तू अशीच जवळ रहावी... - 18 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - 18

तू अशीच जवळ रहावी... - 18

भावना आणि मृत्युंजयचे इंग्लंड मधील दिवस खूप चांगले जात होते...मृत्युंजयने तिला बाहेरच्या जगापासून थोडेसे लांब ठेवले होते...तिच्या काळजीसाठीच त्याने तस केलं होतं...तो भरपूर बिझी झाला होता कामात पण त्यातून ही तो तिच्यासाठी बरोबर वेळ काढायचा...म्हणून ती खुश व्हायची...अश्यातच त्यांना इंग्लंडला येऊन 2 महिने होतात...खूप चांगलं चालू होते दोघांचे...मृत्युंजय कितीही टेन्शन मध्ये असला तरीही तो तिच्यासमोर तिला ते दाखवून द्यायचा नाही...तिला खुश पाहून त्याला बरे वाटायचे म्हणून तो काही गोष्टी तिला सांगायचा नाही...आता त्याने ऑफिसला जाणे देखील सुरू केले होते...

असाच एकदिवस तो तिला नेहमी प्रमाणे इन्स्ट्रुकॅशन देऊन तिला हसून मिठीत घेऊन ऑफिसला निघून गेला होता...ती तो गेल्यावर गपचूप आपलं काम करण्यात बिझी झाली होती...किचनमध्ये शेफ सोबत बोलून त्याला आजच्या जेवणाची लिस्ट सांगून ती बंगल्याच्या गार्डनमध्ये एका बेंचवर जाऊन बसली होती...मृत्युंजयचा चेहरा आठवून ती गालात लाजत होती आणि स्वतःशीच हसत होती...ती आपल्याच विश्वात मस्त अशी डोळे बंद करून रमली होती...नेहमी प्रमाणे आजही तिने साडीच घातली होती...जयला आवडायचे म्हणून ती जास्त साडीचा वापरायची घरात असताना...आजही सिम्पल अशी साडी नेसली होती...हातात तिच्या लाल बांगड्या होत्याच...भांगेत कुंकू आणि गळ्यात त्याच्या नावाचे मंगळसूत्र...चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नव्हता तिच्या तरीही ती सिम्पल लूक मध्ये क्युट दिसत होती...ती विचारात रमली असताना कोणीतरी मागूनच तिच्या चेहऱ्याला पकडले आणि घट्ट एका हाताने तिच्या गळ्याला पकडून तिच्या मानेवर स्वतःच्या हाताची बोट फिरवली...तो स्पर्श तिला अनोळखी वाटला...तस तिने पटकन डोळे खोलले आणि त्या व्यक्तीला पाहिले...

"कोण आहात तुम्ही...???"ती पटकन उठत घाबरून विचारते...

"अरे माझी जान मोक्षिता...मला नाही ओळखल का??हा..."ती व्यक्ती तिला उठलेलं पाहून मिठीत घेत बोलते...त्याचा स्पर्श तिला नकोसा वाटतो...म्हणून ती घाबरून त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करते...

"प्लीज डोन्ट टच मी...मी...मी...भावना आहे..."ती त्याच्या मिठीतुन सुटत घाबरून बोलते...

"तू माझी मोक्षिता आहे जान...मी तुझा बॉय फ्रेंड प्रेम..."तो हसून तिच्याजवळ जात बोलतो...त्याच अस बोलणं ऐकून ती शॉक होते...त्यात त्याला जवळ येताना पाहून देखील ती घाबरते...

"मी नाही ओळखत तुम्हाला...प्लीज लिव्ह मी..."ती घाबरुन मागे सरकत बोलते...तीच सौंदर्य पाहून प्रेम विचित्र पणे हसत आणखीन तिच्याजवळ जात असतो आणि ती मात्र त्याला घाबरुन मागे मागे सरकत असते...त्याच्या नजरेची तिला भीती वाटत होती...मनातच ती देवाचा धावा करत होती...प्रेमला request पण करत होती...

"प्लीज मला सोडून द्या...मी नाही तुमची मोक्षिता...😧माझे जय तुम्हाला नाही सोडणार..."ती घाबरून डोळ्यात पाणी ठेवून मागे सरकत त्याला बोलते...

"तुझा जय?तुझा नाही जान तो भावना वहिनी चा आहे...तू का आमच्या वहिनीची जागा घेत आहेस...ती बघ माझी वहिनी तिथे उभी आहे..."प्रेम हसून एका ठिकाणी बोट करून बोलतो...त्याने बोट केलेल्या ठिकाणी ती पाहते आणि जबरदस्त शॉक होते...

