तू अशीच जवळ रहावी... - 19 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - 19

तू अशीच जवळ रहावी... - 19

वर्तमानकाळ:-

जय भूतकाळाचा विचार करता करता झोपून जातो...मानसिक रित्या खूप तो थकला होता म्हणून  शांत झोपून जातो...रात्री 8 च्या सुमारास कसल्या तरी आवाजाने त्याला जाग येते...तो डोळे उघडून बाजूला पाहतो तर भावना गायब असते...तो पूर्णपणे घाबरतो आणि वेड्यासारखा तिला शोधू लागतो...शेवटी बाथरूमच्या दिशेला जाताच त्याला आतून रडण्याचा आवाज येतो...तसा तो पटकन दरवाजा तोडून आतमध्ये जातो आणि समोरच दृश्य पाहून तर तो घाबरतो आणि चिडतो देखील...

"भावना$$$ आर यू मॅड 😡"तो तिच्याजवळ जाऊन बोलतो...ती त्याच्या आवाजाने दचकते...

"जय...मला...नको...आहे...हे..."ती रडत रडत स्वतःच्या मानेवर काच फिरवत असते की जय तिच्याजवळ जाऊन रागात तिच्या हातातुन ते काढून घेतो...

"भावना...सांगितले ना तुला मी??की कळत नाही??का एवढं पॅनिक होत आहेस?हा आरसा फोडून अश्या काचा फिरवून ते जाणार काय??"जय रागात बोलतो...कारण तिने मिरर फोडला होता बाथरूमचा आणि त्यातील एक काच हातात घेऊन ती मानेवर फिरवत होती...मानेवर फिरवल्याने तिथून थोडं थोडं रक्त येत होतं...हे सर्व पाहून तो घाबरला होता...तो पुढे होऊन तिला काही कळायच्या आत झुकून स्वतःच्या दोन्ही हातात तिला उचलून घेतो...ती रडत असते...ते पाहून त्याला कसतरी होते...तो बाथरूममधून बाहेर घेऊन येऊन तिला बेडवर ठेवतो आणि पटकन तो फर्स्ट एड बॉक्स घेऊन तिच्याजवळ येतो...

"का अशी वागत असते तू??मला त्रास होत आहे तुझ्या वागण्याचा..."तो तिला औषध लावत बोलतो... तिच्यासोबत बोलत बोलतच तो तिला क्रीम लावत असतो की तेवढ्यात त्याची नजर तिच्या हातावर जाते...पटकन जय तिचा हात स्वतःच्या हातात घेतो...

"एवढं लागलं तरीही सांगत नाहीस हुं..."जय तिच्या हातावर क्रीम लावत बोलतो...

"जय..."ती त्याच्याकडे पाहून भरल्या डोळयांनी बोलते...

"शु...काहीच होणार नाही तुला ...मी आहे ना..."तो सगळं आवरत तिचे हात स्वतःच्या हातात घेत बोलतो...तिच्या दोन्ही हातांना त्याने पट्टी केली कारण तिच्या हाताला थोडीशी आरश्याची काच लागली होती...त्यात सकाळी तिच्या हाताच्या बांगड्या तिच्या हातात रुतून जखमा झाल्या होत्या...जय हळूहळू तिला चेक करतो कुठे कुठे जखमा झाल्या की नाही ते??

"प्रिन्सेस अजून कुठे लागलं आहे तर सांग मला??ओकवर्ड वाटतंय तर तू करते का मग??"जय प्रेमाने तिला उठवत बसवत बोलतो...ती रडतच त्याच्या मिठीत शिरते...जय प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवत असतो की ती मध्येच विव्हळते...

"आउच..."ती मानेला हात धरून बोलते...तिच्या आवाजाने जय तिला पटकन बाजूला करतो...

"प्रिन्सेस दाखव मला काय झालं आहे ते...??"जय थोडस चिडून बोलतो...ती नाही मध्ये मान हलवते...

"प्लीज दाखव प्रिन्सेस..."जय थोडस शांत होत बोलतो... तशी ती त्याच्यासमोर पाठ फिरवून बसते...डोळे घट्ट बंद करून ती हळूच स्वतःच्या शर्टची दोन बटणे काढते...तसा तो शर्ट तिच्या खांद्यावरून खाली पडतो...तस जयची नजर तिच्या उगड्या खांद्यावर आणि मानेवर जाते...तिथे प्रेमच्या नखांचे निशाण असतात...ते पाहून जयला कसतरीच वाटते...तो पटकन मागूनच तिला स्वतःच्या मिठीत घेतो...

