तू अशीच जवळ रहावी... - 22 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - 22

तू अशीच जवळ रहावी... - 22

आज भावनाचा इंग्लंडच्या जयच्या ऑफिस मधील पहिला दिवस होता...पण आज ती लवकर उठलीच नाही...जय लवकर उठून स्वतःच आवरुन तयार होऊन आला तरीही ही झोपलेली होती...तिला अस पाहून तो काळजीने तिच्याजवळ जातो...तिच्या डोक्यावर हात लावून तो पाहतो...

"हिला ताप तर नाही आहे?मग का हल्ली लवकर उठत नाही ही?"जय तिच्याकडे पाहून बोलतो...

"प्रिन्सेस उठ...ऑफिसचा फर्स्ट डे आहे तुझा?"जय हळूच झुकून तिच्या कानाकडे चेहरा नेऊन हळू आवाजात बोलतो...त्याच अस बोलणं ऐकून ती पटकन डोळे उघडते...

"व्हॉट?आज माझा फर्स्ट डे आहे...??ओह गॉड 8 वाजत आले...मी नाश्ता कधी करू??ते खाऊन ऑफिसला कधी जाऊ?उशीर झाला की आहेच ओरडा...ओह नो...मम्मी आता माझं काही खर नाही..."ती अशी गोंधळून स्वतःशीच बडबडत उठते...जयला तीच बोलणं ऐकून हसू येत...

"मम्मी नाही आहे...तुझा नवरा मिस्टर मृत्युंजय आहे..." जय हसून तिला पाहत बोलतो...जयला पाहून ती शांत होते...

"मी आलीच तयार होऊन...खाली भेटू...ओन्ली 5 मिनिट मध्ये..."ती अस बोलून उठते...नंतर तिला काहितरी लक्षात येत तशी ती सावकाशपणे बेडवरून उठते आणि वोडरोब कडे जाऊन स्वतःचे कपडे घेऊन ती बाथरूमला निघून जाते...

"कस होणार माझं??हा प्रश्न कधी कधी उदभवतो...पण असो खूपच क्युट आणि अतरंगी आहे..."जय अस स्वतःशीच बोलून खाली निघून जातो...

काहीवेळाने भावना मस्त तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी म्हणून खाली येते...जय आपला डायनींग टेबलच्या चेअरवर बसून मोबाईल चाळत असतो...ती येऊन सरळ चेअरवर बसते...तरीही त्याचा लक्ष नसतो...ते पाहून ती गप्प बसते...तिचा लक्ष डायनींग टेबलच्या डिशेसवर जात...त्या डिशेस पाहून तिला ते सर्व अचानक खावेसे वाटते...कारण पंजाबी डिशेस एकापेक्षा एक झणझणीत वाले असे बनवलेले होते...ती लगेच स्वतःला वाढून घेऊन खायला लागते...

"ही आचारी भेंडी,छोले मसाला,मलाई कोफ्ता,आलू टिकी काय मस्त लागत आहे हे...😋"ती खात खात बोलते... तीच बोलणं ऐकून जयची तिच्यावर आणि डायनींग टेबलवर नजर पडते...ते पाहून त्याचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात...कारण पंजाबी पदार्थ जास्त तेलकट आणि झणझणीत असे होते...

"हे कोणी बनवले एवढे पदार्थ??आपण नाष्ट्याला बसलो आहोत की जेवायला??"जय तिच्याकडे पाहून बोलतो...

"तुमच्यासमोर तुमचं डायट फूड पडलं आहे...ते खावा गप्प...मी तर मस्त पैकी खाणार आहे..."भावना खाता खाता बोलते...

"भावना हे हेल्दी बिलकूल नाही आहे...😒किती ऑइल आहे त्यात...आजच कसे एवढे पदार्थ बनवले गेले हा?ते सुद्धा पंजाबी?"जय स्वतःच डायट फूड खात बोलतो...

"पती परमेश्वर मी महाराष्ट्रीयन असली तरीही माझे पूर्वज पंजाबी होते...हा आता आम्ही दोन्ही नाव लावतो ते वेगळं...पण तुम्हाला तर माहितीच आहे मी काही वर्षे पंजाबला राहिली म्हणून सवय झाली मला...त्यात बोलण्यासारखं काहीच नाही आहे..."भावना त्याच्या कडे पाहून बोलते...

