तू अशीच जवळ रहावी... - 23 in Marathi Love Stories by Bhavana Sawant books and stories Free | तू अशीच जवळ रहावी... - 23

तू अशीच जवळ रहावी... - 23

"सगळी कडे मनमानी करतात हुं..."भावना फुगूनच बोलते...जय हसून तसाच तिला घेऊन येऊन बेडवर ठेवतो आणि प्रेमाने तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवतो...

"मला हात लावायचा नाही...किस तर नाहीच नाही करायची"भावना उलटा हात कपाळावरून फिरवत बोलते...तस तो हसून बाजूला होतो आणि तिच्या पोटावर स्वतःचा हात ठेवतो...तशी ती शॉक होऊन त्याला पाहते...

"सिरिअसली तू खरच आहे का प्रेग्नंट???"जय तिच्या पोटावर हात ठेवून विचारतो...

"पुन्हा उत्तर देऊन काय सत्य परिस्थिती बदलणार आहे का??मला नाही बोलायचे तुमच्यासोबत तुम्ही जावा इथून..."ती चिडून त्याचा हात पोटावरुन काढत बोलते...पण त्याचा भारदस्त हात जरासुद्धा हलत नाही...

"प्रिन्सेस कितीही प्रयत्न केला तरीही नाही काढता येणार तुला माझा हात...तू एक नाजूकशी गुलाबाची कळी आहेस...आणि मी..."तो बोलतच असतो की ती तेवढ्यात बोलायला लागते...

"तुम्ही एक चिंमपाजी आहात...😒मोठा वाला..."ती तोंड फिरवून बोलते...तीच बोलणं ऐकून तो रागात तिच्याकडे पाहतो...पण तिला काहीच फरक पडत नाही...कारण यावेळी तिची चूक नसताना तो तिला बोलला होता म्हणून ती त्याला भाव देत नव्हती...त्याला कळलं होतं तिच्यासमोर काही बोलल की ती दुसरं एक एक नाव शोधून त्याला देणार...त्यामुळे तो गप्पच बसतो...

"आले मोठे मला बोलणारे...माझ्या पिल्लु वरून हात काढा हा...ते माझं पिल्लु आहे..."ती बोलते...

"माझं पण आहेच की ते प्रिन्सेस...??"जय...

"हुं...मी नऊ महिने पोटात ठेवणार मग ते माझं आहे तुमचं नाही...जावा तुम्ही इकडून नाहीतर मीच जाते इथून कुठेतरी..."ती वैतागत बोलते...जय तिला काही बोलायला जाणार त्या आधीच अलेक्झांडर डॉक्टरला घेऊन तिथं येतो...डॉक्टरला पाहून जय गप्प बसतो...

"डॉक्टर...चेक करा..."जय अस बोलून उठून तिथून बाजूला होतो...तो बाजूला झाल्यावर डॉक्टर भावनाच्या बाजूला बसून तिला चेक करायला लागतात...ती पण फुगूनच बसून त्यांचं त्यांना काम करायला देते...

"मिसेस सरदेशमुख तुम्हाला आणखीन काही त्रास होतो तर सांगा??"डॉक्टर...

"हा..होतो आहे त्रास यांचा...त्यांना सांगा इथून जायला...मला नाही आवडत ते..."भावना जयला पाहून बोलते...तीच अस बोलणं ऐकून डॉक्टर घाबरून जयकडे पाहते...तो तर नजर रोखून भावना वर पाहत असतो... पण ती नजर फिरवून दुसरीकडे पाहत असते...

"मिस्टर जय...शी इज प्रेग्नंट...अजूनही तुम्हाला खात्री नाही पटत तर तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करू शकतात..."डॉक्टर बोलतात...जय त्यांचे बोलणे ऐकून भावनाजवळ येतो...

"नो डॉक्टर...तुम्ही जाऊ शकतात...एवढी खात्री तरी आहे..."जय बोलतो...डॉक्टर भावनाला चेक करून तिथून निघून जाते...तसा जय भावनाला स्वतःच्या दोन्ही हातात उचलुन घेतो आणि तसाच गोल फिरवायला लागतो...

"अहो$$$ मध्येच कसले झटके येतात तुम्हांला??सोडा मला खाली...नाहीतर मी चावेन हा..."ती रागातच त्याला बोलते...तीच अस बोलणं ऐकून तो थांबतो...