"तू...तू...कोण आहे???😧तू माझ्यासारखी का दिसते???"ती घाबरून बोलते...

"तू माझ्यासारखी दिसते...मी नाही दिसत तुझ्यासारखी..." ती तिच्याजवळ येत बोलते...

"प्रेम ही भावना बनून माझी जागा घ्यायला आली आहे...घेऊन जा हिला इथून...मोक्षिता उगाच कशाला त्याला सोडून जयच्या मागे लागली आहे माझ्या???"ती...

"मोक्षिता गपचुप चल इथून हा...😡उगाच नाटक नको...दादाला पाहून भुलू नको..."प्रेम ओरडत तिला बोलतो...

"मी...नाही...आहे मोक्षिता...😭मी भावना आहे...प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर...ही खोट बोलत आहे..."प्रेमच्या समोर उभी असलेली बोलते...पण तो काही तीच ऐकून न घेता तिच्याजवळ जातो आणि तिचा हात धरतो...

"हेय सोड मला तू...मी जय ला सांगीन हा..."ती त्याच्या हातातुन हात सोडवत बोलते...पण त्याचे ते मजबूत हात असल्याने ती पकड तिच्या कडून सैल होत नाही...तो तिचा हात तो आणखीन घट्ट पकडतो...

"चल तुला खूपच माज आला आहे ना??एका झटक्यात तुझा माज उतरवतो..."प्रेम रागातच तिला बोलत तिथून घेऊन जात असतो...

"बॉडी गार्ड वाचवा मला....😭जय प्लीज हेल्प मी..."ती रडतच बोलते...त्याने घट्ट पकडल्याने तिच्या हाताच्या बांगड्या फुटून त्याच्या काचा तिच्या हातात रुतात...पण तिला त्याच भानच नसत...तो मात्र तिला जोरात ओढतंच तिथुन घेऊन जात असतो...तिचा आवाज ऐकून बॉडी गार्ड तिच्याजवळ येत असतात की प्रेम त्यांना रागात पाहतो...तसे ते जागीच थांबतात...ती जीवाच्या आकांताने रडत ओरडत सगळयांना मदत मागत असते पण कोणीच तिच्या मदतीला येत नाही...तो विचित्र पणे हसत तिला नेत असतो की तेवढ्यात तो कोणाला तरी धडकतो...तो मान वर करून पाहतो तर जय असतो...

"अरे दादा...तू इथे यावेळी??"प्रेम स्वतःला सावरत बोलतो...

"हम्म फाईल राहिली म्हणून आलो होतो...ही का रडत आहे???"जय प्रेम सोबत असलेल्या तिला पाहून विचारतो...

"दादा ही वहिनीची जागा घ्यायला आली होती म्हणून हिला इथून घेऊन जात आहे...😡"प्रेम रागात बोलतो...

"जय मी...मी...नाही...कोणाची...जागा...😢घेतली...मी...भावना आहे..."ती डोळ्यात पाणी ठेवून बोलते...

"शटाअप मोक्षिता...😡"प्रेम रागात बोलतो...

"जय मला वाटल्यास मारून टाका...पण प्लीज मला...तुमच्यापासून दूर नका करू....😭मी मरून जाईन..."ती जयकडे जाऊन हुंदके देत बोलते...

"जय ही उगाच नाटक करते...मी आहे तुमची प्रिन्सेस..." दुसरी भावना तिथे येत बोलते...जयला त्या दोघींना एकत्र पाहून आश्चर्य वाटते...

"प्रेम तुला आधीच सांगितले होते ना तरीही दोघी एकत्र कशा आल्या??"जय प्रेमकडे पाहून बोलतो...

"सॉरी दादा पण हिला पैसे पाहून तुझा हव्यास झाला म्हणून इथे आली...हे काय मी घेऊन जातच आहे..."प्रेम जयला अस बोलून रडत असणाऱ्या तिला जयच्या समोर घेऊन जात असतो...