"सॉरी प्रिन्सेस माझ्या मुळे अस तुला त्रास होत आहे...पण मी खरच सध्या तुला माझ्यापासून दूर नाही करू शकत..."जय कसतरीच तिला मिठीत घेऊन बोलतो...

"जय...ते...कोण...होते??"ती डोळे बंद करून स्वतःला शांत करून विचारते...

"तू न घाबरता मला विचार न बाळा...माझी प्रिन्सेस अशी कोमेजली तर मला कसतरीच वाटते..."जय तिच्या खांद्यावर स्वतःचे ओठ टेकवत बोलतो...त्याच्या स्पर्शाने ती बेधुंद होते...जयला तिच्या हृदयाची धडधड जाणवते...तसा तो पटकन भानावर येऊन तिच्यापासून दूर होतो...त्याच्या अश्या दूर होण्याने तिला वाईट वाटत...ती तशीच शर्ट अंगावर चढवून गपचूप काही न बोलता बेडवर पडून जाते...

"हेय प्रिन्सेस खरच सॉरी ना..."तो मागून झोपून तिला मिठीत घेत बोलतो...तरिही ती गप्प राहते...

"प्रिन्सेस काही गोष्ठी वेळेनुसार तुला कळल्या की बर वाटेल मला..."जय तिच्या पोटावर स्वतःचे हात दाबत बोलतो...

"तुम्ही..का...मला सांगत नाही..."ती डोळे बंद करूनच बोलते...तीच बोलणं ऐकून जय तिला हाताने ओढून घेऊन व्यवस्थित झोपवतो...तशी ती डोळे उघडून  त्याला पाहते...

"माझ्यावर तुझा विश्वास आहे ना प्रिन्सेस....??"तो तिच्या डोळ्यांत डोळे घालून विचारतो...

"हो...स्वतः पेक्षा जास्त..."ती त्याच्या डोळयांत पाहून बोलते...

"मग बस झालं प्रिन्सेस...मी कधीच तुझा हा विश्वास मोडणार नाही..."जय अस बोलून तिच्या नाजूक ओठावर स्वतःचे ओठ टेकवतो...ती काहीवेळ गप्प राहून त्याचा स्पर्श अनुभवत असते...नंतर भानावर येऊन ती त्याला प्रतिसाद देते...तिच्या अंगावर गोड शहारे येत होते...तो थोडस बाजूला होऊन तिला पाहतो...तर तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळून गालावर येतात...

"हेय प्रिन्सेस काय झालं आता तुला???"जय काळजीने तिला विचारतो...

"मी वेडी झाली आहे जय तुमच्यासाठी...मला कधीच दूर नाही ना करणार तुम्ही...??"ती...

"तू माझ्यासाठी वेडी आहेस आणि मी तुझ्यासाठी..."जय तिच्या गालावर ओठ टेकवत बोलतो...तो एका हाताने तिचे डोळे पुसतो...त्याचा असा प्रेमळ स्पर्श पाहून ती त्याचा हात स्वतःच्या हातात घेते आणि त्याच्यावर स्वतःचे ओठ टेकवते...जय फक्त तिला पाहत असतो...जी भावना आधी त्याच्यापासून दूर पळायची ती आता त्याच्यापासून दूर जायला पण घाबरत होती...एक इनोसेंट सध्या ती त्याला वाटत होती...

"उठा आता मिसेस मृत्युंजय...आम्हाला भूक लागली आहे..."जय तिला पाहून बोलतो...

"जय प्लीज तुम्ही जेवून घ्या ना मला नाही जेवायचं..."ती..

"हे अजिबात चालणार नाही...चल उठ प्रिन्सेस... सकाळपासून तू काही खाल्लं नाही आहे..."जय...

"जय प्लीज नका ना फोर्स करू..."ती...

"ओके तू नाही जेवणार ना?चल मी पण नाही जेवत आपण झोपून जाऊ..."जय ती ऐकत नाही पाहून बोलतो...त्याच बोलणं ऐकून ती उठून बसते...