"हेय प्रिन्सेस किती भारी न्यूज दिली यार तू...!!! आय एम सो हॅप्पी यार..."तो आनंदात बोलतो...त्याचा आनंद पाहून ती जबरदस्त शॉक होते...तो तिला गोदीतच घेऊन थोडस झुकून आनंदात तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवतो...

"मी सांगितले ना मला किस नाही करायचं??तर नाही करायचं..."ती चिडून बोलते...पण जय मात्र हसून तिला पाहत असतो...

"अस नको चिडू सोना...सॉरी ना बाबा...आता कान पकडू काय???"जय तिच्या नाकावर नाक घासत बोलतो...ती हातानेच स्वतःच्या नाकावर हात फिरवते...

"तुम्ही माझी इन्सल्ट केली...तर आता तुम्ही 100 वेळा उठक बैठक करायची..."ती फुगूनच त्याला बोलते...

"व्हॉट 100??सोना मी एक मोठा बिझनेसमन आहे...एवढ तरी लक्षात ठेव..."तो तिला बेडवर ठेवत बोलतो...

"बिझनेसमन बाहेर आहात तुम्ही...इथं फक्त माझा नवरा आहात...त्यामुळे शिक्षा भोगा..."ती...

"कुठच्या मुहूर्तावर हिच्या प्रेमात पडलो काय माहिती...??"जय स्वतःशीच पुटपुटतो...

"मी नाही सांगितले पडायला...जावा तिकडे वैदेही कडे तुमच्या...मी तर उद्या इथून जाणार आहे आणि हे फायनल आहे माझं..."ती चिडून बोलते...

"प्रिन्सेस आधी ऐकून घे आणि मग ठरव काय ते..."जय तिच्याबाजूला बसून बोलतो...

"बोला...तुमचं घर आहे आणि तुमचंच राज्य आहे...आम्ही गरीब दासीं आहोत इकडची..."ती...

"तू दासी नाही...तू तर राणी आहे या माझ्या राज्याची..."तो  बोलतो...

"हुं...म्हणून अस वागतात का माझ्यासोबत तुम्ही??"ती रागात त्याला बोलते...

"प्लीज ऐक ग तू माझी गुड वाली प्रिन्सेस ना??दोन आईस्क्रीम देईल तुला ऐकून घेतल्यावर..."तो थोडस वैतागत बोलतो...पण त्याच आईस्क्रीमच बोलणं ऐकून ती त्याच्याकडे पाहते...

"आधी आईस्क्रीम मग तुमचं बोलणं..."हळू आवाजात ती त्याला बोलते...तीच ते क्युट बोलणं ऐकून त्याला तिच्यावर भरपूर सार प्रेम करावे वाटत होते...पण त्याने तो विचार झटकला...आईस्क्रीमच नाव ऐकून ती नमती होणार हे त्याला आधीच माहिती होते...म्हणून तो बोलतो...तो स्वतःचा फोन काढतो आणि कॉल लावून बॉडीगार्डला आईस्क्रीम आणायला सांगतो...आईस्क्रीम येईपर्यंत तो इकडून तिकडून नुसता चकरा मारत असतो...कारण भावना आईस्क्रीम हातात पडल्यावरच त्याच ऐकणार होती...हे त्याला कळलं होतं...

काही मिनिटांत त्याचे बॉडीगार्ड वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम आणून तिच्यासमोर ठेवतात...तस ती जयवर रागावली आहे हे विसरून आईस्क्रीमला पाहून एक हातात घेऊन खायला लागते... एवढं फ्लेवर पाहून जयच्या कपाळावर आठ्या पडतात...

"भावना ओन्ली टू वर झालं आहे आपलं बोलणं बाकी नाही..."जय तिच्याजवळ येऊन बोलतो...पण मॅडमच अजिबात त्याच्या बोलण्याकडे लक्ष नसते...ती मस्त आईस्क्रीम खात असते...

"प्रिन्सेस ऐक ग बाई आधी माझं...मग खा की..."जय तिच्या बाजुला बसून बोलतो...तशी ती आईस्क्रीम खाता खाता त्याला डोळयांनीच बोल बोलते...कितीही काहीही झालं जग इकडच तिकडच झालं तरीही ती हातातील आईस्क्रीम काही सोडणार नव्हती...🤣हे त्याला कळलं होतं...

"ऐक तू गेली ना तिथून तेव्हा मी त्या वैदेहीला माझ्या केबिनमध्ये बोलावलं..."तो तिला पाहून बोलतो...

"कशाला अजून तिला समजवायला???की तिची बाजू आणखीन घ्यायची बाकी होती म्हणून??"ती खाता खाता विचारते...