"जय तुम्हाला काय...पुरावा...देऊ मीच भावना असल्याचा...😭प्लीज जय मला दूर नका करू तुमच्यापासून..."ती मागे फिरून जयला मिठी मारत रडत बोलते...तिला अस त्याच्या मिठीत पाहून दुसरी भावना आणि प्रेम तिच्याजवळ येतच असतात की तो हातानेच त्या दोघांना थांबवतो...तिचे दोन्ही हात तो स्वतःच्या ब्लेझरवरून बाजूला काढतो...ते पाहून ती घाबरते...पण दुसऱ्याच क्षणी तिच्या मागे कसला तरी आवाज होतो...तशी ती मागे वळते आणि पाहते तर दुसरी भावना आणि प्रेम जमिनीवर गाल पकडून पडलेले असतात...ते दृश्य पाहून ती घाबरते...जय तिचे हात पुन्हा एकदा स्वतःच्या दोन्ही हातात पकडतो...

"कसलाच पुरावा नको आहे प्रिन्सेस मला तुझ्याकडुन... तुझं मन,डोळे आणि हृदय नेहमीच तुझ्या खऱ्या पणाचा पुरावा देत असतात..."जय अस बोलून तिचे डोळे पुसतो आणि तिला स्वतःच्या मिठीत घेतो...प्रेम आणि मोक्षिता तर जयला पाहत राहतात...

"प्रिन्सेस घरात जा तू...मी येतो काही वेळात..."तो तिला बाजूला करत बोलतो...

"नाही...मी...नाही...जाणार सोडून..."ती अडखळत शब्द जुळवत बोलते...

"प्रिन्सेस काही होणार नाही मला...आता तू सेफ आहेस माझ्याजवळ..."जय शांतपणे तिला बोलतो...ती झालेल्या प्रकाराने घाबरली होती...

"जय यांनी मला टच केलं...त्याचा तो स्पर्श नकोसा वाटत होता मला...😭मी request पण केली...तरीही..."ती रडत त्याला दाखवत बोलते...प्रेमची नख तिच्या मानेवर लागली होती झटापटीत ते ती दाखवत होती...ते पाहून जयच डोकच गरम होते...पण सध्या ती घाबरली होती...म्हणून तो स्वतःला शांत करतो...हळुवार तिच्या मानेवर हात फिरवतो...

"शु$$$ मी आलोय ना...??मला माहित आहे सगळं...प्लीज आता शांत होऊन घरात जाते का??"जय शांतपणे बोलतो...तो तिथेच असलेल्या बॉडीगार्ड ला डोळयांनीच इशारा करतो...तसे ते बॉडी गार्ड मोक्षिताला आणि प्रेमला सरळ उभे करतात...

"भावना शांतपणे आतमध्ये जा..."जय मोठया आवाजात बोलतो...त्याच बोलणं ऐकून ती घाबरून तिथून आतमध्ये जाते...ती गेल्यावर जय प्रेम आणि मोक्षिता कडे वळतो...तो खाऊ का गिळू नजरेने त्या दोघांना पाहतो...

"तुला काय वाटलं प्रेम तू तुझ्या गर्लफ्रेंडला घेऊन येऊन तीची प्लॅस्टिक सर्जेरी करून तिला भावना चा चेहरा लावून माझ्यासमोर आणून उभा करशील आणि मी माझा प्लॅन तुम्हाला कळवून मग तुम्ही त्यात स्वतःच्या मर्जीने बदल करून तो मार्गी लावाल??😡"जय प्रचंड चिडत बोलतो...

"दादा तू काय बोलतो हे??जी आतमध्ये गेली ती तुझी भावना नव्हती ही आहे??"प्रेम अस बोलताच जय प्रचंड रागात त्याच्या तोंडावर पंच मारतो...तसा तो दूर जमिनीवर जाऊन पडतो...

"तुझा चेहरा आणि तुझ्या विचारांना मी जाणून होतो प्रेम...😡मानसी ही तुझी गर्लफ्रेंड होती...पण मला पाहिल्या पासून ती माझ्यासाठी वेडी झाली आणि तू देखील माझ्या भावनाचे सौंदर्य पाहून वेडा झाला म्हणून आज तिच्या हव्यसापायी अस केलं तू?मी आधीही बोललो होतो भावनाला त्रास देणाऱ्या व्यक्तींना मी कधीच सोडणार नाही...मग ती माझ्याजवळची असली तरीही... अलेक्झांडर गन..."मृत्युंजय रागात बोलतो...तसा त्याचा बॉडीगार्ड अलेक्झांडर त्याच्याजवळ येतो...