"जय अजिबात हे चालणार नाही हा...😒मी येत आहे साडी घालून..."ती अस बोलून पटकन उठते...पण तेवढ्यात काहीतरी आठवते...तशी ती गप्प पुन्हा येऊन बेडवर पांघरूण घेऊन बसते...

"काय झालं प्रिन्सेस??"जय...

"मला कपडे change करायचे आहे पण तुम्ही हाताला हे बांधल्याने नाही करता येत..."ती स्वतःचे हात त्याला दाखवत बोलते...

"ओह अस आहे का??तर मी आहे ना change करायला..."जय खट्याळपणे हसत तिच्याजवळ येऊन बोलतो...

"नाही...😓"ती घाबरून बोलते...जय हसून तिला पाहतो आणि उठुनच वोडरोब कडे जाऊन साडी घेऊन येतो...तो साडीची घडी मोडून तिला पाहतो...

"जय तुम्ही का साडी घालत आहात??🤔चला हवा येऊ दे सिरियलला माणसं कमी पडताय म्हणून तुम्हाला बोलवल काय???"ती त्याच्या हातात साडी पाहून बोलते...

"फुल्ल गॅरेनंटी आहे मला तूच माझी प्रिन्सेस आहे..."जय एक कटाक्ष तिच्यावर टाकून बोलतो...

"ते कसं काय म्हणजे आधी नव्हती काय??मग तुम्ही मला किस का केलं??अस पराये लोकांना किस नाही करायचं..."ती इनोसेंटली बोलते...जय तीच बोलणं ऐकून हसावे का रागवावे हे समजत नाही...

"आग माझी आई...ही साडी तुझ्यासाठी काढली आहे...मी तुला कुठेही ओळखू शकतो...म्हणूनच केलं ना किस...अजून एक्सपरिइन्स नाही मला कोणत्या मुलीला किस करायचा...एकच आहे ना माझ्याकडे सध्या तरी म्हणून तिच्यावर try करतो...परफेक्ट जमल की मग बघू..."जय तिला डीवचत बोलतो...

"ओह माझ्याकडे पण सध्या एकच आहे...😏पण रोमान्स काही येत नाही त्यांना अनरोमॅंटिक,खडूस,रागिष्ट,चिडकू, कूच का लौकि बॉस कुठचा..."ती नाक मुरडत बोलते...तीच बोलणं ऐकून तो तिच्याजवळ येतो...

"हेय किती बोलली तू मला...😡उगाच आणलं तुला इथे...मी अनरोमॅंटिक,खडूस काय??आधी मराठी तरी बोल शुध्द मग काय ते नाव ठेव..."तो चिडून तिला पाहून बोलतो...

"मी तुम्हाला नाही बोलली पण...मराठी मला येते हा...😫हा आता काही भाषा त्यात ऍड होतात...हा काही शब्द  बोलता येत नाही...😔त्या ज्ञ ला ग्य बोलते..तेवढेच... म्हणून तुम्ही अस बोलणार काय जय आता??"ती एखाद्या लहानमूलीसारखं एक्सप्लॅन करत त्याला बोलत होती...

"जाऊ दे बाबा...तुला बोलून काही फायदा नाही...ते मराठी कशी शिकली हे मला माहित आहे आणि आता पुन्हा तुझे क्लास घ्यायचे म्हणजे डोक्याला टेन्शन आहे माझ्या..."जय वैतागून बोलतो...

"ओ मिस्टर मृत्युंजय...उगाच बोलू नका हा मला...🤥 फक्त 6 टीचर त्यावेळी स्कुल सोडून गेल्या...माझी मराठी पाहून...तुम्ही शिकवले तशीच तर बोलती मी...आता मला संस्कृत पण येते..."ती शेवटच वाक्य खुश होत बोलते... जय तिची खुशी पाहून मनातून सुखावतो...तो पटकन पुढे होऊन तिला स्वतःच्या मिठीत घेतो...

"हीच भावना हवी होती मला सकाळपासून हसणारी अशी माझी अतरंगी प्रिन्सेस..."जय खुश होऊन तिच्या कानाकडे बोलतो...

"सॉरी..."ती कसतरीच त्याला बोलते...

"हम्म आता चला जेऊया ना??"जय विचारतो...

"आधी change करायचे कसे ते सांगा??"ती...