"पाच मिनिटांत संपवून बाहेर यायचं...नाहीतर आज ऑफिसला लेट आल्यामुळे बोलणं खाव लागेल बॉसच...''जय स्वतःचे हात टिशू पेपरला पुसत बोलतो...

"मला बॉस ओरडणार...??मी तर त्यांची PA आहे मग??"भावना...

"मिसेस सावंत-पटेल तुम्ही होतात आधी...आता नाही आहात..."जय चेअरवरून उठत बोलतो...

"व्हॉट??हे कसं शक्य आहे?मी नाही आहे PA म्हणजे मिस्टर सरदेशमुखने चांगली हिरोईन अशी ठेवली असेल...काय लाईन मारतात काय बॉस वर??"भावना खाऊन संपवत बोलते...तीच बोलणं ऐकून जयच्या डोक्यावर आठ्याच पडतात...

"ओह तुला काळजी आहे का माझी?असो पण आता ठेवली आहे ना तर काय बोलणार ना मी?मला कशी अशी स्मार्ट वाली,हुशार,मॉर्डन लूक वाली हवी होती आणि ते गुण तिच्यात आहे म्हणून ठेवली ग...अशी तुझ्यासारखी ऑफिस मध्ये टाईमपास करणारी...जाड वाली सेक्रेटरी असली तर ऑफिस बंद करून मला घरी बसावे लागेल..."जय तिला डीवचत बोलतो...त्याच बोलणं ऐकून ती बारीक डोळे करून त्याला पाहते...

"ओ गॉड यांना जाड वाली नाही आवडत ना??मग बेबीच्या वेळी तर मी गॅसच्या बलूनसारखी फुगणार आहे...तेव्हा तर मग हे मला जवळ पण करणार नाही..."भावना स्वतःशीच मनात बोलते...ती अशीच स्वतःच इम्याजीन करते...

"नाही नाही...$$$"भावना इम्याजीन मध्ये स्वतःला पाहून बोलते...

"काय नाही,नाही करते??"जय तिला पाहून विचारतो...

"ते असच...ऑफिसला जायचं ना?चला जाऊ..."ती भानावर येत बोलते...

"आज तुला भांडायचे नाही का??कमाल आहे?"जय तिचयजवळ जाऊन तिला उठवत विचारतो...त्याच बोलणं ऐकून ती नाही मध्ये मान हलवते...तसा जय हसून तिला स्वतःच्या मिठीत घेतो...

"आज एवढा संयम कुठून आला बर??"जय हसून तिला विचारतो...

"संयम म्हणजे??"ती निरागसपणे विचारते...

"धीर ग..."जय तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवत बोलतो...

"वो तो अभि आया हैं मुझ में...आता मी लहान नाही आहे मोठी होणार आहे..."ती हसून बोलते...

"तू कितीही मोठी झाली तरीही माझ्यासाठी लहानच रहाणार आहे..."जय अस बोलून तिच्या कंबरेत हात घालून तिला जवळ खेचतो...

"आपके इरादे अच्छे नहीं हैं मिस्टर जय..."ती त्याच्या डोळ्यात पाहून बोलते...

"येस इतनी अच्छी हमारी सरदारनी लगेगी तो हम कैसे खुद को रोक लेंगे??"जय अस बोलून तिच्या ओठांवर ओठ टेकवतो...एक दीर्घ किस करून तो तिला बाजूला करतो...तशी ती लटक्या रागात त्याला पाहते...

"जय तुम्ही ना खरच बेशरम आहात...माझा मेकअप खराब केला..."ती थोडीशी वैतागत बोलते...

"ओ माय माय...मेकअप खराब झाला नाही उलट आता व्यवस्थित झाला आहे...एकदम गुलाबी फुलासारखा त्यावर एक वेगळेच तेज आले आहे..."जय हसून बोलतो...त्याच बोलणं ऐकून ती गोड अशी लाजते आणि त्याच्या मिठीत जाते...तसा तो देखील हसून तिला मिठीत घेतो...

"चला आता मॅडम आपण जाऊ ऑफिसला...''जय तिला बाजूला करत बोलतो...

