर्षाची बाई कुत्स्कीपणे बोलते... त्या बाईचे बोलणे ऐकून जयला राग येतो...भावना त्या बाईला पाहून थोडीशी घाबरते...ती एकदा जय कडे पाहते...तो शांत प्रेमाने तिच्याजवळ पाहतो म्हणून ती सुटकेचा श्वास सोडते...

"जय बस्स झालं सोडा आता मला..."ती हळुवारपणे त्याला बोलते...

"तुम्ही कोण आहात मी ओळखत नाही...त्यामुळे बाजुला व्हा दारातून..."जय शांतपणे बोलतो...

"ऐ आमच्या घरी येऊन आम्हाला अस बोलतो...😡तुझी एवढी हिंमत...सोड आमच्या पोरीला खाली..."ती बाई रागात बोलते...पण जय मात्र शांतपणे त्या बाईच काहीही ऐकून न घेता तिच्यासमोरून भावनाला तिच्या बेडरूममध्ये घेऊन जातो...ते पाहून त्या बाईला प्रचंड राग येतो...

"सासूबाई मुलीची लक्षण काही चांगली दिसत नाही...लवकरच लग्न लावून टाकू...आपल्या घराची इज्जत रहावी...या उद्देशाने मी बोलत आहे..."ती बाई एका म्हाताऱ्या बाईजवळ येऊन बोलते...

"माफ करा आई तो मुलगा भावनाचा होणारा नवरा आहे त्यामुळे आम्हाला काही गैर वाटत नाही...कारण त्या आधी तो तिचा चांगला मित्र आहे..."भावनाची आई किचनमधून येत बोलते...

"तू शिकवणार का आता आम्हाला?तुलाच आणलं ते बघ...जास्त चुरूचुरू बोलू नको...तुझी अपशकुनी मुलगी पूर्ण घराला गिळायच्या आत तिला हाकलून लावलेल बर...मी आणलेल्या मुलासोबत तीच लग्न होईल...😡"ती बाई...

"माफ करा ताई माझ्या पोरी बद्दल बोललेलं मी खपवून घेणार नाही...😡मुलगी आहे म्हणून कसलेही आरोप तुम्ही लावत आहात...हे अजिबात मला पटत नाही... आजवर मला बोललेलं मी ऐकून घेतलं पण माझ्या मुलीबद्दल अजिबात नाही...माझ्या मुलीला मारण्यासाठी तुम्ही काय काय केलं हे सांगू का यांना??घरात मुलगी नको म्हणून किती खालच्या थराला गेला होतात??सांगू का मी भावनाच्या बाबांना..."भावनाची आई रागातच बोलते...त्यांचे बोलणे ऐकून दोघी एकमेकींना पाहतात...

"तू दीड दमडीची आमच्या बद्दल बोलणार हुं...त्या आधी तुलाच फोडते आणि मग तुझ्या मुलीला बघते..."ती बाई अस म्हणुन भावनाच्या आईवर हात उगारत असते की तेवढ्यात कोणीतरी तिचा हात हवेत धरत...ती बाई पाहते तर मृत्युंजय असतो...भावनाला शांत झोपवून तो जाण्यासाठी बाहेर आला होता...पण आईवर हात उगरताना पाहून तो मध्ये पडला...

"चुकून सुद्धा हे काम करायचा प्रयत्न करू नका काकी...😡त्यांचा मुलगा या घरात आहे...हे लक्षात ठेवा...स्लो पॉईझन घालून भावनाला मारण्याचा प्रयत्न तुम्हीच केला होता ना??मुलगी नको म्हणून..."जय त्या बाईचा हात खाली करत बोलतो...

"कोण आहेस तू???"म्हातारी बाई...

"मी कोण आहे कळेल नंतर आजी पण आज तुमच्या पापाचा घडा भरला आहे...भावनाच्या भावाला तुम्ही दोघांनी मारले??ते तुम्हीच केले ना दोघींनी??आईच्या पोटी कोणीच नको जन्मायला म्हणून तिच्या मुलांना मारून टाकले ना??म्हणजे त्यांना वांझ ठरवून स्वतःची बहीण या घरात आणावी यासाठी हे सर्व केलं ना??"जय प्रचंड रागात दोघींना पाहून बोलतो...त्याचे बोलणे ऐकून दोघी घाबरतात...इकडे भावनाची आई पण शॉक होते...

"बोला लवकर दोघी...😡😡मी अजून सहन नाही करू शकत तुम्हाला??नाहीतर दुसरा पर्याय आहे..."जय चिडून बोलतो...

"आम्ही काहीच नाही केलं...काय.....काय.....पुरावा.... आहे....तुझ्याजवळ???"काकी...

"ओह कॅमोंन काकी एवढं पाप करून पुरावा मला विचारतात...आहेत माझ्याकडे पुरावे...मी ते कमिशनरकडे दिले आहे...काही वेळात ती लोक येऊन तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला घेऊन जाणार आहेत... खून केले आहे तुम्ही सर्वांनी दोन बाळांचे..."जय आवाज चढवत बोलतो...

"जय दोन बाळ...😢मला एकच माहिती आहे...तू दोन का म्हणत आहे??"भावनाची आई त्याच्याजवळ येऊन त्याला विचारते...

"आई तुम्हाला दोन बाळ होती...त्यातील मुलीला या लोकांनी जिवंतपणी खड्यात पुरल...😡भावनाला दोष देत होते ना हे तर तिच्या भावाला डॉक्टरचा आधार घेऊन या लोकांनी संपवले...भावना कधीच यात दोषी नव्हती...तिच्या मनावर या लोकांनी कोरून ठेवले म्हणून ती त्याच्या पासून दूर राहत होती..."जय बोलतो...त्याचे असे बोलणे ऐकून भावनाच्या आईला धक्का बसतो... भावनाचे बाबा देखील जयचे बोलणे ऐकून शॉक होतात...स्वतःची आई आणि घरातील लोक एवढ्या खालच्या थराला जातील असा त्यांनी विचार पण केला नव्हता...

"अहो...या लोकांनी माझ्या मुलांना मारलं...😭😭" भावनाची आई भावनाच्या बाबांना पाहून बोलते...तसे सगळयांची नजर त्यांच्यावर पडते...भावनाच्या बाबांना पाहून दोघी घाबरतात...

"शु$$$ ऐकलं मी सगळं सौ...जय भावनावर कधी प्रयत्न केला यांनी..."भावनाचे बाबा मन घट्ट करून विचारतात...

"तू बाळा आता आमच्यावर विश्वास ठेवणार नाही का???"आजी...

"जय तू बोलतो का आता???"भावनाचे बाबा स्वतःच्या आईला इग्नोर करून बोलतात...

"हो...ते...पप्पा...."जय...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः

©®भावना सावंत(भूवि❤️)

Rate & Review

sanjana kadam

sanjana kadam 3 months ago

Priya Gavali

Priya Gavali 3 months ago

Swati Jagtap

Swati Jagtap 3 months ago

Arati

Arati 3 months ago

I M

I M 3 months ago