Janu - 11 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | जानू - 11

जानू - 11


जानू आज पुन्हा चाळीतल्या आठवणीत हरवलेली असते ..अभय ची आज पुन्हा तिला खूप आठवण येते ..त्याचं पाहणं ,बोलणं ,सर्वांना मदत करन सर्व तिला आठवत असत..आणि स्वतःवर राग येत असतो की का आपण इतका राग केला त्यांचा?नकळत तिला अभय वर एक कविता सुचते

निखळ मैत्री तुझी
समजू शकले नाही मी
परी तू नेहमीच समजून घेतले मला
साथ दिलीस तू दूर राहुनी

हसणं माझं तुला आवडे
पण तुला पाह ताच मी नाक मुर्गळे
आज माझ्या नजरेत
मीच अपराधी ठरले

निखळ मैत्री तुझी
समजू शकले नाही मी
फसव्या या जगापासूनी
तू नेहमीच मला सावध केले
बोल तेव्हा तुझे मज कटू वाटले
हसून बोलण्याला तुझ्या
शब्द दिले मी तिरस्कारा चे

निखळ मैत्री तुझी
समजू शकले नाही मी
काळजी घेताना तू माझी
मज तो तुझा स्वार्थ वाटला
आठवणीने तुझ्या आज हा कंठ दाटला
अपमान केला मी तुझा पदोपदी
तरी तू घेतले नाहीस कधी मनवरी

निखळ मैत्री तुझी
समजू शकले नाही मी
मी येताच तू आनंदाने फुलाय चा स
अन् तू येताच माझ्या कपाळावर
अठ्याच जाळ पसरायच
तू माझ्यासाठी फुले आणयचास
मी मात्र बोचरे काटे तुझ्या हातावर ठेवायची

निखळ मैत्री तुझी
समजू शकले नाही मी
आपलेपणाने तू जवळ येता
मी मात्र तुला दूर लोटायचे
फसव्या या जगालाच
तेव्हा मी आपल मानायचे
आज उमजाता मैत्री तुझी
माफी तुझी मागू कशी रे
वेळ रे आहे निघून गेलेली
अभागी मी तुझी मैत्री
हरवून बसलेली
दूर जरी मी असले आज
प्रार्थना करीन मी तुझ्यासाठी
देव करो अन जिथे असशील
तिथे सुखी तू राहावं
जरी नसले आज सोबत तुझी
तरी मैत्री तुझी जीवापाड मी
आठवणीत आहे जपलेली

जानू च्या साऱ्या भावना तिने कागदा वर उतरवली अभय कधी भेटलाच तर त्याला सांगू आपण त्याच्या वर कविता केली होती ..अस म्हणून ती स्वतः शीच हसली.

जानू च कॉलेज सुरू झालं..आता ती पदवीच्या दुसऱ्या वर्षाला होती ..सर्व काही नवीन ..तिला बराच वेळ लागला कॉलेज मध्ये रुळायला..आता तिला नवीन फ्रेंड्स भेटले..समिधा..ही तिची खास मैत्रीण झालेली...कॉलेज छान चाललं होत ..हळू हळू जानू अभय ला विसरू लागली ..ती सध्या जास्त कशात लक्ष च देत नव्हती ..कॉलेज ,घर,मैत्रिणी बस यातच सर्व काही.कॉलेज सुरू होवून २.३ महिने झाले होते .
एक दिवस अचानक कॉलेज ला जायला उशीर झाला ..ती गडबडीने क्लास रूम कडे निघाली होती ..सर्वजण क्लास रूम मध्ये होते त्यामुळे बाहेर कोणीच नव्हते...अचानक तिची नजर समोर च्या क्लास रूम बाहेर गेली ..आणि त्याच वेळेस समोर उभ्या असणाऱ्या मुलाने ही तिला पहिलं..बस दोघे एकमेकांना पाहण्यात दंग झाले .