"हम्म चला..."ती देखील थोडीशी स्वतःला सावरत बोलते...जय हसून तिचा हात हातात पकडतो आणि तिला बंगल्याच्या बाहेर घेऊन येतो...तो आणि ती त्यांच्या मोठ्या अश्या महागड्या ब्लॅक कलरच्या गाडीत बसतात...ड्रायव्हर ते दोघे बसल्यावर गाडी स्टार्ट करतो आणि त्या दोघांना तिथून घेऊन जातो...त्यांच्या गाडीच्या आजूबाजूला दोन ते तीन बॉडी गार्डच्या कार असतात... भावनाला हे माहितीच होत...सगळ्यात मोठया कंपनीचा मालक तो होता त्यामुळे त्याला अशी सुरक्षा तर असायचीच...

"भावना काही प्रॉब्लेम आहे तर बोलत जा??"जय तिला शांत पाहून बोलतो...त्याच्या आवाजाने ती भानावर येते...मगासपासून ती विचारात हरवली होते...जास्त बोलणं पण तीच नव्हतं म्हणून तो न राहवून तिला विचारतो...

"खरच स्वतःच्या कपड्यावरून चेहऱ्यावरून लोक आपली बुद्धिमत्ता ठरवतात का??"ती जय कडे न पाहता बोलते...जयला कळत त्याने मगाशी बोलण्याच्या नादात काय बोलले ते?

"भावना मला तस नाही बोलायचं होत...फक्त तू नव्हती माझ्याकडे म्हणून ठेवलं गेलं...तुला माहिती आहे ना मला सिनसीअर लोक लागतात ते..."जय तिच्याकडे पाहून बोलतो...

"जय प्रत्येक माणूस हा सिनसीअर असतो का नाही हे त्याच्या दिसण्यावरून ठरत नाही ना?माझं म्हणाल तर मी कामाच्या बाबतीत आहे सिनसीअर फक्त काही क्षण मी माझ्या आयुष्यात आनंदाने जगते कारण मला आवडत तस जगायला...त्यामुळे त्यावरून मला कोणी जज करू नये...एक गोष्ट मी नक्कीच सांगेन मी कोणासाठी माझ्यात बिलकुल चेंज करणार नाही...ना कपड्यात,ना राहणीमान मध्ये...प्रेम जस तुम्ही केलं तसच मी ही केलं...पण त्या प्रेमासाठी मी तुम्हाला कधीच बदला अस बोलणार नाही...कारण प्रेमात लाचारी नाही हवी...आपल्या प्रेमासाठी मूळ आपला स्वभाव सोडून वागणं हे माझ्या तत्त्वात बसत नाही..."भावना जयकडे पाहून बोलते...तीच अस बोलणं ऐकून जय काहीवेळ तिला पाहतच राहतो...

"प्रिन्सेस तुला बदल कोण बोलत आहे?फक्त काही ठिकाणी आपल्याला चांगलं जावं लागतं त्यामुळे तिथं तरी निदान जावं अस मला वाटत...तू कधीच तुझा स्वभाव बदलू नको कारण तू जशी आहेस तशी मला आवडते... तुझ्यातील स्वाभिमान मला जास्त आवडतो..." जय तिच्या डोळ्यांत पाहून बोलतो...जयच बोलणं ऐकून तिला समाधान वाटते...कारण ती साधी सिम्पल राहायची...खूप काही तिच्यात होत पण तिच्या साधेपणा वरून लोक तिला जज करायचे ते तिला बिलकुल आवडायचं नाही...म्हणून ती आज जयसोबत बोलली...बोलत बोलत ते दोघे ऑफिसच्या जवळ पोहचतात...जय तिच्या हट्टापायी तिला ऑफिसच्या काही अंतरावर सोडतो...तशी ती चालतं चालत आपलं सामान घेऊन ऑफिसमध्ये पोहचते...तो देखील काहीवेळाने ऑफिसमध्ये येतो आणि सरळ आपल्या केबिन मध्ये जाऊन बसतो...त्याने मुद्दाम तिला स्वतःच्या केबिनच्या समोर त्याला त्याच्या केबिन मधून दिसेल अश्या ठिकाणी तिला डेस्क दिला होता...तो काम करायचा आणि तिला देखील पहायचा...ती मात्र खूप शांतपणे स्वतःच काम करत होती...आसपास काय चालले या कडे तीच बिलकुल लक्ष नव्हते...तिला त्यात इंटरेस्ट पण नव्हता...जयच्या ऑफिसमध्ये काही भारतीय लोक होती तर काही इंग्रज लोक देखील होती...इंग्रज मुली भावनाकडे पाहतात...कारण तिने फुल्ल येल्लो कलरचा टॉप घातला होता आणि त्याला मॅचिंग लेगीनज घातली होती...केस मोकळेच सोडले होते...तिचे ते मोठे आणि काळेभोर केस पाहून सगळयाजणी तिला पाहत असतात...खूपच वेगळी दिसत होती...एकदम भारतीय अशी कारण डोक्यावर छोटीशी टिकली पण होती...काही ऑफिसमधील मुलं तिला पाहत होते...पण ती कोणालाच पाहत नव्हती...