"प्रिन्सेस अस का बोलते सोना तू??अग तू जेव्हा बोलत होती ऑफिस मध्ये माझ्यासोबत तेव्हा तुझ्या डोळ्यांत पाणी नव्हते...ते डोळे बेधडक होते...त्यामुळे मला कळलं होतं...म्हणून तू गेल्यावर तिला केबिनमध्ये बोलावून हाकलून दिलं...तिला कुठेच नोकरी मिळणार नाही आता...पूर्ण ऑफिस मध्ये तू माझी बायको आहे हे पण सांगितले..."जय तिला पाहून बोलतो...त्याच बोलणं ऐकून ती भलतीच खुश होते...

"देखो बच्चा पापा ने उस चुडैल को भगा दिया। अब हम पापा से बात कर सकते हैं??"भावना आईस्क्रीम बाजूला ठेवून पोटावर हात ठेवून बोलते...

"व्हॉट चुडैल??भावना सगळयांनाच नाव ठेवली का तू??"तो नजर रोखून विचारतो...

"येस any प्रॉब्लेम??"ती...

"नो..."जय तिला पाहून बोलतो...कारण आता कुठे ती चांगली बोलत होती...पुन्हा चिडली की त्याच काही खर नव्हतं हे त्याला कळलं म्हणून तो बोलतो...

"प्रिन्सेस आता झालं ना...मग आपण मस्त राहू या ना??"जय ...

"नो नो आधी 100 उठक बैठक करा मग चांगलं वागू या..." भावना आईस्क्रीम हातात घेत बोलते...तीच बोलणं ऐकून जय एक मोठा श्वास घेतो आणि कान पकडून उठा बशा काढायला लागतो...ती होतीच अँटिक आणि त्यात क्युटनेस भरभरून होता तिच्यात त्यामुळे तो काढायला लागतो...त्याच्या साठी ते easy होत...म्हणून तो हसत हसत मारत असतो...त्याचा तो स्टॅमिना पाहून ती हातातील आईस्क्रीम बाजूला ठेवून डोळे मोठे करून त्याला पाहत असते...काळे कुरळे जेलने सेट केलेले केस...अंगावर पांढरा शर्ट घातला होता...तो शर्ट उठाबश्या काढल्यामुळे घामाने भिजला होता...त्यातून त्याची बॉडी,मसल्स एकदम भारी दिसत होते...ते पाहून ती त्याच्यातच हरवली...तो तिला अस पाहताना पाहून हळूच स्वतःची शिक्षा पूर्ण करून तिच्याजवळ येतो...

"जास्त हॉट दिसतो ना मी??"तो तिच्याजवळ येऊन बोलतो...

"येस भरपूरच दिसतात..."ती नकळतपणे बोलते...पण नंतर तिच्या लक्षात येताच ती थोडीशी बेडवर बसूनच मागे सरकते...

"माझी शिक्षा तर पूर्ण झाली आहे...आता तुझी शिक्षा बाकी आहे..."तो अस बोलून अचानक पणे तिला स्वतःच्या मिठीत घेतो...

"तुला नाही माहिती तू मला किती मोठ गिफ्ट दिलं आहेस ते...!!खूप खूप खुश आहे मी...आय लव्ह you प्रिन्सेस..."जय अस बोलून तिच्या गालाला स्वतःचा गाल घासतो...त्याची बेअर्ड तिला लागते म्हणून ती चेहरा छोटासा करते...

"तुझ्यासारखी क्युट छोटीशी प्रिन्सेस हवी मला...मला डॅड बोलणारी...छोटीशी गोंडस अशी..."तो अस बोलून तिच्या चेहऱ्यावर स्वतःचे ओठ फिरवतो...त्याच्या अश्या करण्याने ती काही वेळापूर्वी त्याच्यावर रागावली होती हे पण ती विसरली होती...ती डोळे बंद करून त्याचा स्पर्श अनुभवते....तो अलगदपणे तिच्या ओठांवर ओठ टेकवून छोटासा किस करून बाजूला होतो...

"आता नाही जाणार ना तू??"तो प्रेमाने तिचे केस नीट करत विचारतो...

"ते का ?मी जाणार कुठे होते पण??मी कुठेच जाणार नव्हती..फक्त मस्करी केली...सिरीयस नका घेऊ माझं बोलणं...🤣"ती हसून बोलते...

"एक नंबरची अतरंगी आहेस तू...कधीच सुधारणार नाही...आता आराम कर...मला काम आहे खाली...तर मी खाली जात आहे...हे आईस्क्रीम संध्याकाळी खा हा...आता घेऊन जातो मी..."जय हसून तिला बोलतो...