"बॉस हे काम आम्ही करू...तुम्ही जाऊन मॅडम ना पहा..."अलेक्झांडर मृत्युंजय जवळ येत बोलतो...त्याच बोलणं ऐकून मृत्युंजय स्वतःला शांत करतो...त्याच्यासमोर भावनाचा चेहरा येतो...आज जर तो वेळेत आला नसता तर तिच्यासोबत काय घडलं असत...याचा विचार करून त्याच डोकं गरम होते...तो त्या दोघांवर रागाचा कटाक्ष टाकतो आणि बॉडीगार्डला इशारा देतो...तसे सगळे बॉडीगार्ड त्या दोघांजवळ येतात आणि प्रेमला चांगलं तुडवायला लागतात...लेडीज बॉडी गार्ड मोक्षिताची खबर घ्यायला लागतात...त्यांचा विव्हळण्याचा आवाज तिथे घुमत होता...पण त्या कोणालाच त्यांची दया येत नव्हती...भावना जेव्हा जयच्या मिठीत गेली तेव्हा जो आवाज झाला होता तो त्या दोघांच्या एक सणसणीत कानाखाली बॉडीगार्डने काढल्याने झाला होता...जय त्या दोघांवर नजर टाकून बॉडीगार्डला इन्स्ट्रुकॅशन देऊन तिथून घरात निघून जातो...

तो सरळ स्वतःच्या रूममध्ये जातो...तो पाहतो तर भावना बेडवर झोपून उशीत चेहरा खुपसून मुसमुसत होती...ते पाहून त्याला कसतरीच झाले...तो पटकन स्वतःचे ब्लेझर काढून तिथेच बेडवर ठेवतो...तो जाऊन तिच्या बाजूला बसतो आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवतो... त्याचा अस स्पर्श होताच ती रडत रडत उठते आणि पटकन त्याच्या मिठीत शिरते...तो देखील तिला स्वतःच्या घट्ट मिठीत घेतो आणि प्रेमाने तिला कुरवाळत असतो...

"प्रिन्सेस किती रडशील बाळा??वाईट स्वप्न समजून विसरून जा ना...मी आहे ना तुझ्याकडे..."जय शांतपणे तिला बोलतो...

"मी...मी...घाबरले होते...त्या माणसाची नजर खराब होती आणि त्याचा स्पर्श सुध्दा..."ती मुसमुसत बोलते...त्याचा स्पर्श आठवून तिला कसतरीच होते...तिच्या अंगाची थरथर वाढते...ते पाहून जय तिला स्वतःच्या दोन्ही हातात उचलून घेतो...तो तसाच तिला घेऊन बाथरूम मध्ये जातो आणि तिला खाली सोडून शॉवर ऑन करतो...शॉवरच पाणी अस अचानक पडल्याने ती घाबरून हाताची घडी घालून डोळे घट्ट बंद करून घेते...जयला तिला तस पाहून वाईट वाटते...सकाळी त्याची भावना एकदम टवटवीत फुलासारखी होते आणि आता ती खचून कोमेजून गेली होती...तिला माणसाचे स्पर्श आवडायचे नाही हे त्याला माहित होते...पण आता प्रेमचा स्पर्श आठवून आठवून ती घाबरून जात होती...जय पुढे होऊन तिला स्वतःच्या मिठीत घेतो...तशी ती दचकून डोळे खोलून त्याला पाहते...जय तिची हनुवटी स्वतःच्या हाताने वर करून तिला पाहतो...तिच्या चेहऱ्यावरून टपकणारे पाणी आणि त्यात मिसळत जाणारे तिचे अश्रू पाहून त्याला देखील भरून येत पण तो ते न खाली गाळता पुढे होऊन तिच्या नाजूक ओठांना स्वतःच्या ओठांमध्ये बंदिस्त करतो...तो स्वतःचा प्रेझेंस तिच्या मेंदू पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो...तो खूपवेळ तस करतो पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद त्याला दिला जात नाही हे पाहून तो बाजूला होतो...त्याला काहीतरी जाणवत तसा तो स्वतःच्या श्वासाला कंट्रोल करून तिच्याकडे पाहत असतो की ती काही क्षणात त्याच्या खांद्यावर जाऊन बेशुद्ध पडते...ते पाहून तो घाबरतो...तो पटकन तिला धरून एका हाताने शॉवर बंद करतो आणि तसाच तिला स्वतः च्या बाहुपाशात उचलून घेतो...