"हेय जेनी शी इज सो beautiful ना??"एक इंग्रजी मुलगी बोलते...

"या शी इज इंडियन..."जेनी...

"जरा जास्तच कुजबुज करत आहे ही लोक या मुलीची...पण खरंच बार्बी डॉलसारखी वाटत आहे...तिचे ते लांबसडक केस तर खूपच भारी दिसत आहे..."एक माणूस बोलतो...

"रमेश भाई जादा मत सोचो उसके बारे में क्यूकी उसकी शादी हो चुकी हैं...उसके हातों में रेड चुडा हैं...ये चुडा शादी होने के बाद ही लडकी पहेंती हैं..."दुसरा व्यक्ती बोलतो...त्याच अस बोलणं ऐकून रमेशच्या चेहऱ्यावर आठ्या पडतात...

"ऐसा थोडी ना होता हैं नकुल??फॅशन होती हो गी इसलीए पहेने हो गे..."रमेश भावनाकडे पाहून बोलतो...

"नहीं ये फॅशन वाले कंगण नहीं हैं...ये चुडा हैं...आप ही जाकर पुछकर आओ..."नकुल थोडस वैतागत बोलतो...त्याच बोलणं ऐकून रमेशला तिच्या बद्दल कयुरोसिटी वाटते...तो काहितरी विचार करून तिच्याजवळ जात असतो...की तेवढ्यात जय तिच्या डेस्ककडे जातो...

"मिस सावंत मला तुमच्यासोबत एका प्रोजेक्ट बद्दल डिस्कशन करायचे आहे...त्यासाठी केबीन मध्ये या..."जय थोडस कडक शब्दांत बोलून तिथून निघून जातो...त्याच बोलणं ऐकून ती पटकन त्याच्या मागे निघून जाते...ते पाहून रमेश आपल्या जागेवर जाऊन बसतो...

"माय कम इन सर..."भावना हसून विचारते...

"येस कम इन प्रिन्सेस..."जय देखील हसून तिला बोलतो...त्याची परमिशन मिळताच ती आतमध्ये येते आणि चेअरवर जाऊन बसते...

"काय काम होत तुमचं??"भावना...

"काहीच नाही...माझ्या बार्बी डॉलला बाहेरचे लोक पाहत होते म्हणून आतमध्ये बोलावलं...बस्स एवढंच..."जय काचेतून सर्वांना पाहून बोलतो...त्याच्या केबिन मध्ये काय चालायचं हे कोणाला दिसायच नाही...पण जय आतून सगळयांना पाहायचा त्याची नजर कॅमेरावर देखील होतीच...त्याने कॅमेरा वरून बाहेरची कुजबुज ऐकली होती...त्यामुळे तो बाहेर आला होता...

"जलसी फिल?"भावना हसून विचारते...

"जे माझं आहे तर ते माझंच असणार ना?यात कसली जलसी?"जय फाईल चाळत बोलतो...

"आले मेले पत्तिदेव इतना गुस्सा?"भावना क्युटपणे त्याला विचारते...

"याला गुस्सा नाही रागावणं म्हणतात...काही लोकांच्या नजरा चांगल्या नसतात त्यामुळे अस वागावे लागले...पण आता अजिबात बाहेर जायचं नाही...उद्या पासून माझ्या केबिनमध्ये राहून काम करायचं..."जय थोडस चिडून बोलतो आणि तसाच कोणाला तरी कॉल करून आतमध्ये बोलावतो...तशी एक सुंदर मुलगी दरवाजातुन शॉर्ट ड्रेस घालून आतमधे येते...भावना तर तिल पाहतच राहते...

