Janu - 21 in Marathi Love Stories by vidya,s world books and stories PDF | जानू - 21

जानू - 21

जानू आणि समीर ची प्रेम कहाणी आता बहरू लागली होती..आता बराच वेळ ते गप्पा मारायचे ..किती बोलायचे हे त्यांचं त्यांनाच ठाऊक नसेल..पणं सकाळी उठल्या पासून रात्री हातात तून फोन खाली पडू पर्यंत यांचं बोलणं चालूच राहायचं..समीर ला झोप खूपच प्रिय ..त्यामुळे तो बोलता बोलता कधी झोपी जात असे हे त्याला ही कळत नसे..पणं जानू मात्र बडबड करतच असायची ..आणि समीर झोपला कळलं की खूप राग यायचा तिला..हा साध सांगून ही झोपत नाही..मी एकटीच बडबडत बसते.
आज कॉलेज ला जाताना फारच उशीर झाला होता त्यात तिने गडबडीने केसांची वेगळीच स्टाईल केली...तिला ती स्टाईल अजिबात आवडत नसे..पणं नाइलाज आज उशीर जो झाला होता..पणं समीरने जेव्हा तिला पाहिलं..त्याला ती स्टाईल इतकी आवडली की रोजच अशी स्टाईल करत जा अस त्याने आवर्जून सांगितलं तिला..मग काय ? न आवडणारी स्टाईल ही तिला आता खूपच आवडू लागली..कधी कधी तरी ती तसे केस बांधायची ..आणि समीर मात्र तिला पाहत राह त असे.
अधून मधून ते भेटत ..कॉलेज मध्ये तर रोजच सोबत असत पणं त्यांना निवांत बसूंन बोलता येत नसे..आज ही ते भेटले होते..समीर जानू ला आज दुर्गा मातेच्या मंदिरात घेऊन गेला होता.

मंदिर थोड उंचावर होत.. पायऱ्या चढून दोघे वर गेले.. मंदिरा भोवती एक प्रदशिणा काढली..नंतर दोघे ही देवी ला नमस्कार करत होते की ..जानू ने हळूच एक डोळा उघडून ..समीर कडे पाहिलं..आणि नंतर हात जोडून तिने देवीला प्रार्थना केली. .आई ..आज आम्ही दोघे आलो आहोत ..पुढच्या वेळी जोडीने दर्शन करायला येऊ दे ..या समीर ला थोडी अक्कल दे..खूपच राग राग करतो ..पणं खूप चांगला आहे.आम्हाला नेहमी सोबत ठेव आई..तिने डोळे उघडले..समीर च दर्शन झालं..होत..

समीर : काय ग इतकं काय मागत होतीस देवीला ?

जानू त्याच्या बोलण्यावर हसली.

जानू : ते टॉप सिक्रे ट आहे ..

समीर : मला नाही सांगणार ?

जानू : नाही..ते सांगितलं ना देवीला ..आणि ते पूर्ण झालं की सांगेन तुला..

समीर : तुम्हा मुलींचं मला काही कळतच नाही ..जावू दे ..चल थोडा वेळ बसू ..किती छान आणि शांत वाटत इथे..मी कधी कधी येतो मित्रान सोबत इथे .

जानू : हा छान वाटत..प्रसन्न आहे इथलं वातावरण..
दोघे ही तिथेच बसली होती की एक मुंगी येऊन समीरच्या शर्ट वर बसते..जानू ते पहाते ..आणि हळूच तिला काढून हातात घेते..समीर ते पाहतो.

जानू : काय ग ? त्याच्या शर्ट वरती कशाला गेली स? तो माझा समीर आहे ..कळलं का ?तू मुंगी असलीस तरी त्याच्या जवळ जायची तुला परवानगी नाही.
अस म्हणून जानू त्या मुंगीला लांब सोडते.
जानू अस करताना पाहून समीर मात्र खूप हसत असतो...आणि हळूच तुझा समीर काय ? म्हणून जानू च्या हाताला एक चिमटा काढतो..जानू ला दुखत ..

जानू : एक तर मी तुला मुंगी पासून वाचवलं आणि तू उलट मलाच चिमटा काढतोस ?
अस म्हणून जानू रुसते ..
समीर : बर sorry ..
अरे विसरलोच बाईक ला एक बॅग अडकवली आहे त्यात आईस क्रीम आणल होत ..चल लवकर नाही तर आईस क्रीम च सरबत तयार होईल.
आईस क्रीम च नाव काढलं तर जानू लगेच खुश होऊन त्याच्या मागे जाते पणं ती हळु हळू चालत असते की समीर तिच्या हात ओढून आपल्या सोबत यायला सांगतो व तिचा हात धरुन एक एक पायरी चालू लागतो..जानू तर खूपच खुश होते..बॅग मधून आईस क्रीम काढून पहिलं तर ते अजून ही वितळलेले नसत ..समीर एक तिला देतो व एक स्वतः घेतो..लवकर खा ..नाही तर वितळेल..
जानू लगेच खायला चालू करते पणं समीर मात्र आपल आईस क्रीम उघडतो व जानू च्या तोंडा पुढे धरतो..

जानू : अरे मी काय दोन दोन खाऊ?तू खा ना तुझ.

समीर : हो ग खातो पणं एक बाईट खा ना तू .

जानू : ये काही पणं ह..मला पागल पोरी बोलतोस आणि तू काय हे पागल सारखा करतोस ?

समीर : तू खाणार की नाही ?

समीर थोडा रागावतो च ..ते पाहून जानू ला कसं तरीच वाटत ..बर बर दे खाते म्हणून त्याच्या आईस क्रीम चा एक बाइट जानू खाते.. व बाकी समीर ला देते..समीर जानू कडे पाहत हसत असतो.

जानू : अस काय पाहतोस ? मी नाही देणार माझं आईस क्रीम तुला ..

समीर तर हे ऐकुन हसतच राहतो..
समीर : हावरी कुठली.

जानू : ह..

समीर तिला पाहत असतो ..त्याचं आईस क्रीम केव्हाच संपलं होत पणं जानू च अजून चालूच होते ..तो तिला एक टक पाहत असतो...
समीर : किती छान आईस क्रीम खातेस ग तू ? लहान मूल ही खात नसतील अस ..
अस म्हणून तो जानू ला जवळ ओढतो आणि उचलून गोल गोल फिरवतो ..जानू ला काही कळायच्या आधीच समीर ने अस केलं तिला तर सावरायला ही वेळ मिळाला नाही तोल जाऊन पडते की काय असं वाटलं तिला पणं समीर ने तिला घट्ट पकडून ठेवलं होत आणि गोल गोल फिरवत होता..या नादात तिचं थोडंसं शिल्लक असलेलं आईस क्रीम खाली पडलं..

जानू : समीर सोड ना बघ आईस क्रीम ही पडलं.

समीर : पडू दे ग पुढच्या वेळी मी तुला जास्त आणून देईन .

जानू ला काय बोलावं तेच कळेना ती लाजून लाल झाली होती आणि समीर तिच्या कडे पाहून हसत होता..मग हळूंच त्याने तिला खाली उतरवले व चल जावू उशीर होत आहे बोलला..

क्रमशः.


Rate & Review

Mansi Gaikwad

Mansi Gaikwad 9 months ago

uttam parit

uttam parit 9 months ago

Vaishali Kamble

Vaishali Kamble 9 months ago

Dipali Bakale

Dipali Bakale 9 months ago

I M

I M 9 months ago