"ओके...मी स्लीप होत आहे..."ती अस बोलून बेडवर व्यवस्थित झोपते...जय हसून तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवतो आणि तिच्या अंगावर ब्लँकेट टाकून लँन्सी आणि बु ला तिथून घेऊन जातो...तो खाली येऊन मस्त आरामात फ्रेश होऊन आपलं काम लॅपटॉप वर करत बसतो...खूप वेळ तो काम करत असतो...लँन्सी आणि बु त्याला मदत करत असतात...मध्ये बू ची कॉमेडी चालू असते...हसून ते आपलं काम पूर्ण करतात...

"चला आता जेवणाची वेळ झाली असेल...भावना ला उठवून खाली घेऊन येतो...तो पर्यंत तुम्ही थांबा इथे..."जय लँन्सी आणि बु ला बोलतो...तो लॅपटॉप बाजूला करून उठतो आणि तसाच भावनाला बोलावण्यासाठी म्हणून स्वतःच्या रूममध्ये थोडस हसतच जातो...तो रूमचा दरवाजा कार्ड ने ओपन करून आत जातो...आतमध्ये येताच बेडकडे जातो आणि पाहतो तर भावना तिथे नसते...

"बाथरूम मध्ये असेल...तिकडे पाहतो..."जय स्वतःशीच बडबडत बाथरूम कडे जातो तर ते ओपन असते...पण तिथे ती नसते...तसा तो घाबरतो आणि तिला पूर्ण रुतर आवाज देत शोधतो....पण कुठूनच त्याला रिस्पॉन्स मिळत नाही...

"प्रिन्सेस मस्करी बिलकुल चालणार नाही हा गपचूप समोर ये😤"तो चिडून बोलतो...पण कुठूनच त्याला तिचा आवाज ऐकू येत नाही....तसा तो रागातच खाली येतो...

''बॉडीगार्ड मॅडम कुठे आहेत ते पहा लवकर...एवढी टाईट सेक्युरिटी असताना मॅडम कश्या गायब झाल्या??कोण आलं होतं का ते पहा आणि 2 मिनिट मध्ये मला पूर्ण बंगल्याचे cctv फुटेज हवे आहे..."जय रागातच खाली येऊन बॉडी गार्डला बोलतो...त्याच बोलणं ऐकून ते घाबरतात आणि भावनाला शोधू लागतात...पण ती काही कोणाला भेटत नाही...लँन्सी आणि बु पण शोधायला लागतात पण त्यांना देखील ती भेटत नाही...

"सर cctv फुटेज आणले आहे...तुम्ही पहा..."अलेक्झांडर समोर येत बोलतो...

"हुं...चालू करा लवकर..."जय अस म्हणताच अलेक्झांडर त्याच्या हातातील लॅपटॉप चालू करतो...तसा जय स्वतःच्या रूममधील फुटेज पाहायला लागतो...तो खाली येताना कॅमेरे चालू करून आला होता...म्हणून रूममध्ये काय झालं भावना सोबत ते त्याला कळणार होते म्हणून सर्वात आधी ते पाहतो...काही तास भावना झोपलेली असते हे त्याला दिसते...पण जस जस पुढे जातो तस तस वेगळंच काहीतरी त्याला दिसायला लागते...अचानक पणे रूममध्ये पांढरे धुके पसरते...ते हळूहळू वाढते आणि नंतर हळूहळू कमी होते...ते धुके कमी झाल्यावर भावना बेडवर नसते...हे पाहून जय घाबरतो...तो विचित्र प्रकार पाहून सगळेच घाबरतात ...कारण रूमच्या खिडक्या पासून ते दरवाजा टेक्नॉलॉजीने बनलेला होता...त्यामुळे कोणी आतमध्ये येऊन तिला नेण शक्य नव्हते...ते धुके पण अश्या प्रकारे गायब होते की त्याचा काहीच ठावठिकाणा त्यांना कोणाला लागत नव्हता...जय देखील झालेल्या प्रकाराने विचारात पडतो...त्याच्यासमोर तिचा मगासचा चेहरा येतो आणि तो आठवून नकळतपणे त्याचे डोळे भरतात...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः

©®भावना सावंत(भूवि❤️)

Rate & Review

Swati Jagtap

Swati Jagtap 2 months ago

टिना

टिना 2 months ago

Arati

Arati 3 months ago

Prakash Gonji

Prakash Gonji 3 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 3 months ago