"हेय प्रिन्सेस उठ ना...अस नको वागू तू..."तो काळजीने तिला बोलतो...तो पटकन मागचा पुढचा विचार न करता तिचे कपडे पटापट चेंज करतो आणि स्वतःचा देखील शर्ट काढून टाकतो...तो तसाच वोडरोबकडे जाऊन स्वतःच एखादा शर्ट शोधून काढून तिच्याजवळ घेऊन येऊन तिला घालतो...तिच्या अंगावर ब्लॅंकेट टाकून तो तसाच शर्टलेस तिच्या हातांना चोळत बसतो...एखादी गोष्ट तिच्यासोबत घडली की ती अशीच कोमेजून जायची हे त्याला माहित होते म्हणून तो तस करतो...आज पहिल्यांदा तिने त्याला प्रतिसाद दिला नाही हे पाहून त्याला वाईट वाटत होतं...तो खूपवेळ तिचे हात पाय चोळतो...शेवटी कुठे तरी तिचा आवाज त्याच्या कानावर पडतो...तसा तो काळजीने तिच्या चेहऱ्याकडे स्वतःचा चेहरा घेऊन जाते..

"मला...नका...दूर...करू...जय...तुम्ही..."ती डोळे बंद करून थरथरत बोलते...

"शु$$ मी कधीच नाही करणार तुला माझ्यापासून दूर...तू फक्त माझीच आहेस..."तो थोडस झुकून तिच्या कपाळावर किस करत बोलतो...तो उठून रुमचा दरवाजा लॉक करतो आणि खिडक्या बंद करून पूर्ण रूमच्या लाईट बंद करतो...तो तसाच तिच्या बाजूला पडतो आणि तिला जवळ घेऊन अंगावर ब्लॅंकेट ओढून घेऊन घट्ट मिठीत घेतो...त्याच्या अंगाची उब तिला मिळावी आणि तिची थरथर कमी व्हावी हाच उद्देश ठेवून तो तस करतो...त्याच्या छातीची होणारी लयबद्ध धकधक तिच्या कानापर्यंत पोहचते तशी ती हळू डोळे खोलते...

"जय "ती डोळयांची उघडझाप करत बोलते...

"गपचुप झोप...बर नाही आहे तुला...मी काहीच करत नाही आहे..."जय तिला पाहून बोलतो...त्याच बोलणं ऐकून ती गप्प राहते...त्याच्या मानेत स्वतःचा चेहरा घासून ती गपचूप झोपते...तिच्या अश्या करण्याने त्याच्या अंगावर शहारा येतो...तो सगळे विचार झटकून तिला आणखीन स्वतःच्या बाहुपाशात कैद करतो...तिच्या पाठीवर हात फिरवून तो तिला शांत करतो...तिच्या तोंडून अस्पष्ट अस त्याचेच नाव घेतले जात असते...

"हो प्रिन्सेस मी आहे इथेच ना..."जय शांतपणे तिला कुरवाळत बोलतो...तो काहीवेळ तसाच तिला समजावत असतो...ती खूपवेळानंतर त्याच्या कुशीत झोपून जाते...तो मात्र झालेल्या प्रकाराचा विचार करत जागा असतो...

"आज मी नाही आलो असतो तर या लोकांनी माझ्या प्रिन्सेसला माझ्यापासून दूर केले असते...प्रिन्सेस तुझ्या हृदयाची होणारी धडधड आणि तुझे हे डोळे अगदी खरेपणा तुझ्यातील सिध्द करत असतात...त्यामुळे कितीही जण तुझी कॉपी घेऊन आल्या तरीही तुझा जय तुला त्यातून शोधून काढेल...कारण माझा कोहिनूर हिरा एकच खणखणीत आणि अस्सल आहे...तुझ्या जवळपास असण्याने माझ्या हृदयात एक वेगळीच फिलिंग येते...आजही तू माझ्या मिठीत येताच ती वाढली गेली...ती फक्त तुझ्यासासाठी आहे इतरांसाठी नाही..." जय तिला पाहून बोलतो...भावना झोपेतच त्याच्या हृदयाकडे स्वतःच डोकं ठेवते...तस त्याचे हृदय 120 च्या स्पीडणे धडधडू लागते...तो हळूच गालात हसतो...तो विचार करत करत प्रेम आणि मोक्षिता भेटल्यापासून च्या गोष्ठीचा संदर्भ लावत असतो...तो तसाच फ्लॅशबॅक मध्ये जातो...

फ्लॅशबॅक:-

"डॉक्टर डेव्हिड मी तुम्हाला रिपोर्ट काढायला सांगितले होते मोक्षिता आणि भावनाचे तर ते काढले का??"तो डॉक्टरच्या केबिन मध्ये येत विचारतो...

