जानू - 12 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories Free | जानू - 12

जानू - 12


समीर आता जानू सोबत थोड थोड बोलू लागला होता..कधी कधी .. हाय ..हॅलो चालायचं.. ब्बास पणं गाडी काही पुढे जात नव्हती...तिथेच थांबल्या सारखी झाली होती .
जानू आता सर्वांच्या ओळखीची झाली होती ..कोणाला काही अडचण आली की ती त्याला help करत असे..कोणी बोललं की त्याच्या शी बोलत असे .
भास्कर तिचा क्लास मेट ..तिच्या सोबत नेहमी बोलायला पाहायचा ..गप्पा मारायच्या ..जानू ला त्याचं काही वाटत नसे..पणं समीर ला हे खूप खटकत होत ..तो रागाने लालबुंद होत असे ..जानू भास्कर सोबत बोलत असली की...२.३ वेळा असच झालं ..समीर बोलत होता जानू सोबत की भास्कर तिथे आला आणि त्याने मध्येच बोलायला सुरुवात केली..समीर शांत बसला व तिथून निघून गेला..जानू च्या  ते लक्षात आलं पणं आपण विचार करतो तस काही नसेल म्हणून तिने तो विचार सोडून दिला..पणं पुन्हा तसचं झालं ..भास्कर तिच्या सोबत बोलत होता की समीर दूर उभा राहून पाहत होता ..खूप राग होता त्याच्या डोळ्यात ..जानू ला समीर ला अस पाहून खूप हसू आल ..अरे याला काय होत इतकं ?मी बोलले तर दुसरं कोण सोबत ?
हळू हळू जानू आणि समीर ची चांगली मैत्री झाली .समीर जानू ची खूप काळजी करी..तिला अभ्यासात मदत करी..तिला हसवत असे..ती उदास असलेलं त्याला पाहवत नसे...आता रोजच बोलणं चालू झालं..नंतर त्यांचं फोन वर ही बोलणं चालू होत ..समीर रोज तिला मॅसेज करी.
एकदा असच जानू ला समीर चा मॅसेज आला.

समीर : हाय ,काय करत आहेस ?

जानू : काही नाही,बोल.

समीर : बर , ऐक ना.

जानू : हा ,बोल

समीर : मी शॉपिंग ला आलो आहे ..तुझ्या साठी काही आंनु का ?

जानू : नको ,मला काही नको.

समीर: अग ,अस काय मी कधी कोणा साठी शॉपिंग करत नाही .तू लकी आहेस ,आज पहिल्यांदा तुला विचारल आहे ,सांग पटकन.

जानू : अरे खरंच मला काही नको.पणं मी सांगशील ते करशील?

समीर : हा ,बोल.

जानू: माझ्या आवडीचा ड्रेस घे तुझ्या साठी .

समीर : ok ,बरं सांग .

जानू: व्हाईट शर्ट आणि ब्ल्यू जीन्स.

समीर : व्हाईट शर्ट ? ok बघतो भेटला तर .

जानू : भेटला तर उद्या घालून ये .

समीर थोड्या वेळाने परत जानू ला मॅसेज करतो की शर्ट घेतला म्हणून..जानू ही खुश होते ऐकुन.
दुसऱ्या दिवशी जानू खूप आतुरतेने समीर ची वाट पाहत असते की तो कधी येतो .थोड्या वेळाने समीर येतो ..जानू तर फक्त त्याला पाहतच राहते ..इतका हॅण्डसम दिसत असतो तो..ती डोळ्याने च त्याला ..क्या बात म्हणून खुणावते ..समीर ही खुश होतो.