"इकडे बघ मी चेंज करतो..."जय तिला उठवत बोलतो...तिच्याकडे काहीच पर्याय नसल्याने ती गपचूप त्याच्यसमोर उभी राहते...जय बेडवरची ब्लॅंकेट काढून तिच्या अंगावर टाकतो...

"जय अजिबात मस्ती करायची नाही हा..."ती वॉर्न करत त्याला बोलते...पण पुढे जय होता...जय तिच्या ब्लॅंकेट ला धरून तिला स्वतःजवळ ओढून घेतो...तशी ती जाऊन त्याच्या छातीवर आदळते...

"जय...😒"ती बोलते की पुढच्याच क्षणी त्याचे भारदस्त हात तिच्या कंबरेवर असतात...तो खट्याळपणे तिच्याकडे पाहून एका हाताने तिच्या शर्टची बटण काढू लागतो... त्याच्या अश्या करण्याने ती घट्ट डोळे बंद करून घेते...त्याला पाहून तिच्या हृदयाची धडधड वाढते... कारण तो शर्टलेस तिच्यासमोर उभा होता...त्यात त्याचे जिमने कमावलेले शरीर पाहून तिला कसतरीच होत होते...म्हणून तिने डोळे बंद केले होते...तो हळूहळू तीच शर्ट काढू लागतो...त्याचा होणारा प्रत्येक स्पर्श तिच्या अंगावर गोड शहारे आणत होता..

"जय प्लीज ...नका ना त्रास देऊ..."ती...

"मी कुठे त्रास देत आहे प्रिन्सेस...मी तर माझं काम करत आहे...तुला काही होत आहे काय??"तो हसून विचारतो... तिचा हात सांभाळून तो हळूच तिचं शर्ट काढतो आणि तिच्या अंगावर पूर्णपणे ब्लॅंकेट टाकतो...आता त्याला देखील कसतरी होत होते...ती डोळे खोलून त्याच्याकडे पाहते तर तो डोळे बंद करून उभा होता...

"जय तुम्ही उशीर करत आहात...एवढ्यात मी नेसली असती..."ती त्याला पाहून बोलते...ती जागी नसताना तो तिचे कपडे बदलायचा पण आता ती जागी होती म्हणून त्याला थोडीशी भीती वाटत होती...तो डोळे बंद करूनच तिला अंगावरचे कपडे घालून देतो...शेवटी ब्लाऊज ची नॉट बांधल्यावर तो डोळे खोलतो...

"अहो झटपट घाला की साडी...नुसता टाईमपास करत आहात..."ती वैतागून त्याला बोलते...

"नेसवत आहे ना??गप्प बस जरा..."जय साडी व्यवस्थित करत बोलतो...तो व्यवस्थित पणे तिला साडी नेसवायला लागतो...ती फक्त त्याला पाहत असते...

"हेय तुम्हाला एवढं परफेक्टली कस येत नेसवायला...???माझ्या आधी कोणाला नेसवली होती काय...??म्हणजे एक्स गर्लफ्रेंड आणि सेक्रेटरी वगैरे असते ना बिझनेसमन लोकांची म्हणून सहजच विचारलं..."ती त्याला साडी चा पदर लावताना पाहून बोलते...

"हो तर एक होती ग...पण नाही राहिली माझ्याकडे... म्हणून मग तुझ्या मागे आलो...काय करणार आता...तिला नेसवायचो मी म्हणून असेल बहुतेक..."जय तिचा पदर पिनअप करत तिला डीवचत बोलतो...

"यांची कोणी होती आधी??म्हणजे मी सेकंड आहे का??(मनात)पण कोण होती ती??सध्या कुठे असते???ती त्याला दूर करून विचारते...

"तुला कोणी सांगितले की प्रत्येक बिझनेसमन ची अशी एक्स वगैरे असते??एखादेचे खरे प्रेम असेल तर तो जगातील कुठच्याच मुलीच्या मागे जाणार नाही..."तो तिच्या डोळ्यांत आरपार पाहून बोलतो....

"ते जस्ट मूवी अँड स्टोरीज मध्ये वाचलं म्हणून बोलली..."ती...