"येस मिस्टर सरदेशमुख...मिसेस सरदेशमुख आणि मोक्षिता यांच्यात बरेच साम्य आहे...तर सांगतो मिसेस सरदेशमुख या जगातील काही स्पेशल लोकांमध्ये मोडतात...लाखात किंवा करोडो लोकांमध्ये एक अशी व्यक्ती असते...त्यात मिसेस सरदेशमुख येतात...यांचं हृदय उजव्या बाजूला आहे...नॉर्मल्ली सगळ्या लोकांचे हृदय डाव्या बाजूला असतात पण यांचं उजव्या बाजूला आहे...एक चांगली गोष्ट म्हणजे ते सुरळीत चालू आहे...यावरून तुम्ही कधीही आणि कुठेही त्यांना ओळखू शकतात...कारण ही एक व्यक्ती आहे...

आता मिसेस सरदेशमुख एवढ्या ऍक्टिव्हिटी एकाच वेळी कश्या करू शकतात याचे पण कारण सांगतो...तर मिसेस सरदेशमुख आपल्या मेंदूला पूर्णपणे शार्प ठेवत असतात...काही गोष्ठी त्या पटकन डोक्यात घेतात...नॉर्मली लोकांच्या काही गोष्ठी शॉर्ट टर्म मेमरीत जातात...पण यांच्या तश्या नाही होत...यांना सगळ्या गोष्ठी डोक्यात बसल्या जातात...फक्त त्या त्यावेळी ते मेंदूला सांगतात आणि काम करतात...खूप कमी लोक असतात की ते सर्व विषयात पारंगत असतात...त्यामुळे या भरपूर हुशार आहेत...असाच एक व्यक्ती आहे त्याचे नाव मिस्टर पलाश गोस्वामी आहे...हे सायंटिस्ट आहे...यांना लोक सायको बोलतात...कारण हे अजीब प्रकारच इन्व्हेशन करणार आहेत...पण एक नक्की सांगेन या माणसापासून तुमच्या बायकोला दूर ठेवा..."डॉक्टर एवढं बोलून थांबतात....त्यांचं बोलणं ऐकून जय सुन्न होतो...पण पटकन भानावर येतो...

"ओके डॉक्टर आता त्या दुसऱ्या बाई बद्दल सांगा...??" जय...

"यांच्याबद्दल काहीच सांगण्याचे नाही आहे...कारण या फेक आहेत प्लॅस्टिक सर्जेरी केली आहे त्यांनी चेहऱ्याची..."डॉक्टर मोक्षिताचे रिपोर्ट पाहून बोलतात...ते ऐकून जयच्या चेहऱ्यावर एक गूढहास्य येते...तो डॉक्टरशी थोडाफार बोलून तिथून बाहेर पडतो आणि आपल्या माणसांना फोन करून प्रेम आणि मोक्षिताची माहिती काढतो...काही वेळातच त्याचा एक बॉडी गार्ड त्याच्या घरात त्याच्याजवळ येतो आणि काही कागदपत्रे देऊन तिथून निघून जातो...जय ते कागदपत्रे पाहून काहितरी प्लॅन बनवतो आणि स्वतःशीच हसून काम करत बसतो...

वर्तमानकाळ:-

जय भूतकाळाचा विचार करता करता झोपून जातो...मानसिक रित्या खूप तो थकला होता म्हणून  शांत झोपून जातो...रात्री 8 च्या सुमारास कसल्या तरी आवाजाने त्याला जाग येते...तो डोळे उघडून बाजूला पाहतो तर भावना गायब असते...तो पूर्णपणे घाबरतो आणि वेड्यासारखा तिला शोधू लागतो...शेवटी बाथरूमच्या दिशेला जाताच त्याला आतून रडण्याचा आवाज येतो...तसा तो पटकन दरवाजा तोडून आतमध्ये जातो आणि समोरच दृश्य पाहून तर तो घाबरतो आणि चिडतो देखील...

"भावना$$$ आर यू मॅड 😡"तो तिच्याजवळ जाऊन बोलतो...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः

©®भावना सावंत(भूवि❤️)

Rate & Review

Swati Jagtap

Swati Jagtap 3 months ago

sanjana kadam

sanjana kadam 3 months ago

Pooja

Pooja 3 months ago

टिना

टिना 3 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 3 months ago