जानू भानावर येते आणि क्लास रूम मध्ये जाते .आपण का त्याच्या कडे पाहत होतो? याच तिला आश्चर्य वाटत.
तो मुलगा असतो तिचा सिनियर समीर कौशिक..कॉलेज चा डयाशिग बॉय ..उंच.. वेल मेन्टेन बॉडी.. हॅण्डसम...कोणाला ही आवडेल असा बऱ्याच मुली फिदा त्याच्या वर पणं त्याला कोनाच्यात च.. इंटरेस्ट नसतो.कॉलेज सुरू झाल्या पासून आज तो पहिल्या दिवशी कॉलेज ला आलेला असतो कारण तो काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेला असतो.त्यामुळे जानू ने त्याला आधी पाहिलेले नसते .
त्याने ही जानू ला आज पहिल्यांदा पाहिलं होत .नवीन एडमिशन हे त्याला लगेच कळत ..कारण गेले दोन वर्ष तर तो कॉलेज मध्ये असतो ..त्यामुळे सर्वांना तो ओळखत असतो .जानू ला समीर बद्दल माहिती मिळाली होती ..तो आपला सिनियर आहे तसेच त्याला खूप मुली लाईक करतात पणं हा कोणाच्या मागे नसतो ..खूपच ध्येयवादी .
रोज आता जानू व त्याची नजर भेट होत असते ..जानू ला खूप वाटत असत त्याने आपल्या सोबत बोलावं ..पणं हे महाशय मात्र जाणून बुजून तिला टाळत असतात..ती समोर दिसली की हा दुसरीकडे पळ काढत असे..आता जानू च्या ही लक्षात येत त्याचं वागणं तिला खूप राग येतो ..समीर चा

जानू:मला पाहिलं की काय होत याला?मी काय खाणार आहे का याला ?खडूस कुठला ..वाटलं बोलावं याच्या शी पणं ..याला काय एवढा attitude .. याला मी याच्या मागे पाळणाऱ्या मुलीनं सारखी वाटते वाटत ..जावू दे ..मला ही नाही बोलायचं .खडूस कुठला?

त्यानंतर जानू ही त्याला टाळू लागते .तो दिसला की ती आता स्वतः च वळून जावू लागते . त्याला ही जाणवतं..की ती ही आपल्याला टाळते..पणं त्याला ते नकोस वाटत ..हिने का आपल्याला टाळावं ?

दुसऱ्या दिवशी साऱ्या मुली समीर च खूपच कौतुक करत असतात ..साऱ्या त्याला पाहण्यात मग्न असतात.जानू कॉलेज मध्ये येते व समिधा कडे जाते .

समिधा: जानू आज समीर ला पाहिलेस का ?

जानू : कोण तो खडूस ?

समिधा: अग ,खडूस काय ? चांगला आहे तो ?

जानू : असू दे ह..मी नाही पाहिलं त्या खडूस ला.

समिधा : अग आज खूप छान दिसत आहे तो ? सगळ्या मुली तर फ्लॅट झाल्यात त्याला पाहून .

समिधा सांगत असते की जानू ला समोर समीर दिसतो . ब्लू जीन्स त्यावर तसाच थोडा फिक्कट ब्लू शर्ट ..दोन्ही बाजूने शर्ट ची बाही दुमाडलेली...खरंच छान तर दिसतो आहे आज समीर ती मनातच बोलते .

जानू : समिधा ,दिसला बाई खडूस .

समिधा : अग काय परत खडूस ?

जानू : आहेच .तो खडूस .

समिधा: बर बाई,पणं छान दिसत आहे ना आज ?

जानू : हो ,छान तर दिसतो आहे .

अस म्हणून दोघी ही हसू लागतात .आज जानू ने समीर ला पाहिलं होत ..आणि समीर ने ही पाहिलं होत की जानू आपल्या कडे पाहत होती ..तो खुश होतो .कारण ती ही त्याला टाळत असते तेव्हा पासून ती त्याच्या कडे पाहत ही नसते .

इकडे अभय मात्र जानू च्या आठवणीत हरवलेला असतो ..आज बेड वर पडल्या पडल्या तो तिचाच विचार करत असतो ..कधी भेटेल जानू ? कधी पाहू आपण तिला ? कधी सांगू तिला की ..ती माझं सर्वस्व होऊन बसली आहे ..तिच्या शिवाय जीवन किती उदास आहे माझं .

नकळत तुझ्या प्रेमात पडलो
कसे स्वतः ला हरवून बसलो
का जाणे मन तुझेच गाणी गाते
तू मात्र समोर असता मी अबोल होतो
प्रेम माझे व्यक्त करण्याची..वाटे मनाला भीती
नाही ही वेळ संधी साधण्याची
पाहू अजून वाट तरी किती?

i miss you ..

i miss you

i miss you जानू

असे म्हणत म्हणत तो झोपी जातो.


क्रमशःRate & Review

Gautam pawar

Gautam pawar 6 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 11 months ago