"भावना ही रिअल लाईफ आहे आपली...अजूनही तुझा माझ्यावर विश्वास का बसत नाही आहे???कितीवेळा सांगू माझं पहिल प्रेम तू आहे...इतर कोणीच नाही...तरीही तू अस बोलत असते..."जय थोडस चिडून बोलून तिथून निघून जातो...तो असा चिडून गेल्याने तिला वाईट वाटतं...त्याच्या प्रेमावर ती नेहमी प्रश्न उठवायची हे पाहून तो चिडला होता...कितीतरी वेळा त्याने सांगितले होते तिला पण ती अजूनही काँन्फुज्ड होती...म्हणुन त्याला वाईट वाटले...

"भावना काय गरज होती तुला त्यांना अस बोलायची...???आता नाराज झाले ते मग कसे मनवु बर??थॅंक्यु पण बोलली नाही मी त्यांना...मागच्या वेळी सारख सोडून तर जाणार नाही ना मला???"ती स्वतःशीच बोलते...शेवटच वाक्य बोलताना ती घाबरते...ती तशीच स्वतःला सावरून पटकन खाली येते...ती पाहते तर मृत्युंजय डायनींग टेबलच्या चेअरवर तिचीच वाट पाहत बसला होता...तशी ती पटकन त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या बाजूच्या चेअरवर बसते...तिला आलेलं पाहून तो खाली मान घालतो...सर्वेन्ट येऊन दोघांना जेवण सर्व्ह करतात...तसा जय खाली मान खाऊ लागतो...पण ती मात्र त्या प्लेटकडे पाहत राहते आणि तशीच स्वतःच्या दोन्ही हाताकडे पाहते...

"हे मी कशी खाऊ बर??हे भगवान कैसे पती हैं मेरे...कुछ दया भी नहीं दिखाते...अपने हातों से ही खाना पडेगा "ती मनातच बोलते...कशीतरीच ती समोरचा चमचा उचलण्याचा प्रयत्न करते...पण ते काही तिला जमत नाही...

"जर मदत हवी असेल तर सांगितले पाहिजे..."तो खाली मान घालूनच बोलतो...

"हुं...भावना खाऊ शकते स्वतःच्या हाताने...''ती अस बोलून चमचा उचलायला जाते...पण पुन्हा ते काही तिला जमत नाही...हे पाहून जयच चमच्याने स्वतःच्या प्लेटमधल भरून घेऊन तो चमचा तिच्यासमोर करतो...पण ते सुद्धा तिच्याकडे न पाहता...

"तुम्हाला काय शिक्षा दिली आहे का कोणी??माझ्याकडे न बघण्याची??बघून भरवा की...म्हणजे सुकून मिळतो खाताना..."ती बोलते...

"खायच आहे तर खा...नाहीतर बस उपाशी...पुन्हा मी देणार नाही आहे..."तो चिडूनच बोलतो...त्याच अस बोलणं ऐकून ती पटकन चमच्यातिल खाते...

"Volcano तापलं आहे तर...जस्ट मस्करी पण समजत नाही यांना हुं..."ती मनातच बोलत गपचूप खाऊ लागते...जय तिला भरवून झाल्यावर स्वतः खातो...पण तो काही तिच्यासोबत बोलत नाही...हे पाहून तिला कसतरी होते...

"ओय मिस्टर तुम्ही चिडला की सुपर हॉट दिसतात...त्यात असेच शर्टलेस बसलात की आय हाय...😍😘"ती त्याच्याकडे पाहून बोलते...तो तिच्याकडे एक लूक टाकतो...

"ऐसे ना मुझे तुम देखो, सीने से लगा लूँगी
तुमको मैं चुरा लूँगी तुमसे, दिल में छुपा लूँगी..."ती त्याचा लूक पाहून बोलते...

"काय करू मी या क्युटिन्स च...जरा असा चिडू शकत नाही...पण गरजेचे आहे..."मृत्युंजय खाली मान घालून बोलतो...

Bhigee bhigee (rato -3) aisee barasato me
Kaisa (lagata hai- 2)
Bhigee bhigee raton me mithee mithee baton me
Aisee barasato me kaisa lagata hai
(Aisa lagata hai tum banke badal
Mere badan ko bhigo ke mujhe (ched rahe ho-2))-2

ती उगाच गाणं आठवत बोलते...तीच ते गाणं ऐकून बिचाऱ्याला ठसकाच लागतो...

"हळूहळू मिस्टर...😄मी सहज बोलली..."ती खट्याळपणे हसून बोलते आणि तशीच ती त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देते...

"गाणे म्हणायचे असतील तर दुसरीकडे जाऊन म्हणावे...इथे नाही म्हणायचं..."तो पाणी पिऊन झाल्यावर बोलतो...