"अश्या मुली ठेवतात ही लोक...एवढा छोटा ड्रेस आहे तो?मेरे पती पर लाईन मारने के लिए सबकुछ कर रही हैं...हुं"भावना मनातच त्या मुलीला पाहून बोलते...

"मिस वैदही उद्यापासून तुम्ही मिस सावंतच्या जागेवर जाऊन काम करा...उद्यापासून तुमचं काम या पाहतील..."जय त्या मुलीला पाहून बोलतो...पण बोलताना त्याची नजर मात्र भावनाकडे असते...ते पाहून वैदेही आतल्या आत भावनाला किती तरी शिव्या देते...

"ओके सर..."वैदेही अस बोलून तिथून निघून जाते...

"अहो तुम्ही जर असच वागत राहिला ना?तर मला नको हा जॉब...मी दुसऱ्या कंपनीत जाते..."ती थोडीशी चिडून बोलते...

"मी असताना तुला नाही मिळणार कुठे जॉब प्रिन्सेस..."जय थोडस हसून बोलतो...

"मोठा गैरसमज आहे...इथे तर नाही मिळणार ना?पण parallel युनिव्हर्स मध्ये मिळणार..."ती थोडीशी attitude मध्ये बोलते...पण तिचे बोलणे ऐकून जय डोळे मोठे करून तिच्याकडे पाहतो...

"हेय काय असत आता नवीन??"जय फाईल बाजूला ठेवत विचारतो...

"ते आपल्या पृथ्वीसारखच असत...किती तरी असे ग्रह आहे ब्रम्हांडात जे आपल्या पृथ्वीसारखेच आहेत...तिथे आपल्या सारखीच माणस असतात...मग तिथे कंपन्या पण असतील...तिकडे जाऊन करीन जॉब मी..."भावना बोलते...जय तीच बोलणं ऐकून अजीब नजरेने तिला पाहतो...

"भावना या कल्पना आहेत फक्त तुझ्या...जस्ट जोक्स आहेत...रिअल मध्ये अस काही नसतं..."जय तिला समजावत बोलतो...

"पण मी तर जाऊन आले आहे अस मला वाटत"ती मनातच स्वतःला बोलते...

"भावना ऐकलं तू??हे काही नसतं...त्यामुळे तुला इथेच जॉब करावा लागेल..."जय थोडस चिडून बोलतो...

"हुं...करते आहे...पण अजिबात माझ्यावर ओरडायच नाही...नाहीतर घरी गेल्यावर पाहतेच तुम्हाला..."ती त्याच्याकडे पाहून बोलते...तिचे बोलणे ऐकून तो हसतो...

"मी तर तुझाच आहे...कधीही पाहू शकतेस तू..."जय खट्याळ भाव चेहऱ्यावर ठेवत बोलते...

"ओ गॉड इतना रोमान्स हमे नहीं अच्छा लगता हैं..."ती बोलते...

"आता जाऊ शकते तू...नाहीतर पुन्हा मलाच बोलशील..."जय बोलतो...त्याच बोलणं ऐकून ती सुटकेचा श्वास घेते आणि बाहेर निघून येते...

"बर झालं यांनी हाकलले नाहीतर आणखीन काही वेळ बसली असती तर नक्कीच प्रेग्नन्सी बद्दल कळलं असत..."ती मनातच बोलून आपल्या डेस्कवर येऊन बसते...ती आपली कामात मग्न असते आणि इकडे वैदेही तिला पाहून चरफडत असते...

काहीवेळाने भावना सगळं आवरुन वॉशरूम ला जाते...याच संधीचा फायदा वैदेही घेते...भावना आपलं तोंड पुसत असते की तेवढयात वैदेही तिथं येते...

"वा वा क्या बात हैं!! पहिल्याच दिवशी सरांना चांगलंच इम्प्रेस केलं आहे..."वैदेही कुत्स्कीपणे बोलते...

"मी का इम्प्रेस करू??
स्वतःच्या नवऱ्याला इम्प्रेस करायची गरज काय आहे मला(मनात)"ती मागे वळून वैदेहीला बोलते...

"एवढं लक्षात ठेव तू कितीही प्रयत्न केला तरीही सरदेशमुख सर तुला मिळणार नाही..."वैदेही बोलते...

"अरे,पण जे माझे आधीच आहे तर त्यांना का मिळवू मी??ही पोरगी येडी आहे..."भावना मनातच बोलते...