                     जानू आणि समीर ची फ्रेन्डशिप वाढत होती ..पणं समीर जसा तिच्या सोबत मॅसेज नी बोलायचा मोकळे पणाने तसा कॉलेज मध्ये मात्र थोडा अनोळखीच वागायचा याच जानू ला आश्चर्य वाटायचं.हा मॅसेज ने तर किती बोलतो पणं समोर आले की मात्र तितकंच थोडक्यात ? खरंच मी समीर सोबत च बोलते ना मॅसेज नी .असा तिला कधी कधी प्रश्न पडत असे.
फक्त सिनियर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होता.समीर ने ही भाग घेतला होता .त्यासाठी समीर बरीच तयारी करत होता..रोज त्याची हॉल मध्ये प्रॅक्टीस सुरू होती.जानू ची खूप इच्छा होती ..त्याचा डान्स पाहण्याची पण ती कशी जाणार ..कारण ती तर त्याची ज्युनिअर होती ..आणि तिथे फक्त सिनियर विद्यार्थ्यांना परवानगी होती ...पणं काही झालं तरी आपण पाहायचं त्याचा डान्स तेही कार्यक्रम होण्या आधीच अस जानू ठरवते ..मग काय ...सिनियर ची एक मुलगी नुकतीच तिची मैत्रीण झाली होती ..ती तिला रिक्वेस्ट करते की plz मला ही पहायची आहे प्रॅक्टीस फक्त एकदा मला तिथे घेऊन चल..मग ती ही तयार होते..समीर प्रॅक्टीस मध्ये बिझी असतो ..जानू आलेली त्याने पहिलेलच नसत..त्याचा डान्स चालू असतो  ..जानू ला तर विश्वास च बसत नाही की समीर इतकं छान डान्स करतो ..तिला तर वाटलं होत ..लग्नात वरती समोर केला जातो तसा त्याचा डान्स असेल ..पणं समीर एखाद्या प्रोफेश नल डान्स र सारखं डान्स करताना पाहून जानू खूप चकित होते.  समीर डान्स मध्ये मग्न असतो ..त्याला अचानक समोर जानू  दिसते तसा तो दचकतो ..पणं आपला भास असेल म्हणून तो नजर वळवतो ..पणं त्याला पुन्हा त्याच दिशेला पाहिल्याशिवाय राहवत नाही ..जेव्हा तो परत पाहतो तेव्हा ..अजून हि खरंच जानू समोर असते ..मग त्याला विश्वास बसतो की ती खरंच तिथे आली आहे ..मग काय डान्स मध्ये त्याचं लक्षच लागेना तो सारखा सारखा जानू कडे पाहू लागला अधून मधून आणि त्याचे स्टेप्स चुकायला लागले ..जानू ने त्याला एक smile दिली व ती तिथून निघून गेली..तिच्या लक्षात आलं होत की समीर चुकत आहे त्यामुळे त्याचं लक्ष विचलित होयला नको म्हणून ती तिथून बाहेर आली .

समीर ला मात्र तिला पाहून खूप आनंद झाला होता..ती लगेच गेली हे पाहून वाईट ही वाटलं..त्याने पुन्हा कॉलेज मध्ये येऊन पाहिलं तर जानू घरी गेली होती ..तो ही घरी गेला ..आणि पाहिलं जानू ला मॅसेज केला.

समीर : हाय.

जानू: हा ,बोल.

समीर : काय मॅडम आज डायरेक्ट हॉल मध्ये आलात ?

जानू : हो,तुला surprise द्यावं म्हटल ..पणं

समीर : पणं काय ?

जानू: तूच मला surpise दिलास ..किती छान डान्स करतो तू ?

समीर : तुझं आपल काही तरच ..येतो तसा करतो ग.

जानू : अरे नाही खरंच पाहिलं मी फक्त ऐकल होत तू छान डान्स करतो पण आता मी स्वतः पाहिलं.

समीर : बस ..हा किती तारीफ आता.

जानू : हो ,तू तर कधी कोणाची करत नाहीस ..आणि तुझी ही केलेली चालत नाही तुला ?

समीर : ये ,मला असल कोणाची तारीफ करणं वगैरे अजिबात जमत नाही .

जानू : धन्य ,महाराज . बर चल बाय मला काम आहे नंतर बोलू.

समीर : ok bye.

सांस्कृतिक कार्यक्रम होतो ..समीर चा डान्स तर खूपच छान होतो ..त्यात त्याची एक क्लासमेट समीर च्या खूप मागे पुढे करत असते ..आणि समीर ही खूप प्रेमळ पने तिच्या सोबत बोलत असतो ..हे पाहून ना जाणे का जानू ला खूप राग येतो .

क्रमशः

Rate & Review

Prajkta Yesane

Prajkta Yesane 3 months ago

Prakash Gonji

Prakash Gonji 5 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 5 months ago