"मेरी मर्जी...हमे तो प्रेमरोग हुंवा हैं...आपको कुछ प्रॉब्लेम हैं??"ती...

"जा की मग दवाखान्यात का इथं बसली आहे..."तो...

"ना ना...याचे इलाज तर तुम्ही करू शकता...😍"ती हसून त्याच्या अंगावर हात फिरवत बोलते...तिच्या स्पर्शाने तो वेडा होतो...पण पटकन भानावर येऊन तो तिचे हात बाजूला करतो...

"स्टॉप इट यार भावना...झालं खाऊन तर जा झोपायला...मला माझे काम आहेत...तुला असले करायला भरपूर वेळ आहे...पण मी बिझनेसमन आहे म्हणून मला भरपूर काम आहेत..."तो चिडून बोलतो...

"हुं मी रिकामटेकडी असच म्हणायचं आहे ना तुम्हाला??उद्या पासून मी पण जाणार काम करायला..."ती चिडून अस बोलून तिथून निघून जाते...तो तिला गेलेल्या दिशेला पाहून कपाळावर हात मारतो...

"करायला जायचं होतं दुसरं आणि हिने दुसरच समजलं...आता हीला समजावणे म्हणजे महाकठीण आहे..."जय अस बोलून कोणाला तरी कॉल करतो...काहीतरी चर्चा करून तो फोन कट करतो...तो भावनाला पाहायला वर जातच असतो की तेवढ्यात अलेक्झांडर तिथं येतो...

"बॉस...त्या दोघांचे काय करायचे??ते दोघ काहीच सांगायला तयार नाही आहेत..."अलेक्झांडर...

''मी येतो...भावना झोपल्यावर पाहायला...तू जाऊ शकतो..."जय विचार करून बोलतो...तो अस बोलल्यावर अलेक्झांडर तिथून निघून जातो...तसा तो भावनाला पाहायला त्यांच्या रूमकडे निघून जातो...रूमच्या जवळ येताच त्याला आतून फुटण्याचे आवाज येतात...तसा तो घाबरतो...

"आज वातावरण जास्त तापलं आहे...आज खूप कष्ट घ्यावे लागणार आहे मला..."जय बाहेर राहून बोलतो...

"कोण समजतात कोण हे??यांनी मला घरात कैद केले आहे कैदिसारखं बसवलं आहे...😡माझं सगळं बंद केलं आणि वर मला बोलतात मला काम आहे...तुझ्यासारखं वेळ नाही...बेईज्जती करतात सरळ सरळ माझी...मी थोडी सांगितले होते बसवायला...यांना हवं तसं वागायचे आणि वर यांचे बोलणे खायचे...हे मालक आणि मी नोकर असच झालं हे..."ती रागातच पायाने तिला जमतील त्या वस्तू फेकत बोलते...जय तीच बोलणं ऐकून कपाळ खाजवतो...पुन्हा एकदा वेगळा समज तिने करून घेतला होता...

"भावना काय बोलते तू??तुझं तुला कळतंय काय?हे काय अवस्था केली रूमची??"तो तिच्याजवळ येऊन बोलतो...तशी ती त्याला बघून गपचूप बेडवर बसते...

"कोण तुम्ही?मी नाही ओळखत...मी उद्या कॉलेजला जाणार आणि नोकरीला पण जाणार...संध्याकाळीच घरी येणार मी..."ती रागात अस बोलून बेडवर झोपते...

"हे कोण साफ करणार??"जय...

"तुम्ही😒 मी कामाला जाणार मग तुम्हाला स्वतःच करता आलं पाहिजे...त्याची आतापासून सवय करा.."ती पांघरूण मधून बाहेर डोकावून बोलते आणि पुन्हा पांघरूण घेऊन झोपी जाते...ती सध्या काही ऐकून घेणार नाही हे जाणून तो तिला झोपी देतो...सर्वेन्ट ला बोलावून तो रूम साफ करतो...ती झोपली याचा अंदाज घेऊन तो तिथून निघून जातो...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
©®भावना सावंत(भूवि❤️)

Rate & Review

Swati Jagtap

Swati Jagtap 3 months ago

uttam parit

uttam parit 3 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 3 months ago

Pooja

Pooja 3 months ago

टिना

टिना 3 months ago