"कळलं का तुला मिस??"वैदेही...

"अग कोंबडी तू काय मला शिकवते??तूच दूर रहा की...कशाला स्वतःची चोच मध्ये घालते..."भावना हसून तिला बोलते...

"व्हॉट कोंबडी?तू मला कोंबडी बोलली?"वैदेही रागातच विचारते...

"आता तुझ्याशिवाय इथे कोणी आहे का??तुलाच बोलली..."भावना देखील तिच्या भाषेत तिला उत्तर देते...

"आता तर तुला दाखवते ही वैदेही काय चीझ आहे ते??"वैदेही अस बोलून स्वतःच्या बुटात लपवलेला चाकू काढते आणि मुद्दाम हातावर वार करून घेते...थोडेसे केस देखील ती हाताने विस्कटते...भावना तर तिला नुसती पाहत राहते...

"आता तर तुझी नोकरी गेली मिस भावना...मृत्युंजय सर तुला धक्के मारून हाकलतील..."ती अस म्हणून कुत्स्कीपणे हसून बाहेर आरडाओरडा करत पळते...तिला अस पाहून सगळेजण तिच्याजवळ येतात...जय देखील तिचा आरडाओरडा पाहून केबिन मधून बाहेर येतो...

"काही लोकांना तमाशा करायला भरपूरच आवडतो...हुं... संपथी मिळवण्यासाठी खालच्या थराला गेली..."भावना एक उसासा सोडत स्वतःशीच बोलते...ती तशीच स्वतःच आवरुन बाहेर येते...तिला बाहेर आलेले पाहून जय थोडं रागात तिला पाहतो...

"मिस भावना का केलं तुम्ही हे??"जय थोडस चिडूनच तिला विचारतो...

"व्हॉट?मी केलं हे?पण कधी??"भावना...

"सर तुमच्यावर लाईन मारण्यासाठी अस केलं...मला बोलते त्यांच्यावर लाईन मारू नको...मी तिला बोलली अस काही केलं नाही तरीही न ऐकून घेता मला मारायला लागली..."वैदेही रडत रडत बोलते...

"किती खोटं बोलते तू??जय मी बिलकुल अस काही केलं नाही आहे...ही एक नंबरची खोटारडी आहे..."भावना रागातच बोलते...

"शटआप भावना...😡तुमचं अशी वागणूक पाहून ही कंपनी तुम्हाला काढून टाकू शकते..."जय चिडून बोलतो...

"तसही राहायचे कोणाला आहे इथे...??तुम्ही काय काढत आहात मिस्टर सरदेशमुख...??मीच ही कंपनी सोडत आहे...जिथे असे खोटारडे लोक आणि तुमच्यासारखे बॉस असतील ना?त्या ठिकाणी ही भावना काम करणार नाही..."भावना रागात जयला पाहून बोलते...ती रागातच आपल्या डेस्ककडे जाते आणि स्वतःच सामान घेऊन वैदेही वर कटाक्ष टाकून निघून जाते...

दुसरी एखादी असती तर तिने सॉरी बोलले असते...पण भावना त्यातील बिलकुल नव्हती...जिथे ती चुकत नव्हती तिथं ती झुकत पण नव्हती...तिला ते आवडायचे पण नाही...त्यात जयने देखील तिच्यावर अविश्वास दाखवल्यामुळे तिला राग आला त्याचा...

ती तशीच बाहेर येऊन कॅब पकडते आणि त्यात बसून निघून जाते...रागातच ती तणतणत घरी येते आणि स्वतःच्या रूममध्ये जाऊन स्वतःची बॅग काढते...ती रागातच वोडरोबमधील कपडे काढते आणि बॅगेत भरायला लागते...

"कोण समजतात कोण स्वतःला?काय माहिती??आता तर हद्दच झाली...मी आता इथं राहणारच नाही..."ती अस बोलून सगळे कपडे भरायला लागते आणि बॅग घेऊन जिन्यावर येते...

"हेय हे काय करत आहेस तू??असा निर्णय नाही ना घेऊ शकत तू??"जय तिच्याजवळ येऊन बोलतो...त्याच्या बॉडी गार्डने सांगितल्यामुळे तो काम सोडून घरी आला होता...

"एकदम गप्प राहायचं...!!मी आता एक क्षण पण नाही राहू शकत तुमच्यासोबत...ज्या माणसाचा स्वतःच्या बायकोवर विश्वास नाही...त्याच्यासोबत मी एक पल पण थांबणार नाही..."ती रागातच त्याला बोलते...

"तुला काय गरज होती पण तिच्यासोबत अस करायची??"जय चिडून विचारतो...

"जय$$$ स्टॉप इट..."ती रागातच त्याला बोलते...

"ती काय बोलली तुम्हाला माहिती नाही...ती तुमच्यावर डोरे टाकायला पाहत होती आणि जे केलं ते तिने स्वतः केलं...मी काहीच केलं नाही..."भावना चिडून बोलते...यावेळी तिच्या डोळ्यांत बिलकुल पाणी नव्हते...

"नको तिथं डोकं चालत ना तुझं म्हणून बोलावे लागते डायरेक्ट काय चाकू  घेऊन मागे लागली होती तिच्या?तूच बोलली होती ना मला मी तुम्हाला ओळखत नाही मग??माझ्या लाईफ सोबत मग प्रॉब्लेम का येतो तुला?"जय देखील तेवढ्याच आवाजात तिला विचारतो...

"जय मी वाईफ आहे तुमची हे विसरत आहात तुम्ही...जाऊ दे मलाच नाही बोलायचं तुमच्यासोबत...मी आणि माझं बाळ तुम्हाला सोडून कायमचे चाललो..." भावना भयंकर रागात बोलते...तीच बोलणं तर त्याला काही क्षण कळत नाही...तोपर्यंत ती रागातच स्वतःची बॅग घेऊन हॉलमध्ये जाते...

"बॉडीगार्ड क्लोज द डोर..."जय भानावर येत मागे वळून बोलतो...त्याच बोलणं ऐकून भावना एक रागीट कटाक्ष टाकते...

"दरवाजा बंद केले म्हणून काय मी बाहेर जाऊ शकत नाही का??खिडकीतून बाहेर जाणार आहे मी..."ती अस बोलून किचनमध्ये जाते ...तिथे एक खिडकी पूर्ण ओपन असते हे तिला माहिती होते...म्हणून ती तिथे जाते आणि आपलं सामान बाहेर फेकून...खिडकीवर सावकाश चढते...ती बाहेरच्या दिशेने जात असते की तेवढयात जय तिला धरतो...

"व्हॉट इज धिस प्रिन्सेस??असले स्टंटस येतातच कुठून तुझ्या डोक्यात??"जय तिला विचारतो...

"तुम्हाला काय करायचं आहे??मला नाही बोलायचं तुमच्यासोबत..."ती त्याच्या हातातुन हात सोडवण्याचा प्रयत्न करत बोलते...

"एका प्रश्नाचे उत्तर दे??तू खरच प्रेग्नंट आहे का??"जय थोडस प्रेमाने विचारतो...

"खोटं पण प्रेग्नंट होतात??मला माहीतीच नव्हते..." भावना उपहासाने त्याला विचारते...

"भावना मी सरळ विचारत आहे ना??मग सरळ उत्तर दे"जय तिला तिथून उचलून घेत विचारतो...

"सांगितले ना एकदा?पुन्हा पुन्हा सांगावे मला वाटत नाही आणि अजनबी लोकांना तर नाहीच नाही..."भावना त्याच्या हातातुन सुटण्यासाठी त्याला मारत बोलते...

"अलेक्झांडर कॉल द डॉक्टर..."जय भावनाकडे पाहून बोलतो...

"सगळी कडे मनमानी करतात हुं..."भावना फुगूनच बोलते...जय हसून तसाच तिला घेऊन येऊन बेडवर ठेवतो आणि प्रेमाने तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवतो...

"मला हात लावायचा नाही...किस तर नाहीच नाही करायची"भावना उलटा हात कपाळावरून फिरवत बोलते...तस तो हसून बाजूला होतो आणि तिच्या पोटावर स्वतःचा हात ठेवतो...तशी ती शॉक होऊन त्याला पाहते...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
©®भावना सावंत(भूवि❤️)

Rate & Review

Swati Jagtap

Swati Jagtap 3 months ago

Priya Gavali

Priya Gavali 3 months ago

sanjana kadam

sanjana kadam 3 months ago

Jak

Jak 3 months ago

Prakash Gonji

Prakash Gonji 3 months ago